
Official Twitter Account of District Information Office, @MahaDGIPR, Government of Maharashtra, Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagar, MH
Joined July 2016
- Tweets10.1K
- Following25
- Followers16.1K
- Likes165
छत्रपती संभाजीनगर डाक विभागातर्फे दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
सहा आठवड्यांपासून प्रलंबित व असमाधानकारक उत्तर मिळालेल्या तक्रारी दि. ३ नोव्हेंबरपर्यंत दोन प्रतींत सादर कराव्यात.
#डाकअदालत #डाकसेवा #छत्रपतीसंभाजीनगर #जनहित
#राष्ट्रीयअंधत्वनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे #व्हिटीओरेटिनल सर्जनची आवश्यकता आहे. पात्रता MS/DNB (Ophthalmology). इच्छुक तज्ज्ञ डॉक्टरांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात अर्ज सादर करावेत.
RashtriyaEktaDiwas 2025 Across the length and breadth of the nation, citizens and police forces united for the RunForUnity, commemorating the 150th Birth Anniversary of Sardar Vallabhbhai Patel — the Iron Man of India who forged national unity.
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
दुष्काळात चारा टंचाई टाळण्यासाठी महसूल विभागामार्फत जिल्हानिहाय नियोजन. त्याकरिता चारा बँक आणि विशेष एसओपी. #शेतकरीहित #Drought #उपाययोजना
@MahaDGIPR
बुद्धिमत्ता जातीवर अवलंबून नसते, हे सूत्र सांगताना महात्मा जोतीराव फुले म्हणतात, "मानव सारिखे निर्मीके निर्मीले ।। कमी नाही केले ।। कोणी एक ।। कमी जास्त बुद्धी मानवा वोपिली ।। कोणा नाही दिली ।। पिढीजादा ।। #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
#राष्ट्रीयविधीसेवा प्राधिकरणाच्या (NALSA) अंतर्गत वीर परिवार सहायता योजना २०२५ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना विविध कायदेशीर प्रकरणांमध्ये विनामूल्य कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या #वीरपरिवारसहायतायोजना २०२५ अंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, #छत्रपतीसंभाजीनगर येथे लीगल सर्व्हिस क्लिनिक स्थापन. पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे यांनी केले.
#माजीसैनिक
महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सभासदांना नूतनीकरणाची विशेष सवलत!
सभासदांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत केवळ ₹३०० शुल्क भरून सभासदत्व नूतनीकरणाची संधी. १ जानेवारी २०२७ पासून नवीन नोंदणीसाठी ₹८०० शुल्क लागू होणार.
#छत्रपतीसंभाजीनगर #महाराष्ट्र
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती #सावित्रीबाईफुले आधार योजनेंतर्गत’ भोजन, निवास आणि निर्वाहासाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभाच्या रकमेत राज्य शासनाने वाढ केली आहे.
#औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून डॉ.प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना आज गुरुवारी सकाळी विजयी उमेदवार घोषित करण्यात आले.निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी माधुरी खोडे चवरे यांच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र प्रदान केले.
#औरंगाबादपदवीधर मतदार संघातून डॉ.प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना आज गुरुवारी सकाळी विजयी उमेदवार घोषित करण्यात आले.निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी माधुरी खोडे -चवरे यांच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र प्रदान केले.
#औरंगाबादपदवीधरमतदारसंघ आतापर्यंत ११ उमेदवारांची वगळणी !
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू आहे. विजयासाठी आवश्यक ८८,५५८ मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण न केल्याने सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारांची वगळणी करण्यात येत आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ : पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू; दोन उमेदवारांची वगळणी
०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाली असून, विजयासाठी ८८,५५८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
#औरंगाबादपदवीधरमतदारसंघ #मतमोजणी२०२६ #
















