गडांचा मान, संविधानाचा सन्मान!
राष्ट्रीय संविधान सन्मान दिन विशेष उपक्रम
२६ नोव्हेंबर २०२६
📍स्थळ: किल्ले रायगड
@isiddheshRkadam
#GadanchaMaanSamvidhanachaSanman #ChhatrapatiShivajiMaharaj #DrBabasahebAmbedkar #MPCB #SiddheshKadam
1
109
मा. श्री सिद्धेश कदम जी, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून 'नाला पाणी शुद्धीकरणाच्या तंत्रज्ञानासंदर्भात' महत्त्वपूर्ण बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीत मा. श्री. सिद्धेश जी यांनी संबंधित विषयाचा आढावा घेऊन आवश्यक निर्देश दिले. याप्रसंगी मंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
--------------
Hon. Shri Siddhesh Kadam, Chairman, Maharashtra Pollution Control Board (MPCB), presided over a crucial online meeting organized by MPCB regarding 'Nallah Water Purification Technology'. During the meeting, Hon. Shri Siddhesh Ji reviewed the concerned subject and issued necessary directives. Relevant officials of the Board were also present on this occasion.
@isiddheshRkadam
#MPCB #SiddheshKadam
100
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून गड-किल्ल्यांवर साजरा होणार राष्ट्रीय संविधान दिन!
@mieknathshinde @isiddheshRkadam
#MPCB #eknathshinde #siddheshkadam
1
114
मा. श्री. सिद्धेश कदम जी, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची मंडळाच्या कार्यालयात ई - निर्माल्य संस्थेचे संस्थापक डॉ. समीर कोलते, राजेश डोळस आणि रितू कोलते यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी ई - कचरा व्यवस्थापणाबाबत चर्चा झाली
____________
Founders of the E-Nirmalya Foundation Dr. Sameer Kolte, Rajesh Dolas, and Ritu Kolte meet to Hon'ble Shri Siddhesh Kadam Ji, Chairman, Maharashtra Pollution Control Board, at the MPCB office today. Discussions were held regarding e-waste management during the meeting.
@isiddheshRkadam
#MPCB #SiddheshKadam
मा. श्री. सिद्धेश कदम जी, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी जीआयएस, उपग्रह प्रतिमा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजनांसंदर्भात तांत्रिक सादरीकरण पार पडले. या बैठकीत मा. सिद्धेश जी यांनी संबंधितांना योग्य ते निर्देश दिले. याप्रसंगी इएसआरआयचे आणि मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
———————
A technical presentation on leveraging GIS, satellite imagery, and Artificial Intelligence (AI) for monitoring river water quality was held today at the Maharashtra Pollution Control Board (MPCB) office in the presence of Hon'ble Shri Siddhesh Kadam Ji, Chairman, MPCB. During the review, he issued necessary directives to the concerned teams for effective implementation. Officials from Esri and MPCB were present at the meeting.
@isiddheshRkadam
#MPCB #SiddheshKadam
1
4
374
विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार !
@mieknathshinde @isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #SiddheshKadam #MPCB
🤖 Made with AI
161
वारीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश !
@mieknathshinde @isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #SiddheshKadam #MPCB
🤖 Made with AI
139
संकल्प 'सुजलाम सुफलाम' महाराष्ट्र घडवण्याचा !
@isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #SiddheshKadam #MPCB
1
154
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा नवा प्रयोग ! डीप क्लीनिंग मशीन !
@mieknathshinde @isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #SiddheshKadam #MPCB
151
भक्ती आणि लोककलेतून पर्यावरण रक्षणाचा जागर!
पंढरपूर येथे ‘कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी, पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी’ हा पर्यावरण जनजागृती सोहळा आणि सोलर-पॉवर बसेसचे लोकार्पण उत्साहात पार पडले. पारंपरिक लोककला आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत पर्यावरणपूरक महाराष्ट्राचा संकल्प!
@mieknathshinde @isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #EknathShinde #SiddheshKadam #MPCB
1
143
पंढरीत रंगला भक्ती आणि निसर्ग रक्षणाचा अनोखा संगम!
मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सिद्धेश कदम जी, व सदस्य सचिव मा. श्री. राहुल रेखावार जी (भा.प्र.से.) यांच्या समवेत पंढरपूर येथे ‘कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी, पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी’ हा पर्यावरण जनजागृती सोहळा आणि सोलर-पॉवर बसेसचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले.
लोककलेच्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर महाराष्ट्राचा संदेश देणारा हा पर्यावरणपूरक उपक्रम होता!
@mieknathshinde @isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #EknathShinde #SiddheshKadam #MPCB
154
प्रदूषण नियंत्रणात महाराष्ट्राची मोठी कामगिरी !
@isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #SiddheshKadam #MPCB
🤖 Made with AI
1
1
226
प्रदूषण नियंत्रणासाठी तंत्रज्ञान व संस्कृतीचा संगम !
@isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #SiddheshKadam #MPCB
🤖 Made with AI
1
156
दुष्काळाच्या संकटामुळे, पर्यावरण संवर्धनाची जाणीव !
@mieknathshinde @isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #SiddheshKadam #MPCB
124
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित 'कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी' या कार्यक्रमात मंडळाचे सदस्य सचिव श्री. राहुल रेखावार जी (भा.प्र.से.) यांनी सिंगल-युज प्लास्टिक टाळून 'रियूज, रिसायकल आणि रिपेअर' ही त्रिसूत्री अंगीकारण्याचे तसेच वृक्षारोपणातून निसर्गाशी नाते घट्ट करण्याचे आवाहन केले.
#KartikiEkadashi #PandharpurWari #SiddheshKadam #MPCB
2
193
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित 'कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी' या कार्यक्रमात मा. श्री. सिद्धेश कदम जी, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना लहान वयातच पर्यावरण रक्षणाचे धडे देणे आणि एआय (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानासोबतच वारीसारख्या पारंपरिक माध्यमातून आपली संस्कृती व निसर्ग जपणे, या मंडळाच्या महत्त्वपूर्ण कार्याचा विशेष उल्लेख केला.
@isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #SiddheshKadam #MPCB
1
102
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पंढरपूर येथे 'कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी' या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मा. श्री. एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
@mieknathshinde @isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #EknathShinde #SiddheshKadam #MPCB
1
59
कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी,
पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेला ‘कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी - पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी’ हा पर्यावरणविषयक जनजागृती सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी, यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सिद्धेश कदम जी, सदस्य सचिव मा. श्री. राहुल रेखावार जी (भा.प्र.से.) यांच्या समवेत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी यांनी विठुरायाच्या भक्तीसोबतच निसर्गाचे रक्षण करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पर्यावरण जनजागृतीसाठी मंडळाने सुरू केलेल्या सोलर-पॉवर बसेस, शालेय विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे अॅनिमेटेड व्हिडिओ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर तसेच पंढरपूर स्वच्छ ठेवण्यासाठी राबविलेल्या 'डीप क्लीन ड्राईव्ह' उपक्रमाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. भारूड, पोवाडा व कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी आणि तरुण पिढीपर्यंत स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीचा संदेश पोहोचवून प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्याला राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले जी, माजी मंत्री श्री. सिद्धाराम म्हेत्रे जी, आमदार श्री. अभिजित पाटील जी, आमदार श्री. राजू खरे जी, माजी आमदार श्री. शहाजीबापू पाटील जी, माजी आमदार श्री. संजय कदम जी, पंढरपूरच्या नगराध्यक्षा श्रीमती प्रणिता भालके जी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी आणि वारीचे संयोजक श्री. संजय भुस्कुटे जी, महाराष्ट्र कला संस्कृती मंच अध्यक्षा सौ. शैलजा खांडगे जी, लोककलांचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे जी, यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि बहुसंख्येने वारकरी बांधव उपस्थित होते.
@isiddheshRkadam @mieknathshinde @ibharatgogawale
#KartikiEkadashi #PandharpurWari #EknathShinde #SiddheshKadam #MPCB
कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी,
पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित ‘कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमात मा. श्री. एकनाथजी शिंदे जी, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व मा. श्री. सिद्धेश कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मा. श्री. राहुल रेखावार (भा.प्र.से.) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण जनजागृती करणाऱ्या ५ विशेष जनजागृती वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच पर्यावरण रक्षणाचे संस्कार रुजवण्यासाठी ही जनजागृती वाहने संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहेत. आकर्षक चित्रे, LED स्क्रीनवरील व्हिडिओ आणि ‘वसुंधरा जपा, पर्यावरण संवर्धन करा’ असा संदेश देणाऱ्या लहान मुलीच्या मॅस्कॉटच्या माध्यमातून दैनंदिन पर्यावरणपूरक सवयींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. उद्याच्या पिढीला निसर्गाशी जोडणारा आणि स्वच्छ, हरित महाराष्ट्राचा पाया मजबूत करणारा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.
याप्रसंगी मा. श्री. भरतशेठ गोगावले, मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. शहाजीबापू पाटील, माजी आमदार, मा. श्री. अभिजित पाटील, आमदार, माढा विधानसभा,, मा. श्रीमती प्रणिता भालके, नगराध्यक्षा, पंढरपूर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
@mieknathshinde @isiddheshRkadam @ibharatgogawale
#EnvironmentalAwareness #SiddheshKadam #MPCB
1
2
196










































