Constitutional Law practice.Enabling access to justice for all. Dealing with Criminal,Family, Environment cases. Writer, Law-Policy-Constitutionalism Analyst

Maharashtra
Joined June 2009
ऑडिओ क्लिप प्रकरणात FIR होऊ शकते? वकिलांकडून कायद्याचं विश्लेषण youtu.be/7eCmn5sRIhU?si=O-6X… via @YouTube वरील व्हिडीओ नक्की बघा आणि सबस्क्राईब करा.
7
1
62
1,491
Utterly ridiculous! What is the ECI hiding???
🚨EC cites “trade secrets and commercial confidence” to deny info about software used for SIR. It also says divulging information on who reviews flagged anomalies might “endanger” their lives. Reiterates that EROs remain the statutory authority to prepare rolls. @htTweets
15
141
1
412
6,696
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून टोरेंट प्रकल्प 20 किमी अंतरावर आणि वन्यजीव अभयारण्य 15.53 किमी अंतरावर आहे व इकोसेन्सेटिव्ह झोन बाहेर सगळं प्रोजेक्ट आहे. प्रकल्पासाठी पर्यावरण व वन विषयक परवानग्या 18 महिन्यात कायदेशीर प्रक्रिया करून पूर्ण केल्या हे मुख्यमंत्र्यांनी सांगणेच आजचे मोठे ' फेक नॅरेटिव्ह' आहे. स्थळ पाहणी, कॉस्ट-बेनिफिट ऍनालिसिस,पर्यावरणीय अभ्यास, पर्यावरणीय आघात मूल्यांकन, जनसुनावणी, एक्सपर्ट समित्यांकडून छाननी या सगळ्या प्रक्रियांमध्ये बदमाशी व बेकायदेशीरता आहे. बरीच कागदपत्रेच सार्वजनिक न करणे ही लपवेगिरी याचे एक उदाहरण आहे. 4 महिन्यांपूर्वी टोरेंट प्रोजेक्टबाबत आक्षेप असलेले लोक माझ्याकडे आले परंतु संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध नाहीत व हरित न्यायालयात गेल्यास तिथे प्रक्रियाशूर न्यायाधीश आहेत पर्यावरणपूरक दृष्टिकोन वापरण्यात ते अशक्त आहेत त्यामुळे आम्ही थांबलो होतो. केवळ या प्रकल्पाची महती मुख्यमंत्र्यांनी सांगू नये, आजूबाजूच्या अनेक प्रकल्पांचे अस्तित्व आणि आता हा नवा टोरेंट यांचा एकत्रित परिणाम आणि आवश्यकता याबाबत बोलावे. आहे का हिंमत झाडतोड्या प्रवृत्तीची?
16
234
4
1,083
21,423
निवडणुकांचा घोळच नाही तर लोकशाही यंत्रणांना ताब्यात घेणे ही दरोडेखोरी आहे. सत्तेचा इतका दुरुपयोग यापूर्वी कधीही झाला नाही. Asim Sarode | Gyanesh Kumar | ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर सरोदें... youtu.be/DdBrARrRPTw?si=uK14… via @YouTube
4
4
77
1,645
आज कोल्हापूर येथे.
🤖 Made with AI
1
31
1,283
अभिजित दिपकेचा भारतातील पहिला कार्यक्रम पुण्यात झाला. कॉक्रोच जनता पार्टीच्या पहिल्या पत्रकार परिषदेच्या आधी मी आणि विश्वम्भरने अभिजितला गांधी आणि आंबेडकर यांची एक AI जनरेटेड इमेज भेट दिली. गांधी आणि आंबेडकर ही वैचारिक ताकद सोबत असेल तर भारतात परिवर्तन शक्य आहे आणि हुकूमशाह केवळ गांधी व आंबेडकर या कॉम्बिनेशनला घाबरतात हे सिद्ध झाले. आम्ही दिलेली फोटो फ्रेम nantr जंतरमंतर आंदोलनाच्या स्टेजवरील महत्वाचा विचार ठरली.
63
144
9
1,379
48,998
पक्षाचं नाव चोरून मिळवलेली ओळख घेऊन सत्तानाथ यांचा हा शेवटचा दसरा मेळावा ठरला, तर आश्चर्य वाटायला नको! आधी पक्षचोरी, मग निवडणुकीतल्या कथित गैरप्रकारांचे प्रयोग आणि आता सत्तेच्या नाटकाचा अखेरचा अंक! लोकशाहीच्या रंगमंचावर सगळे प्रयोग यशस्वी झाले असं वाटत असलं, तरी न्यायालयाचा पडदा सत्तेचा खेळ संपवेल, हे अजून बाकी आहे! कारण सत्ता कितीही मोठी असली, तरी लोकशाहीत अंतिम शब्द सत्तेचा नसतो—तो संविधानाचा आणि न्यायाचा असतो!
18
99
1
948
20,460
🤖 Made with AI
3
9
1
64
2,472
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात माझा काडीचाही संबंध नसतांना माझे नाव उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संजय राऊत, अनिल देशमुख, अखिल चित्रे, वरुण सरदेसाई यांच्यासह प्रतिवादी म्हणून मानहानीचा खटल्यात का घालण्यात आले? मला काहीच उलगडा होत नाहीये. माझा तर या प्रकरणाशी मुळीच संबंध नाही शिवाय इतर कुणाचाही काही संबंध असेल असे मला वाटत नाही. उद्धव ठाकरे साहेबांची कमाल आहे की पक्षफुटीपासून तर अशा कितीतरी आरोपांपर्यंत अनेक गोष्टींचा व गलिच्छ राजकारणाचा सामना ते अत्यंत शांतपणे व ताकदीने करीत आहेत. दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य सात जणांविरोधात मानहानीचा अशी काहीतरी केस ठाणे कोर्टात दाखल झाल्याचे मला फ्रीप्रेस जर्नल च्या बातमीतून कळले. आज २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे म्हणतात. कायद्याचा वापर न्याय मिळविण्याचे साधन म्हणून करावा परंतु इतरांना जखमी करण्यासाठी शस्त्र म्हणूनच कायदा वापरण्यामागील प्रेरणा काय असतात हा संशोधनाचा विषय आहे.
21
113
1
1,048
38,559
शहाणपणाचाच दुष्काळ आहे. 18 कोटी रुपये खर्च करुन दुष्काळ असतांना दुष्काळी भागात वृक्षारोपण.शेतकरी मरत असतांना कुंभमेळा जोरदार करणारच असा दुराग्रह ठेवणाऱ्या मूर्ख सरकारकडून अजून काय अपेक्षा करणार? भर दुष्काळात लावलेली 18 कोटीची रोपे करपून मेली.
9
196
4
1,097
12,737
भारत विरुद्ध भाजप तिरंगा विरुद्ध भाजपचा दुरंगा देशभक्ती विरुद्ध पक्षभक्ती असा सामना आता सुरु झालेला आहे. 🇮🇳
79
96
7
881
12,288
'प्रहार दी अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्वल निकम' या सिनेमाचे शो लावण्यासाठी अनेक बार असोसिएशन च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांना सतत आग्रहाने सांगितले जातेय. शिवाय काही आमदारांना शो साठी सिनेमा थिएटर बुक करा, प्रेक्षक भरा असेही सांगितले जातेय व हे होणे अपेक्षितच होते. असो. पोलिसांचे शोर्य व पोलिसांनी अथक मेहनत घेऊन केलेला तपास याआधारे नराधम कसाब फाशीची शिक्षाच झाली असती. कसाबला फाशी म्हणजे पोलीस इन्वेस्टीगेशन ची व्हिक्टरी आहे.
22
59
4
642
32,097
खालील बातमी बघा. नाशिकमध्ये पिवळे पाणी व त्यामुळे कँसर चा धोका. याकडे लक्ष द्या, कुंभमेळा अनावश्यक आहे. instagram.com/reel/Debl8f9gR…
5
27
1,797
मला सुद्धा वाटले होते कि 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत शिवसेना पक्ष, पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि अपात्रता याबाबतची सुनावणी संपेल आणि दिवाळीपूर्वी निकाल लागेल.परंतु कदाचित दिवाळीनंतरच निकाल लागेल असे आता वाटतेय कारण जेष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी शिंदेसेने तर्फे युक्तिवाद केल्यानांतर आता जेष्ठ वकील ध्रुव मेहता हे सिम्बॉल बाबत युक्तिवाद करतील, जेष्ठ वकील मणिंदरसिंग हे अपात्रतेबाबत म्हणणे मांडतील, जेष्ठ वकील शेषाद्री नायडू हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची बाजू मांडतील, अरविंद दातार सर केंद्रीय निवडणूक आयोगाची बाजू मांडणारा युक्तिवाद करतील आणि नंतर जेष्ठ वकील मुकुल रोहतगी सर सिम्बॉल बाबतचा युक्तिवाद करतील. 16 जणांच्या विरोधातील प्राथमिक अपात्रतेची पिटिशन असल्याने कुणी 4 तर कुणी 5 आमदारांना रिप्रेझेन्ट करीत आहेत. त्यामुळे युक्तिवादासाठी प्रत्येकाला वेळ द्यावा लागणार. जेष्ठ वकील कपिल सिम्बल सरांना वाटते की सगळ्यांचा युक्तिवाद झाल्यावर त्यांना एकत्रित विचार करून तयारी करायला वेळ लागेल आणि नंतर ते एका दिवसात सगळ्यांना उत्तर देणारा शेवटचा युक्तिवाद करतील. त्यामुळे जर न्यायालयाने सलग दुपारी 2.30 नंतरचा संपूर्ण वेळ दररोज या प्रकरणासाठी दिला नाही तर दिवाळी नंतर अंतिम निकाल लागेल असेच दिसते.
62
75
3
951
75,625