DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote) header
DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote) profile picture

MLA Gadchiroli 68

Gadchiroli
Joined February 2023
Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)
श्री श्री राधाकृष्ण सेवा समितीच्या गरबा-दांडिया उत्सवाला सदिच्छा भेट! 📍 बहादरपूर, ता. चामोर्शी बहादरपूर येथे श्री श्री राधाकृष्ण सेवा समितीच्या वतीने आयोजित उत्सवाला सदिच्छा भेट दिली. यावेळी गरबा व दांडिया सादरीकरणाचा आनंद घेतला. स्पर्धकांचा उत्साह, ऊर्जा आणि अप्रतिम सादरीकरण पाहून मन भारावून गेले. स्थानिक संस्कृती व परंपरेचे जतन करणारे असे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राकेशजी सरकार, नरेशजी अलसावार, दीपकजी मिस्त्री, रमेशजी विश्वास, जगन्नाथ हलदार, असीमजी मिस्त्री यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
7
श्री श्री राधाकृष्ण रासलीला उत्सवाला सदिच्छा भेट! 📍 विष्णुपूर, ता. चामोर्शी आज विष्णुपूर येथे आयोजित श्री श्री राधाकृष्ण रासलीला उत्सवाला भेट देऊन गरबा स्पर्धेला उपस्थिती दर्शविली तसेच श्री राधाकृष्णाचे दर्शन घेतले. यावेळी स्थानिकांच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी सभागृह बांधकामाकरिता १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रोशनीताई वरघंटे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिल्पाताई रॉय, भाजयुमोचे नरेशजी अलसावार, भाजपाचे भारतजी ढोडरे, युवानेते रामचंद्रजी वरवडे, उपसरपंच महानंदजी हलदार, नरतम ठाकूर, नित्याजी ठाकूर, सुनीलजी विश्वास, अरविंदजी विश्वास, कमलजी पॉल, विषभजी मंडल, गौतमजी रॉय, विशालजी मंडल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
11
सेवादूत अभियान कार्यशाळेत सहभाग व मार्गदर्शन! 📍 यमुना लॉन, पोटेगाव रोड, गडचिरोली भारतीय जनता पार्टी, गडचिरोलीच्या वतीने आयोजित सेवादूत अभियान कार्यशाळेला उपस्थित राहिलो. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपा संघटन प्रमुख डॉ. उपेंद्रजी कोटेकर होते. यावेळी सेवादूत अभियानाची संकल्पना, सेवादूतांची भूमिका, जबाबदाऱ्या आणि प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन करावयाच्या कार्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या लोककल्याणकारी योजना तसेच भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि नागरिकांशी थेट संवाद साधत संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विदर्भ भाजपा विदर्भ सहसंयोजक तथा आमदार प्रवीणजी दटके, भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु, जनजाती तथा माजी खासदार डॉ अशोकजी नेते, भाजपा प्रदेशाध्यक्ष आदिवासी मोर्चा तथा माजी आमदार डॉ देवरावजी होळी, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार डॉ नामदेवरावजी उसेंडी, जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी जिल्हाध्यक्ष किशनजी नागदेवते, माजी नगराध्यक्ष तथा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष योगिताताई पिपरे, भाजपा राज्य परिषद सदस्य डॉ. चंदाताई कोडवते, रेखाताई डोळस, व मान्यवर उपस्थित होते
20
📍 गडचिरोली अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, शाखा रामनगर, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित रामधून रॅलीमध्ये सहभागी झालो. यावेळी माजी आमदार डॉ. नामदेवरावजी उसेंडी, समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, नगरपरिषद उपाध्यक्ष निखिलजी चरडे, नगरसेवक शेखरजी आखाडे, भाजयुमो कार्यकर्ते तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
15
भाजयुमो शहराध्यक्ष श्री. साईजी सिलमवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र हनुमान देवस्थान, सेमाना येथे पूजाविधीस उपस्थित राहून दर्शन घेतले. तसेच महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे आयोजित ‘माणुसकीचा घास’ या सेवाभावी उपक्रमास उपस्थिती दर्शविली. साईजी सिलमवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
13
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन! 📍 कर्तव्य कक्ष कार्यालय, गडचिरोली महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कर्तव्य कक्ष कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. स्त्रीशिक्षण, सामाजिक समता, वंचितांचे उत्थान आणि समाजप्रबोधनासाठी त्यांनी केलेले महान कार्य सदैव प्रेरणादायी राहील.
10
थोर समाजसुधारक, जनसामान्यांचे आधारस्तंभ आणि स्त्री शिक्षणाचे अग्रणी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी वंदन! समता, बंधुता आणि शिक्षणाची ज्योत पेटवून बहुजन व वंचित घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. विनम्र अभिवादन, #MahatmaPhule #MahatmaJyotibaPhule #Krantisurya #Tribute #Gadchiroli #DrMilindNarote
14
भाजपा युवा मोर्चा गडचिरोलीचे शहराध्यक्ष मा. श्री. साई सिलमवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. #HappyBirthday #SaiSilamwar #BJYM #Gadchiroli #DrMilindNarote
16
कै. माजी राज्यमंत्री बाबुरावजी मडावी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 📅 २७ नोव्हेंबर २०२६ 📍 कै. बाबुरावजी मडावी चौक, गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीसाठी मोलाचे योगदान देणारे माजी राज्यमंत्री कै. बाबुरावजी मडावी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकस्थळी भेट देऊन प्रतिमा व स्मारकाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. जिल्ह्याच्या निर्मितीसाठी त्यांनी दिलेले योगदान, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष आणि समाजहितासाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांचे विचार व कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. #बाबुरावजीमडावी #जयंती #गडचिरोली #विनम्र_अभिवादन
14
आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान, वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व आणि महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री स्व. बाबुरावजी मडावी साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांचे विचार सदैव आपल्याला प्रेरणा देत राहतील. #BaburaojiMadavi #जयंती #विनम्रअभिवादन #Gadchiroli #गडचिरोली
27
आश्वासनांची पूर्तता, विकासाची गती! राज्य शासनाच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेअंतर्गत धानोरा नगर पंचायत क्षेत्रातील बाजार ओट्यांना शेडचे बांधकाम व स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्याकरिता १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे! माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असून, या कामांमुळे धानोरावासीयांची महत्त्वाची गरज पूर्ण होणार आहे: 🔸 उन्हातान्हात आणि पावसात बसून व्यापार करणाऱ्या लहान-मोठ्या विक्रेत्यांना तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. 🔸 कठीण प्रसंगी कुटुंबीयांना आधार देणाऱ्या स्मशानभूमी परिसराचा कायापालट होऊन तिथे आवश्यक सुविधा उभ्या राहतील. या निधी मंजुरीबद्दल राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार! #Gadchiroli #Dhanora #Maharashtra #DevendraFadnavis #DrMilindNarote
20
चामोर्शी शहराच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा! राज्य शासनाच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेअंतर्गत चामोर्शी नगर पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र. १४ येथील जुन्या शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ‘संत संताजी जगनाडे महाराज सभागृह’ बांधकामासाठी तब्बल २ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वारकरी संप्रदायाचे थोर संत आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचे लेखक श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या नावाने उभे राहणारे हे भव्य सभागृह आगामी काळात शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचे मुख्य केंद्र ठरेल. या भरीव निधीबद्दल राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार! #चामोर्शी #गडचिरोली #विकासकामे #संतसंताजीजगनाडेमहाराज #डॉमिलिंदनरोटे
22
गडचिरोलीतील पथविक्रेत्यांचे स्वप्न साकार! हॉकर्स झोनसाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर! गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील कष्टकरी पथविक्रेत्यांच्या (फेरीवाल्यांच्या) हितासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, राज्य शासनाच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेअंतर्गत गडचिरोली शहरात सुसज्ज ‘हॉकर्स झोन’ (Hawkers Zone) विकसित करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपये इतका भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार! #Gadchiroli #गडचिरोली #HawkersZone #DevendraFadnavis #DrMilindNarote
4
33
लोकशाही मूल्यांचे जतन करूया, संविधान दिन चिरायू करूया! जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय देणारे महान संविधान प्रदान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! भारतीय संविधान दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा! #ConstitutionDay #SamvidhanDiwas #26November #IndianConstitution #DrMilindNarote
1
48
२६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीर शहीद जवानांना आणि प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या शूरवीरांचे हे बलिदान आणि त्याग सदैव स्मरणात राहील. #2611MumbaiAttack #Tribute #MumbaiTerrorAttack #SaluteToMartyrs
26
गडचिरोली प्रादेशिक नियोजन मंडळाच्या बैठकीस उपस्थिती! 📍 जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली | २५ नोव्हेंबर २०२६ गडचिरोली प्रादेशिक नियोजन मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहून जिल्ह्याची प्रादेशिक विकास योजना तयार करण्याची कार्यपद्धती, एजन्सी नियुक्ती तसेच विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. जिल्ह्याच्या सर्वांगीण व नियोजनबद्ध विकासासाठी आवश्यक सूचना मांडल्या. #गडचिरोली #जिल्हाविकास #प्रादेशिकनियोजन
19
फुटपाथावरील छोट्या व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा! 📍 जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली गडचिरोली शहरातील फुटपाथावर व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या व्यावसायिकांना व्यवसायासाठी योग्य व सोयीस्कर पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी मागणी यावेळी केली. छोट्या व्यावसायिकांच्या हिताचा विचार करून त्यांना योग्य जागा उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या रोजगारावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.
18
📅 २५ नोव्हेंबर २०२६ 📍 जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली बहुजन हिताय ऑटो चालक कामगार संघटना, गडचिरोली यांच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या व्यथांची दखल घेत, आज माननीय जिल्हाधिकारी (अध्यक्ष, RTA) यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मुख्य बस स्थानक ते कॉम्प्लेक्स दरम्यान लांब पल्ल्याच्या एसटी बसेसकडून होणारी स्थानिक प्रवासी वाहतूक थांबवून, परवानाधारक रिक्षा चालकांचा रोजगार सुरक्षित ठेवण्याची भूमिका प्रशासनासमोर मांडली. रिक्षा बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. बहुजन हिताय ऑटो चालक कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयजी कृपाकर, जिल्हा उपाध्यक्ष वामनजी गावतुरे, जिल्हा सचिव विनोदजी सहारे तसेच जिल्हा संघटक रुपराजजी वाकोडे व फारुखजी शेख उपस्थित होते. #गडचिरोली #रिक्षाचालक #जनहित #वाहतूकनियमन #Gadchiroli
17
हळदी समारंभास सदिच्छा भेट! 📍 रेगडी | २५ नोव्हेंबर २०२६ भारतीय जनता पार्टी बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेशजी शहा यांच्या भगिनी चि. लीना यांच्या हळदी समारंभाला उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले. यावेळी शहा परिवाराशी स्नेहपूर्ण संवाद साधत आनंदाच्या क्षणांत सहभागी झालो. लीनाच्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
13
हळदी समारंभास सदिच्छा भेट! 📍 गडचिरोली | २४ नोव्हेंबर २०२६ गडचिरोली येथील प्रतिष्ठित व्यावसायिक विजयजी हरडे यांचे सुपुत्र चि. विशाल यांच्या हळदी समारंभाला उपस्थित राहून हरडे परिवाराला शुभेच्छा दिल्या. यावेळी परिवारासोबत आनंदाचे क्षण अनुभवत स्नेहपूर्ण संवाद साधला. #सदिच्छाभेट #गडचिरोली #हळदीसमारंभ
14