STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@MPSCstudsRight) profile picture

MPSC STUDENTS RIGHTS HELP for MPSC, UPSC AND OTHER COMPETITIVE AND ALL STUDENTS https://teapawt.net/t.co/WQNAqeq0oB

Pune, India
Joined February 2020
आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! 💐 🌟 शुभ दीपावली! 🌟 -किरण निंभोरे वास्तव कट्टा MPSC स्टुडंट्स राइट्स ऋणानुबंध फाउंडेशन
132
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
पोलीस भरतीमध्ये बोगस स्पोर्ट सर्टिफिकेटचे रॅकेट उघड करणाऱ्या वैभव चव्हाण या तरुणाचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. विशेष म्हणजे आपल्याबाबत असा काही घातपात होऊ शकतो, अशी शंका त्याने व्यक्त केली होती आणि आज तो आपल्यात नाही. MPSC मध्ये देखील बोगस खेळाडू व दिव्यांग उमेदवार भरपूर आहेत त्यांची यादी देखील सरकारला दिलेली आहे परंतु सरकार त्यावर काहीही उपाययोजना करत नाही. म्हणून तुम्ही कितीही आरक्षण दिले तरी खरा खेळाडू व दिव्यांग यांना न्याय मिळणार नाही. सरकारने जे करायला पाहिजे ते वैभवने केले परंतु त्याच्या पदरी काय आले? सरकारने वेळीच वैभव च्या मारेकऱ्यांना आणि पेपर फुटीशी संबंधित सर्व दोषींच्या मुसक्या लवकरात लवकर आवळायला हव्यात. आम्ही सर्वजण त्याच्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि त्याचा बोगसगिरीविरोधातील लढा पुढं घेऊन जाऊ.! @CMOMaharashtra
6
5
194
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ऋणानुबंध फाउंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेली मोफत स्पर्धा परीक्षा ध्येय पंख सिरीजला दिवाळीनिमित्त अल्पविराम दिवाळी सणानिमित्त ध्येय पंख सिरीजमधील सर्व व्याख्यानांना सुट्टी. नवीन सत्रांचा प्रारंभ १६ नोव्हेंबरपासून
137
📌 गट क पूर्व 2026 ..... 📍 नवीन तारीख 📍 24 जानेवारी 🔥🔥✅✅
1
2
18
1,406
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC मधील गैर प्रकारासंदर्भात पूर्वीच सचिवांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार करूनही पेपर फुटतील भामट्यांना अभय... MPSC पेपरफुटी प्रकरणात काल आयोगातील सहायक कक्ष अधिकारी रोहित कोलटक्केला अटक झाली आहे, अटक झालेला आयोगातील हा चौथा अधिकारी आहे. आयोगामधील या भामट्यांची भनक MPSC मधील काही अधिकाऱ्यांना लागलेली होती. या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करूनही या भामट्यांवर पांघरून घालण्याचे काम त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले आहे. मोठा मासा नेहमी छोट्या माशांना खातो परंतु या मोठ्या माशांनीच काही छोट्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न या पेपर फुटी मध्ये केलेला आहे. अजूनही काही मासे तपासात समोर आलेले नाहीत ते देखील लवकरच समोर येतील. या संदर्भात SIT ला माहिती देणार आहेच त्यासोबत वास्तव कट्ट्यावर लाईव्ह तर येणारच... -किरण निंभोरे @CMOMaharashtra @mpsc_office
1
41
87
1,694
११ दिवस MPSC चे आंदोलन पेटते ठेवणारा आणि महाराष्ट्राने ज्याला डोक्यावर घेतले आहे अशी महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ विवेकानंद पाटील याचा आजपर्यंत न ऐकलेला पॉडकास्ट रुपी प्रवास वास्तव कट्ट्यावर... लवकरच...
1
29
842
2021 पासून च्या सर्व परीक्षांची चौकशी करण्याची मागणी असूनही काही ठराविक परीक्षांचीच चौकशी का? सर्वच परीक्षांची चौकशी करायला हरकत काय? @CMOMaharashtra
11
1
19
3,365
श्री. सतिश बबन वाघोले, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची दिनांक १६ ऑक्टोबर, २०२६ पासून, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदाचा अतिरिक्त कार्यभार देऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती.
1
1
14
543
आंदोलनामुळे MPSC अध्यक्षांना नैतिकता नाही पण सुट्टी मात्र मिळाली तीही पगारी सुट्टी... आता वाट पाहूया समितीचा चौकशी अहवाल आणि अध्यक्षांच्या राजीनाम्याची... आंदोलनातून साध्य काय? लवकरच वास्तव कट्ट्यावर लाईव्ह...
1
1
17
578
The demands from Pune are clear: • Resignation of the MPSC Chairman • Accountability within MPSC • Transparent & fair examinations • Recruitment for 70000 posts • Safeguards against exam irregularities Shri @RahulGandhi ji, we request you to visit Pune & meet the aspirants
17
55
832
पुणे MPSC आंदोलन.. Waiting For @RahulGandhi Students from across Maharashtra have gathered in Pune by the thousands to protest, demanding the resignation of the MPSC Chairperson. @RRPSpeaks @vastavkatta
6
47
3
212
8,343
RT @VastavKatta: संयुक्त परीक्षा गट ब 2026 ची SIT मार्फत चौकशी होऊनच पुढील निर्णय घेतला जाईल असा शब्द मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis महोदयां…
27
37
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC पेपर फुटी संदर्भातील लढा थांबलेला नाही... अध्यक्ष, सचिव आणि सदस्य यांना हटवल्याशिवाय हा लढा कदापि थांबणार नाही. परीक्षा या पारदर्शकपणे होण्यासाठी संपूर्ण बॉडी बरखास्त होणे गरजेचे आहे तरच MPSC वर विश्वास बसेल. हा लढा कोणा एकाचा नसून तो आपणा सर्वांचा लढा आहे त्यामुळे या लढ्यामध्ये आपण सर्वांनी ताकतीने आणि एकीने उभे राहणे गरजेचे आहे. बाकी सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य करण्याचे आश्वासन जरी दिलेले असले तरी मुख्य मागणी ही अध्यक्ष, सचिव आणि संपूर्ण बॉडीचा राजीनामा हिच असणार आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याकारणाने विद्यार्थी शांत आहेत परंतु हा उत्सव संपल्यानंतर विद्यार्थी पुन्हा एकदा नव्या जोशाने अध्यक्ष सचिव आणि सदस्य यांचा राजीनामा घेण्यासाठी समोर येतील. ही मागणी जिवंत ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण कमीत कमी आपल्या सोशल मीडियावरून तरी ही मागणी लावून धरणे गरजेचे आहे. कोणी काय केले यापेक्षा आपण काय करतोय हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी आपल्या सोशल मीडियावर तरी व्यक्त होणे गरजेचे आहे. आपण जेवढे ताकतीने एखाद्याला ट्रोल करतो तेवढ्या ताकतीने जर आपण सोशल मीडियावर आपली मागणी लावून धरली तर ती मान्य होण्यास नक्कीच मदत होईल. गणेश विसर्जनानंतर हा लढा आणखीन तीव्र होईल. राजीनामा झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाहीच मी नेहमी आपल्या सोबत असेल.... धन्यवाद किरण निंभोरे
15
124
259
5,790
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC अध्यक्षांचा राजीनामा तर झालाच पाहिजे पण MPSC वरील विश्वासार्हता संपादन करायची असेल तर अध्यक्ष सचिव सदस्य यांच्यासोबत संपूर्ण बॉडी रिस्ट्रक्चर होणे गरजेचे आहे. अध्यक्ष व सचिव हे थेट IAS असावेत. मुख्यमंत्री महोदय आपण राजीनामा घेऊ शकत नाहीत परंतु आपण संपूर्ण बॉडी restructure करू शकता, ज्यामध्ये अध्यक्ष व सचिव हे थेट IAS असायला हवेत. हे रिफॉर्म्स केले तर अध्यक्षांच्या राजीनाम्याची गरजच नाही ते ऑटोमॅटिक बाहेर पडतील आणि त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल. अध्यक्षांकडे नैतिकता शिल्लक नाही म्हणून राजीनामा नाही, परंतु जानेवारी मध्ये DI पेपर फुटला असेल तर तत्कालीन अध्यक्षांवर कारवाई केव्हा होणार.? राजीनामा झाल्याशिवाय विद्यार्थी शांत राहणार नाहीत. @mpsc_office @CMOMaharashtra
17
185
2
343
5,672
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या... प्रथमेश दिलीप देशमुख मूळ गाव खासापुरी ता. परंडा जिल्हा धाराशिव. दोन दिवसापूर्वी प्रथमेश घरी गेला होता घरचे सोयाबीन पूर्णपणे जळालेले पाहून तो नैराशेत गेला होता. वडील नाहीत पाच बहिणी व आई हेच त्याचे कुटुंब. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना स्पर्धा परीक्षेची तयारी पुण्यात करत असताना भविष्यातील आर्थिक खर्च कसा पेलवायचा याचेही टेन्शन होतेच. MPSC मधील पेपर फुटी धोक्यात गेलेले भविष्य आणि धोक्यात गेलेली शेती पुढे होणार काय? या चिंतेतून ही आत्महत्या झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. आज सकाळी पुणे येथे त्यांच्या रूम मध्ये ही आत्महत्या केली. सरकार ने या आत्महत्या कडे गांभीर्याने पहावे ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @RealBacchuKadu @VikramPachpute_ @RRPSpeaks
8
94
8
205
4,314
आक्रोश मोर्चा सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026 सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे
1
7
1
40
709
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC अध्यक्षांचा बचावाचा केविलवाणा प्रयत्न... अध्यक्षांच्या मते औषध निरीक्षक पदाची प्रश्नपत्रिका जानेवारी 2026 मध्येच फुटली, पोलिसांच्या तपासात मात्र विश्वेश्वर नकाते यांनी 19 मार्च रोजी पार्किंग मध्ये प्रश्नपत्रिका संच अभिजीत लेंडवे याला दिला अशी माहिती सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. या महोदयांनी तीन मार्च 2026 रोजी पदाचा प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला. 19 मार्चला जर प्रश्नपत्रिका पार्किंग मध्ये मिळाले तेव्हा अध्यक्ष महोदय झोपले होते का? एक खोटं लपवण्यासाठी किती खोटे बोलणार? आणि तुम्हाला कोणी सांगितले की आम्ही फक्त तुमचा राजीनामा मागतोय? आम्ही तुम्हाला सह आरोपी करण्याची मागणी करतोय. माझ्या माहितीनुसार आयोग तीन महिने आधी प्रश्नपत्रिका तयार करत नाही. अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कार्यकाळात म्हणजेच 19 मार्चला जर प्रश्नपत्रिका पार्किंग मधून देवाण-घेवाण झाले असेल तर मुख्य आरोपी अध्यक्षांनाच करावी लागेल. आणि जर तुमच्या म्हणण्यानुसार प्रश्नपत्रिका जानेवारी 2026 मध्ये फुटले असेल तर तत्कालीन अध्यक्षांवरती सध्याचे अध्यक्ष गुन्हा दाखल करणार का? @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @bhimanwar
10
155
1
309
4,205
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC पेपर फुटी मध्ये जे आरोपी पकडले ते फक्त मोहरे आहेत, या पेपर फुटीमध्ये अध्यक्ष, सचिव, सदस्य व मंत्रालयातून डेप्युटेशन वर आलेले अधिकारी यांनाही सहआरोपी करून यांची हकालपट्टी करावी. तरच 7 सप्टेंबर रोजीच्या मुलाखती पारदर्शक होतील व मागील परीक्षांची पारदर्शक चौकशी होईल. या चौकशीसाठी SIT नेमणे गरजेचे असतानाही अजूनही सरकार कशाची वाट पाहत आहे. अध्यक्ष, सचिव व काही अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय का? मुख्यमंत्री यावर काहीच का बोलत नाहीत? एक आमदार सोडता विरोधक व सत्ताधारी आमदार, खासदार या पेपर फुटीवर का काहीच बोलत नाहीत? विद्यार्थ्यांचे भविष्य चोरणाऱ्यांविरोधात विद्यार्थी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरणार मग पोलिसांनी दबाव आणला तरीही आणि लाठीचार्ज झाला तरीही. मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @mieknathshinde @SunetraA_Pawar
21
184
292
3,761