29 ऑक्टोबर 1978
भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे विकृतिशास्त्रज्ञ आणि जीवाणूशास्त्रज्ञ 'वसंत रामजी खानोलकर' यांचा आज स्मृतिदिन.
28 ऑक्टोबर 1867
लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या मार्गारेट एलिझाबेथ नोबल उर्फ #अग्निशिखा #कर्मयोगिनी भगिनी निवेदिता यांचा आज जन्मदिवस.
२७ ऑक्टोबर १८७३
प्रसिद्ध कवी #भारातांबे यांचा जन्मदिन. प्रेम, विरक्ती, निखळ दर्शन घडविणारी त्याची काव्य गीते आजही लोकांचे ओठावर आहेत. त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९२० मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांनी लिहिलेल्या २२५ कविता व २२ गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका आजही उपलब्ध आहेत.
अभिवादन.
२५ ऑक्टोबर:2009 #दिनविशेष
#मराठी रंगभूमी व चित्रपटांतून सुमारे ६० वर्ष आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे अभिनेते #चित्तरंजनकोल्हटकर यांचा स्मृतिदिन. आग्य्राहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट या ऐतिहासिक मराठी नाटकांतील भूमिका त्यांनी अजरामर केल्या.
अभिवादन.



















