
Minister of Higher & Technical Education, Parliamentary Affairs - Govt Of Maharashtra | MLA Kothrud | BJP | RSS | Former President @bjp4maharastra
Maharashtra, India
Joined August 2014
- Tweets41.1K
- Following198
- Followers35K
- Likes5.7K
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!
आप स्वस्थ और दीर्घायु रहें, ईश्वर से यही कामना करता हूं।
#ओम_बिरला
#Om_Birla
@ombirlakota @BJP4India
देशाप्रती समर्पण, शिस्त, साहस आणि कर्तव्यनिष्ठेची भावना जपणाऱ्या सर्व उत्साही व समर्पित एनसीसी छात्रसैनिकांना, प्रशिक्षकांना तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय छात्र सेना (NCC) स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#NCCDay #NCCIndia #राष्ट्रीयछात्रसेना
316
Chandrakant Patil retweeted
धृतिर्दाक्ष्यं संयमो बुद्धिरग्र्या धैर्यं शौर्यं देशकालोऽप्रमादः।
स्वल्पस्य वा महतो वापि वृद्धौ धनस्यैतान्यष्ट समिन्धनानि।।
Modi govt is shaping a green future for every Indian by planting trees across India. Gladdened to see the Rudraksha sapling planted at Lok Bhawan campus in Arunachal Pradesh in February 2020 become a fully grown tree.
Today planted a Red Sandalwood tree for an even better tomorrow.
मल्लविद्येच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पैलवान दिलीप सूर्यवंशी यांचे काल दुःखद निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवंगत दिलीप सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी शोकाकुल सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या दुःखात सहभागी झालो.
त्यांचे जाणे हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींसाठी अत्यंत वेदनादायी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि परदेशी कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, ही प्रार्थना.
ॐ शांती!
📍२२ नोव्हेंबर २०२६ | सांगली
#सांगली #Sangli
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
आज कोल्हापूर येथे अन्न प्रक्रिया आणि पॅकेजिंग उद्योगातील नवे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि व्यवसाय वाढीच्या संधींची माहिती स्थानिक उद्योजकांना व्हावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘आयएफएफई एक्स्पो २०२६’ (IFFE Expo 2026) या प्रदर्शनाचे उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात बाजारात रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. या एक्स्पोमुळे अन्न प्रक्रिया आणि पॅकेजिंग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि व्यवसाय विस्ताराच्या नव्या संधी उद्योजकांना एकाच ठिकाणी पाहता व समजून घेता येत आहेत, हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी एक्झिफेरन्स मीडिया आणि नेक्स्पोस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व प्रमुख पदाधिकारी व नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍२२ नोव्हेंबर २०२६, कोल्हापूर
#IFFEExpo2026 #Kolhapur #FoodProcessing #PackagingIndustry #Entrepreneurship
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
आज कोल्हापूर येथील क्रीडा संकुल रोडवरील देशभक्त रत्नाप्पा कुंभार स्थापित 'काऊन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटी'च्या मुलींच्या वसतिगृहाच्या नवनिर्मित तिसऱ्या मजल्याचा लोकार्पण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.
ग्रामीण भागातून कोल्हापुरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची निवास व्यवस्था या वसतिगृहात करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थिनींच्या वाढत्या संख्येमुळे उपलब्ध खोल्यांची संख्या अपुरी पडत होती. ही निकड लक्षात घेऊन लोकसहभागातून वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती. त्यानुसार हे बांधकाम विहित वेळेत पूर्णत्वास नेण्यात आले.
लोकसहभागातून साकारलेल्या या विस्तारित वास्तूमुळे ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाची सोय अधिक सुकर होणार आहे.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, प्रसाद मगदूम, डॉ. विश्वनाथ मगदूम, ॲड. वैभव पेडणेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
📍 २२ नोव्हेंबर २०२६ | कोल्हापूर
#Kolhapur #CouncilOfEducationSociety #RatnappaKumbhar #GirlsHostel #EducationForAll #WomenEmpowerment
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
आज कोल्हापूर येथे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सागर चित्तरंजन बगाडे यांच्या ३० वर्षांच्या शैक्षणिक सेवापूर्तीनिमित्त आयोजित सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्यास उपस्थित राहून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अध्यापनाच्या माध्यमातून पिढी घडवतानाच सागर बगाडे यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील संघर्ष, विचार आणि सुवर्ण आठवणींचा वेध घेणाऱ्या ‘अथांग… एका मास्तराची चित्तरकथा’ या महागौरव ग्रंथाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, खासदार धनंजय महाडिक, आमदार कौस्तुभ शुभांगी मुरलीधर गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
📍२२ नोव्हेंबर २०२६, कोल्हापूर
#Kolhapur #SagarBagade #30YearsOfTeaching #NationalAwardTeacher #GratitudeCeremony #BookRelease #Athang
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @dbmahadik @gawade_kaustubh #Sagar_Bagade
भावपूर्ण श्रद्धांजली!
खाटूश्यामजींचे दर्शन घेऊन परतत असताना राजस्थानमधील कोटा-उदयपूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात धुळे जिल्ह्यातील ९ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि हे अपार दुःख सहन करण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
या अपघातातील जखमींवर योग्य उपचार सुरू असून, त्यांना लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करतो. या दुःखद प्रसंगी मी सर्व पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
ॐ शांती!
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा…
काळ वेगाने बदलत आहे. आगामी काळात कौशल्यालाच सर्वाधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. ज्यांच्याकडे योग्य कौशल्य, ज्ञान आणि क्षमता असेल, त्यांच्यासाठी संधींची कधीही कमतरता भासणार नाही.
— मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
भावपूर्ण श्रद्धांजली!
भाजपाचे राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांच्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालेल्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष, माजी विधान परिषद सदस्य आणि राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनात दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. धनगर समाजाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी केलेले कार्य तसेच संघटनात्मक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय होते.
ईश्वर दिवंगत रामरावजी वडकुते यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो, ही प्रार्थना.
ॐ शांती!
सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ पैलवान दिलीप सूर्यवंशी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. कुस्ती क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि क्रीडाप्रेमींशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते सदैव स्मरणात राहील.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, ही प्रार्थना!
ॐ शांति!
रक्तदान हेच श्रेष्ठ दान; सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम!
भाजपा कोथरूड उत्तर मंडलाचे सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर यांच्या संयोजनातून आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांच्या या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.
रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला जीवनदान देण्याचे अमूल्य कार्य आहे. समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून अशा उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी केले.
याप्रसंगी भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा नेते लहु बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, निकीता माथाडे, जागृती विचारे, मृणाल गायकवाड, स्मृती जैन, वंदना सिंह, अनिकेत चांदेरे, रोहन कोकाटे, सचिन दळवी, सचिन पाडाले, महेश कुंटुरकर, सोहम मुरकुटे, श्रेयस जाधवर, प्राजक्ता देवस्थळी यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
📍२१ नोव्हेंबर २०२६ | पुणे
#BloodDonation #रक्तदान #BJP #Kothrud #SocialResponsibility
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
भविष्याची केवळ प्रतीक्षा करणारा नव्हे, तर आपल्या सामर्थ्याने भविष्य घडवणारा भारत! 🇮🇳
This is the power of New India!
आत्मविश्वास, नवकल्पना आणि विकासाच्या बळावर नव्या भारताची दमदार वाटचाल!
#NewIndia #ViksitBharat #IndiaRising #DigitalIndia #GrowthStory
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
प्राणीमात्रांमध्ये सद्भावना नांदो आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण होवो!
-मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
#PMModi
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
रत्नागिरीतील ज्येष्ठ नेते, पत्रकार आणि समाजसेवक वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
'सत्यशोधक' साप्ताहिकाच्या माध्यमातून पाच दशकांहून अधिक काळ पत्रकारितेची सेवा, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून ग्रामीण विकासासाठी केलेले कार्य आणि केंद्रीय नारळ विकास मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कोकणातील नारळ उत्पादकांसाठी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्यही मोलाचे राहिले.
त्यांच्या निधनाने कोकणच्या विकासासाठी समर्पित असलेले अनुभवी नेतृत्व आपण गमावले आहे.
राजाभाऊ लिमये यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
ॐ शांति!
युवा प्रतिभेला प्रोत्साहन देणारे व्यासपीठ!
आज पुणे येथे रोटरी क्लबच्या वतीने आयोजित ‘रोटरी रोट्रॅक्ट यूथ फेस्टिव्हल’चे उद्घाटन केले.
युवकांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्यातील नेतृत्वक्षमता, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव अधिक समृद्ध करणारा हा महोत्सव आहे. अशा उपक्रमांतून युवकांना आपल्या क्षमता सिद्ध करण्याची आणि नव्या संधींची क्षितिजे खुली करण्याची संधी मिळते. या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व युवा मित्रांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
या कार्यक्रमास रोटरीचे जिल्हा संचालक संतोष परदेशी, नितीन ढमाले, प्रा. डॉ. करिश्मा आवरी, दीपक शिकारपूर, मानसी ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
📍२१ नोव्हेंबर २०२६ | पुणे
#RotaryClub #RotaractYouthFestival #YouthPower #Pune #पुणे
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
आयआयटी खरगपूरच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आज अमृतमहोत्सवी सोहळ्यातून गौरव होत आहे. भारताच्या परिवर्तनाच्या प्रवासात देशातील पहिली आयआयटी म्हणून या संस्थेने शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
-मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
#IITKharagpur #PlatinumJubilee #75YearsOfIITKGP #Education #Innovation #ViksitBharat #AmritKaal
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
पुण्यातील नियोजित कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून उपराष्ट्रपती मा. श्री. सी. पी. राधाकृष्णनजी पुढील प्रवासासाठी पुणे विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांची भेट घेऊन पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्माजी उपस्थित होते.
📍२१ नोव्हेंबर २०२६ | पुणे
#VicePresidentOfIndia #CPRadhakrishnan #Pune #PuneVisit
@CPR_VP @Jishnu_Devvarma
आरोग्यसेवा अधिक सक्षम, आता नव्या रूपात!
कोथरूडकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरू केलेला ‘मोफत फिरता दवाखाना’ हा उपक्रम आता अधिक आधुनिक आणि अद्ययावत सुविधांनी सज्ज झाला आहे.
आरोग्यसेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचा विस्तार करत, अधिक सोयीसुविधांसह तो नव्या स्वरूपात आपल्या सेवेत दाखल होत आहे.
कोथरूडकरांचे आरोग्य, हीच माझी प्राथमिकता!
#Kothrud #आरोग्यसेवा #मोफतफिरतादवाखाना
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @BJP4PuneCity





















































































