Ravi Parab retweeted
हा स्वतः मुख्यमंत्री, गृहमंत्री आहे.. केंद्रात याचीच सत्ता आहे, सगळे रिसोर्स हातात आहेत. इच्छा असती तर दादांच्या अपघाताची चौकशी दोन दिवसात पूर्ण झाली असती..
Ravi Parab retweeted
आठवतंय ना ?
मराठा आरक्षण आंदोलक जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा याच भाजपची लोकं म्हणत होती, मुंबईत येऊन गर्दी केली, घाण केली वगैरे वगैरे.
आता याच भाजप-शिंदेची लोकं बिमारू उत्सवासाठी संपूर्ण मुंबई घाण करत आहेत. पुढची समीकरण काहीही असोत, पण मराठ्यांनी हे विसरता कामा नये.
#मुंबई
Ravi Parab retweeted
छठपूजा हा सण सगळ्याच उत्तर भारतीयांचा नाही तर फक्त भोजपुरी, मगधी आणि मैथिली भाषिकांचा सण आहे.
पण तरीही #मराठी माणसांविरोधात अवघा उत्तर भारत एकवटला आहे आणि आपले काही कपाळ करवंटे मराठी मात्र त्यांची लाळ घोटत आहेत.
Ravi Parab retweeted
नेतान्याहूंचा अंत:
आजच्या काळातील सर्वात मोठा नरसंहार करणारा आणि वंशसंहाराचा सूत्रधार, बेंजामिन नेतान्याहू, आता पतनाच्या मार्गावर आहे.
द्वेष पसरवून किती काळ सत्तेत टिकून राहता येईल, याची एक मर्यादा असते आणि बेंजामिन नेतान्याहूने ती मर्यादा ओलांडली आहे.
इस्रायलचे संभाव्य भावी पंतप्रधान गादी आयझेनकोट यांनी काल बेंजामिन नेतान्याहूवर जोरदार टीका केली आणि म्हटले:
"नेतान्याहू एक मिनिटही सरकार चालवण्यास पात्र नाहीत; ते इस्रायली लोकशाहीसाठी एक ठोस, थेट आणि तात्काळ धोका आहेत."
हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेले नेतान्याहू, गादी आयझेनकोट यांच्यासोबत 'राष्ट्रीय एकता सरकार' स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांचा उद्देश पंतप्रधानपदी कायम राहून कायदेशीर संरक्षण (immunity) मिळवणे हा होता, ज्यामुळे त्यांना अटक होण्यापासून वाचता आले असते.
दरम्यान, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी, नेसेटच्या (इस्रायली संसद) 'अरेंजमेंट्स कमिटी'ने नऊ हंगामी उपसभापतींच्या (Deputy Speakers) नियुक्तीला मंजुरी दिली. यामध्ये अहमद तिबी आणि वालिद ताहा यांसारख्या अरब कायदेकर्त्यांचाही समावेश आहे. नेतान्याहूंच्या गटाने याला विरोध केला, परंतु ते हे रोखू शकले नाहीत. याव्यतिरिक्त, इस्रायलच्या नवीन सरकारमध्ये मुस्लिमांचा सहभाग निश्चित झाला आहे.
हे जवळजवळ निश्चित आहे की, नेतान्याहूंचे कट्टर विरोधक मतान काहाना हे नेसेटचे सभापती (Speaker) बनतील. काहाना यांनी जाहीर केले आहे की, "नेतान्याहू युगाचा अंत झाला आहे आणि त्यांनी राजकारणातून बाहेर पडले पाहिजे."
मतान काहाना पुढे असेही म्हणतात की, "७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या अपयशाची मुख्य जबाबदारी नेतान्याहू यांचीच आहे."
येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी—इस्रायलची सुरक्षा यंत्रणा अत्यंत प्रगत असूनही—काही व्यक्ती मोटारसायकलवरून सीमा कुंपण तोडून दक्षिण इस्रायलमध्ये शिरल्या होत्या.
त्यांनी अनेक ज्यू वस्त्यांवर, शहरांवर आणि 'नोव्हा' संगीत महोत्सवावर हल्ले केले; त्यांनी नागरिकांवर गोळ्या झाडल्या, घरांमध्ये घुसून हत्या केल्या आणि अनेकांना ओलीस ठेवून गाझा पट्टीमध्ये नेले.
या घटनेत सुमारे १,२०० लोक मारले गेले आणि सुमारे २५० जणांना ओलीस ठेवण्यात आले. या घटनेला 'होलोकास्ट'नंतर ज्यू लोकांवरील सर्वात मोठा हल्ला आणि इस्रायल राज्याच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक घटना मानले जाते.
या हल्ल्यानंतर, इस्रायलने गाझामध्ये एक मोठी लष्करी मोहीम सुरू केली, ज्यामुळे प्रचंड विध्वंस झाला. ही एक अशी घटना ठरली जी इतिहासात नोंदवली गेली आणि पुढे एका दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धात रूपांतरित झाली.
मतान काहाना यांचा असा दावा आहे की, बेंजामिन नेतन्याहू यांनी निवडणूक जिंकण्यासाठी हे सर्व घडवून आणले. काहाना यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी उचलून धरली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या नरसंहाराची, तसेच त्याशी संबंधित गुप्तचर, लष्करी आणि राजकीय अपयशांची चौकशी करण्यासाठी एका 'स्टेट कमिशन ऑफ इन्क्वायरी'द्वारे (राज्य चौकशी आयोग) स्वतंत्र तपास केला जावा.
या प्रक्रियेत, बेंजामिन नेतन्याहू हे नवीन सरकारचे मुख्य लक्ष्य असतील आणि कदाचित त्यांना कारावासाची शिक्षाही भोगावी लागू शकते.
इतिहासातील प्रत्येक हुकूमशहाचे नशीब असेच राहिले आहे; अनेकांनी सत्तेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा वापर एक शस्त्र म्हणून केला आहे.
बेंजामिन नेतन्याहू हे एक उदाहरण आहेत की, द्वेषाची पेरणी करून ती अनंतकाळपर्यंत लादता येत नाही—तिचा शेवट निश्चित असतो. नेतन्याहू यांची १९ वर्षांची सत्ता संपुष्टात आली, हेच याचे प्रमाण आहे.
भारतात, बेंजामिन नेतन्याहू हे काही विकृत
विचारसरणीच्या लोकांसाठी एक आदर्श राहिले आहेत.
येथेही असे अनेक नेते आहेत—केवळ एकच नव्हे, तर कदाचित पाच ते सात जण—ज्यांनी त्यांच्या (नेतन्याहूंच्या) आदर्शांचे आणि धोरणांचे अनुकरण करून सत्ता मिळवली आहे. त्यांचाही शेवट निश्चित आहे; तो केवळ वेळेचा प्रश्न आहे.
शेवटी, जर 'मातृभूमी' (इस्रायल) नेतन्याहू यांना सत्तेतून बाहेर काढू शकत असेल—आणि तीही अशा वेळी जेव्हा गाझामध्ये नरसंहार सुरू होता आणि इराणसोबत युद्धाचे सावट होते—तर भारताची सध्याची परिस्थिती, त्या तुलनेत, त्या तीव्रतेच्या १० टक्क्यांपर्यंतही पोहोचलेली नाही.
Ravi Parab retweeted
पुणेकर बीड-कोल्हापूर-नगरकरांना बाहेरचे म्हणत बसले आणि बिहारच्या लोकांनी मुळा मुठा अगदी भीमा इंद्रायणीचा सुद्धा ताबा घेतला.
लॉजिक काय असेल? म्हणजे दिवाळी आली की महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील लोकांना बिनधास्त non punekar म्हणायचं पण हजार किलोमीटर लांबून आलेल्या उत्तर भारतीयांना परप्रांतीय म्हटलं की देश तुटतो!
Ravi Parab retweeted
मराठी मनाचे मानबिंदू , हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
Ravi Parab retweeted
एक देशाचा, एक राज्याचा गृहमंत्री,
अजित दादाचा पुतळा उभारत आहेत त्याच उद्घाटन करत आहेत,
पण लोकांची जी मागणी आहे मृत्यूची चौकशी व्हावी ती मात्र होत नाही.
त्यावर कोण बोलत नाही
असो
शेवटी दादा म्हणायचेच राजकारण लय वंगाळ
ते खरच आहे
#Dada
Ravi Parab retweeted
१८७४ मध्ये सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याने या तलावाची निर्मिती केली. मोत्यासारखे स्वच्छ पाणी असल्यामुळे त्याचे नाव खेम सावंतांनी मोती तलाव असे ठेवले
आज या बिहाऱ्यांनी त्याची माती केली👎
समस्त सावंत वाडीच्या सावंतांना लाज वाटली पाहिजे.
पैसे घेऊन करा मतदान कोकणवाल्यानो👎🤦
Ravi Parab retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र,
भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय.
त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा.
पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी.
भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं!
जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच !
माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की.
भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो !
बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते !
भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ !
राज ठाकरे ।
Ravi Parab retweeted
मराठी लोकांनी गणेश विसर्जन कृत्रिम तलावात करायचं पण भैय्यांच्या छट पूजेसाठी सगळ्या चौपाट्या आणि नद्या मोकळ्या करून दिल्यात.
कोकण महोत्सव छट साठी बंद केलाय.
सगळे नियम कायदे आम्ही पाळायचे आणि सरकारचे परप्रांतीय जावई मात्र बापाचं राज्य आल्यासारखं धिंगाणा घालत फिरणार.
Ravi Parab retweeted
गुजरातने पुन्हा एकदा मराठी माणसाला फसवले आहे किंवा कदाचित मराठी माणसाच्या नशिबातच अशी फसवणूक लिहून ठेवली आहे, असे म्हणावे लागेल.
या ताज्या प्रकारामागे पुन्हा एकदा अदानी आणि मुख्यमंत्री फडणवीस ही जोडी आहे.
अदानी महाराष्ट्रात एक मोठा जलविद्युत प्रकल्प उभारणार आहेत, जो एका व्याघ्र प्रकल्पाच्या (टायगर रिझर्व्ह) क्षेत्रात येतो.
वनविभागाच्या नियमांनुसार, अशा भागात उभारल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकल्पासाठी, एकूण प्रकल्प खर्चाच्या ४% रक्कम व्याघ्र प्रकल्पाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे.
पण आता अदानींची 'गुजराती व्यावसायिक बुद्धिमत्ता' पाहा.
अदानींच्या या जलविद्युत प्रकल्पाचा खर्च ५,६७५ कोटी रुपये इतका आहे.
त्यामुळे, या रकमेच्या ४% म्हणजेच २२७ कोटी रुपये व्याघ्र प्रकल्पाच्या खात्यात जमा व्हायला हवे होते.
पण त्याऐवजी, अदानींनी महाराष्ट्र वनविभागाला सांगितले की, त्यांच्या प्रकल्पाचा खर्च ५,६७५ कोटी रुपये नसून केवळ ५६.७५ कोटी रुपये आहे!
परिणामी, व्याघ्र प्रकल्पासाठी मिळणारा ४% वाटा थेट २.२७ कोटी रुपयांवर आला. थोडक्यात सांगायचे तर, अदानींनी ९९% रक्कम स्वतःच्या खिशात घातली.
आणि फडणवीस जे स्वतः 'चोरलेल्या मतांच्या' बळावर सत्तेत आले आहेत त्यांच्या हाताखालील नोकरशहांनी अदानींचा हा दावा जसाच्या तसा मान्यही करून घेतला.
अशा प्रकारे, केवळ दशांश चिन्ह (डेसिमल पॉइंट) इकडून तिकडे सरकवून, अदानींनी हे स्पष्ट केले आहे की आपण मराठी माणसे म्हणजे निव्वळ मूर्ख आहेत.
गंमत म्हणा की फुटके नशीब म्हणा की दुर्देव मराठी माणसाला मूर्खात काढणारा एक मराठी माणूस आहे...
दुसऱ्याची कणभर चूक जगजाहीर करणारे, स्वतःची मणभर चूक मात्र लपवतात… हाच आजच्या राजकारणाचादुटप्पीपणा असतो..!
41
Ravi Parab retweeted
Replying to @ChDadaPatil
ज्या हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून आपण निवडणूक लढवली, आज तेच तुमचे 'स्वाभिमानी सहकारी' झाले? दादा, गोकुळचं दूध पांढरं असतं, पण तुमचं राजकारण किती वेळा रंग बदलतं हे अख्खा कोल्हापूर पाहतोय! 🥛🎭
Ravi Parab retweeted
🚩 स्वराज्याचं आख्यान – अप्रतिम व्याख्यान! 🚩
स्वर गंधार रिव्हर फेस्टिव्हलमध्ये छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची गौरवगाथा अनुभवायला मिळाली! ❤️🔥
इतिहासाचा अभिमान जागवणारा हा कार्यक्रम नक्की बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा!
जय भवानी! जय शिवाजी! जय शंभूराजे! 🚩
#SwargandharRiverFestival #SwarajyachaAakhyan #ChhatrapatiSambhajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #JaiShambhuraje
@Karus123SB
Ravi Parab retweeted
दिवाळी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. फराळ साठी या 😋♥️
@gharchatiffin
एक कटु सत्य..!
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !
राज ठाकरे ।
3
59
Ravi Parab retweeted
ब्रेकिंग न्यूज 🤔
कन्नड तालुक्यातील भांबरवाडी तांडा मधल्या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 4 थी च्या तुकडी अ ,ब,क वर्गातील मॉनिटर पदाच्या नियुक्ती वर न्यायालया कडून स्थगिती .
देवेंद्र फडणवीस यांनी,3 नवीन मुलांना ऍडमिशन देऊन वर्ग मॉनिटर बनवले .
@INCIndia
@rautsanjay61























