गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺
गणपती बाप्पांच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🌺
“भारत हमको जान से प्यारा है”
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!
Wishing everyone a very Happy Independence Day!
🇮🇳🙏💐🙏🌷🎉
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची परंपरा आणि संतांच्या विचारांची समृद्धी लाभलेल्या आपल्या महाराष्ट्राचा अभिमान सदैव उंच राहो.
महाराष्ट्र दिन चिरायू होवो!
🙏🙏🙏💐💐💐
मराठी नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
आपणां सर्वांना निरोगी, आनंदी व समाधानी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
चला तर, आपण सर्वजण आपल्या आयुष्यात प्रगती, आनंद आणि स्नेहाची गुढी उभारूया. 🙏🙏🙏
#गुढीपाडवा #नववर्ष
जागतिक महिला दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा 🌸🙏
स्त्री ही कुटुंब, समाज आणि राष्ट्राची शक्ती आहे. तिच्या कर्तृत्वाला, त्यागाला आणि सामर्थ्याला सलाम करण्याचा हा दिवस आहे.
नागरिकांचे जीवन सुकर करणे हे शासनाचे आद्यकर्तव्य आहे. याच अनुषंगाने मा. मुख्यमंत्री, दोन्ही मा. उपमुख्यमंत्री व मा. महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्व तालुक्यांत शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
महसूल विभाग, भूमिअभिलेख विभाग आणि मुद्रांक शुल्क विभागातील राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी मागील काही काळापासून मनापासून मेहनत घेतली आहे. त्याबद्दल मी येथे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
या शिबिरांमुळे शासन आणि जनता यांच्यातील संवाद अधिक दृढ होईल आणि नागरिकांच्या विविध अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक त्या सेवा अधिक प्रभावीपणे देता येतील, असा मला विश्वास आहे.
@Dev_Fadnavis @cbawankule @CMOMaharashtra @maharevenue
महाराष्ट्र टाइम्स तर्फे आयोजित करण्यात आलेल्या “माय मराठी संगम” या महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळां मध्ये समावेश झाला, त्याबाबत संपूर्ण प्रक्रियेबाबत मला माहिती देण्याची संधी मिळाली.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
🙏🙏🙏
आज शिवजयंतीनिमित्त तमाम शिवप्रेमींना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेशाच्या प्रयत्नांमध्ये मला सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळाली, याचा मला सार्थ अभिमान आहे.
या विषयावर DD सह्याद्री वाहिनीवरील “जय महाराष्ट्र” या कार्यक्रमात पूर्वी घेतलेली माझी मुलाखत, ज्यांना पाहता आली नाही त्यांच्यासाठी… 🙏
भाग-१
youtu.be/U4U9xzdmk7E?si=9xJc…






