भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णक्षण; भारताला मिळाला १०० वा ग्रँडमास्टर!
फिलिपिन्स येथे झालेल्या ७ व्या ASEAN Plus Individual Open Chess Championship स्पर्धेत विजेतेपद पटकावत अनुज श्रीवात्री यांनी भारताचे १०० वे ग्रँडमास्टर होण्याचा ऐतिहासिक मान मिळवला आहे.पहिल्या डावातील पराभवानंतरही खचून न जाता दमदार पुनरागमन करत त्यांनी ९ फेऱ्यांमध्ये ७ गुणांची कमाई केली आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. विश्वनाथन आनंद यांच्यापासून सुरू झालेला भारतीय बुद्धिबळाचा प्रवास आज १०० ग्रँडमास्टरच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. अनुज श्रीवात्री यांचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashtra #Congratulations #बुद्धिबळ #chessgame
दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #HappyDiwali #Diwali2026
Dr Shrikant Lata Eknath Shinde retweeted
सभी देशवासियों को गोवर्धन पूजा की बहुत-बहुत शुभकामनाएं। यह पावन पर्व आप सभी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। सभी के सुख, सौभाग्य और समृद्धि का विस्तार हो, यही मंगलकामना है।
आभीरनगरीप्राणप्रियं सत्यपराक्रमम् ।
स्वभृत्यभयभेत्तारं गोवर्धनधरं भजे ॥
दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #HappyDiwali
#दीपावलीपाडवा
Dr Shrikant Lata Eknath Shinde retweeted
📍जालना
मौजापुरी गावातील अंबादास तांगडे यांच्या घरी आपुलकीची भेट आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीचा शिधा आणि फराळ वाटप.
📍 मौजपुरी, जालना
दुष्काळाचं संकट केवळ शेतातील पिकं हिरावून घेत नाही, तर शेतकरी कुटुंबांच्या जगण्यावरही अनेक प्रश्न उभे करतं. अशा परिस्थितीत सणांचा आनंदही कुठेतरी हरवून जातो. जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथील शेतकरी अंबादास तांगडे यांच्या कुटुंबाची परिस्थितीही अशीच. कुटुंबाचा आधार असलेल्या वडिलांचे छत्र हरवलेल्या या कुटुंबातील एका मुलीच्या डोळ्यांत मात्र आजही मोठं स्वप्न आहे. बारावीत शिकणाऱ्या या मुलीला पोलीस अधिकारी व्हायचं आहे. मात्र, परिस्थिती आणि आर्थिक अडचणींमुळे तिच्या या स्वप्नांना मर्यादा येऊ नयेत, यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.
आज अंबादास तांगडे यांच्या घरी भेट देत साहेबांनी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आपुलकीने संवाद साधला. यावेळी या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची तसेच भविष्यातील विवाहाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. एका लेकीच्या स्वप्नांना आर्थिक अडचणींचा अडथळा येऊ नये, तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळावी, यासाठी दिलेला हा आधार खऱ्या अर्थाने मोलाचा ठरला. यावेळी घरातील तान्ह्या बाळाला कडेवर घेऊन त्याच्याशी लाडाने संवाद साधतानाचा क्षणही या भेटीतील जिव्हाळा संवेदनशीलता दाखवणारा होता. पदाची प्रतिष्ठा बाजूला ठेवून एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांच्यात रमलेले शिंदे साहेबांचे रूप माणुसकीच्या नात्याची जाणीव करून देणारे होते.
दिवाळी म्हणजे केवळ पणत्या लावणे, घर सजवणे आणि फराळाचा आनंद घेणे नव्हे; तर ज्यांच्या आयुष्यात संकटांचा अंधार आहे, त्यांच्या जीवनातही आनंदाचा प्रकाश निर्माण करणे होय. दुष्काळाने चिंताग्रस्त झालेल्या शेतकरी कुटुंबाच्या दारी पोहोचून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे आणि एका लेकीच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारणे, यातून शिंदे साहेबांनी माणुसकीचा खरा दीप प्रज्वलित केला.
#Shivsena #EknathShinde #maharashtra #Diwali #jalna #droughtrelief #farmers
ठाण्याची कन्या शौर्या अंबुरे हिने डकार २०२६ युथ ऑलिम्पिक गेम्समध्ये महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदकाची कमाई करत देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १३.५९ सेकंदांत शर्यत पूर्ण करत तिने १३.७० सेकंदांचा राष्ट्रीय विक्रमही मोडीत काढला आणि नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला आहे. शौर्याची ही कामगिरी केवळ ठाणे जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. तिच्या जिद्दीला, मेहनतीला आणि अथक सरावाला मिळालेली ही यशाची पावती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंग्याचा गौरव वाढवणाऱ्या शौर्याचे मनःपूर्वक अभिनंदन. तिच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. भविष्यातही अशीच उत्तुंग भरारी घेत देशासाठी अनेक पदके जिंकावीत आणि आपल्या कर्तृत्वाने नव्या पिढीसमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण करावा, हीच सदिच्छा.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashtra #Thane #Congratulations
Dr Shrikant Lata Eknath Shinde retweeted
जिथे आपत्ती तिथे शिवसेना !
जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे!
कालची रात्र ठाणेकरांसाठी काळजाचा ठोका चुकवणारी ठरली! सर्वत्र लक्ष्मीपूजनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच ठाण्यातील रहेजा गार्डन परिसरातील १७ मजली रहेजा कार्लाइन इमारतीला भीषण आग लागली. आठव्या मजल्यावर लागलेल्या आगीने काही क्षणांतच १४ व्या मजल्यापर्यंत मजल मारली. आगीचे लोट, धुराचे साम्राज्य आणि घरांमध्ये अडकलेले रहिवासी... अनेक कुटुंबांचा जीव टांगणीला लागला होता.
या संकटाची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचा आढावा घेत बचाव कार्यावर लक्ष ठेवले. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना धीर दिला. घाबरलेल्या रहिवाशांना विश्वास दिला आणि सुखरूप बाहेर आलेल्या नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. ठाणे अग्निशमन दल, टीडीआरएफ पथक आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना तत्पर नेतृत्वाची साथ मिळाली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचावकार्यात सर्व ५० रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी दिवाळीनिमित्त हवेत उडणारे फटाके फोडण्यास मनाई करण्याचे आदेशही एकनाथजी शिंदे साहेबांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाला दिले.
संकटाच्या वेळी माणसाला सर्वाधिक गरज असते ती मदतीची आणि धीर देणाऱ्या आधाराची. एकनाथजी शिंदे साहेबांच्या बचाव कार्यातील सहभागामुळे काल रात्री ठाण्यातील नागरिकांना हा आधार मिळाला. पदापेक्षा माणुसकी मोठी आणि आश्वासनापेक्षा संकटाच्या वेळी धावून जाणे महत्त्वाचे असते !
#Thane #Shivsena #EknathShinde #mumbai
Dr Shrikant Lata Eknath Shinde retweeted
समाः सर्वेषु भूतेषु कामक्रोधविवर्जिताः।
न्यायमार्गं न मुञ्चन्ति ते वै सत्पुरुषाः स्मृताः।
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत 'नंदनवन' निवासस्थानी दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या डोळ्यांतील आनंद आणि आपुलकीच्या या क्षणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. साहेबांनी त्यांच्यासोबत फराळाचा आनंद घेतला, त्यांना भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या स्नेहमेळाव्यामुळे 'नंदनवन' खऱ्या अर्थाने आनंदवन झाले.
दिव्यांग बांधवांना केवळ सहानुभूती नव्हे, तर सन्मानाने जगण्याची संधी, स्वावलंबन आणि आत्मविश्वास मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या प्रत्येक प्रयत्नाला बळ देणे, हाच या उपक्रमामागील उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा एक क्षण फुलवता आला, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणता आले, तर त्याहून मोठा दिवाळीचा आनंद दुसरा कोणता असू शकतो. यावेळी सर्व दिव्यांग बांधवांना आनंद, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा ही दिल्या.
यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे वैद्यकीय सहाय्यक उपस्थित होते.
#दिवाळीस्नेहमेळावा #Shivsena #EknathShinde #maharashtra #DrShrikantShindeFoundation






























