प्रथमेश retweeted
आळंदीमध्ये इंद्रायणी काठावर छठ पूजा ही धोक्याची घंटा आहे तुमच्या आमच्या साठी. ज्ञानोबा माऊलींच्या समाधीस्थळ आहे तिथे फटाके वाजवले आहेत या कर्मदरिद्री लोकांनी. आळंदी ग्रामस्थांनी सभा घेऊन तिथे छठ पूजेवर कायमची बंदी घालण्याचा विचार केला आहे. आता गरज आहे एकत्र येण्याची.
अजिबात ignore करण्यासारखं पुस्तक नाही हे. हलक्यात घेऊ नका दुनियादारी level ची भानगड ए ही. #पुस्तक
15
पूर्वी अशा ट्विट बघितल्या की username check करायचो, आता सवयीचं झालंय
बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) व्यवस्थित असती तर अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला नसता. अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी बारामतीच्या विमानतळावर व्हिजिबिलिटी का कमी होती तर या विमानतळापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर शेंडफळ येथे रोहित पवारांचा एक साखर कारखाना आहे. रोहित पवारांच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून जो धूर निघतो, त्या धुरामुळे बारामती परिसरातील व्हिजिबिलिटी कमी झाली आहे. फेब्रुवारीत तापमान कमी असते, आपल्याला माहिती आहे, तापमान कमी असल्यावर धुराचा फॉग तयार होतो. या परिसरात पावणेनऊच्या वेळेस अपघात झाला तेव्हा रोहित पवार यांच्या कारखान्यामुळे व्हिजिबिलीटी कमी झाली होती. - नवनाथ बन, प्रवक्ते (भाजप)
#BJP #AjitPawar #RohitPawar #MaharashtraPolitics #NavnathBan
(BJP, Ajit Pawar, Rohit Pawar, Maharashtra Politics, Navnath Ban)
1
31
प्रथमेश retweeted
अल्लाउद्दीनकडे “जादूचा दिवा” होता. आपल्याकडे ‘पुस्तकं’ आहेत.
जादू मात्र तीच!
योग्य पुस्तकं निवडा, ती नीट समजून घ्या, त्यातलं ज्ञान शहाणपणानं वापरा आणि बघा, आयुष्य कसं उजळून निघतं!
वाचनाच्या अशा जादुई प्रवासावर गप्पा मारायला मी या शनिवारी संध्याकाळी ६ वाजता पुण्यात येतोय.
१/५
मी लोकांना सांगितलेले टेक्निक्स आणि solutions स्वतः वापरले तरी आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम सुटतील 🙆🏻🤷🏻
उत्तम आहे अंक #दिवाळी_पाडवा 🪔📖📚
Hon. mentions -
वैखरीच्या वाटेवरचा नांददीप ( विषय : प्रा शिवाजीराव भोसले )
चित्रकथी तात्या (विषय : व्यंकटेश माडगुळकर)
लँडमार्क्स हवेत ( संवाद : रामदास भटकळ @PopularPrakashn , दासू वैद्य)
6
84
प्रथमेश retweeted
मराठी एक्स (ट्विटर) प्लॅटफॅार्म नेहमीच मराठी भाषा, संस्कृती आणि त्यासंबधीत नवनव्या सर्जनशील प्रयोगांना, कल्पनांना मनापासून साथ देत आलाय.
या सोहळ्याला आपण सर्वांनी वेळ काढून नक्की या. मी पण येतोय. भेटूया.
#मराठी
प्रथमेश retweeted
माझा मित्र कार्टूनिस्ट आलोक @caricatured यावर्षी एक भन्नाट, क्रिएटिव्ह आणि पुर्ण नवा प्रयोग घेऊन आलाय.
पुलं देशपांडे यांच्या खुमासदार विनोदांचं कॅलेंडर.
आपल्याकडे मराठीत असे ‘धाडसी’ प्रयोग व्हायला हवेत.
आपणही सर्वांनी अशा प्रयोगांना साथ द्यायला हवी.
#मराठी #दिनदर्शिका
१/३
प्रथमेश retweeted
एकमेकांचे विचार पूर्ण भिन्न आहेत हे माहिती असूनही एकत्र प्रवास करायचा. चूकभूल समजून घ्यायची. पुन्हा कधी भेटू याची कसलीच खात्री नसते, शक्यताही नसते. तरीपण प्रवासाचा जो टप्पा ठरलाय, तिथपर्यंत नीट साथ द्यायची.
प्रवास माणसाला प्रगल्भ बनवतो. प्रवास कायम सूरू ठेवायचा.
प्रथमेश retweeted
आमच्या लांजा संगमेश्वर भागात ही प्रथा आहे आणि ते सर्वत्र होते असे माझे म्हणणे देखील नाही. ज्यांच्याकडे प्रथा आहे त्यांना योग्य वाटते.कोकणात भैरी भवानीच्या गोंधळाला बोकड कापतात आणि तो सुद्धा देवा समोर.
हे योग्य नाही म्हणत कांगावा केलात तर मटणाची हाडे तोंडात कोंबून मिळतील.
प्रथमेश retweeted
काल इंडिगोच्या विमानाने प्रवास केला.
इंडिगो ही माझी तशी पहिली चॅाईस कधीच नसते. परंतू हल्ली सर्वच एअरलाईन्स एअर इंडियाला आदर्श मानून प्रवासाला लागल्याने “मग दुसरा काही पर्याय असेल तर सांगा” या विवेकी , सर्वमान्य व सर्वदूर पोहचलेल्या फिलोसॅाफीमुळे इच्छा असो की नसो त्यानेच प्रवास करावा लागतो.
खरं तर वीसेक वर्षांपूर्वी ज्यांनी एअर इंडीया, जेट एअरवेज, काही वर्षांपूर्वी विस्तारा आणि सार्वकालीन - सर्वश्रेष्ठ किंगफिशर एअरलाईन्सने प्रवास केलाय त्यांनाच खरा राजेशाही विमानप्रवास म्हणजे काय ते ठाऊक आहे.
कधीकधी तर वाटते आजच्या पिढीला हे कळावे म्हणून श्री श्री श्री विजय मल्ल्यांना भारतात बोलावून पुन्हा एकदा किंगफिशर एअरलाईन्स चालू करू द्यावी. लोकांना नक्की बेस्ट एअरट्रॅव्हल काय असतो तो तरी एकदाचा कळेल.
बाकी त्यांच्या भानगडी हा वेगळा विषय. पण किंगफिशर म्हणजे भारतीय हवाई प्रवासाला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं असं माझं ठाम मत आहे. यावर पुन्हा कधीतरी सविस्तर चर्चा करूया.
तर मुळ विषयाकडे येतो. विषय आहे इंडिगोच्या विमान प्रवासाचा आणि त्यांनी प्रवासात दिलेल्या खाद्यपदार्थांचा.
चार - साडेचार तासांचा आंतरराष्ट्रीय प्रवास. विमान सूरू झाल्या झाल्या एअरहोस्टेसने पाण्याची बाटली दिली. मी नेहमीच्या सवयीने लेबलं पाहिलं - Blue Fire नावाची पाण्याची बाटली. मग उत्सुकता म्हणून त्याचा बॅाटलिंग प्लांटचा पत्ता पाहिला. तो पत्ता होता, हिमाचल प्रदेशचा.
थोड्या वेळाने कुकीज आणि रेडीमेड मसाला चहा दिला. त्याच्या कुकीजचा डबा मला नेहमीच आवडतो. (कुकीज पेक्षा). त्याचाही मॅनुफॅक्चरींग ॲड्रेस पाहिला. तो निघाला थेट तामिळनाडूचा.
पुढे काही मिक्स ड्रायफ्रुट्स दिले. त्याच मॅन्युफॅक्चरिंग होतंय बंगलोरला, कर्नाटकात. शेवटी एक छोटीशी मिठाईची वडी दिली. ती बनलेली होती दिल्लीत.
विमानात जेवण म्हणून जे दिलेलं ते रेडी टू इट प्रकारातलं होतं. ते ही चौकशी केल्यावर कळालं की ते ही तामिळनाडूमध्येच बनतंय. विशेष म्हणजे इंडीगोचा तो जूना आणि मोठा सप्लायर आहे.
एक काळ होता जेंव्हा भारतीय विमानसेवेत अशा खाद्यपदार्थांमधे मुंबई आणि दिल्लीची जवळपास मक्तेदारी होती. आता ती तशी जवळपास मोडीत निघालीये.
या पारंपारिक “हब ॲंड स्पोक” मॉडेलला इंडिगोच्या “पॉईंट टू पॉंईट” बिझनेस फिलॉसॅाफीने ने सर्वच बाजूंनी धक्का दिलाय. आता आंतरराष्ट्रीय प्रवासात मात्र त्यांनी मध्यम मार्ग स्विकारून हायब्रिड मार्ग स्वीकारला आहे असं एकंदर दिसतंय. त्याचाही त्यांना फायदाच होतोय.
आता मुद्दा क्रमांक दोन. येत्या काळात भारतात विमान प्रवास अजून वाढेल. ( काही तज्ञांच्या मते बुलेट ट्रेन किंवा अजून काही फास्ट ट्रेन्स सूरू झाल्या तर विमान प्रवास थंडावेल वगैरे वगैरे) पण मला तसं वाटतं नाही. ज्या पद्धतीची आपली लोकसंख्या आहे, भारताची भौगोलिक रचना आहे, त्याप्रमाणे यात नक्कीच प्रचंड वाढ अपेक्षित आहे. तसेच या खाद्यपदार्थांची विक्री तसेच पर्यायाने उत्पादनही खूप वाढेल. या सोबतच अजूनही याच्याशी संबंधीत अनेक उद्योग वाढतील.
महाराष्ट्रातील अनेक तरूणांनी या क्षेत्रात उतरायला हवं. Clear पाण्याचा ब्रॅंड असो किंवा पेपरबोट किंवा असे बरेचशे कन्झ्युमर ब्रॅंड्स जे अशाच प्रकारचा व्यवसाय करत मोठे बनलेत. त्यांचा आदर्श आपण घ्यायला हवा.
या सर्व व्यावसायिक प्रोसेसमधे प्रचंड कष्ट लागतात. दररोज जवळपास फायनलचीच परिक्षा द्यावी लागते. “स्पर्धा परीक्षांसारखं एकदा पास की आयुष्यभर पास” असं काही सुखावह आयुष्य नक्कीच नाही. पण जर यश मिळालं तर “मागची पुढची सगळी ब्लडलाईन - तुमच्यावर गर्व करेल” हे मात्र नक्की. दुसरं तुम्ही तुमच्या कमावलेल्या पैशांचा वापर चांगल्या गोष्टींसाठी अभिमानानं करू शकाल.
या क्षेत्रात फक्त व्यवसायच नाही तर नोकरीच्या खूप संधी आहेत. त्यासाठीची स्किल्स शिकली तरी चांगल्या पगाराची महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर सहज नोकरी मिळू शकते. फुड टेक्नॉलाजी, सेल्स, मार्केटिंग, इंजिनियरींग, प्रोसेस ऑटोमेशन, तसेच लोअर अन मिडल मॅनेजमेंटमधे अनेक ठिकाणी तुम्हाला संधी मिळू शकते.
बाकी या प्रवासात तरी मला महाराष्ट्रातलं काहीच मिळालं नाही ही खेदाची बाब वाटली. नवी मुंबई एअरपोर्ट सूरू होत असल्याने इकडे आजूबाजूला अशा प्रचंड इंडस्ट्रीज आता येऊ घातल्यात. तीच काय आशादायी बाब.
त्यामुळे यात आपल्या मराठी मंडळींनी लक्ष घालायला हरकत नाही. (जयंत्या, सण, उत्सव यासाठी वर्गणी किंवा खडी रेती सिंमेट दम देऊन विकण्यापेक्षा) पुर्ण तयार, दर्जेदार, कायमस्वरूपी, अधिक मानाचा असा शाश्वत उद्योग कधीही चांगला.
त्याच विमानात टिश्यू पेपर दिलेला त्यावरच वाक्य या लेखाचा शेवट करताना - दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम।
आता विचार आणि कृती आपल्याला करायची आहे.



























