जगाचा पोशिंदा माझ्या बळीराजाला भरभराटीचे दिवस येवोत..!!
बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BaliPratipada #DipawaliPadwa #बलिप्रतिपदा
98
लाखनी येथील निवासस्थानी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर विधिवत लक्ष्मीपूजन करून माता लक्ष्मीचे आशीर्वाद घेतले.
सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, तसेच सर्वांच्या घरात धनधान्याची भरभराट होवो, हीच प्रार्थना!
शुभ दीपावली! 🪔
#DrParinayFuke #DrParineetaFuke #Diwali #lakshmipujan #familytime
📍 खैरलांजी वस्ती, भंडारा.
दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त आज साकोली तालुक्यातील खैरलांजी वस्ती येथे भटके-विमुक्त व आदिवासी समाजबांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि कुटुंबीयांसह सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
समाजातील प्रत्येक घटकाला सणाचा आनंद घेता यावा, प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव व्हावी आणि प्रत्येकाच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळावी, या भावनेतून हा छोटासा संवाद साधला.
खऱ्या अर्थाने सणांची सुंदरता ही केवळ रोषणाईत नसते, तर माणसांमधील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि एकमेकांशी जोडल्या जाणाऱ्या नात्यांमध्ये असते. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने आणि आत्मीयतेने सोबत घेऊन जाणे, हीच आपल्या सामाजिक बांधिलकीची खरी ओळख आहे. या भेटीदरम्यान मिळालेले प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे क्षण नेहमीच स्मरणात राहतील.
समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची आणि त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची भावना यानिमित्ताने अधिक दृढ झाली.
या दीपावलीच्या मंगलमय पर्वात खैरलांजी वस्तीतील प्रत्येक घरात आनंदाचे दीप उजळोत, प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो. समाजातील एकोपा, बंधुभाव आणि माणुसकीची भावना अधिक वृद्धिंगत होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #Diwali #Dipawali #PeopleFirst
लाखनी तालुक्यातील ब्राह्मणी येथील वाघाच्या हल्ल्यात कृनाल कैलास उईके यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने उईके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शासनाच्या वतीने १० लाखांचा धनादेश आणि १५ लाखांची एफडी, अशी एकूण २५ लाख रुपयांची मदत वडील कैलास उईके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या. या दुःखद प्रसंगी उईके कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
1
91
दिवाळीच्या मंगल पर्वानिमित्त आज लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील गोपाळ समाज वस्तीत भेट देऊन समाजबांधवांशी मनमोकळा संवाद साधला आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आनंद, सन्मान आणि विकास पोहोचणे, हेच खऱ्या लोकसेवेचे सार आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे समाधान हीच माझ्यासाठी दिवाळीची खरी भेट आहे.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #Diwali #dipawali #PublicInteraction
1
4
150
दीपावलीच्या सणानिमित्त भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा येथील बहुरूपी समाज वस्तीला भेट देऊन समाजबांधवांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #दीपावली #Diwali #PublicInteraction
1
79
दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नव्हे, तर आनंद, आपुलकी, प्रेम आणि माणुसकीची नाती अधिक दृढ करण्याचा सण. यानिमिताने आज भंडारा तालुक्यातील गिरोला येथील वडार समाज वस्तीत भेट देऊन समाजबांधवांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस करत समस्त वडार समाज बांधवांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
समाजातील प्रत्येक घटकाच्या आनंदात सहभागी होणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि आपुलकीचे नाते जपणे, हाच या भेटीमागील मुख्य हेतू होता. समाजबांधवांनी दिलेले प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी पाहून मन भारावून गेले.
या प्रेमळ भेटीने दिवाळीचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची भरभराट होवो, हीच सदिच्छा!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #Diwali #dipawali #PublicInteraction
केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा.ना.श्री. @mohol_murlidhar जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #MurlidharMohol
104
भंडारा जिल्ह्यात आज, ९ नोव्हेंबर रोजी समाजातील वंचित, भटके-विमुक्त आणि आदिवासी बांधवांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरत, त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी विशेष दौरा...
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #Bhandara #Diwali





















































