तुळशी विवाहाच्या मंगलमय शुभेच्छा! 🌿
तुळशी विवाहाच्या पवित्र पर्वानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
भगवान श्री विष्णू आणि माता तुळशी यांच्या कृपेने प्रत्येकाच्या घरात मांगल्य, प्रेम आणि समाधानाचे वातावरण सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#तुळशी_विवाह #मंगलमय_शुभेच्छा – at Malvan-Tarkarli, India
कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सर्व विठ्ठल भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना!
#कार्तिकी_एकादशी #जय_हरी_विठ्ठल – at Malvan-Tarkarli, India
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम वीर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नासाठी दिलेले त्यांचे सर्वोच्च बलिदान आणि संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील.🙏
#हुतात्मा_स्मृती_दिन
#हुतात्मादिन
शिवसेनेचे प्रेरणास्थान, अवघ्या महाराष्ट्राचे प्रबोधन करणारे थोर विचारवंत, महान समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते, निर्भीड वक्ते आणि झुंजार पत्रकार प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
#प्रबोधनकारठाकरे #स्मृतिदिन – at Malvan-Tarkarli, India
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या साहेबांचे विचार सदैव आमच्या हृदयात जिवंत राहील!
#हिंदुहृदयसम्राट – at Navi Mumbai, India
शिवसेना नेते, राज्यसभा खासदार तथा दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक मा. श्री. संजय राऊतजी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या निर्भीड विचारांच्या लेखणीतून मराठी माणसाचा आवाज बुलंद होत राहो, हीच सदिच्छा!
#SanjayRaut – at Panvel, India
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! सर्व बालगोपाळांना बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
#nehrujayanti #childrensday
बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🪔🌸
पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न, नवे क्षितीज! ✨
🪔 शुभ दिवाळी! 🪔
#दिवालीकीशुभकामनाएँ
#दिवाळीच्यासर्वांनाहार्दिकशुभेच्छा – at Panvel, India
माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धीची सदैव बरसात होत राहो.
लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या आपणांस मंगलमय शुभेच्छा! 🙏🌺🪔
#लक्ष्मीपूजन #laxmipuja
#shivsenaubt #शुभदीपावली – at Panvel, India
अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय साजरा करणारा हा मंगलमय दीपोत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. आपणांस व आपल्या परिवारास नरक चतुर्दशी व दीपावलीच्या मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!
शुभ दीपावली! 🪔
#शुभदीपावली – at Panvel, India
धन, ऐश्वर्य आणि समृद्धीची मंगलमय बरसात आपल्या सर्वांच्या जीवनात सदैव होत राहो! माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!
पवित्र धनत्रयोदशीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक मंगलमय शुभेच्छा! 🙏🪔
#धनत्रयोदशी
#dhanteras – at Navi Mumbai, India
गोमातेची मनोभावे सेवा आणि तिचे संवर्धन करण्याचे पुण्यकार्य आपल्या हातून सदैव घडत राहो. गोमातेच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात आनंद नांदो आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, हीच मनःपूर्वक प्रार्थना!
पवित्र वसुबारस व गोवत्स द्वादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🚩
#वसुबारस
महान स्वातंत्र्यसैनिक, आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रदूत क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना, अदम्य साहसाला आणि देशभक्तीपूर्ण कार्याला विनम्र अभिवादन!
#VasudevBalwantPhadke #वासुदेव_बळवंत_फडके #जय_हिंद – at Panvel, India
झाडे तोडू नका 🌳
झाडे म्हणजे केवळ हिरवळ नाही, तर आपल्या श्वासाचा आधार आहेत. त्यांच्या सावलीत अनेक पिढ्या वाढल्या, पक्ष्यांना घर मिळाले आणि निसर्गाला सौंदर्य लाभले. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश करू नका! झाडे वाचवा, निसर्ग वाचवा कारण झाडे असतील तरच उद्या असेल!
#Bhimashankar – at Navi Mumbai, India
ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
संकष्ट चतुर्थीच्या आपणांस मंगलमय शुभेच्छा!
#संकष्टीचतुर्थी
#गणपतीबाप्पामोरया – at Navi Mumbai, India
विद्या विकास मंडळ, अंधेरी पश्चिम या माझ्या शाळेतर्फे माझा सत्कार होणे, ही माझ्यासाठी अत्यंत भावूक, अभिमानास्पद आणि भाग्याची गोष्ट आहे.आयुष्यात कितीही मोठे झालो, तरी आपल्या जडणघडणीचा पाया असलेल्या शाळेचे ऋण कधीच फिटत नाही!माझ्या शाळेने दिलेले संस्कार,हीच आयुष्याची खरी श्रीमंती!🙏🏻 – at Mumbai, India
कोजागिरी पौर्णिमेला आपल्या कुटुंबात प्रेम, आरोग्य, शांती आणि समृद्धी सदैव नांदो! कोजागिरीच्या मंगलमय शुभेच्छा!
#कोजागिरी_पौर्णिमा
#kojagiripornima – at Navi Mumbai, India
लोकमत वृत्तपत्र समूहाचे मनपूर्वक आभार !!
जनसेवेचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा श्वास!
विकासासाठी सदैव तत्पर !
यशोधर (शैलेश) फणसे!
नगरसेवक प्रभाग क्रमांक ५९
वर्सोवा विधानसभा संघटक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 🚩
#shivsenaubt – at Panvel, India
मुंबई महानगरपालिकेतील मुदत ठेवींच्या वापराबाबत पारदर्शकता असावी आणि जनतेच्या पैशांचा हिशोब जनतेसमोर यावा, यासाठी स्थायी समितीत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे! मुंबईकरांच्या हक्कांसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी आमचा लढा सतत सुरू राहील.
यशोधर (शैलेश) फणसे
#bmc #ShivsenaUBT – at Navi Mumbai, India



















