कोपरखैरणे येथील गुरुद्वारा दशमेश दरबार येथे गुरुपूरब सोहळा भक्तीभावाने साजरा!
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व स्थानिक नगरसेवकांनी गुरुद्वारात उपस्थित राहून घेतले दर्शन; शीख बांधवांना दिल्या शुभेच्छा.
#NaviMumbai #Koperkhairane #Gurpurab #GaneshNaik
18
सीबीडी बेलापूर येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा येथे गुरुपूरब मोठ्या भक्तीभावाने साजरा!
श्री गुरु नानक देवजींच्या ५५७ व्या जयंतीनिमित्त दिवसभर कीर्तन व धार्मिक विधींचे आयोजन; शेकडो भाविकांनी अत्यंत श्रद्धेने घेतले दर्शन.
#NaviMumbai #CBDBelapur #Gurpurab #GuruNanakJayanti
12
वाशीतील हवेली मंदिरात कार्तिक पौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी!
मंदिर समितीच्या सदस्यांनी स्वतः उसाचा ताजा रस काढून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसाद म्हणून केले वाटप; भक्तांकडून उपक्रमाचे कौतुक.
#NaviMumbai #Vashi #KartikPurnima #HaveliTemple #Mahaprasad
23
कल्याण पश्चिमेत सर्पमित्र दत्ता बोबे यांच्याकडून पाच फुटी विषारी नागासह दीवड सापाला जीवदान!
गोदरेज हिल येथील टर्फच्या जाळ्यात अडकलेला नाग व ९० फुटी रस्त्यावर आढळलेला दीवड साप सुरक्षित पकडून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात मुक्त
#SnakeRescue #WildlifeConservation
47
‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’ अंतर्गत कल्याणमध्ये भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात!
रामबाग येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर शहरप्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्या उपस्थितीत दिमाखदार शुभारंभ.
#Kalyan #KhasdarKridaSangram
14
‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’चा डोंबिवलीत दिमाखदार शुभारंभ!
२० ते २९ नोव्हेंबरदरम्यान ३२ क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा व ७५ हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग; प्रणव देसाई व शौर्या अंबुरे यांचा विशेष सन्मान.
#Dombivli #Kalyan #Thane #Bhiwandi #KhasdarKridaSangram #ShrikantShinde
44
कल्याणमध्ये सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत आढळल्या अळ्या आणि काळा गाळ
टावरीपाडा येथील शंकेश्वर प्रेसिडेन्सी सोसायटीतील धक्कादायक प्रकार; पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्याची व जलवाहिनी दुरुस्तीची सचिव बजरंग तांगडकर यांची KDMC कडे मागणी.
#KDMC #WaterContamination #CivicIssue
27
तळोजा ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे नालासोपाऱ्यापर्यंत; नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाकडून ५५ वर्षीय आफ्रिकन नागरिकाला अटक! आरोपींची संख्या १० वर, आतापर्यंत ५ किलो एमडी ड्रग्ज व ८०० ग्रॅम कोकेन जप्त.
#NaviMumbai #Taloja #Nalasopara #DrugBust #NaviMumbaiPolice
बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त ठाण्यात राज्यस्तरीय भव्य एकांकिका स्पर्धा!
२७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर प्राथमिक फेरी, तर ६ डिसेंबरला गडकरी रंगायतन येथे अंतिम फेरी; ७१ संघांचा सहभाग आणि विजेत्याला ३ लाखांचे बक्षीस.
#Ekankika #BalasahebThackeray #MarathiTheatre #EknathShinde
14
कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; कायमस्वरूपी सुरक्षा कुंपण व अतिरिक्त RPF-GRP बंदोबस्त तैनात न केल्यास स्टेशन मास्तर कार्यालयाला टाळे ठोकणार; मनसे शहराध्यक्ष हर्षद पाटील यांचा इशारा.
#Dombivli #KoparStation #MNS #CentralRailway #RailwaySafety
51
उल्हास नदी प्रदूषणमुक्तीसाठी KDMC चा साडेसहा कोटींचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प!
नाल्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडणार; प्रशासनाकडून प्रकल्पाचे सादरीकरण पूर्ण, लवकरच कामाला सुरुवात होण्याचे संकेत.
#Kalyan #Dombivli #KDMC #UlhasRiver #RiverPollution #SewageTreatment
39
‘आपला दवाखाना’ बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय; कल्याणमध्ये काँग्रेसचा राज्य सरकारवर निशाणा!
डॉक्टर, कर्मचारी व औषधांच्या पुरवठ्यासह दवाखाने तातडीने सुरू करण्याची केडीएमसी काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांची मागणी;
#Kalyan #KDMC #AaplaDavakhana #Congress #KanchanKulkarni
39
बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये ठाकरे गट आक्रमक!
उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली शायना एनसी यांच्या फोटोला जोडे मारून फासले काळे; गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत लेखी तक्रार दाखल.
#Kalyan #ShivSenaUBT #VijaySalvi #ShainaNC #BalasahebThackeray
45
वाशी रेल्वे पोलिसांकडून 'जीवन रक्षा अभियानांतर्गत' मानवी साखळीद्वारे जनजागृती!
रेल्वे रुळ न ओलांडण्याचे व पादचारी पुलाचा वापर करण्याचे प्रवाशांना आवाहन; आपत्कालीन मदतीसाठी GRP हेल्पलाईन १५१२ ची दिली माहिती.
#NaviMumbai #Vashi #RailwaySafety #JeevanRakshaAbhiyan #GRP
32
दुबईला पाठवण्यात येणाऱ्या पेट्रोलियम जेलीची चोरी करणारी टोळी एपीएमसी पोलिसांकडून जेरबंद!
पुनीत कॉर्नर पार्किंगमध्ये रंगेहाथ छापा टाकत ६ आरोपींना अटक; ४०० लिटर जेली, कंटेनर व वाहनांसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त.
#NaviMumbai #APMC #NaviMumbaiPolice #CrimeUpdate #Taloja #JNPT #Vashi
53
बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या आरोपावरून कल्याणमध्ये ठाकरे गट आक्रमक!
'शायना एनसी यांनी कल्याणमध्ये येऊन दाखवावे,' ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र कपोते यांचे खुले आव्हान; तर गटनेते उमेश बोरगावकर यांची जाहीर माफीची मागणी.
#Kalyan #ShivSenaUBT #ShainaNC #BalasahebThackeray
71
प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार थाळीनाद!
मानधनवाढ व विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेविकांचा एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा.
#AnganwadiWorkers #Protest #ThaneCollectorOffice
14
मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; तीन नायजेरियन नागरिकांना अटक, तब्बल १० कोटी ९३ लाखांचे अमली पदार्थ जप्त!
अमली पदार्थ तस्करांच्या रॅकेटचा पर्दाफाश; मुंब्रा पोलिसांकडून पुढील तपास सुरू.
#Thane #Mumbra #DrugBust #ThanePolice #MumbraPolice #Crime
40
नेरूळमध्ये बालाजी गार्डन परिसरात नशेखोरांना हटकल्याने ६१ वर्षीय वृद्धावर दगडाने प्राणघातक हल्ला; उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू!
नेरूळ परिसरात गर्दूल्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
#NaviMumbai #Nerul #CrimeUpdate #DrugMenace #NaviMumbaiPolice
दुष्काळाच्या झळांमुळे बळीराजा मुंबईच्या आश्रयाला; एपीएमसी मार्केटमध्ये मोलमजुरी करून कुटुंब पोसण्याचा संघर्ष!
शेती करपल्याने अक्कलकोटमधील शेतकरी नवी मुंबईत; ओझी वाहून मिळणाऱ्या ५००-६०० रुपयांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह.
#NaviMumbai #APMC #Drought #MaharashtraFarmers #Akkalkot
15
