दिवाळीच्या सजावटीसाठी LED दिवे वापरा आणि गरजेपुरतीच रोषणाई करून विजेचा अपव्यय टाळा. छोट्या सवयींतून ऊर्जा वाचवूया आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करूया!
#MBMC #MiraBhayandar #SaveElectricity #EcoFriendlyDiwali
रस्त्यावर, उद्यानात किंवा सार्वजनिक नळाजवळ पाण्याची गळती आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे तक्रार नोंदवा. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, गळतीमुळे होणारी पाण्याची नासाडी रोखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
#MBMC #MiraBhayandar #savewater
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या (MoHUA) मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाचा शुभारंभ मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे आणि Making The Difference (MTD) या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने आज बुधवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी समाजमंदिर, माशाचा पाडा येथे आयोजित RRR (Reduce, Reuse, Recycle) प्रदर्शन व वापरण्यायोग्य वस्तू वितरण उपक्रमाद्वारे करण्यात आला.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शहरात एकूण १० RRR केंद्रे स्थापन केली आहेत. सेवा संकल्प अभियानांतर्गत दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नागरिकांकडून कपडे, पुस्तके, खेळणी, पादत्राणे, भांडी आणि इतर पुनर्वापरयोग्य वस्तू संकलित करण्यात आल्या. या वस्तूंचे RRR प्रदर्शनात मांडणी करून गरजू नागरिकांना त्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ६०,३५४ पुनर्वापरयोग्य वस्तू संकलित करण्यात आल्या असून, त्यापैकी ५६,३५० वस्तू गरजू नागरिकांना वितरित करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश वापरण्यायोग्य वस्तूंचा पुनर्वापर करणे, गरजू नागरिकांना उपयुक्त वस्तू उपलब्ध करून देणे, कचऱ्याचे प्रमाण कमी करणे, नैसर्गिक संसाधनांची बचत करणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, ओला व सुका कचरा तसेच सॅनिटरी आणि विशेष काळजीचा कचरा यांचे योग्य वर्गीकरण करणे आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
वापरण्यायोग्य वस्तू फेकून न देता त्यांचा पुनर्वापर करणे, गरजू नागरिकांना मदतीचा हात देणे आणि स्वच्छतेची सवय दैनंदिन जीवनात रुजविणे, या माध्यमातून स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक मिरा-भाईंदर घडविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. तसेच, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय टाळावा आणि जलसंवर्धनासाठी सहकार्य करावे.
#MBMC #SwachhMiraBhayandar #SwachhDiwaliShubhDiwali #ReduceReuseRecycle #SwachhBharat
साफसफाईतून निघालेला कचरा योग्य ठिकाणी टाकूया आणि घरासोबत आपला परिसरही स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करूया.
#MBMC #SwachhDiwaliShubhDiwali #PlasticFreeDiwali #SwachhSurvekshan2025_26 #CleanMiraBhayandar
पिण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी घ्या आणि पाण्याचा अपव्यय टाळा. पाणी बचत ही प्रत्येकाची जबाबदारी!
#MBMC #SaveWater #MiraBhayandar
गाडी धुण्यासाठी पाइपऐवजी बादली आणि स्पंजचा वापर करा. प्रत्येक थेंब वाचवा, पाणी बचतीचा संकल्प करा!
#MBMC #SaveWater #पाणीबचत #जलसंवर्धन #MiraBhayandar
स्वच्छ व पर्यावरणपूरक दिवाळीसाठी पणत्या, कंदील, मिठाई आणि भेटवस्तूंच्या खरेदीत प्लास्टिकमुक्त पर्याय निवडूया!
#MBMC #SwachhDiwaliShubhDiwali #PlasticFreeDiwali #SwachhSurvekshan2025_26 #CleanMiraBhayandar
आज सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली "स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी" अभियानाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता राखणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा साचू न देणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला. शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे तसेच फटाक्यांमुळे निर्माण होणारा कचरा योग्य पद्धतीने संकलित करणे, याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
#MBMC #SwachhMiraBhayandar #SwachhDiwaliShubhDiwali #CleanMiraBhayandar #SwachhBharat
आज सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता व मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी, मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, मा. स्थायी समिती सभापती श्री. हसमुख गहलोत, उपायुक्त (मुख्यालय) प्रणाली घोंगे, नगरसचिव दिनेश कानगुडे आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
#महर्षी_वाल्मिकी_जयंती #mbmc #mirabhayandar
Care for Those Who Keep Our City Clean!
Under the “Swachh Diwali, Shubh Diwali” campaign, Mira Bhayandar Municipal Corporation organised a comprehensive health check-up camp for 400+ sanitation workers, ensuring access to essential health screenings and medical check-ups.
A heartfelt step towards prioritising the health, safety and well-being of our Swachhata Warriors, whose dedication keeps our city clean every day.
#SwachhDiwaliShubhDiwali #MBMC #SwachhataWarriors #HealthForAll #SwachhBharatMission
मिरा भाईंदर शहरासाठी उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि आगामी संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात आज शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस महानगरपालिका मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.), मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, मा. स्थायी समिती सभापती श्री. हसमुख गहलोत, पाणीपुरवठा व मल:निसारण समिती सभापती श्री. मोहन म्हात्रे, नगरसेवक भगवती शर्मा, जय ठाकूर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर आणि शहरातील सर्व भागांत योग्य दाबाने व नियोजनबद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम (STEM) प्राधिकरण व एमआयडीसी (MIDC) यांच्यासोबत सुधारित पाणीपुरवठा वेळापत्रकाबाबत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, झोननिहाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
#watersupply #mbmc #MiraBhayandar
सेवा संकल्प अभियानांतर्गत महिलांचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि मासिक पाळीविषयक जनजागृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आज बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिका मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन वाटप व मासिक पाळी स्वच्छता जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महानगरपालिका शाळांमधील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थिनी, आशा सेविका आणि गरजू मातांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थिनी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती अनिता पाटील, उपसभापती श्रीमती हेमा बेलानी, उपायुक्त (मुख्यालय) प्रणाली घोंगे, उपायुक्त (महिला व बालकल्याण) कविता बोरकर, शिक्षण सभापती श्रीमती स्नेहा पांडे, प्रभाग समिती क्रमांक २ च्या सभापती श्रीमती सुनीता जैन, नगरसेविका श्रीमती सुरेखा सोनार, श्रीमती रुपाली मोदी, श्रीमती रुबिना फिरोज, महिला व बालकल्याण विभागप्रमुख चारुशीला खरपडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जॉन सरकार यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
#SevaSankalpAbhiyan #MenstrualHygiene #WomenEmpowerment #MBMC #MiraBhayandar
मिरा-भाईंदर शहरातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी दर आठवड्यातील ठरावीक कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याची बचत करावी आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
#MBMC #MiraBhayandar #WaterConservation #SaveWater #MajhiVasundhara
स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पाणी व वीज बचत आणि सार्वजनिक स्वच्छतेचे संकल्प करून मिरा-भाईंदर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवूया.
#MBMC #Vijayadashami #Dussehra #SwachhMiraBhayandar #MiraBhayandar
Mira Bhayandar Municipal Corporation,Maharashtra (802786)
🚴♂️♻️ Ride to Segregate | Seva Sankalp Abhiyan
Under the Seva Sankalp Abhiyan, Mira Bhayandar Municipal Corporation organised a “Ride to Segregate” Cyclothon on 18 October 2026 at 7:00 AM, from Mira Road Railway Station to Bhaktivedanta Hospital, with enthusiastic participation from 300–350 students and members of cycling groups and associations.
Carrying placards with waste segregation messages, participants spread awareness about four-way waste segregation—Wet Waste, Dry Waste, Special Care Waste and Sanitary Waste, in line with the Solid Waste Management Rules, 2026.
This initiative reinforces the message that segregation begins at source, and every citizen has a vital role in building a cleaner, greener and more sustainable India.
#SevaSankalpAbhiyan #SwachhSurvekshan2026 #SWMRules2026 #RideToSegregate #WasteSegregation
🔇 नवरात्रोत्सव श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि आनंदाचा… पण आवाजाचा नाही!
गरबा-दांडियाचा आनंद साजरा करा, मात्र ध्वनीप्रदूषण टाळून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची काळजी घ्या. ध्वनिक्षेपकाच्या नियमांचे पालन करून शांत, सुरक्षित आणि आनंददायी नवरात्रोत्सव साजरा करा!
#MBMC #Navratri2026 #MiraBhayandar
उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाची मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात व धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामी जाहिर नोटीस.
#MBMC #MiraBhayandar #Gardendepartment #MBMCUpdates










































