KMC Kolhapur (@KolhapurKmc) header
KMC Kolhapur (@KolhapurKmc) profile picture

Govt Organization

Kolhapur, India
Joined September 2020
Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)
मनपा क्रीडा समितीची पहिली सर्वसाधारण सभा सभापती विजयसिंह खाडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरात स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्यासोबतच महापालिका शाळांतील खेळाडूंसाठी 'मिशन ऑलिम्पिक' उपक्रम राबवून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच प्रभाग २० मध्ये भव्य फुटबॉल स्टेडियम, अंबाई टँक जलतरण तलाव पूर्ववत सुरू करणे आणि क्रीडा क्षेत्रासाठी ५% निधीची तरतूद करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. ​#SportsPolicy #MissionOlympic #KMCKolhapur #FootballStadium #SwimmingPool
44
मुलांच्या आरोग्यासाठी व शारीरिक विकासासाठी मनपाच्या आरोग्य विभागामार्फत जरगनगर व नेहरूनगर विद्यामंदिरात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२६ अंतर्गत जनजागृती करण्यात आली. आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, महिला व बालकल्याण सभापती सौ. कौसर बागवान, आरोग्य सभापती सौ. सुरेखा ओटावकर, शिक्षण सभापती सौ. शीला सोनुले व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पालकांनी आपल्या पाल्यांना जंतनाशक गोळी सेवनासाठी प्रवृत्त करून या मोहिमेत सक्रिय सहकार्य करावे. ​#NationalDewormingDay #KMCKolhapur #ChildHealth #HealthCampaign
47
नाट्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता कोल्हापूरचे ऐतिहासिक 'संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह' बुक करणे झाले आहे आणखी सोपे! 🎭✨ कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे तुम्ही आता घरबसल्या काही मिनिटांतच तुमच्या कार्यक्रमासाठी नाट्यगृहाचे ऑनलाइन बुकिंग करू शकता. 🌐 अधिकृत वेबसाइट: web.kolhapurcorporation.gov.… आजच भेट द्या आणि आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सहज आणि सोयीस्कररीत्या स्लॉट बुक करा! #KMCKolhapur #Kolhapur #KeshavraoBhosaleNatyagruha #OnlineBooking #केशवरावभोसलेनाट्यगृह
1
1
70
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात क्रीडा समितीची पहिली सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात पार पडली. क्रीडा समितीचे सभापती विजयसिंह खाडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहरातील क्रीडा सुविधांचा विकास, स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याबाबत अनेक दूरगामी व ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या धर्तीवर महापालिकेचे स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्यात येणार असून यासाठी आवश्यक पदे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीसाठी विशेष प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती देण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग क्र. २० मधील ५ एकर जागेवर भव्य फुटबॉल स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. तसेच अनेक दिवसांपासून बंद असलेला अंबाई टँक जलतरण तलाव आगामी उन्हाळ्यापूर्वी डीपीडीसीच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. दुधाळी मैदानावरील मनपाच्या शूटिंग रेंजचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी निधीचा पाठपुरावा केला जाईल. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्पर्धांसह 'महापौर चषक' स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील क्रीडा क्षेत्रासाठी मंजूर असलेली ५ टक्के तरतूद प्रत्यक्ष क्रीडा विकासासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या सभेस क्रीडा उपसभापती रोहित कवाळे, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्यासह समितीचे सदस्य अश्किन आजरेकर, विजयसिंह देसाई, प्रमोद देसाई, ऋतूराज क्षीरसागर, सचिन शेंडे, प्रशांत खेडकर, पुष्पा नरुटे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरच्या क्रीडा संस्कृतीला आणि होतकरू खेळाडूंना नवी दिशा देणारा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे! #KMCKolhapur #SportsPolicy #MissionOlympic #FootballStadium #Kolhapur
88
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण समिती, आरोग्य समिती आणि प्राथमिक शिक्षण मंडळ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२६' अंतर्गत आज जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर आणि नेहरूनगर विद्यामंदिर येथे विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी मार्गदर्शन करताना, १ ते १९ वर्षांखालील बालकांनी जंतनाशक गोळी घेतल्याने शरीरातील कृमींचा प्रादुर्भाव कमी होऊन मुलांची शारीरिक वाढ, पोषण आणि बौद्धिक विकास उत्तम होण्यास मदत होते, असे स्पष्ट केले. या कार्यक्रमास महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, आरोग्य समिती सभापती सौ. सुरेखा ओटावकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ. शीला सोनुले, उपसभापती सौ. पूजा पवार, स्थानिक नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेविका सौ. रेखा उगवे, सौ. माधुरी व्हटकर, डॉ. सुषमा जरग आणि ॲड. मानसी लोळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेविका डॉ. सुषमा जरग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोबाईलचा अतिवापर टाळून मैदानी खेळ आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा मोलाचा सल्ला दिला. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्पिता खैरमोडे, मुख्याध्यापक, शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना जंतनाशक गोळी सेवनासाठी प्रोत्साहित करून मनपालिकेच्या या उपक्रमास पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. ​आपल्या मुलांचे आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य यासाठी प्रशासनाला साथ द्या! ​#KMCKolhapur #NationalDewormingDay #ChildHealth #DrPrakashPavara #Kolhapur
61
कोल्हापूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आज प्रशासनाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून झंझावाती काम केले आहे. महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व थेट उपस्थितीत आज सकाळी ७ ते २ या वेळेत शहरातील प्रमुख मार्गांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. खानविलकर पेट्रोल पंप, १०० फुटी रोड, विन्स हॉस्पिटल परिसर, महावीर गार्डन परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि नागाळा पार्क मुख्य रस्ता. या मोहिमेदरम्यान तब्बल २० टन खरमाती, तणकट, झाडांचे कटिंग, प्लॅस्टिक कचरा आणि डिव्‍हायडरची स्वच्छता करून संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला. स्वच्छता कामाला वेग देण्यासाठी २ आयवा डंपर, २ ट्रॅक्टर आणि १ जेसीबीचा प्रभावी वापर करण्यात आला. महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्यासह सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, नगरसेविका सौ. पल्लवी देसाई, उपशहर अभियंता अरुणकुमार गवळी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, शहर समन्वयक मेघराज चडचणकर, आरोग्य निरीक्षक प्रकाश लोंढे, आनंदा बावडेकर, छ. ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय क्र. ४ मधील पवडी विभागाचे ७० कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. ​आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला असेच सतत सहकार्य करावे, हीच अपेक्षा! 🚩 ​#KMCKolhapur #SwachhBharat #CityCleanliness #Kolhapur #SwachhKolhapur
1
3
164
कोल्हापूर शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी खानविलकर पेट्रोल पंप, १०० फुटी रोड, विन्स हॉस्पिटल, महावीर गार्डन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागाळा पार्क परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत तब्बल २० टन खरमाती, प्लॅस्टिक, तणकट व कचरा गोळा करण्यात आला. आयवा डंपर, ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने झालेली ही मोहिम यशस्वी करण्यासाठी मनपाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. #CleanKolhapur #MajheShaharMajhiJababdari #KMCKolhapur #SmartKolhapur #Kolhapur
73
कोल्हापूरच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाचे जतन, संवर्धन आणि प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत महत्त्वपूर्ण व ठोस उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दरम्यान, रंकाळा संवर्धन संरक्षण समितीच्या वतीने उद्या नियोजित असणारे 'रास्ता रोको' आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. देवकर पाणंद येथील श्याम सोसायटी नाल्यातील सांडपाणी दुधाळी एसटीपी केंद्राकडे वळविण्यात आले असून वाहिनीतील अडथळे दूर करण्यात आले आहेत. परताळा क्षेत्रातील दूषित पाणीही पूर्णपणे वळविण्यात आले असून देखरेखीसाठी पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. केंद्र शासनाच्या 'अमृत २.०' अभियान अंतर्गत रंकाळा पुनरुज्जीवनासाठी ११ कोटी ९९ लाख रुपयांच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये गाझियाबाद येथील अत्याधुनिक 'काऊनॉमिक्स' (Cowonomics) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संध्यामठ व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन, नवीन पदपथ, सुरक्षा भिंत दुरुस्ती, लँडस्केपिंग आणि गार्डनिंगची कामे हाती घेण्यात आली आहेत. उपआयुक्त नागेंद्र मुतकेकर, जल अभियंता जयेश जाधव यांच्यासह अधिकारी-अभ्यांतरांच्या पथकाने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून समितीच्या प्रतिनिधींना सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली आहे. रंकाळ्याचे सौंदर्य आणि पर्यावरण टिकवण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून नागरिकांनी व संघटनांनी प्रशासनाला सहकार्य करावे, ही नम्र विनंती! #KMCKolhapur #LakeRejuvenation #DrRajendraBharud #Kolhapur #RankalaConservation
1
1
97
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील शासकीय जमिनीवरील २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमण नियमित करण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी! ​महाराष्ट्र शासनाच्या २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत विविध भागांत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याच क्रमाने उद्या दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी 'सचिव वसाहत' येथे शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ​तरी संबंधित सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा व शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. ​#KMCKolhapur #KolhapurNews #CitizenNotice #MaharashtraGovt #Kolhapur
1
106
कोल्हापूर शहरात कसबा बावडा येथील 'झूम' कचरा प्रकल्पाच्या परिसरात अचानक लागलेली आग महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त व अतिशय तत्पर प्रयत्नांमुळे पूर्णपणे विझवण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याचे आणि सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेत तातडीने योग्य त्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. घटनेची गंभीर दखल घेत परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि तातडीने योग्य तो उपाय काढण्यासाठी खालील मान्यवरांनी जातीने भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या, यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, माजी महापौर सौ. स्वाती येवलुजे, नगरसेवक सचिन चौगुले, ॲड. नीलेश नरुटे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे उपस्तित होते. प्रशासनाच्या आणि अग्निशमन दलाच्या धाडसी व वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. #KMCKolhapur #ZoomProject #FireDepartment #DrRajendraBharud #Kolhapur
77
कोल्हापूर शहरातील रस्ते व पदपथांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत धडक कारवाई यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहणार आहे. दिवाळीपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई होणार नाही या गैरसमजुतीतून ज्यांनी पुन्हा अतिक्रमणे थाटली आहेत, त्यांना प्रशासनाकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे. महापालिकेने यापूर्वी हटविलेली अतिक्रमणे पुन्हा बळकावणाऱ्यांनी तात्काळ हातगाड्या व स्टॉल काढून घ्यावेत. अनधिकृतपणे अतिक्रमण केल्यास साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जाईल. अधिकृत फेरीवाल्यांनी व्यवसाय करताना रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, पादचारी व वाहनधारकांच्या रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी आणि कमीत कमी जागेत व्यवसाय करावा. ज्या फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे, त्यांनी महापालिकेची निर्धारित फी भरून लवकरात लवकर क्युआर कोड व प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व फेरीवाल्यांनी व व्यावसायिकांनी महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करावे, ही नम्र विनंती! #KMCKolhapur #AntiEncroachment #TrafficManagement #DrRajendraBharud #Kolhapur
79
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात सर्व विभागांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. महसूलवाढ, विकासकामे आणि प्रशासकीय शिस्तीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी अत्यंत महत्त्वाचे व धडक निर्णय घेत कडक निर्देश दिले आहेत. घरफाळा, पाणीपट्टी व इतर करांची वसुली दर महिन्याला वाढवून मागील वर्षाच्या तुलनेत प्रत्येक महिन्यात ४ ते ५ कोटी रुपयांची जादा वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व सहायक आयुक्तांनी उपद्रव शोध पथकांद्वारे (NDS) नियमित कारवाई करावी. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेल्या ६२ कोटींच्या ६४ रस्त्यांच्या कामांबाबत ठेकेदारांसोबत बैठक घेऊन अडचणी दूर कराव्यात व कामे गतीने पूर्ण करावीत. अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी आतापर्यंत १,७९९ अर्ज दाखल झाले असून, उर्वरित अर्जांसाठी स्थानिक भागात कॅम्प आयोजित करून ही प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. शहरातील रस्त्यांवर अनधिकृत स्टॉल लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच कायमस्वरूपी बंद असलेले गाळे निविदा प्रक्रियेद्वारे तातडीने वाटप करावेत. पाणीपट्टीकडे असलेली २७ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी जल अभियंत्यांनी दैनंदिन पाठपुरावा करून वसुलीला तीव्र वेग द्यावा. शासनाकडून मंजूर झालेली १४० पदे भरण्यासाठी उत्पन्न वाढवणे गरजेचे असून, झाडू व सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांची छाननी करून ती तातडीने निकाली काढावीत. ​शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी प्रशासनाने उचललेल्या या कठोर पावलांना नागरिकांनीही सहकार्य करावे, ही नम्र विनंती! ​#KMCKolhapur #CivicReview #TaxDepartment #DevelopmentWorks #StrictAction
102
कोल्हापूर शहरात राज्य शासनाच्या २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, शासकीय जमिनीवर रहिवासी प्रयोजनासाठी करण्यात आलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांमध्ये यासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, पात्र नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर केवळ रहिवासी प्रयोजनासाठी करण्यात आलेली अतिक्रमणे शासनाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून नियमानुकूल केली जाणार आहेत. कोल्हापूर शहरातील शासकीय जमिनीवर वसलेल्या १९ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना स्वतःचे घर नियमानुकूल करून घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अर्जाचा विहित नमुना महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांत उपलब्ध आहे. पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या विभागीय कार्यालयात जमा करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ आहे. मात्र, शेवटच्या दिवसाची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १ जानेवारी २०११ पूर्वीचे रहिवास सिद्ध करणारे पुरावे (उदा. मतदार यादीतील नोंद, मनपा कर पावती, वीज बिल, सर्वेक्षण नोंद किंवा सॅटेलाइट इमेज) तसेच चालू वर्षाचा अधिकृत पुरावा अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. शहरातील पात्र नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही नम्र विनंती! #KMCKolhapur #Regularization #SlumRehabilitation #DrRajendraBharud #Kolhapur
80
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिकांची सुरक्षा, रहदारीची सुलभता आणि सुरक्षितता लक्षात घेता, फूटपाथवर किंवा रस्त्यांवर विनापरवाना फटाक्यांचे स्टॉल थाटणाऱ्यांवर मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ​अनेकदा पूर्वसूचना देऊनही नियमबाह्य पद्धतीने स्टॉल थाटल्यामुळे प्रशासनाला हा पाऊल उचलावा लागत आहे. अनधिकृत स्टॉलधारकांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम यापुढेही तीव्र केली जाईल. सर्व विक्रेत्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि विनापरवाना व्यवसाय करू नये, ही नम्र विनंती. ​#KolhapurMunicipalCorporation #KMCKolhapur #AntiEncroachment #SafetyFirst #Kolhapur
63
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिकांची सुरक्षा, रहदारीची सुलभता आणि सुरक्षितता लक्षात घेता, फूटपाथवर किंवा रस्त्यांवर विनापरवाना फटाक्यांचे स्टॉल थाटणाऱ्यांवर मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ​अनेकदा पूर्वसूचना देऊनही नियमबाह्य पद्धतीने स्टॉल थाटल्यामुळे प्रशासनाला हा पाऊल उचलावा लागत आहे. अनधिकृत स्टॉलधारकांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम यापुढेही तीव्र केली जाईल. सर्व विक्रेत्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि विनापरवाना व्यवसाय करू नये, ही नम्र विनंती. ​#KolhapurMunicipalCorporation #KMCKolhapur #AntiEncroachment #SafetyFirst #Kolhapur
1
1
3
487
आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षितता राखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. हिंगोली येथील दुर्दैवी घटना लक्षात घेता, शहरात विनापरवाना फटाका विक्री, अनधिकृत स्टॉलची उभारणी आणि रहिवासी भागात होणारी फटाक्यांची साठवणूक याविरोधात धडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जनहित याचिका क्र. १५२/२०१५ मधील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतींमध्ये व गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांची विक्री व साठवणूक करण्यास सक्त मनाई आहे. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी शहरातील अनधिकृत स्टॉल तातडीने हटविण्याचे निर्देश संबंधित विभागीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांवर 'आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५' आणि 'महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६' अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व नागरिक, परवानाधारक व व्यावसायिक विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे आणि सुरक्षित दिवाळी साजरी करावी. प्रशासनाच्या या महत्त्वपूर्ण आवाहनाची नोंद घ्या आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या! #KMCKolhapur #FireDepartment #DiwaliSafety #StrictAction #Kolhapur
83
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने विद्यार्थिनींचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि पालकांवरील प्रवास खर्चाचा आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी व १२ वीच्या (कला व वाणिज्य शाखा) विद्यार्थिनींना मोफत के.एम.टी. पासचे वाटप करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्या हस्ते आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. कौसर इस्माईल बागवान, गटनेते शारंगधर वसंतराव देशमुख, उपसभापती सौ. दीपा अजित ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त शिल्पा देरेकर, स्थायी समिती सभापती विशाल किरण शिराळे, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, अभिजीत शमाराव खतकर, सहायक आयुक्त सौ. उज्ज्वला शिंदे यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थिनींना पास वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना मोफत व सुलभ प्रवास उपलब्ध होणार असून, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला मोठे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. नागवकर, पर्यवेक्षक कॅप्टन डॉ. अमित पुंडलिक रेडेकर आणि प्राध्यापकवृंदाचे विशेष नियोजन व सहकार्य या कार्यक्रमास लाभले. कोल्हापूर महानगरपालिकेचा हा लोकोपयोगी व दूरगामी विचार, विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे! #KMCKolhapur #KMCCollege #FreeKMTBusPass #WomenAndChildWelfare #Kolhapur
78
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील मॅटर्निटी ऑपरेशन थिएटरचे निर्जंतुकीकरणाचे (Sanitization) महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याची सुरक्षा आणि योग्य ती खबरदारी म्हणून हे ऑपरेशन थिएटर शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर ते सोमवार, दि. ०२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ३ दिवस बंद राहणार आहे. मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी स्वॅबचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर थिएटरचे नियमित कामकाज पूर्ववत सुरू करण्यात येईल. या ३ दिवसांच्या कालावधीत संबंधित गर्भवती महिला व रुग्णांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी पंचगंगा रुग्णालय तसेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे जाऊन वैद्यकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. सर्व संबंधित नागरिकांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, ही विनंती! #KMCKolhapur #SavitribaiPhuleHospital #HealthDepartment #DrRajendraBharud #Kolhapur
65
शहरातील अरुंद गल्ल्या आणि गर्दीच्या ठिकाणी आगीच्या दुर्घटनेवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाकडून कोल्हापूर महानगरपालिकेला १२ फायर बुलेट देण्यात आल्या आहेत. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे महापौर सौ. रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला. २५ लिटर पाणी क्षमता आणि पंप असलेल्या या रॉयल एनफिल्ड फायर बुलेटमुळे प्राथमिक आगीवर नियंत्रण मिळवणे आता अधिक सोपे होणार आहे. ​#FireBullet #KMCKolhapur #FireDepartment #SafetyFirst #Kolhapur
2
2
97
शहरातील अरुंद गल्ल्या आणि गर्दीच्या ठिकाणी आगीच्या दुर्घटनेवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाकडून कोल्हापूर महानगरपालिकेला १२ फायर बुलेट देण्यात आल्या आहेत. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे महापौर सौ. रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला. २५ लिटर पाणी क्षमता आणि पंप असलेल्या या रॉयल एनफिल्ड फायर बुलेटमुळे प्राथमिक आगीवर नियंत्रण मिळवणे आता अधिक सोपे होणार आहे. ​#FireBullet #KMCKolhapur #FireDepartment #SafetyFirst #Kolhapur
1
97