जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad) header
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad) profile picture

Official Twitter Account of District Information Office, #RAIGAD, Directorate General of Information & Public Relations, Gov. of Maharashtra

Joined July 2016
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांना अभिवादन करुया! एकतानगर, गुजरात येथे दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या ‘भारत पर्व’मध्ये सहभागी होऊया! @EktaDiwasBharat
136
श्रमदानातून जलसमृद्धीकडे! ग्रामपंचायत खरोशी व ग्रामपंचायत दुरशेत येथील नदीवर ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानातून वनराई बंधारे उभारले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जलसंधारणाला हातभार लावत गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक पुढाकार घेतला.
1
134
भारताचे पहिले उपपंतप्रधान, देशाची एकता व अखंडतेचे प्रतीक, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती निमित्त विनम अभिवादन! राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #सरदार_वल्लभभाई_पटेल
1
2
191
गुजरातमधील एकता नगर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
1
3
278
श्रमदानातून जलसंधारणाला बळ! पोलादपूर तालुक्यातील गोवेले, खांडस, खोपट, ढवळा व सावलीकोंड येथे लोकसहभागातून श्रमदान करत वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. #मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान #जलसंधारण #वनराईबंधारे #श्रमदान
2
246
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी गुजरात, केवडिया येथे आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिन’ समारंभात पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतील नागरिक विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार #राष्ट्रीयएकतादिन
1
202
पावसाळ्यानंतर पर्यटकांच्या सेवेत पुन्हा एकदा माथेरानची मिनी ट्रेन! मध्य रेल्वेवरील नेरळ आणि माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा दिनांक ३०.१०.२०२६ पासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी वेळापत्रक तपासून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.
3
335
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग retweeted
अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणा; सुधारित आदेश लवकरच निर्गमित करण्याचे निर्देश! अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील लहान बालके, गरोदर महिला व स्तनदा मातांच्या पोषणाची आणि आरोग्याची काळजी घेण्यात आपल्या १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० मदतनीस भगिनींचा मोलाचा वाटा आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये अधिक सुधारणा करण्याबाबत कर्मचारी संघटनांकडून प्राप्त झालेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करून, बैठकीत या संपूर्ण विषयाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, बैठकीत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून सुधारित आदेश निर्गमित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार, आता पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, उपस्थिती आणि गृहभेटी या महत्त्वाच्या घटकांच्या व निकषांच्या आधारे प्रोत्साहन भत्ता निश्चित केला जाणार आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या अतिरिक्त आहार योजना, आदर्श अंगणवाडी योजना आणि बेबी केअर किट योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगानेही बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आमचे सरकार सदैव खंबीरपणे उभे आहे. #अंगणवाडी #wcd #anganwadisevika #maharashtra
1
5
17
2,332
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग retweeted
दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मौजे दिवेआगर बीच येथे ग्रामपंचायत दिवेआगार यांना प्राप्त झालेले #रोबोटिक_बोया चे समुद्र किनारा येथे बंदोबस्तास असणाऱ्या सर्व होमगार्डना यांना प्रात्यक्षिक देण्यात आले.
1
1
193
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग retweeted
📍 लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प कार्यालय, नवी मुंबई 🗓️ बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ नवी मुंबईतील लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी आपल्या हक्काच्या जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात पहिला हक्क मिळालाच पाहिजे, हीच आमची सुरुवातीपासूनची ठाम भूमिका आहे. याच मुद्द्यावर आज विमानतळाच्या प्रकल्प कार्यालयात विमानतळ व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेऊन स्थानिक बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी भूमिका मांडली. या आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे रायगड आणि नवी मुंबईच्या विकासाला नवी दिशा मिळणार असली, तरी ज्यांनी यासाठी स्वतःची जमीन दिली ती प्रकल्पग्रस्त कुटुंबे आणि स्थानिक तरुण या विकासापासून वंचित राहता कामा नयेत. म्हणूनच विमानतळावर निर्माण होणाऱ्या एकूण रोजगारांपैकी स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के रोजगार प्राधान्याने देण्याची आग्रही मागणी व्यवस्थापनाकडे केली. विमानतळामुळे बाधित झालेल्या २७ गावांतील कुटुंबांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधींमध्ये सामावून घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या बैठकीत विमानतळावरील भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि स्वच्छ पद्धतीनेच झाली पाहिजे; कोणत्याही राजकीय किंवा इतर दबावाला बळी न पडता केवळ स्थानिक व पात्र तरुणांनाच संधी मिळाली पाहिजे. तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबांतील कुशल व अकुशल भगिनींना त्यांच्या क्षमतेनुसार काम मिळावे; आवश्यक असल्यास त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी सक्षम करण्यात यावे. विमानतळ परिसरात काम करणाऱ्या सर्व खासगी कंत्राटदार कंपन्यांनी स्थानिक तरुणांना आणि प्रकल्पग्रस्तांना भरतीत प्रथम पसंती दिली पाहिजे. स्थानिक तरुणांनीही काम करताना कंपन्यांना वेठीस न धरता परस्पर समन्वयाने व विश्वासाने काम करून प्रकल्पाच्या नावलौकिकात भर घालावी, असे महत्त्वाचे निर्णय घेतले. या बैठकीस युवासेना निरीक्षक श्री. बाजीराव चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विनोद साबळे, शिवसेना नेते अमर म्हात्रे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रितम सुर्वे, युवा उद्योजक अनिकेत भगत, युवासेना शहरप्रमुख सागर रोकडे, युवासेना विभागप्रमुख मेहबुब शेख, विमानतळ प्रकल्पग्रस्त २१ गाव समितीचे पदाधिकारी, ऑल इंडिया एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉइज युनियनचे प्रतिनिधी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. #DBPatilInternationalAirport #ProjectAffectedPeople #LocalEmployment #Shivsena #BharatshethGogawale
3
5
96
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १४ हजार ७८७ अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती #आरोग्यविभाग #महाराष्ट्रशासन
3
275
दिव्यांगांच्या कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ टक्का निधी #दिव्यांग
162
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग retweeted
दुष्काळापासून वाचायचं असेल तर एकमेव पर्याय "रायगड पॅटर्न" रायगड मध्ये अवघ्या ०५ दिवसांत, २०० वनराई बंधारे बांधून तयार.. #RaigadPattern #WaterConservation #DroughtFreeMaharashtra #BharatshethGogawale #JalSandharan
2
4
121
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ४० पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप! राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शिधापत्रिकांचे वितरण. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अन्नसुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल!
200
राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये खरीप हंगामात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. #दुष्काळ
1
215
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
168
श्रमदानातून जलसमृद्धीकडे ! दुष्काळ परिस्थितीशी सामना करण्यास माणगाव तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत उणेगाव येथील मौजे वावे तर्फे निजामपुर येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.
1
2
244
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
2
204
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त ‘मराठी भाषा दूत’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
1
153
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागाचे विविध उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
1
139