Pinned Tweet
आजच्या या शुभ दिनी लोकांना अत्रेंचे हे विचार समजलेच पाहिजेत.❤️❤️
#म #मराठी
#महाराष्ट्रदिन #महाराष्ट्र_दिन #जय_महाराष्ट्र
पैशापायी तुटलेली नाती, प्रेमाने जोडता येत नाहीत. आणि प्रेमाने जोडलेली नाती, पैशापायी तुटत नाहीत!
6
168
कार्तिक | Kartik retweeted
"माणुसकी" 🏘️🩴
ही गोष्ट आहे १९६० सालची एका नदीकाठच्या खेडेगावातल्या राजाभाऊची. एकत्रित कुटुंब असलेल्या घरातला हा राजाभाऊ, घरी गाई म्हशी असल्यामुळे खात्या पित्या घरचा पोरगा. वडील सगळ्यात थोरले असल्याने हा सगळ्या भाऊ बहिणींमध्ये वयाने मोठा. आजोबांनी दुष्काळात कुटुंब जगवण्यासाठी घेतलेल्या कर्जापोटी बरीचशी जमीन विकलेली. थोड्याफार जमिनीत आणि म्हशींच्या दुधातून घर चालायचं.
राजाभाऊचे २ चुलते आणि वडीलांनी बैलांनी शेती नांगरणे, खोती घेऊन शेती करणे अशी कामं करून परत हळूहळू वैभव आणायला चालू केलं. राजाभाऊ शाळेमधे हुशार होता पण घर आणि म्हशी सांभाळायच्या असल्यामुळे शिक्षण सातवी नंतर सोडून द्यावं लागलं. त्या काळात नोकरी लागत असताना पण न करता कुटुंबाला पुढे आणण्यासाठी शेती करायची ठरवलं. गावातच एक लहान किराणा दुकान चालू केलं, तालुक्याच्या ठिकाणावरून डोक्यावर,बैलगाडीत माल आणून गावात दुकानात विकायचे. त्या काळी सायकल सुद्धा क्वचित दिसायच्या, माल वाहतुकीसाठी बैलगाडी असायची. गावातल्या कित्येक लोकांचा किराणा उधारीवर व्हायला लागला, हळूहळू जम बसू लागला थोडी शेती घेतली. गावातल्या लोकांना हे खटकायला लागलं, जी शेती त्यांनी विकत घेतली होती ती बोली केल्यामुळे माघारी द्यावी लागलेली.
किराणा दुकान चांगलं चालत असतानाच रेशन दुकान परवाना पण त्याच्याकडे चालून आला. आता संपूर्ण गाव त्याच्याकडे येणं जाणं चालू झालं होतं. त्यातच गावच्या पाटलांनी मुलगी देऊ केली, आता पंचक्रोशी मधे राजाभाऊचं चांगलं प्रस्थ वाढलं होतं. लोकं त्याच्याकडे मंगल कार्य असो किंवा मयत त्याच्याशिवाय पान हलत नव्हतं. अशातच गावात ग्रामपंचायत निवडणूक लागलेली, लोकांनी राजाभाऊला आग्रह केला की तुम्ही उभा राहा. पण त्याचा या गोष्टीला विरोध होता, विरोधी पक्ष खूप खुश झाला कारण त्यांना तो उभा राहिला तर डिपॉसिट जप्त होण्याची भीती होती. पण गावच्या जनतेपुढे राजाभाऊला नमतं घ्यावं लागलं आणि फॉर्म भरायचे ठरवलं. विरोधातल्या लोकांनी अब्रु जाण्यापेक्षा ग्रामपंचायत बिनविरोध करून त्यांना सरपंच केलं. राजाभाऊ आता तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन गावासाठी निधी आणून विकास करायला चालू केला. हे काय गावातल्या मंडळींना पचेना, त्यांनी कटकारस्थान चालू केली. राजाभाऊ आणि त्याच्या चुलत्यांची भांडण लावली आणि घरं फोडली, प्रत्येकजण वेगळं राहायला लागलं. पण चांडाळ चौकडी एवढ्यावर थांबली नाही, त्यांनी त्याच्या बायकोचे कान भरले - मनात विष कालवून लहान मुलासहित माहेरी जायला भाग पाडलं.
दोन-चार महिन्याचे बघत बघत २ वर्ष होत आले तरीपण राजाभाऊची बायको माघारी यायला तयार होईना, शेवटी घरच्यांनी वैतागून त्याचं दुसरं लग्न लाऊन दिलं. राजाभाऊच्या सासऱ्याला मुलगा नव्हता त्यामुळे सासऱ्याची जमीन राजाभाऊला मिळू नये, म्हणून त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी पोरीला माघारी जाऊ दिलं नाही. त्यांनी त्याच्या सासऱ्याला शेती विकून तालुक्याच्या ठिकाणी राहायला जायला भाग पाडलं. राजाभाऊच्या मागं गावातली गोर गरीब जनता होती, ५० एकराच्या आसपास शेती झाल्याने रोज घरात रानात वर्दळ असायची. राजभाऊचा लहान भाऊ दादा हे सगळं बघायचा, राजाभाऊ गावच्या विकासासाठी तालुक्याला आणि जिल्ह्याला असायचा. बघत बघत पुन्हा ग्रामपंचायत निवडणूक आली, गावातल्या विरोधातल्या लोकांना वाटलं आता कशाला उभा राहतो हा. पण राजाभाऊने नाकावर टिच्चून फॉर्म भरला आणि त्यांच्या विरोधी पॅनेलचा धुरळा उडवला. आता मात्र चांडाळ चौकडीला हे सहन होईना, त्यांनी आजुन डावपेच आखायला चालू केले.
राजाभाऊचं नाव एवढं झालं होतं की गावातली लोकं किराणा, खतं, कपडे, सोने पण तालुक्याच्या ठिकाणी शेडजी कडून त्यांच्या नावावर उधार आणायचे. गावात कोणाचं शुभकार्य असेल तर राजाभाऊ आवर्जून पैशाची मदत करायचे, घरात भुसार माल नसेल तर स्वतःच्या घरातलं ज्वारी, बाजरी स्वतः त्यांच्या घरी नेऊन द्यायचा. लोकांनी उधारीचे पैसे देऊ न देऊ कधी मांडून ठेवत नव्हते, दुष्काळात रेशन आणि रॉकेल स्वखर्चाने गावाला वाटलं. पंचायत समिती मधून गोर गरिबांना विहिरी, घरं आणि पाइपलाइन करून दिल्या. काही लोकांना स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन ट्रॅक्टर आणि ट्रक घेऊन दिले, पण कधी मी पना दाखवला नाही. आता लोकांची पण आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत होती त्यामुळे त्यांना पंख फुटायला चालू झाले. चांडाळ चौकडीने लोकांचे कान भरायला चालू केलं आणि राजाभाऊची उधारी बुडवा असे सल्ले दिले. लोकांनी उधारीचे पैसे, कर्ज माघारी द्यायला नकार दिला त्यामुळे राजाभाऊला आर्थिक अडचणी यायला लागल्या. चांडाळ चौकडीने डावपेच आखून निवडणुकीच्या आधी अडचणीत आणल्याने राजजभवन उभा राहायचं नाही ठरवलं. अपेक्षेप्रमाणे विरोधातल्या लोकांना ग्रामपंचायत मिळाली आणि त्यांनी त्यांची योजना आखायला चालू केली.
१/२ 👇🏻
'कार्तिक तु ज्याप्रमाणे वागतोय, त्यातून तुझं Vision Clear असलं, तरी तुझ्यासोबत असणाऱ्या सर्व मंडळींना ते तसंच दिसेल असं नाही. आजही आम्ही ते Face करतोय. आज आपल्यासोबत असलेली मंडळी कदाचित उद्या सोबत नसतील, कारण नियम प्रत्येकाला हवे असतात. फक्त त्याची झळ मला नको, हे
1
69
२० जानेवारी २००९ त्यांनी आपल्या अध्यक्षपदाची पदाची शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा सलग दुसरा कार्यकाळ. शपथ घेतल्याच्या अवघ्या दुसऱ्या दिवशी त्यांनी एक अध्यादेश काढला.
त्यानुसार ज्यांचा वार्षिक पगार $100,000 पेक्षा जास्त होता, अशा व्हाईट हाऊसमधील
1/5
ही व्यक्ती कोण?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
हे का सांगितलं माहितीये?
आज राज्यात दुष्काळ पडलाय. तरी तुम्हाला एका तरी राजकीय नेत्यांना याची जाणिव आहे असं वाटतंय का? त्यामागे कारणही तसंच आहे.
4/5
1
1
326
खिशात पैसे नव्हते शेठ😂
"मेरे जैसे सामान्य व्यक्ति ने कहा और देशवासियों ने गोल्ड कम खरीदा, गोल्ड के दाम टूट गए..." : लखनऊ में आयोजित कार्यक्रम में बोले पीएम मोदी
#GoldPrice #NarendraModi #ABPNews
56
आजवर सर्व त्याग महिलांनी केलेत. पुरूषप्रधान संस्कृतीत महिलांना कायम दुय्यम लेखलं गेलंय, ही वस्तुस्थिती आहे. आजही काहीप्रमाणात हेच सुरु आहे. हे अनूभवायचं असेल, तर शहरात अनूभवता येणार नाही.
1/2
पैसा, प्रसिद्धी, पत सारं काही झटपट मिळवण्याच्या नादात आपण एक गोष्ट विसरत चाललोय. नैसर्गिक वाढ ही कृत्रिम वृद्धीच्या तुलनेत कायम सरस असणार!
'कोण कितीकाळ सोबत असेल?' याचा विचार नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी करायचा नसतो. त्यामुळे नेतृत्व करताना केव्हाच असुरक्षिततेची भावना दाटून येत नाही.
करत असलेले कर्म निष्कलंक असतील, तर स्वप्नांचं रोपटं सत्यात वटवृक्षाप्रमाणे बहरतं. हे बहरणे समाजहितकारक ठेवण्याचा प्रयत्न करावा.
7
154
📌
तलवारीच्या आकाराच्या विहिरीसाठी प्रसिद्ध असलेला सुंदर किल्ला
पाटणचा दातेगड / सुंदरगड | Dategad | Sundargad | Satara | सातारा
youtu.be/AdFqeyZAimo?si=P6Hs…
1
119
कार्तिक | Kartik retweeted
युरोप पेक्षा माझा गावच बरा....🏡🌧️♥️
#कृष्णा
प्रेम हे कायम पवित्र असतं. वासनेच्या आहारी जाऊन होणारं प्रेम यात येत नाही, असं माझं मत आहे.
प्रेम आपल्याला आंधळं करत नाही, तर एक नवा दृष्टीकोन देतं. प्रेम आपल्याला बंधनात अडकवत नाही, तर पुर्ण स्वातंत्र्य देतं. प्रेमात पडावं लागत नाही, ते करावं लागतं!
कार्तिक | Kartik retweeted
सह्याद्रीत वृक्षतोडीचे भयानक परिणाम उघड; झाडे नसलेल्या भागात तापमानात तब्बल २६°C ची वाढ, थेट प्रयोगातून पुरावा समोर.
#सह्याद्री #वृक्षतोड #तापमान #लोकपालक_मिडिया













