Avinash Pushpalata Govindrao Adik (@adik_avinash) header
Avinash Pushpalata Govindrao Adik (@adik_avinash) profile picture

Indian ; student for life , NCP National General Secretary and Spokesperson

Mumbai, India
Joined May 2019
Photo by Avinash Pushpalata Govindrao Adik (@adik_avinash)Photo by Avinash Pushpalata Govindrao Adik (@adik_avinash)Photo by Avinash Pushpalata Govindrao Adik (@adik_avinash)Photo by Avinash Pushpalata Govindrao Adik (@adik_avinash)Photo by Avinash Pushpalata Govindrao Adik (@adik_avinash)Photo by Avinash Pushpalata Govindrao Adik (@adik_avinash)Photo by Avinash Pushpalata Govindrao Adik (@adik_avinash)Photo by Avinash Pushpalata Govindrao Adik (@adik_avinash)Photo by Avinash Pushpalata Govindrao Adik (@adik_avinash)Photo by Avinash Pushpalata Govindrao Adik (@adik_avinash)
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
स्वातंत्र्यलढ्यातील संघर्षापासून समाजसेवेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देणारे, मुळशी सत्याग्रहातील अग्रणी नेतृत्व, सेनापती पांडुरंग महादेव बापट यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! गोवामुक्ती आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात देखील त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना वंदन! #सेनापती_बापट #SenapatiBapat
1
6
23
751
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #महात्मा_ज्योतिबा_फुले #MahatmaJyotibaPhule
4
13
1
29
1,122
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
आज जिल्हा क्रीडा संकुल कळफट, बारामती पुणे अंतर्गत बारामती तालुक्यातील मौजे कटफळ येथे ८०,००० चौ.मी. जागेवर उभारण्यात येणाऱ्या अतिरिक्त क्रीडा सुविधांच्या (टप्पा-३) कामाचे भूमिपूजन केलं. आजचा दिवस बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आदरणीय अजितदादांनी बारामतीला आधुनिक क्रीडा सुविधांचं केंद्र बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. क्रीडा संकुल टप्पा-१ आणि टप्पा-२ अंतर्गत अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. आज टप्पा-३ च्या माध्यमातून त्यांचं ते स्वप्न साकार होत आहे. मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संकुलासाठी ८५ कोटी १३ लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळवून घेतली. या संकुलाच्या माध्यमातून बारामतीच्या क्रीडा क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार आहे आणि आपल्या तरुण खेळाडूंना नव्या संधी मिळणार आहेत. तरुणांना केवळ शिक्षणातूनच नव्हे, तर खेळातूनही आपलं भविष्य घडवता आलं पाहिजे, त्यासाठी खेळाडूंना चांगली मैदानं, आधुनिक सुविधा आणि सरावासाठी योग्य वातावरण मिळालं पाहिजे. या संकुलात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन शक्य होईल. बारामती, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातील प्रतिभावान खेळाडूंना याचा सर्वाधिक लाभ होईल. आदरणीय दादांना ज्याप्रमाणे काम अभिप्रेत होतं, त्याप्रमाणे हे काम उत्तम दर्जाचे, वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावे. गुणवत्ता आणि कालावधी याबाबत कोणतीही तडजोड होऊ नये. खेळाडूंना प्रशिक्षण, वसतिगृह, आहार आणि इतर सोयींचीही योग्य व्यवस्था करावी, अशा सूचना प्रसंगी दिल्या. 📍 बारामती
7
34
884
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, सामाजिक समतेचे अग्रदूत आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा मार्ग दाखवत त्यांनी अन्याय, अंधश्रद्धा आणि जातिभेदाविरुद्ध वैचारिक लढा उभारला. सत्यशोधक विचारांचा वारसा आणि समतेचा संदेश देणारे त्यांचे कार्य समाजाच्या जडणघडणीत सदैव प्रेरणादायी राहील. #महात्मा_ज्योतिबा_फुले #MahatmaJyotibaPhule
4
10
31
732
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
आज बारामती येथील कन्हेरी येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या विकासकामांची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासोबतच ती दर्जेदार आणि टिकाऊ असावीत, यावर भर दिला. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करावीत आणि त्यांच्या गुणवत्तेवर काटेकोरपणे लक्ष द्यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
10
35
980
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना हक्काचा आधार! ३३ जिल्ह्यांतील पात्र कुटुंबांना ३ महिन्यांसाठी मोफत अन्नधान्य उपलब्ध... संकटाच्या काळात हक्काचं सरकार सोबतीला, सक्षम अन्नधान्य पुरवठ्याला!
1
8
32
923
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथील जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी मिळावं, या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांच्या मागण्या, समस्या आणि निवेदनातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी नियमित पाणी उपलब्ध व्हावं आणि त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा निघावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं संबंधित बाबींचा आढावा घेतला. 📍सहयोग, बारामती
8
23
1,126
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
बारामती तालुक्यातील MSEB अंतर्गत पूर्ण झालेली कामं, प्रगतीपथावर असलेली कामं आणि प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली, आवश्यक त्या सूचना केल्या. या बैठकीत बारामती तालुक्यातील सर्व विकासकामं दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीनं निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसंच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांनी शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेनं उपलब्ध राहावं. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक दुरुस्तीची कामं तातडीनं पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. 📍सहयोग, बारामती
7
35
970
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. त्या अनुषंगानं आज बारामती तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलावली, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. या बैठकीत तालुक्याचा मे ते जून २०२७ पर्यंतचा टंचाई आराखडा तयार करावा, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं तसंच आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे नागरिकांची सुरक्षा, पाणी, रस्ते, वीज यासह विविध आवश्यक गरजा लक्षात घेऊन काम करण्याविषयी आणि शासनाच्या विविध योजना प्रत्येक तळागाळातील जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 📍सहयोग, बारामती
1
9
57
1,803
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत बारामती तालुक्यातील निश्चित करण्यात आलेल्या तसंच प्रस्तावित शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा आयोजित बैठकीत घेतला. या रस्त्यांच्या कामांना आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय मान्यता तत्काळ मिळवून निर्धारित कालमर्यादेत आणि गुणवत्तेच्या निकषांनुसार कामं पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 📍सहयोग, बारामती
7
24
883
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही! पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या कामकाजाचा व कायदा-सुव्यवस्थेचा आज आयोजित बैठकीत आढावा घेतला. पुणे शहर आणि जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व असून विद्येचं माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. या शहराची शांतता व सुरक्षितता अबाधित राखणं ही पोलीस दलाची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गुन्हेगारी प्रवृत्तींचं कोणतंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, असं स्पष्ट केलं. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील खुनी हल्ल्याची घटना दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना केल्या. गुन्हेगारी हालचालींची गोपनीय माहिती संकलित करणारी यंत्रणा अधिक सक्षम करणं, अवैध शस्त्रे, कोयता गँग व ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करण्यासह सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त व सुरक्षा व्यवस्था वाढवणं, संवेदनशील भागांत विशेष लक्ष देऊन नियमित तपासणी करणं आणि वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व सक्षम करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पोलीस विभागाची कार्यक्षमता व कामगिरी अधिक उंचावण्याची गरज आहे. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील एका घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही. पोलीस दल निश्चितच आपल्या कामगिरीत सुधारणा करेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त केला. आगामी काळात पोलीस दलाचा धाक आणि दबदबा नागरिकांना दिसून येईल. पुणे शहराची शांतता, सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनानं अधिक सतर्क, सक्षम आणि परिणामकारकपणे काम करावं. याचबरोबर नागरिकांनी सुद्धा पोलीस दलाला सहकार्य करावं, असं आवाहन केलं. 📍पुणे
57
31
7
409
35,287
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर हुतात्म्यांच्या शौर्याला आणि त्यागाला विनम्र अभिवादन!
1
10
43
1,216
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य क्रीडा विकास समितीची बैठक घेऊन राज्यातील विविध विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलांच्या प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेतला. क्रीडा संकुलांसाठी दीर्घकाळापासून पडून असलेला अखर्चित निधी संबंधित समित्यांकडून परत घेऊन तो निधीची नितांत आवश्यकता असलेल्या इतर क्रीडा संकुलांना पुनर्वितरित करावा, तसेच उपलब्ध शिल्लक निधीचा तातडीने विनियोग करावा, असे निर्देश दिले. शासकीय अनुदान मर्यादेत बसणाऱ्या विविध तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांच्या प्रस्तावांना बैठकीतच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच शासकीय अनुदान मर्यादेबाहेरील क्रीडा संकुलांचे प्रस्तावही मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे, क्रीडा संकुलांची प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवी गती देणे, यासाठी मी कटिबद्ध आहे. 📍 सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
11
39
1,227
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
२६ नोव्हेंबर २००८… मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. या भीषण हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. देशाच्या रक्षणासाठी दहशतवाद्यांशी निकरानं लढताना अनेक शूर जवान आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं. त्यांचं शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि देशासाठी केलेला त्याग सदैव स्मरणात राहील. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली आणि हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन! #MumbaiTerrorAttack #26_11MumbaiAttacks #SaluteToHeroes
5
7
46
1,207
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
मुंबईवरील २६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसंच सुरक्षा दलातील अधिकारी यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या शहीद स्मृती स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली, त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. 📍 पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई #MumbaiTerrorAttack
1
10
67
1,261
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
आधुनिक तंत्रज्ञानातून शेतीला नवी दिशा, शेतकऱ्यांच्या समृद्धीचा ध्यास! #karad #farmers #maharashtra
8
28
953
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाचा अधिकार देत लोकशाहीचा भक्कम पाया घातला आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या या महान संविधानातील मूल्यांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. संविधानाचा सन्मान राखत लोकशाही मूल्ये अधिक बळकट करण्याचा आणि संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्ये प्रामाणिकपणे जपण्याचा संकल्प करूया! सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #भारतीय_संविधान_दिन #ConstitutionDay
7
7
52
1,055
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
जनतेच्या हिताचे निर्णय, विकासाचा नवा संकल्प! आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत जनकल्याणाला प्राधान्य देण्यात आले. #मंत्रिमंडळ_निर्णय #CabinetDecisions
4
6
198
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
पुण्यातील बोपदेव घाटात बसची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना भरधाव टेम्पोने धडक दिल्याची अत्यंत दुर्दैवी व मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घाटातील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या भीषण अपघातात काही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. ​या घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातातील सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ​या अपघातात प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही प्रार्थना.
6
19
96
27,892
Avinash Pushpalata Govindrao Adik retweeted
लोककल्याणासाठी सदैव कार्यतत्पर राहणारे तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या राज्याला सक्षम करणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी कराड येथे त्यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले, पुष्पचक्र अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. 📍 प्रितीसंगम, कराड #YashwantraoChavan
11
22
472