🔶 In a crackdown on drug trafficking, Mumbai Crime Branch’s Unit 9, Bandra West team seized 1.505 kg of charas, worth approximately ₹1.5 crore, from a house in Bandra West One accused has been arrested.
🔶 मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-९ बांद्रा पश्चिम पथकातर्फे वांद्रे पश्चिम परिसरातील एका घरातून अंदाजे ₹ १.५ कोटी किंमतीचा १ किलो ५०५ ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली.
#DrugFreeMumbai #MumbaiPolice4All
🔸 Major Action by Ghatkopar Unit of Mumbai Police’s Anti-Narcotics Cell!
Three habitual drug traffickers arrested near the Western Express Highway in Borivali East. The Ghatkopar Unit of the Anti-Narcotics Cell, Mumbai Crime Branch, seized 1.028 kg of MD drugs worth approximately ₹3.08 crore from the accused.
🔸 मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने बोरिवली पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग परिसरात सापळा रचून विक्रीसाठी एमडी बाळगणाऱ्या तीन सराईत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या आरोपींकडून अंदाजे ३ कोटी ८ लाख ४० हजार रुपये किंमतीचा १ किलो २८ ग्रॅम वजनाचा 'एमडी' हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
#DrugFreeMumbai
#MumbaiPolice4All
🔸Under the directions of Hon’ble Shri Deven Bharti, @CPMumbaiPolice, Grievance Redressal Day was organised on Saturday, 24th October 2026, across all police stations under the supervision of the Joint Commissioner of Police (Law & Order).
Additional Commissioners of Police and Deputy Commissioners of Police visited police stations to review the proceedings and guide the officers. Assistant Commissioners of Police and Senior Police Inspectors addressed citizens’ grievances, took appropriate action on applications, and ensured necessary action in registered cases and reported crimes.
Your safety and grievances remain our priority. In cases of crimes against women, citizens are urged to contact our helpline 1090 or dial 100/112 for assistance.
🔸 मा. श्री. देवेन भारती, @CPMumbaiPolice यांच्या निर्देशानुसार, शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या देखरेखीखाली मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी अपर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांनी पोलीस ठाण्यांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला व अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले, अर्जांवर योग्य ती कार्यवाही केली तसेच नोंदविलेल्या गुन्ह्यांमध्ये व प्राप्त तक्रारींमध्ये आवश्यक ती कारवाई सुनिश्चित केली.
आपली सुरक्षितता आणि आपल्या तक्रारींचे निवारण हे आमचे प्राधान्य आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसंदर्भात मदतीसाठी नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १०९० वर संपर्क साधावा किंवा १००/११२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
#GrievanceRedressalDay #MumbaiPolice4All
🔸 Marking #NationalUnityDay2026, Hon’ble Governor of Maharashtra @maha_governor flagged off the National Motorcycle Rally from Marine Drive, Mumbai, promoting the message of Drug-Free India.
With 11 teams from States and UTs, the rally will proceed to Ekta Nagar, Gujarat, carrying the message of national unity, brotherhood and a drug-free India.
🔸 राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘नशामुक्त भारत’ राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीचा आज, शनिवार २४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथून माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते दिमाखात शुभारंभ झाला!
देशातील विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील पोलीस दलांचे ११ पथक या रॅलीत सहभागी झाले असून, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करत, नशामुक्त भारताचा संदेश देत ही रॅली आता गुजरातमधील एकतानगर (केवडिया) कडे मार्गस्थ झाली आहे.
चला, व्यसनमुक्त भारत आणि सशक्त राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपणही आपला हातभार लावुया!
#राष्टीय_एकता_दिन #नशामुक्त_भारत #NationalUnityDay #DrugFreeIndia
🔸राष्ट्रीय एकता दिन २०२६ च्या अनुषंगाने ‘नशामुक्त भारत’ संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता, मरीन ड्राइव्ह, हॉटेल ट्रायडंटसमोर, मुंबई येथे होणार आहे.
विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ११ पोलीस पथकांचा सहभाग असलेली ही रॅली अंमली पदार्थांविरोधात जनजागृती व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत एकतानगर, केवडिया (गुजरात) येथे मार्गस्थ होईल.
🔸National Motorcycle Rally carrying the message of #NashaMuktBharat will be flagged off by the Hon’ble Governor of Maharashtra on 24th October 2026 from Marine Drive, Mumbai, with 11 police contingents heading to Ekta Nagar, Gujarat, to spread awareness about drug abuse and strengthen national unity.
#NationalUnityDay
#NashaMuktBharat
#MumbaiPolice4All
As part of Cyber Security Awareness Month, Mumbai Police is conducting awareness campaigns across the city to bring it closer to a #CyberSafeMumbai.
The Eastern Region Cyber Police Station reached around 200 citizens across Tilak Nagar Police Station, RCF Police Station and railway station premises, while the Southern Region conducted a session at Girgaum Chowpatty. Citizens were guided on social media safety and ways to protect themselves from cybercrime.
सायबर सुरक्षा जागरूकता महिन्याअंतर्गत मुंबई पोलीस दलातर्फे विविध ठिकाणी सायबर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहेत.
याअंतर्गत टिळक नगर पोलीस ठाणे, आर सी एफ पोलीस ठाणे व रेल्वे स्टेशन परिसरात पूर्व विभाग सायबर पोलीस ठाण्यातर्फे अंदाजे २०० नागरिकांना व दक्षिण विभागातर्फे गिरगाव चौपाटी येथे सायबर जनजागृती सत्राअंतर्गत माहिती देण्यात आली. त्यांना सोशल मीडिया व सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
#CyberAwareness #MumbaiPolice4All #Dial1930
मुंबई पोलीस Mumbai Police retweeted
🔸 The spirit of duty lives on, inspiring generations with courage, honour and sacrifice.
Honouring the selfless service and supreme sacrifice of our police martyrs, whose legacy continues to guide and inspire us.
🔸 कर्तव्याची भावना, शौर्य, सन्मान आणि त्यागाचा वारसा पिढ्यान्पिढ्या प्रेरणा देत राहतो.
कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या वीर पोलीस हुतात्म्यांच्या निःस्वार्थ सेवेचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन. त्यांचा त्याग आणि शौर्य सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील.
#SalutingOurHeroes #PoliceCommemorationDay2026
🔸 Watch: Live Webcast of Police Commemoration Day Parade National Police Memorial, New Delhi on October 21st from 07:55hrs
🔸 थेट प्रक्षेपण: २१ ऑक्टोबर २०२६ सकाळी ७:५५ वाजल्यापासून नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पोलीस स्मारकावरून 'पोलीस स्मृती दिन संचलनाचे' थेट प्रसारण आयोजित करण्यात आले आहे.
webcast.gov.in/mha/ib
#PoliceCommemorationDay
🔸 3 drug traffickers arrested; heroin worth ₹10.16 crore seized.
Unit 11 (Kandivali) of the Mumbai Crime Branch seized 2,032 grams of heroin worth ₹10.16 crore and three mobile phones by apprehending 3 accused who are engaged in an interstate drug trafficking racket.
🔶१०.१६ कोटींच्या हेरॉईनसह ३ तस्करांना बेड्या!
मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-११ (कांदिवली) पथकाने अंदाजे १०.१६ कोटी रुपये किंमतीचे २,०३२ ग्रॅम वजनाचे हेरॉईन आणि तीन मोबाईल फोन जप्त करत ३ आरोपींना अटक करत आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
#DrugFreeMumbai #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police retweeted
🔶On the auspicious occasion of Dussehra, performed “Shastra Poojan” at Naigaon Armoury, honouring the tradition and spirit of Vijayadashami. It is the eloquent reminder of our paramount duty to protect the citizens and serve the nation.
It was attended by Shri Suvez Haque, Jt. CP (Admin); Shri Dikshit Gedam, Addl. CP (Armed Police); Shri Anand Bhoite, DCP (Armed Police); and Shri Anurag Jain, DCP (Central Region, Zone 2).
🔶विजयादशमीच्या परंपरेनुसार आज नायगाव शस्त्रागार येथे 'शस्त्रपूजन सोहळा' अत्यंत उत्साहात पार पडला. हा सोहळा म्हणजे नागरिकांचे रक्षण करणे आणि देशाची सेवा करणे या आपल्या सर्वोच्च कर्तव्याची एक अत्यंत प्रेरणादायी आठवण आहे.
या सोहळ्यास पोलीस सह आयुक्त (प्रशासन) श्री. सुवेज़ हक, अपर पोलीस आयुक्त (सशस्त्र पोलीस) श्री. दीक्षित गेदाम, पोलीस उपायुक्त (सशस्त्र पोलीस) श्री. आनंद भोइटे आणि पोलीस उपायुक्त (मध्य प्रादेशिक विभाग, परिमंडळ-२) श्री. अनुराग जैन हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई पोलीस Mumbai Police retweeted
May the victory of good over evil bring peace, prosperity and happiness to every home, and hope and harmony to our city.
Wishing everyone a Happy Dussehra and a Shubh Vijayadashami!
वाईटावर चांगल्याचा विजय, प्रत्येक घरात सुख, समृद्धी आणि आनंद, तर आपल्या शहरात शांतता, सौहार्द आणि नव्या आशेचा प्रकाश घेऊन येवो.
सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#Vijayadashami #Dussehra
This Dussehra, show some character with your passwords and protect your accounts!
सायबर स्कॅमर्सरुपी रावणाचा दहन करायचा असेल, तर मिश्र पासवर्डचा तीर वापरावाच लागतो!
|| शुभ दसरा ||
#दसरा_२०२६ #HappyDussehra
मुंबई पोलीस Mumbai Police retweeted
🔶Please note that the Tuesday meeting with Mumbaikars scheduled for tomorrow, 20/10/2026, will not take place due to Dussehra (Vijayadashami).
Regret any inconvenience caused and wish everyone a happy Vijayadashami.
Citizens are requested to meet me on Tuesday, 27/10/2026, with their doubts, complaints, and problems. No prior permission is required for this.
🔶दसरा (विजयादशमी) सणानिमित्त उद्या, मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी मुंबईकरांसोबतची बैठक होणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. सर्व नागरिकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागरिकांनी आपल्या शंका, तक्रारी व समस्या मांडण्यासाठी मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी भेट द्यावी. यासाठी पूर्वनियोजित वेळ घेण्याची आवश्यकता नाही.
#MumbaiPolice4All #MeetCPOnTuesday
Dance to the beats, not the bait.
Question the offer. Verify the source. Protect your savings.
उत्सवाच्या उत्साहात फसवणुकीला बळी पडू नका. विचारपूर्वक क्लिक करा आणि सायबर सुरक्षित रहा.
#NineHuesCues #HappyNavratri
Caught in a cyber scam’s colour play? Don’t let confusion make you pay.
Keep your celebrations colourful and your choices secure.
सायबर गुन्ह्यांच्या आकर्षक आणि रंगीत फसवुकीला बळी पडला आहात?
थांबा, कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका. उत्सवाच्या आनंदात सुरक्षेशी तडजोड करू नका आणि सायबर सुरक्षित रहा.
#NineHuesCues #HappyNavratri
🔸Under the instructions of Hon’ble Shri. Deven Bharti @CPMumbaiPolice Grievance Redressal Day was organised on 17th October 2026, Saturday across all police stations under the supervision of the Jt. CP (L&O).
On this occasion, Addl CsP and DCsP also visited the Police Stations and guided them. All ACsP and Senior Police Inspectors addressed the complaints and took appropriate action on the applications, registered cases and reported crimes.
In case of any crime against women, citizens are requested to contact our helpline number 1090 or Dial 100/112
🔸 दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मा. श्री. देवेन भारती @CPMumbaiPolice यांच्या आदेशानुसार व पोलीस सह आयुक्त (का.व सु.) मुंबई यांच्या देखरेखीखाली तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. विभागीय सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदरांच्या तक्रारी / तक्रार अर्ज/ दाखल गुन्हे यावर कार्यवाही करत निवारण केले.
महिलांविरुद्ध कोणतेही गुन्हे घडल्यास, नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १०९० किंवा १००/११२ डायल करून संपर्क साधावा.
#MumbaiPolice4All
Don't let cyber scams steal your Navratri colours.
Question the grey areas. Verify before you trust.
सायबर फसवणुकीला तुमच्या आयुष्यातील आनंद हिरावून जीवन रंगहीन करण्याचा हक्क देऊ नका. सायबर जगात सतर्क रहा.
#NineHuesCues #HappyNavratri
🔶 Committed to a Drug-Free Mumbai!
In a two-day special anti-drug drive on 14–15 October, Mumbai Police registered 72 NDPS cases, arrested 21 wanted/absconding accused, executed 40 non-bailable warrants and seized narcotics and other contraband weighing 46.16 kg of narcotics comprising ganja, mephedrone (MD), heroin / brown sugar, charas, LSD paper, cocaine, hashish and hydroponic ganja and a total of 9,540 bottles of codeine-laced cough syrup worth ₹15.87 crore, along with ₹9.47 lakh in cash.
The operation also saw 1 detention order under PITNDPS Act, 1 NDPS case under MCOCA, and removal of 20 unauthorised houses and 145 illegal shops linked to accused in NDPS crimes. Alongside enforcement, 1.83 lakh+ citizens participated in drug-awareness initiatives across 9,031 locations including Garba Venues.
Report drug-related information on the MANAS Helpline: 1933
🔶 ड्रग फ्री मुंबईच्या दिशेने एक मोठी व निर्णायक कारवाई!
१४ व १५ ऑक्टोबर रोजी राबवण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या दोन दिवसीय अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत ७२ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ६१ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ₹१५.८७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच एनडीपीएस गुन्ह्यांतील आरोपींची २० अनधिकृत घरे व १४५ अवैध पानटपऱ्या निष्कासित करण्यात आल्या. तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी गरबा कार्यक्रमांसह ९,०३१ ठिकाणी जनजागृती उपक्रम राबवण्यात आले.
अंमली पदार्थांविरोधात मुंबई पोलीस सदैव कटिबद्ध आहेत. अंमली पदार्थांबाबत माहिती देण्यासाठी मानस हेल्पलाईन १९३३ वर संपर्क साधा.
#DrugFreeMumbai #AntiDrugDrive






















