
Bhartiya Kamgar Sena Official Handle #ShivenaUBT
Joined February 2021
- Tweets1K
- Following54
- Followers1.5K
- Likes848
अंत न होतो तेजस्वी सूर्याचा,
अंत न होतो धगधगत्या विचारांचा!
साहेब... अनादी तुम्ही, अनंत तुम्ही,
वंदितो तव चरणी शिवसैनिक आम्ही!
#BalasahebThackeray #ठाकरे #ShivsenaUBT
1
32
Bhartiya Kamgar Sena | भारतीय कामगार सेना retweeted
भारतीय कामगार सेना कार्यालयात सहकार्यांसमवेत #लक्ष्मीपूजन!!!
#शुभदीपावली #HappyDiwali2026 #BhartiyaKamgarSena #ShivsenaUBT
Bhartiya Kamgar Sena | भारतीय कामगार सेना retweeted
Weaponizing #ESMA to Crush Unions: The Hypocrisy of the "#DoubleEngine" Sarkar
Youngsters have rightfully raised concerns over companies like Cipla advertising Goa-based positions in Himachal Pradesh. Permanent employees are being terminated and employees from other states like Himachal Pradesh are being bought to Goa!
This exposes a clear MISUSE of the Essential Services Maintenance Act (ESMA). Industries—whether manufacturing, service, or pharma - are weaponizing ESMA to crush employees' constitutional right to form unions. Just because these workers formed a union, they are facing suspensions and terminations. This is pure vindictive and unconstitutional action.
ESMA is meant for critical essential services, not to be used as a tool for corporate harassment. If the government cannot generate new employment, it must at least protect the jobs that already exist.
Look at the irony: workers residing on the Maharashtra-Goa border are being dismissed. Meanwhile, the Karnataka CM is pushing policies to secure jobs for the "sons of the soil", and similar sentiments have been echoed by UP CM Yogi Adityanath. Yet, the Chief Ministers of Maharashtra and Goa remain completely silent. If the "Double Engine Sarkar" actually cared about its people, wouldn't it be logical for Goa and Maharashtra to adopt the same protective stance for local youth - भूमिपुत्र - instead of changing their tune based on political convenience?
It is time to immediately withdraw ESMA in Goa as well as other places where it's being misused, stop the unjust terminations, and secure employment for the local youth - sons of soil.
- MP Arvind Sawant
Leader, Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray)
President, Bharatiya Kamgar Sena
Bhartiya Kamgar Sena | भारतीय कामगार सेना retweeted
गणेशभक्तांची सेवा 🙏
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | #भारतीयकामगारसेना
#Ganeshotsav2026 #ArvindSawant #आपलामाणूस #दक्षिणमुंबई
Bhartiya Kamgar Sena | भारतीय कामगार सेना retweeted
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये 'फिक्स्ड टर्म' ( मुदतबद्ध तत्वावर ) काम करणाऱ्या कामगारांवर होणारा अन्याय त्वरित दूर करून त्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन यांची भेट घेऊन केली, तसेच सविस्तर पत्र दिले. भेटीनंतर माझगाव डॉकच्या कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कामगार सेना खंबीरपणे कर्मचार्यांच्या पाठीशी उभी असुन , "माझ्या कामगारांच्या घरातील चूल मी कोणत्याही परिस्थितीत विझू देणार नाही," असा शब्द देत कामगारांना आश्वस्त केले.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अध्यक्ष, भारतीय कामगार सेना
#ArvindSawant #ShivsenaUBT #BhratiyaKamgarSena #Thackeray
Bhartiya Kamgar Sena | भारतीय कामगार सेना retweeted
वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी 'उद्योग जगला तर कर्मचारी जगेल' हे ब्रिदवाक्य दिले आहे, ते घेऊन आम्ही काम करतो, लोकांना न्याय देण्याचं काम करत राहतो. सत्तेचा दुरूपयोग करून सत्ताधारी जसे आमदार फोडाफोडी, पक्ष फोडाफोडी करतात तसेच आता कामगार संघटना फोडण्याचे प्रयत्न करतात, वरून फोन आला की नियमांना डावललं जात, परंतु आमच्या कार्यावर परिणाम होत नाही!
आज हॉटेल ताज लँड्स एंड येथे भारतीय कामगार सेनेच्या (@OfficeofBKS) बोर्डचे अनावरण केले, त्यासमयी माध्यमांसोबत साधलेला संवाद
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#ArvindSawant #BhartiyaKamgarSena #ShivsenaUBT
@OfficeofUT @AUThackeray @ShivsenaUBTComm
Bhartiya Kamgar Sena | भारतीय कामगार सेना retweeted
वरुण बेव्हरेजेस (पेप्सिको) माहुल प्लांटच्या कामगारांवर अन्याय; भारतीय कामगार सेना कामगारांच्या पाठी ठामपणे उभी!
२०१९ मध्ये 'पेप्सिको इंडिया'ने 'वरुण बेव्हरेजेस'ला हस्तांतरित केलेल्या माहुल, पैठण आणि रोहा प्लांट्सपैकी रोहा प्लांट २०२० मध्ये बंद करण्यात आला. आता माहुल (चेंबूर) मधील प्लांटही बंद करण्याचा घाट कंपनीने घातला आहे. येथील १३० कामगारांना गेली २ वर्षे जाणीवपूर्वक काम दिले जात नाहीये, ३ वर्षे पगारवाढ नाही आणि त्यांना महाराष्ट्राबाहेर जाण्याची सक्ती करत व्यवस्थापन युनियनसोबत चर्चेसही नकार देत आहे. या अन्यायाविरोधात कामगारांनी आज भेट घेतली आणि त्यांच्या समस्यांबद्दल सविस्तर चर्चा केली.
त्यांच्यासोबत संवाद साधताना मी भारतीय कामगार सेना ठामपणे कामगारांच्या पाठीशी उभी असून त्यांना न्याय मिळवून देण्याबद्दल आश्वस्त केले.
सदर बैठकीस भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, संयुक्त सरचिटणीस राम साळगावकर, वरुण बेव्हरेजेस (पेप्सिको) माहुल युनिट अध्यक्ष रवींद्र आडिवरेकर, सेक्रेटरी संदीप शिंदे, खजिनदार भावेश माहुलकर, तसेच युनिट सदस्य दादासाहेब माने, संजू सरदार आणि कामगार उपस्थित होते.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अध्यक्ष, भारतीय कामगार सेना
#ArvindSawant #BharatiyaKamgarSena #ShivsenaUBT
Bhartiya Kamgar Sena | भारतीय कामगार सेना retweeted
जे डब्ल्यू मॅरियट (JW Marriott) हॉटेल कर्मचाऱ्यांचा यशस्वी वेतन करार संपन्न!
आदरणीय पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व खासदार श्री. अरविंदजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज 'जे डब्ल्यू मॅरियट' हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचा वेतन करार यशस्वीरीत्या संपन्न झाला. 🚩
व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. यानुसार कर्मचाऱ्यांना रु. १५,०००/- पगारवाढ, रु. १५ लाखांचा आरोग्य विमा आणि दिवाळी बोनस देण्याचे निश्चित झाले असून, त्यानुसार या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा करार यशस्वीरीत्या मार्गी लावण्यासाठी चिटणीस श्री. जीवन कामत यांनी विशेष प्रयत्न केले.
या प्रसंगी हॉटेल व्यवस्थापनाकडून सन्मा. सौ. वल्लभी वैद्य (HR डायरेक्टर) आणि सन्मा. श्री. मनीष दिघे (क्लस्टर डायरेक्टर), तसेच भारतीय कामगार सेनेच्या वतीने संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस जीवन कामत, युनिट अध्यक्ष सुशांत जाधव, सरचिटणीस प्रवीण पावसकर आणि युनिट समितीचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते.
कामगारांच्या हक्कासाठी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- भारतीय कामगार सेना सदैव तत्पर!
#BhartiyaKamgarSena #ShivsenaUBT #UddhavThackeray #ArvindSawant
भारतीय कामगार सेना वर्धापन दिनाच्या सर्व कामगार, सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकारिणीस मनःपूर्वक शुभेच्छा!
सस्नेह निमंत्रण : सत्यनारायण पूजा
स्वागत समारंभ व तिर्थ प्रसाद वेळ :
सायं. ४ ते ८ वा.
स्थळ:
प्रफुल्लबन सोसायटी, आर. के. वैद्य रोड,
दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८.
1
7
106
Bhartiya Kamgar Sena | भारतीय कामगार सेना retweeted
'करो या मरो' घोषणा देत ब्रिटिश राजवटीविरोधात प्राणपणाने लढा देणाऱ्या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन!
निखार्यावर चालण्याची हिम्मत राखणारे, संकटातही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेणारे एकमेव संयमी आणि धाडसी नेतृत्व... आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे!!!
साहेब, वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा!!!
Bhartiya Kamgar Sena | भारतीय कामगार सेना retweeted
हे प्रेम...
हा उत्स्फूर्त प्रतिसाद...
आणि ही अथांग निष्ठा...
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील जनतेच्या अढळ विश्वासाची साक्ष!
आज शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात, आदरणीय पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचा भारतीय कामगार सेनेच्या वतीने सन्मा. अध्यक्ष खासदार श्री. अरविंद सावंतजी आणि सन्मा. सरचिटणीस आमदार श्री. सचिन अहिरजी यांनी चाफ्याचा हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. #ShivsenaUBT



























