
MD DNB FSCAI Cardiology , Sr Consultant Physician & Cardiologist , 25 years in Clinical Practice. #MedTwitter #JustForHearts , Founder Just For Hearts.
Pune Satara
Joined April 2012
- Tweets9.9K
- Following3.7K
- Followers14.9K
- Likes16.2K
Pinned Tweet
“आजच्या तरुणांमध्ये heart attacks ‘blockage’ मुळे नाही… तर plaque rupture मुळे होतायत आणि हीच सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे!”
Office stress, late nights, junk food आणि smoking यामुळे plaque इतकं unstable होतं की फक्त 30–40% blockage असूनही 100% sudden block तयार होतो.
1 Plaque म्हणजे काय आणि का धोकादायक हे समजून घेतले पाहीजे.
Artery च्या wall मध्ये LDL, inflammation आणि fat मिळून soft plaque तयार होतं.
हे दिसायला छोटं असलं तरी rupture झालं की काही सेकंदांत clot तयार होतो.
(Ref: AHA/ACC 2024)
2 LDL & Triglycerides plaque ‘unstable’ करतात
High LDL → plaque मऊ पडतं.
High Triglycerides → plaque मध्ये inflammation वाढतं.
दोन्ही मिळून rupture risk multiply होतो.
(Ref: NEJM 2022)
3 तरुणांमध्ये plaque rupture जास्त का?
🔥 High stress, overworking
🔥 Smoking & Vaping
🔥 Junk food + high cholesterol
🔥 कमी झोप
🔥 No exercise
हे सगळं plaque ला “fragile” बनवतं.
4 Rupture → Clot → अचानक 100% block
Plaque फाटलं की platelet तिथे पटकन चिकटतात.
Seconds मध्ये platelet-rich clot → complete block → sudden heart attack.
यामुळेच सगळे “normal reports” असतानाही तरुणांना attacks येतात.
5 Timely treatment फायदेशीर कधी?
Early arrival → thrombolysis clot तोडतं.
Severe symptoms किंवा re-block? → Angioplasty life-saving.
Late arrival = higher muscle damage.
Advanced tests जसे IVUS/OCT plaque biology समजायला मदत करतात.
6 Plaque stable ठेवण्यासाठी काय महत्वाचे ?
✔ LDL < 70
✔ Smoking/vaping बंद
✔ Daily exercise + strength work
✔ 7–8 hrs sleep
✔ Weight control
✔ Statins → scientifically plaque stabilize करतात (JACC 2021)
7 कोणत्या तरुणांनी विशेष काळजी घ्यावी?
✔ Family history of early heart disease
✔ Diabetes / obesity / fatty liver
✔ High triglycerides
✔ Chest tightness after stress
✔ Sedentary lifestyle
✔ High ApoB
आजच्या तरुणांमध्ये “major blockage” हा प्रश्न नाही…
“unstable plaque + rupture + sudden clot” हा खरा killer आहे.
ही पोस्ट WhatsApp groups, college friends, office teams मध्ये नक्की शेअर करा. एक share एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतं.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#YoungHeartAttack #PlaqueRupture #LDL #Triglycerides #PreventiveCardiology #HeartHealth #JustForHearts #Thrombosis #मराठीआरोग्य #CardiologyCare
काल एका नव्या patient ने अगदी सहज एक शब्द वापरला
“Doctor… मला खूप homesick वाटतं.”
हा शब्द कित्येक वर्षांनी ऐकला.
त्या चाळिशीतल्या होत्या.
Late marriage.
नवीन घर. नवीन relationship. नवीन routine.
Parents आता हयात नाहीत.
भाऊ परदेशात स्थायिक.
त्या म्हणाल्या
“त्यांची फार आठवण येते… आणि काही करता येत नाही.”
पुढे त्या अजून थोडं मन मोकळं करत गेल्या.
नव्या आयुष्यात स्वतःला बसवण्याचा प्रयत्न सुरू होता…
पण मनात कुठेतरी प्रश्नही होते
हा निर्णय योग्य होता का?
उशिरा घेतलेला compromise होता का?
Social pressure होता का?
की मी चूक केली?
त्या खूप शांतपणे बोलत होत्या.
आणि कदाचित म्हणूनच प्रत्येक वाक्य जास्त जाणवत होतं.
काही वेळा आपल्याकडे advice असतो.
काही वेळा treatment असतं.
काही वेळा reassurance देता येतं.
पण काही क्षण असे असतात की
“सगळं ठीक होईल” असं म्हणणंसुद्धा खोटं वाटतं.
त्याक्षणी मला काहीच समजावून सांगावंसं वाटलं नाही.
फक्त ऐकावंसं वाटलं.
कधी कधी अशा patient stories व्यक्तीची ओळख म्हणून नाही, तर एक भावना म्हणून शेअर करावीशी वाटते
कारण कदाचित कुणीतरी दुसरंही अगदी हेच जगत असतं…
फक्त त्याला ते इतकं नेमकं सांगता येत नसतं.
OPD संपल्यानंतरही तो एक शब्द मनात राहिला
Homesick.
घरासाठी?
माणसांसाठी?
की त्या जुन्या आयुष्यासाठी… जिथे आपलं असणं सहज होतं?
कधी कधी loneliness म्हणजे एकटं असणं नसतं.
लोकांमध्ये राहूनही… मनाला “आपलं” असं कुठेच न वाटणं असतं.
#JustForHearts #LifeReflection #EmotionalHealth #HumanStories
Evidence & Practice Notes for Medical Professionals
Oral Semaglutide: Are We Looking Beyond HbA1c?
In clinical practice, we often see patients with reasonably controlled HbA1c who still carry substantial cardiovascular risk. Should glucose control alone define successful diabetes management?
The SOUL trial (NEJM, 2025) studied 9,650 high-risk patients with Type 2 Diabetes and established ASCVD and/or CKD. Oral semaglutide reduced major cardiovascular events from 13.8% to 12.0%.
A new analysis (JAMA Cardiology, Nov 2026) reports 14% fewer total cardiovascular events, including first and subsequent events.
For us, the clinical message is clear: in high-risk diabetes, treatment decisions must consider proven cardiovascular benefits, not HbA1c alone.
Does this mean adding semaglutide to every prescription? Certainly not.
It calls for reviewing existing therapy, selecting appropriate patients, and considering alternative or additional treatment based on cardiovascular and renal risk, tolerability, contraindications and adherence.
रुग्णांसाठी थोडक्यात
Diabetes मध्ये HbA1c चांगला असला तरी Heart Attack, Stroke किंवा Kidney Disease चा धोका राहू शकतो. म्हणून उपचारांचा उद्देश फक्त Sugar Control नसून भविष्यातील complications टाळणंही आहे. काही औषधांचे असे फायदे सिद्ध झाले आहेत. आपल्या उपचारात याचा विचार झाला आहे का, हे डॉक्टरांशी जरूर बोला.
References:
SOUL - NEJM, 2025 | DOI: 10.1056/NEJMoa2501006
SOUL Secondary Analysis - JAMA Cardiology, 11 Nov 2026 | DOI: 10.1001/jamacardio.2026.4944
Dr Ravindra L Kulkarni
Senior Consultant Physician & Cardiologist
#JustForHearts #MedX #CardioX #DiabetesCare #ClinicalEvidence
Resting Pulse Normal… पण Exercise नंतर Heart सावरायला वेळ लागतो! Fitness बद्दल काय सांगतं?
“डॉक्टर, माझा Resting Pulse 68 असतो. पण Brisk Walking केल्यावर Pulse 140 पर्यंत जातो आणि कमी व्हायलाही वेळ लागतो. मग माझी Heart Fitness चांगली आहे का?”
अशा वेळी मी फक्त Resting Pulse पाहत नाही.
कारण विश्रांतीच्या वेळी Heart कसं काम करतं आणि Exercise नंतर कसं सावरतं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत!
1️⃣ Exercise नंतर Pulse कमी होणं का महत्त्वाचं?
Exercise करताना शरीराला अधिक Oxygen लागतो, त्यामुळे Heart Rate वाढतो.
Exercise संपल्यावर Pulse कमी होऊ लागतो. याला Heart Rate Recovery (व्यायामानंतर हृदयाचे ठोके कमी होण्याचा वेग) म्हणतात.
या प्रक्रियेत Autonomic Nervous System (स्वायत्त मज्जासंस्था), विशेषतः Vagal Activity महत्त्वाची भूमिका बजावते.
म्हणजे Heart किती वेगाने धडधडतं याइतकंच, Effort नंतर किती लवकर सावरतं हेही महत्त्वाचं.
2️⃣ मग चांगला Heart Rate Recovery किती असावा?
समजा Exercise संपताना Pulse 140 होता आणि एक मिनिटानंतर 118 झाला.
म्हणजे पहिल्या मिनिटातील Heart Rate Recovery = 22 ठोके.
Clinical Exercise Tests मध्ये काही विशिष्ट पद्धतींनुसार
🔹 हळू चालत केलेल्या Recovery दरम्यान पहिल्या मिनिटात 12 किंवा कमी ठोक्यांची घट असामान्य मानली गेली आहे.
🔹 पूर्ण विश्रांतीच्या काही वेगळ्या Test Protocols मध्ये 18 किंवा कमी ठोक्यांची घट असामान्य मानली गेली आहे.
पण हे Clinical Stress Tests मधील निकष आहेत; घरच्या Smartwatch साठी Universal Normal Range नाही!
Exercise किती तीव्र होता, Recovery कशी केली, औषधं आणि Fitness यामुळे आकडा बदलतो.
3️⃣ Resting Pulse Normal असूनही Recovery कमी का?
चार महत्त्वाच्या शक्यता
🔸 Fitness: नियमित Aerobic Training कमी असणं.
🔸 Sleep & Fatigue: अपुरी झोप, थकवा किंवा जास्त Training.
🔸 Hydration & Illness: Dehydration, ताप किंवा अलीकडचा आजार.
🔸 Medicines & Medical Conditions: Beta-blockers, Anaemia किंवा Heart/Lung Disorders.
म्हणून कमी Heart Rate Recovery म्हणजे लगेच Heart Disease असं नाही.
पण इथे एक महत्त्वाचा Clinical Point
Exercise Capacity (व्यायाम करण्याची क्षमता), Symptoms (लक्षणं) आणि Recovery तिन्ही एकत्र पाहावी लागतात.
काही व्यक्तींचा Resting Pulse उत्तम असतो, तरी Exercise Tolerance कमी असू शकते.
4️⃣ Smartwatch नसेल तर काय पाहायचं?
Smartwatch किंवा Heart Rate Monitor Pulse चा Trend दाखवू शकतो; मात्र प्रत्येक Reading अचूक असेलच असं नाही.
घरी Pulse मोजता येत असेल तरी Exercise नंतर तो झपाट्याने बदलत असल्यामुळे अचूक तुलना कठीण असू शकते.
म्हणून नेहमीच्या सुरक्षित Walking नंतर तीन गोष्टी पाहा
✅ श्वास किती वेळात पूर्ववत होतो?
✅ पुन्हा सहज बोलता येतं का?
✅ त्याच Walking मध्ये पूर्वीपेक्षा कमी Effort लागतो का?
हे Fitness चे उपयोगी Clues आहेत; Heart Rate Recovery ची अचूक Test किंवा Heart Disease चं Diagnosis नाही.
5️⃣ पुढील 7 दिवस एक छोटा प्रयोग!
तुमचं नेहमीचं Walking सुरू ठेवा. त्यापैकी 2–3 वेळा
✅ Same Effort: साधारण सारखाच Walking Route आणि Speed.
✅ Recovery: नेहमीचा Cool-down करताना श्वास किती लवकर पूर्ववत होतो ते पाहा. Monitor असेल तर Pulse सुद्धा नोंदवा.
✅ Track: Just For Hearts App मध्ये Steps, Exercise आणि Sleep नोंदवा. Recovery चीही छोटी तारीखवार नोंद ठेवा.
App download केले आहे? आजची Entry करा.
7 दिवसांनी एकच प्रश्न
“सारख्याच Effort नंतर माझं शरीर किती सहज सावरतंय?”
एका आठवड्यात Fitness बदललीच पाहिजे असं नाही. पण स्वतःचा Pattern लक्षात येऊ शकतो.
Resting Pulse Normal असूनही धाप का लागते? Recovery कमी दिसतेय तर पुढे काय? Beta-blocker घेत असल्यास Pulse कसा समजायचा?
तुमच्या नोंदींसह असे प्रश्न विचारा. App Tracking साठी मदत हवी असल्यासही
📱 JFH ONE: 92097 42597 , WhatsApp Chat Only.
आजचा Just For Hearts नियम
Resting Pulse, Exercise Capacity आणि Recovery , तिन्ही एकत्र समजून घ्या.
Observe the Pattern. Change the Course.
⚠️ महत्त्वाचं: Exercise मध्ये छातीत दुखणं, चक्कर, असामान्य धाप किंवा अचानक क्षमता कमी होणं असल्यास Exercise थांबवून वैद्यकीय सल्ला घ्या. तीव्र लक्षणांसाठी Emergency Care घ्या. Pulse तपासण्यासाठी मुद्दाम Effort वाढवू नका.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#JustForHearts #HeartRateRecovery #HeartFitness #CardiacHealth
HbA1c अजून तसंच आहे… पण शरीरात सुधारणा सुरू झाली असेल तर? कोणते छोटे Signals पाहाल?
“डॉक्टर, महिनाभर Diet सुधारलाय, Walking नियमित आहे. जेवणानंतरची Sugar कमी येते, पोटाचा घेरही थोडा कमी झालाय. पण HbA1c अजूनही 7.2 आहे. मग फायदा होतोय की नाही?”
हा प्रश्न अनेक रुग्ण विचारतात.
पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या
HbA1c हा मागील साधारण 2–3 महिन्यांतील Average Sugar दाखवतो. शरीरातील प्रत्येक सुधारणा त्यात लगेच दिसेलच असं नाही!
म्हणून पुढच्या HbA1c Report ची वाट पाहताना इतर काही बदलही समजून घ्यायला हवेत.
1️⃣ Post-meal Sugar आधी सुधारू शकते!
Diet, Portion Size आणि जेवणानंतरची Activity सुधारल्यावर काही दिवसांतच Glucose Response बदलू शकतो.
उदा. आधी सारख्या जेवणानंतर Sugar 210 येत होती, आता वारंवार 160–170 येते.
हा Glucose Control सुधारत असल्याचा अधिक थेट संकेत असू शकतो.
पण एक-दोन Readings नाही, तर सारख्या परिस्थितीत दिसणारा Trend महत्त्वाचा.
2️⃣ Fasting Sugar अधिक स्थिर होतेय का?
आधी कधी 115, कधी 155, कधी 170…
आता बहुतांश Readings योग्य Range मध्ये येत असतील, तर सुधारणा होत असू शकते.
पण एक Clinical Point लक्षात घ्या
Variability (चढ-उतार) कमी होणं चांगलं असू शकतं; मात्र Average Sugar आणि सुरक्षित Range सुद्धा महत्त्वाची आहे.
केवळ Readings स्थिर झाल्या म्हणजे Control सुधारलाच, असं नाही.
3️⃣ Energy, Hunger आणि Waist मध्ये काही फरक?
काही व्यक्तींना चांगल्या सवयींमुळे
🔹 जेवणानंतरची सुस्ती कमी जाणवते.
🔹 वारंवार भूक लागणं किंवा Snacking कमी होतं.
🔹 दिवसभर Energy अधिक स्थिर वाटते.
🔹 Weight फार न बदलताही Waist कमी होऊ लागते.
हे उत्साहवर्धक बदल आहेत.
पण Energy किंवा भूक सुधारली म्हणजे Insulin Resistance कमी झालीच, असा निष्कर्ष काढू नका.
झोप, ताण, आहार आणि इतर कारणांचाही परिणाम होतो.
Waist कमी होण्यासोबत वाढलेले Triglycerides सुद्धा कमी होत असतील, तर सुधारत्या Metabolic Health चा आणखी एक संकेत मिळू शकतो.
4️⃣ मग HbA1c मध्ये बदल कधी दिसतो?
सुधारणेचा कालावधी प्रत्येक Marker साठी वेगळा असू शकतो.
✅ काही दिवस–आठवडे: Home Glucose Readings मध्ये बदल दिसू शकतो.
✅ काही आठवडे- महिने: Weight, Waist, Fitness आणि Triglycerides मध्ये सुधारणा दिसू शकते.
✅ साधारण 3 महिने: सातत्यपूर्ण Glucose Control चा HbA1c मधून अधिक स्पष्ट आढावा मिळतो.
HbA1c याआधीही बदलू शकतो; मात्र प्रत्येक Marker ठराविक क्रमाने सुधारेलच असं नाही.
म्हणजे सुरुवातीची सुधारणा ओळखा, पण HbA1c च्या पुढील तपासणीलाही महत्त्व द्या.
5️⃣ पुढील 14 दिवस स्वतःचा Progress पाहा!
यावेळी फक्त पुढच्या Report ची वाट पाहू नका.
✅ Sugar: डॉक्टरांनी Home Monitoring सुचवलं असेल तर Fasting आणि निवडक Post-meal Readings.
✅ Activity & Sleep: रोजचे Steps, Exercise आणि झोपेचं सातत्य.
✅ Weight & Waist: आधीच्या मोजमापांशी तुलना.
या नोंदी Just For Hearts App मध्ये उपलब्ध Trackers वापरून करा. आधीचे HbA1c आणि Lipid Reports सुद्धा जतन करा.
App आधीच आहे? आजची Entry करा.
नवीन असाल तरी सुरुवात करण्यासाठी Premium आवश्यक नाही बरं का!
14 दिवसांनी स्वतःला विचारा
① सारख्या जेवणानंतर Sugar पूर्वीपेक्षा कमी येतेय का?
② Waist, Activity आणि Energy मध्ये सकारात्मक बदल दिसतोय का?
③ ही सुधारणा सातत्याने आहे, की एखाद्या दिवसापुरती?
सर्वांनी रोज Sugar तपासण्याची गरज नाही. आणि चांगलं वाटतंय म्हणून औषधं कमी करण्याचीही नाही.
“Readings सुधारतायत, पण HbA1c अजून तसंच का?”
“Waist कमी होतेय, म्हणजे Insulin Resistance सुधारतेय का?”
“पुढची HbA1c तपासणी कधी करावी?”
अशा प्रश्नांसाठी Reports आणि नोंदींसह विचारा. App Tracking साठी मदत हवी असल्यासही
📱 JFH ONE: 92097 42597 , Chat First.
HbA1c Measures the Average.
Patterns Reveal the Progress.
छोट्या सुधारणा ओळखा. त्यांचं सातत्य तपासा. योग्य वेळी Reports चा आढावा घ्या.
Observe the Pattern.
Change the Course.
⚠️ महत्त्वाचं: Sugar वारंवार खूप कमी किंवा जास्त येत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. विशेषतः Insulin किंवा Hypoglycemia होऊ शकणारी औषधं घेत असल्यास औषधं स्वतःहून बदलू नका.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
25+ Years Clinical Experience
Just For Hearts
#JustForHearts #HbA1c #DiabetesCare #MetabolicHealth
📖 This post is also available in English & Hindi in the Just For Hearts App.
Maths हा medical college चा subject नव्हता.
पण school days पासून maths माझा favourite subject राहिला आहे आणि आजही आहे.
विशेषतः X वर एखादा maths puzzle, geometry question, riddle किंवा शब्दकोड्यासारखं काही दिसलं की मी सहज पुढे scroll करत नाही.
थांबतो. स्वतः solve करतो. मग answer check करतो.
या puzzle मध्ये बहुतेक जण लगेच b² = 16 पर्यंत पोहोचतील.
कारण आपण पटकन घेतो
a² = 81 → a = 9
पण थोडं थांबलो तर लक्षात येतं
a = –9 हेही mathematically बरोबर आहे.
आणि तिथेच puzzle फक्त calculation राहत नाही.
तो आपल्याला एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट शिकवतो
Answer शोधण्याइतकंच आपण कोणतं assumption केलं आहे, हे तपासणंही महत्त्वाचं.
यात brain साठीही एक interesting फरक आहे.
Consumption (फक्त माहिती घेणं) म्हणजे सतत scroll करणं, पाहणं, वाचणं.
पण Challenge (मेंदूला काम देणं) म्हणजे थांबणं, pattern (नमुना) शोधणं, आठवण वापरणं, calculation करणं आणि चूक झाली तर पुन्हा विचार करणं.
WHO च्या updated guidance मध्येही cognitive stimulation (मेंदूला विचार करायला लावणाऱ्या गोष्टी), cognitive training आणि social engagement यांना healthy cognitive ageing (वयानुसार मेंदू सक्रिय ठेवणे) याचा भाग मानलं आहे.
याचा अर्थ puzzle सोडवल्याने dementia होणारच नाही असा नाही.
पण एवढं नक्की
Brain ला फक्त content नको.
कधी कधी challengeही हवा.
आता तुमची आवड सांगा
Maths puzzles?
Sudoku?
शब्दकोडी?
Riddles?
Chess?
Logic games?
Word games?
की mobile वरचे brain games?
Gen Z असो किंवा older generation
मेंदूला आव्हान देण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण मजा तीच असते.
तुम्हाला काय आवडतं? Comments मध्ये नक्की सांगा.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Just For Hearts
#JustForHearts #BrainHealth #KeepThinking #WeekendThought
आज Brian Tracy यांच्या निधनाच्या बातम्या पाहिल्या.
अधिकृत confirmation अजून स्पष्ट दिसत नसल्यामुळे त्या बातमीबद्दल निश्चित काही म्हणणं योग्य वाटत नाही.
पण त्या निमित्ताने त्यांच्या लिखाणाबद्दल मनातली कृतज्ञता नक्की व्यक्त करावीशी वाटली.
त्यांची अनेक पुस्तकं वाचली आहेत.
पण Eat That Frog! माझ्यासाठी कायम खास राहील.
Priority ठरवणं, महत्त्वाचं काम आधी करणं, आणि अनेक जबाबदाऱ्यांमध्ये focus टिकवणं , या सवयींवर त्या पुस्तकाचा प्रभाव राहिला.
त्यांची काही पुस्तकं अजून वाचली नसतील तर
• Eat That Frog!
• No Excuses!
• Goals!
• Change Your Thinking, Change Your Life
काही लेखक फक्त पुस्तकं लिहित नाहीत.
ते आपल्या विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धतीत थोडासा कायमचा बदल करून जातात.
Brian Tracy माझ्यासाठी त्यापैकी एक.
मनापासून कृतज्ञता. 🙏
#BrianTracy #EatThatFrog #Gratitude #BooksThatStay
Diabetes म्हणजे फक्त Sugar चा आजार नाही… मग आपण फक्त Sugar कमी करण्यामागे का लागलोय?
आज World Diabetes Day!
गेल्या वर्षभरात आपण Insulin Resistance, Muscle, Fatty Liver, Sleep आणि Metabolic Health याबद्दल खूप चर्चा केली.
25+ वर्षांच्या Clinical Practice मधून एक गोष्ट स्पष्ट आहे
Type 2 Diabetes हा केवळ Sugar चा प्रश्न नाही. Insulin Resistance, अपुरा Insulin Response आणि संपूर्ण Metabolic Health यांचा तो आजार आहे.
Sugar वाढणं हा त्याचा दिसणारा परिणाम!
आज Diabetes Reversal च्या नावाखाली महागडे Programs, Detox, Supplements आणि औषधं बंद करण्याची आश्वासनं दिली जातात.
पण Diabetes सुधारण्यासाठी प्रत्येकाला महागडा Program लागत नाही. आणि प्रत्येकाला Remission मिळेलच असंही नाही!
चला, आज अशा 10 सवयी पाहूया, ज्या कोणत्याही क्रमाने सुरू करता येतात.
Diabetes Care : 10 Changes That Really Matter!
1️⃣ Liquid Sugar आधी कमी करा! 🥤
Soft Drinks, Packaged Juices आणि गोड पेयं कमी करा. संपूर्ण फळं खा; फळं पूर्ण बंद करण्याची गरज नाही.
2️⃣ Carbs बंद नाही… Portion बदला! 🍚
भात-पोळी बंद करण्यापेक्षा प्रमाण आणि गुणवत्ता सुधारा. जेवणात Protein, भाज्या आणि Fibre वाढवा.
3️⃣ जेवणानंतर 10–15 मिनिटं चाला! 🚶
सुरक्षित असेल तर Lunch किंवा Dinner नंतर हलकं Walking करा. Post-meal Sugar सुधारण्यासाठी ही छोटी सवय उपयोगी ठरू शकते.
4️⃣ Muscle ला काम द्या! 💪
Muscle हा Glucose वापरणारा महत्त्वाचा अवयव आहे. Walking सोबत आठवड्यातून किमान 2 दिवस Strength Training करा. Gym आवश्यक नाही.
5️⃣ सलग बसण्याची सवय बदला! 🪑
सकाळचं Walking चांगलं; पण बाकी दिवस निष्क्रिय नको. शक्य असल्यास दर 30 मिनिटांनी थोडं उठून चाला.
6️⃣ Weight बरोबर Waist सुद्धा पाहा! 📏
पोटाभोवतीची चरबी Insulin Resistance शी संबंधित असते. जास्त वजन असल्यास सातत्यपूर्ण 5–7% Weight Reduction अनेकांसाठी अर्थपूर्ण ठरू शकतं.
7️⃣ Sleep ला उपचारांचा भाग माना! 😴
पुरेशी, नियमित झोप Glucose Regulation साठी महत्त्वाची. घोरणं, वारंवार जाग येणं किंवा दिवसा डुलकी येणं दुर्लक्षित करू नका.
8️⃣ Meal Timing सांभाळा! ⏰
उशिराचं मोठं Dinner, अनावश्यक Snacking आणि अनियमित जेवणाच्या वेळा कमी करा. कठोर Fasting सर्वांसाठी सुरक्षित नाही.
9️⃣ Stress कमी करा; Tobacco सोडा! 🧠
Stress चा झोप, खाणं आणि Sugar Control वर परिणाम होऊ शकतो. रोज थोडा शांत वेळ राखा. Smoking/Tobacco पूर्णपणे टाळा.
🔟 फक्त Sugar नाही… संपूर्ण Progress पाहा! 📱
HbA1c सोबत BP, Weight, Waist, Lipids, Sleep आणि Activity पाहा. Heart, Kidney, Eyes आणि Nerves ची आवश्यक तपासणीही नियमित करा.
बदल किती दिवसांत दिसू शकतो? ⏳
✅ काही दिवस–2 आठवडे: Sugar Readings मध्ये बदल जाणवू शकतो.
✅ 4–12 आठवडे: Weight, Waist आणि Fitness मध्ये सुधारणा दिसू शकते.
✅ साधारण 3 महिने: HbA1c मधील अर्थपूर्ण बदल तपासता येतो.
✅ काही महिने किंवा अधिक: योग्य उपचार आणि सातत्यपूर्ण Weight Reduction मुळे काही Type 2 Diabetes रुग्णांमध्ये औषधांची गरज कमी होऊ शकते किंवा Remission मिळू शकते.
पण Remission म्हणजे कायमचा Cure नाही!
आणि औषधं बंद करणं हे Diabetes Care चं अंतिम उद्दिष्ट नाही.
आज एक छोटा निर्णय घेऊया!
दहाही गोष्टी एकदम करण्याची गरज नाही.
आज कोणत्याही दोन सवयी निवडा. पुढील 30 दिवस सातत्य ठेवा.
तुमचे Steps, Sleep, Weight आणि आवश्यक Sugar/BP Readings Just For Hearts App मध्ये नोंदवा.
App सगळ्यांसाठी आहे बरं का!
Premium चा विचार नंतर करा. आधी स्वतःचा Health Pattern समजून घ्या.
Sugar Readings, औषधं, Diet, Remission किंवा App Tracking बद्दल प्रश्न असतील तर
📱 JFH ONE: 92097 42597
WhatsApp Chat Only.
Treat the Diabetes.
Improve the Metabolism.
Protect the Future.
औषधं विरुद्ध Lifestyle असा संघर्ष नाही.
योग्य औषधं + योग्य सवयी + सातत्यपूर्ण Monitoring = Better Diabetes Care.
Observe the Pattern.
Change the Course.
⚠️ महत्त्वाचं: Insulin किंवा Hypoglycemia होऊ शकणारी औषधं घेत असल्यास Diet, Fasting किंवा Exercise बदलताना काळजी घ्या. औषधं स्वतःहून बंद करू नका.
Diabetes Care ही भीती, महागडी आश्वासनं किंवा चमत्कारांवर नाही , तर योग्य ज्ञान, योग्य उपचार आणि रोजच्या कृतीवर आधारित असायला हवी.
लाखो लोकांनी वाचण्यापेक्षा काही हजारांनी जरी आज एक चांगली सवय सुरू केली, तरी हा World Diabetes Day सार्थकी लागेल! ❤️
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Heart’s
#WorldDiabetesDay #JustForHearts #Type2DM
Protein पुरेसं घेतोय… तरी Muscle Strength का वाढत नाही?
हा प्रश्न आजकाल 30–40 वर्षांच्या तरुणांपासून 60 वर्षांपुढील व्यक्तींपर्यंत अनेकांचा आहे.
पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या
Protein पुरेसं असणं, Muscle Mass वाढणं आणि Muscle Strength सुधारणं या तीन वेगळ्या गोष्टी आहेत!
Muscle ला Protein बरोबर योग्य Training, पुरेशी Energy आणि Recovery सुद्धा लागते.
1️⃣ Protein आहे… पण Muscle ला Challenge मिळतोय का?
Walking, घरकाम किंवा रोज थोडा Exercise करणं चांगलं आहे.
पण Strength वाढण्यासाठी स्नायूंना त्यांच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा योग्य प्रमाणात अधिक काम द्यावं लागतं.
यालाच Progressive Overload (हळूहळू वाढवलेलं आव्हान) म्हणतात.
उदा. सुरुवातीला 10 Squats सहज जमत असतील, तर पुढे योग्य Technique राखून Repetitions किंवा Resistance हळूहळू वाढवणं.
Progressive Overload म्हणजे दरवेळी जास्त Weight उचलणं नाही; क्षमतेनुसार Training पुढे नेणं!
2️⃣ Training करूनही Strength का वाढत नाही?
चार महत्त्वाच्या गोष्टी तपासाव्या लागतात.
🔹 Training Stimulus: Exercise नियमित आहे, पण योग्य Resistance आणि Progression आहे का?
🔹 Sleep & Recovery (विश्रांती व पुनर्बांधणी): स्नायूंना Training नंतर पुरेशी विश्रांती मिळतेय का?
🔹 Total Energy: Weight Loss च्या नादात खूप कमी Calories तर घेत नाही ना? Protein पुरेसं असूनही Energy कमी पडू शकते.
🔹 Age & Muscle Response: वयानुसार काही व्यक्तींमध्ये Protein आणि Exercise ला स्नायूंचा प्रतिसाद कमी होऊ शकतो. याला Anabolic Resistance (स्नायूंचा कमी प्रतिसाद) म्हणतात.
पण हा केवळ वाढत्या वयाचा प्रश्न नाही. वयाच्या 30–40 मध्येही चुकीचं Training आणि अपुरी Recovery प्रगती रोखू शकते.
3️⃣ Muscle Size आणि Strength एकच असतात का?
नाही!
Muscle Size फार न वाढताही सुरुवातीला Strength सुधारू शकते.
कारण Training मुळे Nervous System आणि Muscles यांचा समन्वय सुधारतो.
म्हणून फक्त Weight किंवा Muscle Size पाहू नका.
✅ त्याच Exercise मध्ये अधिक Repetitions जमतात का?
✅ योग्य Technique राखून Resistance वाढवता येतो का?
✅ जिने चढणं, वजन उचलणं किंवा रोजची कामं सोपी वाटतात का?
Strength ही फक्त दिसण्याची गोष्ट नाही. ती शरीराची कार्यक्षमता आहे!
4️⃣ मग Protein आणि Training व्यवस्थित असूनही कमजोरी असेल तर?
इथे एक महत्त्वाचा Clinical Point आहे.
प्रत्येक कमजोरीचं कारण Protein किंवा Exercise नसतं.
काही व्यक्तींमध्ये Diabetes, Thyroid Disorders, Vitamin D Deficiency, औषधांचे परिणाम किंवा इतर वैद्यकीय कारणंही तपासावी लागतात.
म्हणून Strength वाढत नसेल तर फक्त Protein Powder किंवा Supplements वाढवणं हा उपाय नाही!
WHO Guidelines नुसार बहुतांश प्रौढांसाठी आठवड्यातून किमान 2 दिवस Muscle Strengthening Activity महत्त्वाची आहे.
5️⃣ पुढील 4 आठवडे एक छोटा प्रयोग करा!
यावेळी Protein किती घेतलं यापेक्षा Strength मध्ये प्रत्यक्ष Progress होतोय का, तेही पाहूया.
✅ Training: दोन सुरक्षित Exercises निवडा. Repetitions, Resistance आणि जाणवणारा Effort नोंदवा.
✅ Recovery: Sleep Duration आणि Exercise मधील विश्रांतीचं सातत्य पाहा.
✅ Progress: चार आठवड्यांनी त्याच Exercises मधील क्षमता तुलना करा.
Just For Hearts App मध्ये Exercise, Activity आणि Sleep Track करा. Strength Progress चीही छोटी तारीखवार नोंद ठेवा.
App आधीच आहे? आजची Entry करा.
नवीन असाल तरी सुरुवात करण्यासाठी Premium ची गरज नाही बरं का!
4 आठवड्यांनी स्वतःला विचारा
① Training नियमित आहे, पण त्यात Progression आहे का?
② त्याच Exercise मध्ये आता अधिक क्षमता दिसतेय का?
③ Protein व्यवस्थित असूनही Recovery कमी पडतेय का?
चार आठवड्यांत Muscle Size मध्ये मोठा बदल दिसेलच असं नाही. पण Strength मधील सुरुवातीची प्रगती समजू शकते.
App Tracking साठी मदत हवी असल्यासही किंवा health questions साठी
JFH ONE: 92097 42597
WhatsApp Chat Only.
Protein Provides the Building Blocks.
Training Provides the Stimulus.
Recovery Allows Adaptation.
Protein महत्त्वाचं आहे. पण Strength वाढण्यासाठी योग्य Training, पुरेशी Energy आणि Recovery यांचं सातत्यही आवश्यक आहे.
⚠️ महत्त्वाचं: अचानक किंवा वाढती Muscle Weakness असल्यास वैद्यकीय तपासणी करा. Heart/Joint Disease असल्यास Exercise आणि Kidney Disease असल्यास Protein Intake वैद्यकीय सल्ल्याने ठरवा.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Physician & Cardiologist
Just For Hearts
#JustForHearts #MuscleStrength #Protein #MetabolicHealth
आज OPD मध्ये 58 वर्षांचे एक patient
Borderline BP, lipids…
आणि अलीकडे एक नवीन त्रास
“कानात सतत शीळसारखा आवाज येतो… कधी भुणभुण, कधी humming सारखं.”
ते स्वतःच म्हणाले
“Doctor, मी tinnitus बद्दल खूप वाचलं.
काही वेळा याचं specific treatment नसतं… आणि काही लोकांना हा आवाज बराच काळ राहू शकतो, हेही कळलं.”
थोडं थांबले.
मग शांतपणे म्हणाले
“माझ्या आईलाही हेच व्हायचं.”
ती सांगायची तेव्हा मी फार serious घेत नव्हतो.
कधी म्हणायचो असं काही नसतं , ignore कर.
कधी तिची complaint अगदी casually घ्यायचो.
पुन्हा थोडा विराम.
आणि मग ते म्हणाले
“आता स्वतःला होतंय… तेव्हा कळतंय तिला किती त्रास होत असेल.
त्या वेळी मी थोडा जास्त caring…
थोडा जास्त compassionate
असायला हवं होतं.”
काही confessions खूप छोटे असतात. पण त्यात वर्षानुवर्षांचं introspection दडलेलं असतं.
कधी कधी दुसऱ्याचा त्रास समजायला,
तो स्वतःच्या आयुष्यात यावा लागतो.
आणि मग… जुने प्रसंग आठवत नाहीत फक्त , त्यांचा अर्थ बदलून जातो.
#JustForHearts #LifeReflection #Compassion #PatientStories
रोज 30 मिनिटं Walking करतो… पण उरलेले 10 तास बसून असतो! मग फायदा किती?
हा प्रश्न अनेकांचा असेल!
कारण रोज Exercise करणं आणि दिवसभर Active राहणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
आणि चांगल्या Metabolic Health साठी दोन्ही महत्त्वाच्या आहेत.
1️⃣ सकाळचं Walking मग उपयोगाचं नाही?
नक्कीच उपयोगाचं आहे!
नियमित Brisk Walking मुळे Heart Fitness, BP, Glucose Control आणि Cardiovascular Health ला फायदा होतो.
पण त्यानंतर अनेक तास सलग बसून राहणं म्हणजे Prolonged Sedentary Behaviour (दीर्घकाळ निष्क्रिय बसणं).
संशोधनानुसार जास्त Sedentary Time चा Diabetes, Heart Disease आणि इतर आरोग्यविषयक जोखमींशी संबंध आढळतो.
म्हणजे सकाळचं Walking वाया जात नाही. पण दिवसभराच्या निष्क्रियतेकडेही दुर्लक्ष करता येत नाही!
2️⃣ सलग बसल्यामुळे शरीरात काय बदलतं?
आपले Muscles हे फक्त चालण्यासाठी नाहीत; ते रक्तातील Glucose वापरण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात.
बराच वेळ बसल्यामुळे मोठ्या स्नायूंची हालचाल कमी होते.
विशेषतः जेवणानंतर
🔹 Muscles चा Glucose वापर कमी राहू शकतो.
🔹 Post-meal Sugar आणि Insulin Response वर परिणाम होऊ शकतो.
🔹 मध्ये थोडं चालल्यास काही व्यक्तींमध्ये हा Glucose Response सुधारू शकतो.
म्हणजे जेवणानंतर एकदाच चालणं चांगलं; पण त्यानंतरही सलग अनेक तास बसणं टाळणं उपयोगी!
हा फरक विशेषतः Diabetes आणि Insulin Resistance असलेल्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा ठरतो.
3️⃣ NEAT म्हणजे काय? आणि ते महत्त्वाचं का?
NEAT Non-Exercise Activity Thermogenesis.
म्हणजे ठरवून केलेल्या Exercise व्यतिरिक्त रोजच्या हालचालींमध्ये खर्च होणारी ऊर्जा.
उदा. घरात किंवा ऑफिसमध्ये चालणं, जिने चढणं, घरकाम, बागकाम किंवा छोटी कामं स्वतः करणं.
या लहान हालचाली मिळून दिवसभरातील Energy Expenditure (ऊर्जा खर्च) वाढवतात.
Exercise शरीराला Training देते. NEAT दिवसभर हालचालींचं सातत्य राखायला मदत करतं.
दोन्ही एकमेकांना पूरक आहेत.
4️⃣ मग किती वेळाने उठून चालायचं?
अनेक अभ्यासांमध्ये दीर्घकाळ बसण्याच्या मध्ये घेतलेल्या छोट्या Walking Breaks मुळे जेवणानंतरच्या Glucose आणि Insulin Response मध्ये फायदा दिसला आहे.
एक व्यवहार्य सुरुवात
✅ दर 30 मिनिटांनी शक्य असल्यास 2–3 मिनिटं उठून चाला.
✅ जेवणानंतर थोडं हलकं Walking करा.
✅ Phone Calls किंवा छोटी कामं करताना हालचाल वाढवा.
✅ नेहमीचं Brisk Walking आणि Strength Training सुरूच ठेवा.
लक्षात ठेवा : फक्त उभं राहण्यापेक्षा थोडं चालणं Glucose Control साठी अधिक उपयुक्त ठरू शकतं.
30 मिनिटांचा नियम हा सोयीचा सुरुवातीचा मार्ग आहे; प्रत्येकासाठी अनिवार्य किंवा जादुई वेळ नाही.
5️⃣ पुढील 7 दिवस एक वेगळा प्रयोग करा!
यावेळी फक्त Steps मोजू नका. तीन गोष्टी पाहा
✅ Total Steps: दिवसभर किती चाललात?
✅ Exercise Minutes: ठरवून किती वेळ Walking किंवा Exercise केलं?
✅ Sitting Breaks: सलग बसताना किती वेळाने उठून हालचाल केली?
Just For Hearts App मध्ये Steps आणि Exercise नोंदवा. Sitting Breaks चीही छोटी नोंद ठेवा.
App आधीच आहे? आजची Entry करा.
नवीन असाल तरी साधं Tracking सुरू करण्यासाठी Premium आवश्यक नाही.
7 दिवसांनी स्वतःला विचारा
① Walking नियमित असूनही सलग बसण्याचे तास जास्त आहेत का?
② Exercise व्यतिरिक्त दिवसभर किती हालचाल होते?
③ Sitting Breaks वाढवल्यावर आपल्या रोजच्या Activity Pattern मध्ये काय फरक पडतो?
एकाच आठवड्यात मोठे Health Results अपेक्षित नाहीत. पण आपल्या सवयीतील एक महत्त्वाची कमतरता समजू शकते.
“Walking करूनही Sugar जास्त का राहते?”
“Desk Job मध्ये Sitting Breaks कसे घ्यावेत?”
“Heart Disease किंवा Joint Pain असल्यास किती Activity सुरक्षित आहे?”
अशा प्रश्नांसाठी तुमच्या नोंदींसह विचारा. App वापरताना मदत हवी असल्यासही
JFH ONE: Ask , Update , Follow up 92097 42597
WhatsApp Chat Only.
❤️ Exercise Matters. Movement Throughout the Day Matters Too.
सकाळचे 30 मिनिटं Walking सुरूच ठेवा पण उरलेल्या दिवसात सलग बसण्याचे तास कमी करा.
कारण Metabolic Health साठी केवळ Exercise चा वेळ नाही, तर दिवसभराची हालचालही महत्त्वाची आहे.
Observe the Pattern.
Change the Course.
⚠️ महत्त्वाचं: Heart Disease, Joint Problems किंवा हालचालींवर मर्यादा असल्यास क्षमतेनुसार Activity ठरवा. छातीत दुखणं, चक्कर किंवा असामान्य धाप आल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Heart’s
#JustForHearts #SedentaryLifestyle #MetabolicHealth #MoveMore
झोप 7–8 तास झाली… तरी सकाळी थकवा का? झोपेचे तास पुरेसे म्हणजे झोप चांगलीच का?
हा प्रश्न अनेकांचा असेल.
पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या
झोपेसाठी दिलेला वेळ, प्रत्यक्ष झालेली झोप आणि झोपेची Quality (गुणवत्ता) या तीन वेगळ्या गोष्टी आहेत!
1️⃣ आठ तास Bed वर म्हणजे आठ तास झोप नाही!
रात्री 11 ते सकाळी 7 अंथरुणात होता.
पण झोप लागायला 30 मिनिटं आणि रात्री जागेपणी एक तास गेला, तर प्रत्यक्ष झोप झाली फक्त 6.5 तास.
याला Sleep Fragmentation (झोप वारंवार खंडित होणं) म्हणतात.
बहुतांश प्रौढांना साधारण 7–9 तास झोपेची गरज असते. पण केवळ तास पुरेसे असणं म्हणजे Restorative Sleep (शरीराला पुरेशी विश्रांती देणारी झोप) मिळालीच, असं नाही.
2️⃣ चांगल्या झोपेचे चार महत्त्वाचे भाग
🔹 Duration (कालावधी): प्रत्यक्ष किती तास झोप झाली?
🔹 Continuity (अखंडता): झोप लागायला किती वेळ लागला? रात्री वारंवार जाग आली का?
🔹 Regularity (नियमितता): झोपण्याची आणि उठण्याची वेळ रोज जवळपास सारखी आहे का?
🔹 Daytime Functioning (दिवसभराची कार्यक्षमता): सकाळी Fresh वाटतं का? दिवसभर लक्ष आणि ऊर्जा टिकते का?
म्हणजे झोप किती झाली, याइतकंच त्या झोपेनंतर दिवसभर कसं वाटतं, हेही महत्त्वाचं!
3️⃣ खराब झोपेचा परिणाम फक्त थकव्यापुरता असतो का?
नाही!
सातत्याने अपुरी, खंडित किंवा अनियमित झोप यांचा पुढील गोष्टींशी संबंध आढळतो
❤️ Heart & BP: Hypertension आणि Cardiovascular Risk वाढण्याशी संबंध.
🍚 Sugar & Insulin: Glucose Regulation आणि Insulin Sensitivity वर परिणाम होऊ शकतो.
⚖️ Weight & Appetite: भूक, खाण्याच्या सवयी आणि वजन नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो.
🧠 Brain & Mood: Concentration, Memory, Mood आणि दिवसभराची Alertness प्रभावित होऊ शकते.
म्हणून Sleep ही फक्त विश्रांती नाही; ती Cardiometabolic Health चा महत्त्वाचा भाग आहे.
मात्र ही Risk Associations आहेत. एक-दोन खराब रात्री म्हणजे आजार होणारच, असा अर्थ नाही.
4️⃣ सात-आठ तास झोपूनही थकवा असेल तर काय तपासायचं?
😴 जोरात घोरणं, श्वास अडखळणं, गुदमरल्यासारखं जाग येणं: Obstructive Sleep Apnoea (झोपेत श्वासाचा मार्ग वारंवार अडखळणं) ची शक्यता.
🌙 वारंवार जाग येणं: Insomnia (निद्रानाश), वेदना, रात्री वारंवार लघवी किंवा इतर Sleep Disturbances.
⏰ रोज बदलणारी झोपेची वेळ: Biological Clock (शरीराचं जैविक घड्याळ) विस्कळीत होणं.
💊 इतर कारणं: Anaemia, Thyroid Problems, काही औषधं किंवा मानसिक ताण.
इथे एक Clinical Point
Fatigue (थकवा) आणि Sleepiness (डुलकी येणं) या एकच गोष्टी नाहीत!
आणि Smartwatch वर Sleep Score चांगला असला तरी Sleep Disorder नसल्याची खात्री होत नाही.
5️⃣ पुढील 7 दिवस झोपेचा Pattern पाहा! 📱
फक्त किती तास झोपलो ते नाही, तीन गोष्टी नोंदवा.
✅ Sleep Duration: झोपण्याची, उठण्याची वेळ आणि अंदाजे प्रत्यक्ष झोप.
✅ Sleep Regularity: रोजच्या वेळेत किती फरक पडतो?
✅ Morning Freshness: उठल्यावर 1–5 Score द्या. (1 = खूप थकवा, 5 = एकदम Fresh!)
या नोंदी Just For Hearts App मधील Sleep Tracker मध्ये करा. रात्री जाग येत असेल, तर त्याचीही नोंद ठेवा.
App आधीच आहे? आजची Entry करा. साधं Tracking सुरू करण्यासाठी Premium आवश्यक नाही.
पुढील सात दिवस उठण्याची वेळ शक्यतो नियमित ठेवा आणि पुरेशा झोपेसाठी वेळ राखून ठेवा.
7 दिवसांनी स्वतःला विचारा
① पुरेसे तास झोपूनही Freshness कमी आहे का?
② झोप वारंवार तुटलेल्या रात्रीनंतर अधिक थकवा असतो का?
③ झोपेची वेळ नियमित ठेवल्यावर काही फरक जाणवतो का?
यातून काही Clues मिळू शकतात; कारण निश्चित ठरत नाही.
“घोरणं आहे, पण दिवसा डुलकी येत नाही , तरी Sleep Apnoea असू शकतो का?”
“सात-आठ तास झोपूनही थकवा का येतो?”
“Sleep Study आवश्यक आहे का?”
असे प्रश्न असतील किंवा App Tracking साठी मदत हवी असेल, तर नोंदींसह विचारा
📱 JFH ONE: 92097 42597 , Chat First.
Don’t Just Count Sleep Hours. Understand How Well You Sleep.
चांगली झोप म्हणजे केवळ पुरेसे तास नाहीत.
झोपेचं सातत्य, नियमित वेळ आणि दिवसभराची कार्यक्षमता तितकीच महत्त्वाची.
Observe the Pattern.
Change the Course.
⚠️ महत्त्वाचं: सतत थकवा, सतत डुलकी किंवा झोपेत श्वास अडखळत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाहन चालवताना डुलकी येत असल्यास वाहन चालवू नका. Sleeping Pills स्वतःहून सुरू करू नका.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#JustForHearts #SleepQuality #SleepHealth #CardiometabolicHealth
📖 Hindi / English versions of post available in our app.
दिवाळीत 4–5 दिवस Routine बदललं…
आता Fasting, Detox की पुन्हा नेहमीची सुरुवात?
“डॉक्टर, दिवाळीत थोडं जास्त खाणं झालं, Walking कमी झालं, झोपेच्या वेळाही बदलल्या. आता Weight वाढलंय आणि शरीर जड वाटतंय. उद्यापासून Fasting करून भरपाई करू का?”
अनेकांच्या मनात सध्या हाच विचार असेल!
पण माझ्या Clinical Experience मधून एक गोष्ट नक्की सांगू शकतो
काही दिवस Routine बदललं म्हणून शरीराला शिक्षा करण्याची गरज नाही.
त्याला पुन्हा नियमिततेची गरज आहे!
चला, यामागचं Science आणि योग्य पुढची दिशा समजून घेऊया.
1️⃣ चार दिवसांत Weight वाढलं… म्हणजे Fat वाढलं?
असेलच असं नाही!
जास्त Salt, Carbohydrates आणि बदललेलं Hydration यामुळे शरीरात तात्पुरतं पाणी साठू शकतं.
Carbohydrates पासून तयार होणारं Glycogen शरीरात पाण्यासोबत साठतं.
म्हणून अचानक 1–2 किलो Weight वाढलं म्हणजे तेवढंच Fat वाढलं असं नाही.
पण वाढलेलं सगळं वजन पाण्यामुळेच आहे, असंही समजू नका. पुढील काही दिवसांचा Trend पाहा.
2️⃣ मग Fasting, Detox किंवा Extra Exercise?
माझ्या मते इथेच अनेकजण चुकतात!
🔹 जेवण बंद करणं: विशेषतः Diabetes ची औषधं किंवा Insulin घेणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं.
🔹 अचानक दुप्पट Exercise: चार दिवसांचा Break एका दिवसात भरून काढण्याची गरज नाही.
🔹 Detox Drinks: Liver आणि Kidneys चं काम सुधारण्यासाठी अशा उपायांची गरज असल्याचा विश्वसनीय पुरावा नाही.
भरपाई करण्यापेक्षा सातत्य परत मिळवणं अधिक महत्त्वाचं!
3️⃣ मग पुढील तीन दिवस नेमकं काय करायचं?
✅ Meals: नेहमीच्या वेळा सुरू करा. Protein, भाज्या आणि Fibre यांना योग्य स्थान द्या.
✅ Walking: पूर्वीची Activity पुन्हा सुरू करा. गरजेनुसार हळूहळू वाढवा.
✅ Sleep: झोपण्याची आणि उठण्याची वेळ नियमित करा.
✅ Hydration: पुरेसं पाणी घ्या. जास्त Salt आणि Processed Food कमी करा.
✅ Medicines: BP, Diabetes आणि इतर नियमित औषधं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सुरू ठेवा.
Routine पुन्हा सुरू करणं म्हणजे कठोर Diet करणं नाही!
4️⃣ Monday Report किंवा दिवाळीनंतरच्या Readings बद्दल काय?
इथे एक महत्त्वाचा Clinical Point आहे.
🔸 Weight: तात्पुरत्या Water Retention मुळे वाढलेलं असू शकतं.
🔸 Sugar / BP: झोप, जेवण, Activity आणि औषधांची नियमितता यांचा परिणाम होऊ शकतो.
🔸 HbA1c: चार-पाच दिवसांचा Report नाही; मागील साधारण 2–3 महिन्यांचा Average दर्शवतं.
म्हणून एक Reading पाहून घाबरू नका. पण वारंवार जास्त येणाऱ्या Readings दुर्लक्षितही करू नका.
5️⃣ पुढील 7 दिवस एक छोटा प्रयोग करा! 📱
मोठे संकल्प नकोत. फक्त तीन गोष्टी पाहूया.
✅ Sleep: झोपण्याची वेळ आणि झोपेचे तास.
✅ Steps: रोजची Activity पूर्ववत होतेय का?
✅ Weight: सुरुवातीला आणि सात दिवसांनी, एकाच परिस्थितीत.
या नोंदी Just For Hearts App मध्ये Track करा.
App आधीच आहे? आजची Entry करा. नसेल तरी साध्या Tracking पासून सुरुवात करा. Premium घेण्याची अट नाही बरं का!
7 दिवसांनी स्वतःला विचारा
① Weight मधील अचानक वाढ कमी झाली का?
② Walking आणि Sleep Routine पुन्हा नियमित झालं का?
③ अजून कोणती एक सवय सुधारण्याची गरज आहे?
हा Weight Loss Challenge नाही… Routine Recovery चं निरीक्षण आहे!
दिवाळीनंतर Sugar/BP बदललेली असेल, Weight कमी होत नसेल किंवा औषधं व Exercise बद्दल प्रश्न असतील, तर तुमच्या नोंदींसह विचारा. App Tracking साठीही मदत मिळेल.
📱 JFH ONE: 92097 42597 , Chat Only.
❤️ Don’t Compensate. Reconnect With Your Routine.
चार दिवसांच्या बदलाची भरपाई करण्यापेक्षा पुढील चार आठवड्यांचं सातत्य अधिक महत्त्वाचं.
Observe the Pattern.
Change the Course.
⚠️ महत्त्वाचं: Sugar/BP सतत जास्त असल्यास किंवा अचानक वजनवाढीसोबत सूज, धाप लागणं असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. Heart Failure/Kidney Disease असल्यास विशेष काळजी घ्या. औषधं स्वतःहून बदलू नका.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
25+ Years Clinical Experience
#JustForHearts #HealthyHabits #MetabolicHealth #BackToRoutine
📖 Prefer reading in Hindi / English? This post is also available in English & Hindi in the Just For Hearts App.
Diwali बदलली आहे…
आणि ते स्वाभाविकही आहे.
बदल फक्त celebration मध्ये नाही
आनंद घेण्याच्या आपल्या पद्धतीतही झाला आहे.
किती calories?
किती sugar?
तूप चालेल का?
फराळ किती?
आज walking कमी झाली तर?
Weight वाढलं तर?
Health awareness महत्त्वाची आहे.
पण information, advice आणि restrictions इतक्या वाढल्या आहेत की कधी कधी आपण क्षण जगण्याआधीच त्याचा हिशोब सुरू करतो.
आरोग्य म्हणजे फक्त numbers control करणं नाही.
आरोग्य म्हणजे आयुष्य अधिक मोकळेपणाने जगता येणं.
काही दिवस discipline चे असतात.
काही दिवस routine चे.
आणि काही दिवस फक्त
कुटुंबासोबत बसायचे,
आवडतं खायचं,
मनसोक्त हसायचं,
फिरायचं,
दिवे-पणत्या 🪔 पाहायच्या,
आणि त्या क्षणात पूर्णपणे राहायचं.
एका दिवसाचा आनंद वर्षभराच्या चांगल्या सवयी मोडत नाही.
पण प्रत्येक आनंदाच्या क्षणी guilt घेऊन बसलो,
तर health जपताना life चाच काही भाग नकळत हातातून निसटतो.
Count less. Live more.
या दीपावलीत थोडं कमी मोजूया…
आणि थोडं जास्त जगूया.
आपणा सर्वांना आनंदी, मनसोक्त आणि सुंदर दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
Diwali बदलली आहे…
आणि ते स्वाभाविकही आहे.
आज greetings एका click मध्ये पोहोचतात.
Calls होतात. Gifts येतात. Photos, reels, stories सगळं share होतं.
हे सगळं celebration चाच भाग आहे.
पण वर्षानुवर्षं माणसं, नाती, आजार, recovery, loss आणि life चे अनेक phases जवळून पाहताना एक गोष्ट वारंवार जाणवते
आपण शेवटी वस्तूंपेक्षा moments जास्त आठवतो.
कोणीतरी अचानक भेटायला आलं होतं…
एखाद्या संध्याकाळी सगळे एकत्र बसलो होतो…
कुठल्यातरी गप्पांवर खूप हसलो होतो…
फराळाच्या निमित्ताने भेट झाली होती…
आणि नकळत एखादी memory तयार झाली होती.
Digital connection आपल्याला जोडून ठेवतं.
पण प्रत्यक्ष भेटीत नात्यांना एक वेगळी जवळीक मिळते.
Diwali म्हणून कदाचित फक्त greetings exchange करण्यापेक्षा
काही लोकांना प्रत्यक्ष भेटणं,
काही वेळ एकत्र घालवणं,
काही moments phone बाजूला ठेवून जगणं…
यालाही तितकीच जागा असावी.
कारण celebration संपतं.
दिवे, पणत्या आणि lights हळूहळू उतरतात.
Gifts वापरून संपतात.
पण काही moments…
memories बनून खूप काळ आपल्यासोबत राहतात.
कदाचित म्हणूनच सण फक्त साजरे करायचे नसतात
ते जगायचे असतात.
या Diwali ला connection ही जपूया…
आणि presence ही
आपणा सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
#HappyDiwali 🪔
Sugar, Weight, Waist सगळं सुधारलं… पण Fatty Liver अजूनही Grade 2!
मग Liver खरंच सुधारतंय का?
“डॉक्टर, तीन महिन्यांत वजन 4 किलो कमी झालं, पोटाचा घेर कमी झाला. Sugar आणि Triglycerides सुद्धा सुधारले. पण Sonography मध्ये अजूनही Grade 2 Fatty Liver आहे!”
इतके प्रयत्न करूनही रुग्णाला वाटतं
मग फायदा काय झाला?
पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या.
Metabolic Health मध्ये सुधारणा सुरू झाली तरी Sonography चा Grade लगेच बदलेलच असं नाही!
आणि Grade बदलणं हाच Liver Treatment चा एकमेव उद्देश नाही.
1️⃣ Sonography बदलण्याआधी कोणते Markers सुधारू शकतात?
1 Waist आणि Weight: पोटाचा घेर व वजन कमी होणं हे Abdominal Fat आणि Metabolic Health सुधारण्याचे उपयुक्त संकेत असू शकतात.
2 Fasting Sugar / HbA1c: Glucose Control सुधारू शकतो. HbA1c साधारण मागील 2–3 महिन्यांतील Average दर्शवतं.
3 Triglycerides: वाढलेले Triglycerides कमी होणं हा सुधारत्या Metabolic Health चा संकेत असू शकतो.
4 ALT / SGPT: आधी वाढलेलं ALT कमी होणं काही रुग्णांमध्ये Liver Injury सुधारण्याचा संकेत असू शकतो.
मात्र हे सर्व Markers एकाच वेळी किंवा ठराविक क्रमाने सुधारतीलच असं नाही.
2️⃣ मग Sonography अजूनही Grade 2 का दाखवते?
Sonography मधील Grade 1, 2, 3 ही Liver Fat ची ढोबळ वर्गवारी आहे.
Liver Fat काही प्रमाणात कमी झालं तरी प्रत्येक वेळी Grade बदललेला दिसेलच असं नाही.
पण याचा उलट अर्थही लक्षात ठेवा
Sugar, Weight किंवा SGPT सुधारलं म्हणजे Liver Fat आणि Fibrosis सुद्धा सुधारलंच, असं नाही.
Metabolic Improvement आणि Liver Recovery या संबंधित, पण वेगळ्या गोष्टी आहेत.
3️⃣ मग Liver मध्ये सर्वात महत्त्वाचं काय तपासायचं?
फक्त Fat किती आहे हे नाही, तर Liver Fibrosis म्हणजे यकृतामध्ये जखमेसारखे कडक बदल झाले आहेत का, हे समजणं महत्त्वाचं.
विशेषतः Diabetes, Obesity किंवा अनेक Metabolic Risk Factors असलेल्या व्यक्तींमध्ये.
गरजेनुसार
🔸 FIB-4 Score: वय, AST, ALT आणि Platelets यांच्या आधारे Advanced Fibrosis चा Risk समजण्यासाठी.
🔸 FibroScan: Liver Stiffness मोजून Fibrosis Risk चं पुढील Assessment करण्यासाठी.
Normal SGPT असूनही महत्त्वाचा Fibrosis असू शकतो!
FIB-4 हा मुख्यतः Risk Assessment साठी असतो. प्रत्येकाला FibroScan आवश्यक नसतो; Risk Factors आणि प्राथमिक तपासण्यांनुसार निर्णय घेतला जातो.
4️⃣ Weight Reduction चा Liver ला किती फायदा?
जास्त वजन असलेल्या Fatty Liver रुग्णांमध्ये सातत्यपूर्ण Weight Reduction मुळे
✅ सुमारे 5%: Liver Fat कमी होण्यास मदत.
✅ 7–10%: Liver Inflammation सुधारण्याची अधिक शक्यता.
✅ 10% पेक्षा जास्त: काही रुग्णांमध्ये Fibrosis सुधारण्याची शक्यता वाढते.
हे निश्चित परिणाम नाहीत; व्यक्तीनुसार बदलतात.
आणि Weight कमी करताना Muscle टिकवणं, नियमित Exercise आणि Diabetes/Lipids Control तितकंच महत्त्वाचं.
5️⃣ पुढील 8–12 आठवडे तीन गोष्टींचा Pattern पाहा! 📱
✅ Weight + Waist: शरीरातील बदल सातत्याने होत आहेत का?
✅ Steps + Exercise: Activity आणि Strength Training नियमित आहे का?
✅ HbA1c, Triglycerides, ALT: डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी तपासून आधीच्या Reports शी तुलना करा.
Just For Hearts App मध्ये Weight, Steps आणि Exercise नोंदवा. उपलब्ध Health Records मध्ये Reports जतन करा. Waist चीही तारीखवार नोंद ठेवा.
App आधीच आहे? आजची Entry करा. 😊 सुरुवातीच्या Tracking साठी Premium आवश्यक नाही.
8–12 आठवड्यांनी स्वतःला विचारा
① Weight बरोबर Waist सुद्धा कमी होतेय का?
② Activity मध्ये सातत्य टिकतंय का?
③ Sugar, Triglycerides आणि Liver Tests मध्ये कोणता बदल दिसतोय?
या नोंदी Metabolic Progress समजण्यासाठी उपयोगी आहेत; Liver Fibrosis सुधारल्याचा पुरावा मात्र नाहीत.
Grade बदलला नाही तर पुढे काय करावं? Normal SGPT असूनही FibroScan आवश्यक आहे का?
अशा प्रश्नांसाठी तुमचे Reports आणि नोंदींसह संपर्क करा. App Tracking साठी मदत हवी असल्यासही
JFH ONE: Ask Update Follow-up
92097 42597 , WhatsApp Chat Only.
Metabolic Improvement Matters.
Liver Fibrosis Risk Matters More.
Sugar, Weight आणि Waist सुधारत असतील, तर त्या प्रगतीला महत्त्व द्या.
पण केवळ Sonography Grade किंवा Normal SGPT वर Liver चं आरोग्य ठरवू नका.
Observe the Pattern.
Change the Course.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Heart’s
#JustForHearts #FattyLiver #MetabolicHealth #LiverHealth
2019 पासून Kedarnath ला जवळजवळ दरवर्षी जाणं हा आता माझ्या वर्षाचा एक ठरलेला भागच झाला आहे.
Schedule कितीही busy असो, somehow हा प्रवास करावासा वाटतोच.
प्रत्येक वेळी तिथून परतताना मन शांत, fresh आणि पुन्हा energy ने भरलेलं वाटतं.
आता परतीच्या प्रवासात आहे.
उद्यापासून पुन्हा नेहमीप्रमाणे काम सुरू.
Weight तेवढंच आहे…
पण पोटाचा घेर वाढतोय!
हा बदल अधिक महत्त्वाचा आहे का?
“डॉक्टर, गेल्या सहा महिन्यांपासून माझं वजन 72 किलोच आहे. पण पँट कमरेला घट्ट होतेय. Weight वाढलं नाही, मग पोट का वाढतंय?”
हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
कारण Weight Stable असणं म्हणजे Body Composition आणि Metabolic Health सुद्धा Stable आहे, असं नाही!
वजनकाटा आपल्याला एकूण वजन सांगतो. पण त्यात Fat आणि Muscle किती आहे, हे सांगत नाही.
1️⃣ Weight तेवढंच… तरी Waist कशी वाढते?
शरीरात एकाच वेळी दोन बदल घडू शकतात.
🔹 Muscle Mass कमी होणं - विशेषतः वयानुसार, कमी Activity किंवा Strength Training च्या अभावामुळे.
🔹 पोटाभोवती Fat वाढणं -विशेषतः Abdominal Fat.
त्यामुळे Weight फारसं बदलत नाही, पण Waist वाढू शकते.
यालाच Body Composition Change म्हणतात.
वजनकाटा शांत असला तरी शरीरात बदल सुरू असू शकतात!
2️⃣ Waist वाढणं अधिक महत्त्वाचं का?
पोटातील चरबी दोन प्रमुख प्रकारची असते.
🔸 Subcutaneous Fat: त्वचेखालची चरबी.
🔸 Visceral Fat: पोटातील अवयवांच्या आसपासची चरबी.
विशेषतः Visceral Fat चा Insulin Resistance, Fatty Liver, Diabetes आणि Cardiovascular Risk शी संबंध असतो.
म्हणून Weight किंवा BMI सोबत Waist मोजल्याने Metabolic Risk बद्दल अतिरिक्त माहिती मिळते.
पण Waist वाढली म्हणजे Visceral Fat निश्चित वाढलं, असंही नाही.
3️⃣ भारतीयांसाठी Waist किती असावी?
भारतीय व दक्षिण आशियाई व्यक्तींमध्ये वापरले जाणारे सामान्य Abdominal Obesity Risk Cutoffs
👨 पुरुष: 90 cm किंवा अधिक
👩 महिला: 80 cm किंवा अधिक
याशिवाय एक सोपा नियम
Waist शक्यतो आपल्या Height च्या निम्म्यापेक्षा कमी असावी.
उदा. Height 160 cm असेल, तर Waist 80 cm पेक्षा कमी ठेवणं हा उपयुक्त सामान्य उद्देश.
हे Risk Indicators आहेत; आजाराचं निदान नाही.
4️⃣ प्रत्येक वाढलेली Waist म्हणजे Fat वाढलं?
नाही!
Bloating, Constipation, जेवणानंतरचा बदल किंवा मोजण्याच्या पद्धतीतील फरक यामुळेही Waist बदलू शकते.
पण काही महिन्यांत Waist सातत्याने वाढत असेल, विशेषतः Weight Stable असूनही, तर त्याकडे लक्ष द्यायला हवं.
अशावेळी Muscle Strength, Activity, BP, HbA1c, Lipids आणि Fatty Liver Risk एकत्र पाहणं अधिक उपयुक्त ठरतं.
5️⃣ पुढील 4 आठवडे एक छोटा प्रयोग करा! 📱
यावेळी फक्त Weight नाही, Waist सुद्धा मोजा.
✅ Weight: आठवड्यातून एकदा, सकाळी साधारण एकाच परिस्थितीत.
✅ Waist: आठवड्यातून एकदा, सकाळी. शेवटची बरगडी आणि Hip Bone यांच्या मधल्या भागात Tape सरळ ठेवा. पोट आत न ओढता, सामान्य श्वास सोडल्यानंतर मोजा.
✅ Just For Hearts App मध्ये Weight आणि Steps/Exercise नोंदवा. Waist च्या मोजमापाचीही तारीखवार नोंद ठेवा.
App आधीच आहे? छान! आजची Entry करा. 😊 सुरुवात करण्यासाठी Premium आवश्यक नाही.
सोबत नियमित Walking आणि आठवड्यातून किमान दोन दिवस Muscle Strengthening वर लक्ष द्या.
4 आठवड्यांनी स्वतःला विचारा
① Weight Stable असूनही Waist वाढतेय का?
② Walking नियमित आहे, पण Strength Training कमी आहे का?
③ Waist बरोबर Sugar, BP किंवा Lipids मध्येही काही बदल आहेत का?
एका-दोन सेंटीमीटरच्या फरकावरून निष्कर्ष काढू नका. सातत्याने दिसणारा बदल महत्त्वाचा.
Weight Stable असूनही Waist वाढत असेल, Body Composition Assessment ची गरज समजून घ्यायची असेल किंवा Tracking साठी मदत हवी असेल, तर तुमच्या नोंदींसह प्रश्न विचारा
JFH ONE: 92097 42597 ,
Ask | Update | Follow up
Chat Only.
❤️ लक्षात ठेवा
Weight Tells How Much.
Waist Adds Where.
वजन कमी करणं हाच प्रत्येकाचा उद्देश असायला हवा असं नाही.
Waist नियंत्रणात ठेवणं, Muscle टिकवणं आणि Metabolic Health सुधारणं हेही तितकंच महत्त्वाचं.
Observe the Pattern.
Change the Course.
⚠️ महत्त्वाचं: पोटाचा घेर अचानक वाढणं, सूज, पोटदुखी किंवा श्वास लागणं अशी लक्षणं असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रत्येक वाढलेला घेर म्हणजे Fat असेलच असं नाही.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#JustForHearts #WaistCircumference #BodyComposition #MetabolicHealth
📖 Prefer reading in English? This post is also available in English in the Just For Hearts App.
थोडं चाललं की पोटऱ्या दुखतात…
थांबलं की बरं वाटतं. हे फक्त वयामुळे?
OPD मध्ये अनेकजण सांगतात
“Doctor, चालायला सुरुवात केली की काही त्रास नसतो.”
“पण थोड्या अंतरानंतर पोटऱ्या भरून येतात, दुखायला लागतात.”
“दोन मिनिटं थांबलो की बरं वाटतं… पुन्हा चालता येतं.”
बहुतेकांना वाटतं वय झालंय, Calcium कमी असेल किंवा Muscle weakness असेल.
पण इथे एक प्रश्न खूप महत्त्वाचा
“दरवेळी साधारण तेवढंच अंतर चालल्यावर त्रास सुरू होतो का?”
कारण हा pattern कधी पायांच्या रक्तपुरवठ्याबद्दल महत्त्वाचं काही सांगत असतो.
1. चालताना 🦵 दुखतं… थांबल्यावर बरं होतं?
पायांच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या असतील तर चालताना muscles ना पुरेसं रक्त मिळत नाही.
मग पोटऱ्या दुखतात, जड होतात किंवा घट्ट झाल्यासारख्या वाटतात.
थोडं थांबल्यावर आराम मिळतो.
याला PAD (Peripheral Artery Disease) म्हणतात , म्हणजे पायांच्या रक्तवाहिन्या अरुंद होण्याचा आजार.
2. पाय दुखतोय… पण Heart ❤️ चा काय संबंध?
Heart च्या रक्तवाहिन्यांमध्ये blockage होण्याची जी प्रक्रिया असते, तीच पायांच्या रक्तवाहिन्यांमध्येही होऊ शकते.
विशेषतः Diabetes, BP, Cholesterol, Smoking किंवा Kidney disease असलेल्या व्यक्तींमध्ये.
म्हणून कधी पोटरीचं दुखणं हा केवळ पायाचा प्रश्न नसतो , तो संपूर्ण रक्तवाहिन्यांच्या आरोग्याचा clue असतो.
3. पण प्रत्येक पोटरीदुखी म्हणजे blockage नाही.
Muscle cramps, जास्त Walking, सांध्यांचा किंवा पाठीच्या मणक्यांचा त्रास यामुळेही पाय दुखू शकतात.
पण फरक लक्षात घ्या
ठरावीक अंतर चालल्यावर दुखणं आणि उभं राहून थांबल्यावर आराम - रक्तपुरवठ्याचा प्रश्न असू शकतो.
बसल्यावर किंवा पुढे वाकल्यावर अधिक आराम हा कधी पाठीच्या nerves चा त्रास असू शकतो.
साधे muscle cramps अनेकदा अचानक, अनियमितपणे किंवा विश्रांतीतही येऊ शकतात.
दुखण्याची वेळ आणि त्याचा pattern कारण शोधायला मदत करतो.
4. मग तपासणी कशी करतात?
डॉक्टर पायांचा रक्तपुरवठा आणि रक्तवाहिन्यांचे ठोके तपासतात.
गरजेनुसार हाताचा आणि घोट्याजवळचा BP तुलना करणारी साधी तपासणी (ABI) किंवा Leg Doppler करता येतो.
प्रत्येकाला Angiography आवश्यक नसते.
5. मग Walking 🚶 बंद करायचं?
नेहमीच नाही.
योग्य diagnosis आणि treatment नंतर नियोजित Walking exercise मुळे चालण्याची क्षमता सुधारू शकते.
पण दुखत असतानाही जबरदस्तीने Steps पूर्ण करू नका.
6. कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष ⚠️ नको?
विश्रांतीतही पाय दुखणं, बोटांवरील जखम न भरणं किंवा पायाचा रंग बदलणं यासाठी लवकर तपासणी आवश्यक.
पाय अचानक खूप दुखणं, थंड किंवा बधिर होणं ही Emergency असू शकते.
आजपासून तीन गोष्टी observe करा ✅
किती अंतर चालल्यावर दुखतं?
थांबल्यावर किती वेळात बरं वाटतं?
पूर्वीपेक्षा कमी अंतरात त्रास सुरू होतोय का?
हा pattern वारंवार दिसत असेल तर एकदा योग्य clinical तपासणी करून घ्या.
तुम्हाला किंवा घरातील व्यक्तीला चालताना पोटऱ्या दुखतात, थांबल्यावर बरं वाटतं किंवा Diabetes असून चालण्याची क्षमता कमी झाली आहे?
JFH ONE: 92097 42597 ,
WhatsApp Chat Only.
तुमचा प्रश्न विचारा. Muscle चा त्रास आहे की पायांचा रक्तपुरवठा तपासायला हवा, याची योग्य पुढची दिशा सांगू.
एकाच अंतरावर वारंवार पाय दुखायला लागणं हा योगायोग नसू शकतो.
कधी शरीर चालण्याची मर्यादा दाखवत असतं आणि त्यामागे रक्तपुरवठ्याचा प्रश्न असू शकतो.
आजचा Just For Hearts नियम
पाय दुखतो म्हणून Walking थांबवण्याची घाई नको.
पण प्रत्येक वेळी त्याच अंतरावर दुखत असेल, तर कारण शोधायला उशीरही नको.
📲 Just For Hearts App मध्ये Steps नोंदवा. Step count सोबत तुमची चालण्याची क्षमता कमी होतेय का, हेही लक्षात ठेवा. त्रास होत असेल तर केवळ Step target पूर्ण करण्यासाठी चालू नका.
Observe the Pattern.
Change the Course.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI
Sr Consultant Physician & Cardiologist
Just For Hearts
#LegPain #HeartHealth #VascularHealth #JustForHearts
काल OPD मध्ये 26 वर्षांचा एक तरुण.
US Stock market trading करतो.
रात्रभर screen समोर.
Weight 136 kg.
तो viral fever साठी आला होता.
Routine discussion मध्ये exercise बद्दल विचारलं.
म्हणाला
“Doctor, walk सुरू करायचा प्रयत्न करतो… पण 5 मिनिटं चाललो की chest pain वाटतं.”
मग?
“Google करतो. Heart attack सारखं काहीतरी दिसतं… मग walk बंद करतो.”
काही दिवस पुन्हा बसून काम.
पुन्हा walk सुरू करण्याचा विचार.
पुन्हा थोडं discomfort.
पुन्हा Google.
आणि cycle तिथेच.
आई-वडील सोबत होते.
आईचा मात्र वेगळाच concern होता
“Doctor, गेल्या काही आठवड्यांत याचं 5 किलो वजन कमी झालंय… मला त्याची काळजी वाटते.”
त्या क्षणी मला एक गोष्ट खूप स्पष्ट दिसली.
136 kg त्यांच्या नजरेला आता problem राहिलं नव्हतं.
5 kg कमी होणं problem वाटत होतं.
25 वर्षांच्या practice मध्ये वारंवार जाणवलेली ही एक मोठी गोष्ट आहे
मानव शरीरापेक्षा आधी मन adaptation करतं.
एखादी unhealthy गोष्ट वर्षानुवर्षं राहिली की ती आपल्याला परिचित होते.
आणि परिचित गोष्ट हळूहळू acceptable वाटू लागते.
थोडं जास्त वजन.
थोडं कमी चालणं.
थोडा जास्त screen time.
थोडं जास्त खाणं.
थोडी कमी stamina.
एकेक गोष्ट वेगळी पाहिली तर फार मोठी वाटत नाही.
पण त्या सगळ्या मिळून कधी lifestyle तयार होतं… आणि lifestyle हळूहळू risk बनतं.
Parents चं प्रेम खरं असतं.
Concern ही खरं असते.
पण कधी कधी आपण आपल्या माणसाला discomfort पासून वाचवताना change पासूनही वाचवत असतो.
त्या तरुणाला फक्त “weight कमी कर” एवढं सांगणं पुरेसं नव्हतं.
त्याला आणि त्याच्या कुटुंबाला हे समजणं जास्त महत्त्वाचं होतं
Change सुरुवातीला uncomfortable वाटतो.
पण familiar असलेली प्रत्येक गोष्ट healthy असतेच असं नाही.
कधी कधी आपण आजाराला नाही,
तर त्याच्याशी जुळवून घेतलेल्या आयुष्याला normal मानायला लागतो.
आणि मग खरा प्रश्न weight चा राहत नाही.
तो असा होतो
आपण आपल्या आयुष्यात नेमकं काय फक्त “खूप दिवसांपासून असंच आहे” म्हणून Normal मानायला लागलो आहोत?
Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI Cardiology
Just For Hearts
#PatientStories #JustForHearts
रोज 10,000 Steps पूर्ण होतात…
मग 30 मिनिटं Brisk Walking वेगळं का? 🤔
“ मी रोज 10,000 Steps चालतो. तरी तुम्ही Brisk Walking करायला का सांगता? Steps पूर्ण झाले की Exercise झाली ना?”
हा प्रश्न अनेक Active लोकांच्या मनात असतो.
कारण आपण किती चाललो आणि चालताना शरीराला किती Effort द्यावा लागला, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
दोन्ही महत्त्वाच्या. पण त्यातून शरीराला मिळणारा फायदा नेहमी सारखा नसतो.
1 Steps नेमकं काय सांगतात?
Steps म्हणजे दिवसभरातील आपल्या हालचालीचं प्रमाण -Activity Volume.
घरात, ऑफिसमध्ये, बाजारात किंवा Walking करताना Steps जमा होतात.
यामुळे निष्क्रिय वेळ कमी होतो, ऊर्जा खर्च होते आणि Metabolic Health ला फायदा होऊ शकतो.
2025 मधील एका मोठ्या Scientific Review नुसार, रोज सुमारे 7,000 Steps चालण्याचा अनेक चांगल्या आरोग्यपरिणामांशी संबंध आढळतो.
म्हणजे 10,000 Steps हा प्रत्येकासाठी अनिवार्य किंवा जादुई आकडा नाही!
2 मग Brisk Walking मध्ये वेगळं काय?
Brisk Walking मध्ये केवळ Steps वाढत नाहीत, तर शरीराला थोडा अधिक Effort द्यावा लागतो.
❤️ Heart Rate आणि श्वासोच्छ्वास वाढतात.
🫁 Heart आणि Lungs अधिक काम करतात.
💪 Muscles ना नियमित Aerobic Challenge मिळतं.
अशा Moderate-Intensity Activity मुळे कालांतराने Cardiorespiratory Fitness सुधारू शकते.
पण इथे एक महत्त्वाची गोष्ट
तुमच्या 10,000 Steps मध्ये आधीच 30 मिनिटं Brisk Walking असेल, तर वेगळी 30 मिनिटं चालण्याची गरज असेलच असं नाही!
प्रश्न Steps विरुद्ध Brisk Walking असा नाही. तुमच्या Steps मध्ये योग्य Intensity किती आहे, हा आहे.
3 Brisk म्हणजे नेमकं किती Fast?
प्रत्येकाची Fitness वेगळी. त्यामुळे सर्वांसाठी एकच Walking Speed योग्य नसते.
एक सोपी पद्धत म्हणजे Talk Test.
✅ चालताना श्वास थोडा वेगवान होतो.
✅ बोलता येतं, पण सहज गाणं म्हणता येत नाही.
✅ Effort जाणवतो, पण असामान्य धाप लागत नाही.
हे अनेकांसाठी Moderate Intensity चं व्यावहारिक लक्षण आहे.
विशेषतः Heart Disease असलेल्या किंवा Beta-blockers घेणाऱ्या व्यक्तींमध्ये Pulse वरूनच Exercise Intensity ठरवू नये. Talk Test, जाणवणारा Effort आणि वैयक्तिक वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा.
4 मग Fitness साठी नेमकं काय आवश्यक?
WHO Guidelines नुसार बहुतांश प्रौढांसाठी
🔹 आठवड्याला 150–300 मिनिटं Moderate-Intensity Aerobic Activity.
🔹 आठवड्यातून किमान 2 दिवस Strength Training.
🔹 दिवसभर जास्त वेळ बसून राहणं कमी करणं.
इथे तीन गोष्टी लक्षात ठेवा
Steps = किती हालचाल झाली.
Intensity = किती Effort लागला.
Fitness = सातत्यपूर्ण Training मुळे विकसित होणारी शारीरिक क्षमता.
तिन्ही महत्त्वाच्या आहेत.
एक दुसऱ्याची पूर्ण जागा घेत नाही.
5 पुढील 7 दिवस एक छोटा प्रयोग करा! 📱
तुमचं नेहमीचं Walking सुरू ठेवा. फक्त रोज दोन गोष्टी पाहा.
✅ Total Steps -दिवसभरात किती चाललात?
✅ Brisk Minutes - त्यापैकी किती मिनिटं Moderate Effort झाला?
दोन्ही नोंदी Just For Hearts App मधील Steps आणि Exercise Trackers मध्ये करा.
App आधीच आहे? आजची Entry करा. नवीन असाल, तरी सुरुवात करण्यासाठी Premium आवश्यक नाही बरं का!
Brisk Walking ची सवय नसेल तर सुरुवातीला 10–15 मिनिटंही पुरेशी चांगली सुरुवात ठरू शकते. सुरक्षितपणे हळूहळू वाढवा.
7 दिवसांनी स्वतःला विचारा
① Steps भरपूर असूनही Brisk Minutes कमी आहेत का?
② कमी Steps असलेल्या दिवशीही चांगला Aerobic Effort झाला का?
③ चालताना Effort कसा जाणवतो आणि कालांतराने तो बदलतोय का?
एका आठवड्यात Fitness बदललीच पाहिजे असं नाही. पण आपल्या Activity मधला फरक समजायला सुरुवात होईल.
Walking करताना Pulse किती असावा, Brisk Walking सुरक्षित आहे का, किंवा Heart Disease, Diabetes, Joint Pain असल्यास Exercise कसं ठरवावं?
तुमच्या नोंदींसह असे प्रश्न विचारा. App Tracking साठी मदत हवी असल्यासही
📱 JFH ONE: 92097 42597
WhatsApp Chat Only.
❤️ Steps Show How Much You Move. Intensity Shows How Hard You Work.
10,000 Steps आणि 30 मिनिटं Brisk Walking हे एकमेकांचे पर्याय किंवा प्रतिस्पर्धी नाहीत.
दिवसभर अधिक चाला. त्यात स्वतःच्या क्षमतेनुसार Brisk Effort ठेवा. Muscle Strength वरही काम करा.
कारण आरोग्यासाठी फक्त Steps चा आकडा नाही, तर कालांतराने शरीराची कार्यक्षमता सुधारणंही महत्त्वाचं.
Observe the Pattern.
Change the Course.
⚠️ व्यायामात छातीत दुखणं, चक्कर, असामान्य धाप असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार Exercise ठरवा.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Just For Hearts
#JustForHearts #Walking #Metabolism



