Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.

Mumbai, India
Joined February 2013
🔷BMC's Municipal Commissioner Smt. Ashwini Bhide, instructed that the directions issued by the Hon’ble Bombay High Court regarding noise pollution caused by firecrackers and their adverse effects be implemented strictly. She also directed that effective measures be undertaken to improve air quality across Mumbai. 🔷Smt. Ashwini Bhide further instructed that the 28-point guidelines issued by the BMC for controlling air pollution be implemented rigorously. The responsibility for controlling dust at construction sites and on adjoining roads rests with the concerned developers or builders. She also directed that action be taken against those responsible if air quality monitoring systems and sensors display incorrect data or remain non-functional. 🔷A review meeting was held today to assess the implementation of the Hon’ble Bombay High Court’s directions concerning noise pollution caused by firecrackers and their adverse health effects, along with measures to improve air quality. 🔷Additional Municipal Commissioner (Eastern Suburbs) Dr. Avinash Dhakane, Deputy Municipal Commissioner (Commissioner’s Office) Shri. Prashant Gaikwad, Deputy Municipal Commissioner (Environment and Climate Change) Shri. Avinash Kate, all Zonal Joint Commissioners, Deputy Municipal Commissioners, Assistant Commissioners and concerned officials were present at the meeting. #mybmcupdates
16
24
3
58
19,363
🔷फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बृहन्मुंबईतील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 🔷वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. बांधकाम स्थळांवरील तसेच लगतच्या रस्त्यांवरील धूळ नियंत्रणाची जबाबदारी संबंधित विकासक किंवा बांधकाम व्यावसायिकांची आहे. तसेच, वायू गुणवत्ता मापन यंत्रणा आणि सेन्सरवर चुकीची आकडेवारी दिसत असल्यास किंवा ते बंद असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देशदेखील श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 🔷फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश तसेच वायू गुणवत्ता सुधारणेसाठी उपाययोजनांबाबत आज आढावा बैठक पार पडली. त्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी हे निर्देश दिले. 🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपआयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) श्री. अविनाश काटे, सर्व परिमंडळीय सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. #MyBMCUpdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
8
21
1
30
16,927
🔹फटाक्यांचा आवाज टाळूया, सणाचा आनंद द्विगुणित करूया. 🔹माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. सण साजरा करताना नियमांचं पालन नक्की करा, असे आवाहन करत आहेत प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर. #MyBMCUpdates #harshadakhanvilkar @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
29
27
4
52
8,514
🔷जंतांचा प्रादुर्भाव रोखून बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 🔷सार्वजनिक आरोग्य विभागाने या विशेष मोहिमेसाठी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात नियोजन केले आहे. 🔷शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना आणि मुला-मुलींना ही मात्रा दिली जाणार आहे. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
1
22
18
9,442
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. 🔷फटाक्यांचा आवाज टाळूया, आनंद द्विगुणित करुया ! @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
4
22
1
22
12,524
🔷माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई क्षेत्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ राबविण्यात येत आहे. 🔷या अंतर्गत, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करता येणार आहे. #mybmcupdates #SIR #SIR2026 #SpecialIntensiveRevision #SIRMaharashtra #VoterRegistration2026 #lnformedVoter @maharashtrasec @ecisveep @CEO_Maharashtra
1
23
25
12,902
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. 🔷फटाक्यांचा आवाज टाळूया, आनंद द्विगुणित करुया! #mybmcupdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
10
33
1
44
14,876
🔷मुंबईकरांनो, पाणी काटकसरीने वापरा! #savewater
27
48
1
81
34,922
🔷माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई क्षेत्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ राबविण्यात येत आहे. 🔷या अंतर्गत, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करता येणार आहे. 🔷नोटीस प्राप्त मतदारांनी अद्यापही आवश्यक दस्तऐवज सादर केले नसतील तसेच ज्यांचे मतदार यादीत नाव नाही, अशांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 🔷आपल्याच मतदान केंद्रांवर दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित या शिबिरांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. #mybmcupdates #SIR #SIR2026 #SpecialIntensiveRevision #SIRMaharashtra #VoterRegistration2026 #lnformedVoter @maharashtrasec @ecisveep @ceo_maharashtra
6
32
33
13,207
🔷मुंबईतील कोळीवाड्यांच्या ठिकाणी महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटन वृद्धीसाठी मुंबईतील माहीम चौपाटीलगत असलेला ‘सी फूड प्लाझा’ आज सुरू करण्यात आला. 🔷महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते तथा जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार, मराठी अभिनेते श्री. कमलाकर सातपुते, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. योगेश देसाई आदींसह महानगरपालिकेचे अधिकारी, बचत गटाच्या सदस्य महिला उपस्थित होत्या. 🔷हा सी फूड प्लाझा आठवड्यात दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी खुला राहणार आहे. 🔷मुंबईतील कोळीवाड्यातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महिला बचतगटांद्वारे संचलित ‘सी फूड प्लाझा’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
11
29
2
75
16,271
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. 🔷या अनुषंगाने, आपण सर्वांना नम्र विनंती आहे की, फटाक्यांचा आवाज टाळूया, सण-उत्सवांचा आनंद द्विगुणित करुया ! #mybmcupdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
20
37
2
52
16,489
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, विशेष शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील गुणवंत आणि प्रयोगशील ५० शिक्षकांचा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उप महापौर श्री. संजय घाडी यांच्या हस्त आज आदर्श महापौर शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या आदर्श ५० शिक्षकांना प्रत्येकी रुपये ११,०००/- (ECS द्वारे बँक खात्यात जमा), स्मृतिचिन्ह, मानपत्र/प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 🔷भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष श्रीमती यामिनी जाधव, सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्ष श्री. आकाश पुरोहित, नगरसेविका श्रीमती उर्मिला पांचाळ, नगरसेविका श्रीमती राजेश्री भाटणकर, नगरसेविका मेहजाबीन अतीक अहमद खान, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. दत्तात्रेय वारे गुरुजी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे, शिक्षणाधिकारी श्री. कीर्तीवर्धन किरीतकुडवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @RajeshreeAtWork
6
22
40
18,527
🔷माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई क्षेत्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ राबविण्यात येत आहे. 🔷या अंतर्गत, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करता येणार आहे. 🔷नोटीस प्राप्त मतदारांनी अद्यापही आवश्यक दस्तऐवज सादर केले नसतील तसेच ज्यांचे मतदार यादीत नाव नाही, अशांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 🔷आपल्याच मतदान केंद्रांवर दिनांक २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित या शिबिरांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. #mybmcupdates #SIR #SIR2026 #SpecialIntensiveRevision #SIRMaharashtra #VoterRegistration2026 #lnformedVoter @maharashtrasec @ecisveep @CEO_Maharashtra
3
26
29
15,355
🔷As per the directives of the Hon'ble Bombay High Court, bursting firecrackers on public roads, streets/alleys and footpaths is strictly prohibited. 🔷Let's avoid the noise of firecrackers and multiply the joy!" #mybmcupdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
13
35
1
30
20,294
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. 🔷फटाक्यांचा आवाज टाळूया, आनंद द्विगुणित करुया ! #mybmcupdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
15
37
48
17,051
🔷त्यावेळीही दिवा होता, आजही दिवा आहे. दिवा हीच आपली खरी दिवाळी ! 🔷फटाक्याला नाही म्हणा, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा. #दिवा_हीच_दिवाळी #MyBMCUpdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
13
33
3
58
13,526
🔷हंगेरीच्या १९५६ मधील क्रांती आणि स्वातंत्र्यलढ्याच्या ७०व्या वर्धापनदिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक इमारतीवर रोशणाई करण्यात आली आहे. 🔷बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबईतील हंगेरीच्या वाणिज्यदूतावासाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या या रोशणाईची ‘फ्रीडम कनेक्ट्स’ (Freedom Connects) अशी मध्यवर्ती संकल्पना आहे. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
5
27
2
64
12,313
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. 🔷फटाक्यांचा आवाज टाळूया, आनंद द्विगुणित करुया ! #mybmcupdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
16
40
4
63
12,738
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबईतील स्वच्छतेच्या बाबतीत दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी संपूर्ण प्रशासन कटिबद्ध असून, त्यानुसार स्वच्छतेबाबत लवकरात लवकर दृश्य स्वरुपात बदल दिसायला हवे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. 🔷तसेच, कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी महानगरपालिकेने प्रभावी यंत्रणा विकसित केली आहे. प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर या यंत्रणेचा तितक्याच प्रभावीपणे वापर करावा. 🔷मुंबईतील कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे (Garbage Vulnerable Points – GVP) ओळखून त्यांचे नकाशांकन करणे, अशा ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे नियमित देखरेख ठेवणे आणि संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयांनी कचरा साचण्यामागील कारणांचे विश्लेषण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. 🔷बांधकाम व पाडकाम राडारोड्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही डॉ. शर्मा यांनी सांगितले. 🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज वरळी येथील महानगरपालिकेच्या कमांड सेंटर येथे पार पडली. 🔷उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, सह आयुक्त, परिमंडळांचे उप आयुक्त, सर्व प्रशासकीय विभागांचे (वॉर्ड) सहायक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
21
23
2
61
14,319