
भारतीय जनता पार्टी • #Political & #Social Activist • मराठा •
MUMBAI
Joined July 2011
- Tweets19.4K
- Following762
- Followers4K
- Likes12.2K
vikas pawar retweeted
राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मान.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.
अपुर्या पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत मिळावी, शासनाकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.
यावेळी उपसमितीचे सदस्य मंत्रीगण तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @cbawankule
vikas pawar retweeted
पनवेल येथील एकविरा आई मासळी बाजार कोळी महिला संस्था यांच्या वतीने कोळी समाजाच्या पारंपरिक सण-उत्सवांचे जतन, संवर्धन आणि सुरक्षित आयोजन व्हावे, तसेच मासेमारी व्यवसायाशी संबंधित बंदरावरील (धक्क्यावरील) आवश्यक सुविधा व पायाभूत कामे मार्गी लागावीत, यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन प्राप्त झाले.
कोळी समाजाची संस्कृती, परंपरा आणि मासेमारी व्यवसायाशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी शासन मच्छिमारांच्या पाठीशी असल्याचे आश्वस्त केले.
vikas pawar retweeted
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण आणि मामा तलावांमध्ये मत्स्यपालनाला चालना देऊन स्थानिक मच्छीमारांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.
भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील तलावांमधील मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत गोसेखुर्द धरण आणि मामा तलावातील मत्स्यव्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर, मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. भानुदास पालवे, भंडारा जिल्हाधिकारी (ऑनलाइन) तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @fisheriesgom
vikas pawar retweeted
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक मासळी बाजारपेठ उभारण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी माढा तालुक्यातील मौजे भीमनगर-रांजणी तसेच पंढरपूर तालुक्यातील मौजे पिराची कुरोली आणि देवगाव येथे मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मासळी बाजारपेठ उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या तिन्ही ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मासळी बाजारपेठांचे सुसज्ज व आधुनिक स्वरूपातील डिझाइन तयार करून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या माध्यमातून स्थानिक मच्छीमार बांधवांना विक्रीसाठी योग्य सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
बैठकीस आमदार श्री.अभिजित पाटील, मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री.भानुदास पालवे, सोलापूर जिल्हाधिकारी (ऑनलाइन) तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @fisheriesgom
vikas pawar retweeted
मरोळ येथे आधुनिक मासळी मार्केट विकसित करण्यासंदर्भात आज मंत्रालयातील माझ्या दालनात बैठक पार पडली.
प्रस्तावित मासळी मार्केटच्या उभारणीतील सर्व त्रुटी दूर करून मुंबई शहरात आधुनिक, सुसज्ज आणि सोयी-सुविधांनी परिपूर्ण असे मासळी मार्केट विकसित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीस मत्स्यआयुक्त श्री.भानुदास पालवे, मत्स्योद्योग महामंडळाचे अध्यक्ष श्री.प्रकाश खपले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @fisheriesgom
vikas pawar retweeted
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयातील माझ्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रकल्पाची घळभरणी लवकरच करण्याचे निश्चित करण्यात आले.
प्रकल्पग्रस्तांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, प्रकल्पाच्या कामातील अडथळे दूर करून कामाला गती द्यावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच पुनर्वसनस्थळी आवश्यक असलेल्या १८ नागरी सुविधा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.
बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (vc द्वारे), जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. जयंत बोरकर, ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. नारायण कराड, ग्रामविकास विभागाच्या सचिव श्रीमती कविता पोद्दार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
vikas pawar retweeted
श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगर येथील प्रभातफेरीत सहभाग! त्यावेळचे काही क्षण !
#GuruNanakJayanti #PrabhatPheri #Ulhasnagar
vikas pawar retweeted
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरावर धर्मध्वज फडकविण्याच्या ऐतिहासिक सोहळ्याचा वर्धापन दिन म्हणजे सनातन हिंदू संस्कृती, सनातन परंपरा आणि कोट्यवधी रामभक्तांच्या अढळ श्रद्धेचा गौरवशाली दिवस !
अनेक पिढ्यांच्या संघर्षाचे आणि अविरत श्रद्धेचे प्रतीक असलेल्या या ऐतिहासिक दिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व रामभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!
जय श्रीराम! 🚩
#ShriRamJanmabhoomi #AyodhyaRamMandir #Dharmadhwajarohan #SanatanDharma #JaiShriRam
vikas pawar retweeted
वैभववाडी तालुक्यातील श्री कुर्ला देवी त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सवानिमित्त उपस्थित राहून श्री कुर्ला देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवीचरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, जयेंद्र रावराणे, बंडू पाटील, अंबाजी हुंबे, राजेश राणे, दिलीप पाटील, जयंत रावराणे, दीपक कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री कुर्ला देवीचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो!
#Vaibhavwadi #TripurariPournima
vikas pawar retweeted
श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५७ व्या जयंतीनिमित्त आज उल्हासनगर, सेक्शन १७ येथील थायरासिंग दरबार येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलो. थायरासिंग दरबार येथून पहाटे सुरू झालेल्या रथयात्रेत पायी सहभागी होत श्री गुरुनानक देवजींच्या चरणी सेवा अर्पण करण्याचे भाग्य लाभले.
वाहेगुरूंचा जयघोष, गुरुवाणीचे मंगलमय स्वर तसेच हजारो भाविक आणि संतांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात हा भव्य सोहळा पार पडला.
शीख बांधवांच्या श्रद्धा, सेवा, समर्पण आणि बंधुभावाच्या समृद्ध परंपरेला मनःपूर्वक अभिवादन!
श्री गुरुनानक देवजी यांनी संपूर्ण मानवजातीला दिलेला प्रेम, समानता, सेवा आणि मानवतेचा संदेश समाजाला सदैव प्रेरणा देत राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना!
वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह! 🙏
#GuruNanakJayanti #PrabhatPheri #Ulhasnagar #WaheguruJi
vikas pawar retweeted
आज मंत्रालयात श्री. प्रविण परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र परिवर्तन संस्था (MITRA) यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विकास प्रकल्प, त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसह भविष्यातील विकासाच्या संधींबाबत सविस्तर चर्चा केली.
@PrvnPardeshi
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभेचे आमदार मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना आमदार म्हणून लोकप्रतिनिधित्वाची १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
@NiteshNRane
vikas pawar retweeted
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वस्व अर्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली!
#हुतात्मा_स्मृतीदिन #HutatmaSmrutiDin #संयुक्त_महाराष्ट्र_चळवळ #Maharashtra
vikas pawar retweeted
आजपासून सुरु होणाऱ्या तुळशी विवाह पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌿🪔
#TulsiVivah #TulsiVivah2026 #KartikEkadashi
vikas pawar retweeted
जागतिक मत्स्यव्यवसाय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व कोळी बांधवांना, मच्छीमारांना आणि मत्स्यव्यवसायिकांना मनःपूर्वक शुभेच्छा !
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या आणि लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या प्रगतीसाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया!
#WorldFisheriesDay #जागतिकमत्स्यव्यवसायदिन
vikas pawar retweeted
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाची ८९ वी बैठक आज बॅलार्ड इस्टेट, मुंबई येथे पार पडली.
या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशात वॉटर मेट्रो सुरू करणे, दिघी, रायगड येथे पाईल जेट्टीचे बांधकाम करणे तसेच मासळी उतरवण्याच्या केंद्रावर मच्छीमारांना मूलभूत सोयी सुविधा पुरविणे, रेवस येथे रो-रो जेट्टीचे बांधकाम, अलिबाग येथील मानकुळे येथील धरमतर खाडीकिनारी शिपयार्ड प्रकल्प उभारण्याकरिता मे.शिपटेक मरीन सोल्युशन कंपनीच्या प्रस्तावास मान्यता देणेबाबत, पनवेल येथील खाडीमध्ये बहुउद्देशीय जेट्टी प्रकल्प उभारणेकरिता मे.फेमस ड्रेजिंग कॉर्पोरेशन यांना दिलेल्या इरादापत्रास मुदतवाढ देणेबाबत, NW 10,91 आणि 83 या राष्ट्रीय जलमार्गांवर VTMS केंद्र उभारण्यासाठी IWAI ला जागा उपलब्ध करून देण्याबाबत दिलेल्या परवानगीस कार्योत्तर मंजुरी प्रदान करणे, वर्सोवा ते मढ आणि गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या जलमार्गांवर प्रवासी वाहतुकीसाठी MMB मार्फत रो पॅक्स बोट आणि स्पीड बोट खरेदी करणेबाबत, नाबार्ड अर्थसहाय्यित FIDF व RIDF योजनेअंतर्गत हाती घ्यावयाच्या मत्स्यबंदरांच्या कामाबाबत बैठकी सविस्तर चर्चा झाली.
राज्यातील सागरी वाहतूक, बंदरे आणि किनारी पायाभूत सुविधांच्या विकासाला अधिक गती देऊन महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी राज्य बनविण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
बैठकीस बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव श्री.संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.प्रदीप, निमंत्रित सदस्य तसेच महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1
vikas pawar retweeted
The 89th meeting of the Board of Directors of the Maharashtra Maritime Board (MMB) was held today at Ballard Estate, Mumbai.
The meeting held detailed discussions on several important initiatives, including:
Introducing a Water Metro service in the Mumbai Metropolitan Region (MMR).
Construction of a pile jetty at Dighi, Raigad, and provision of basic amenities for fishermen at fish landing centres.
Construction of a Ro-Ro jetty at Rewas.
Approval of the proposal submitted by M/s Shiptech Marine Solutions for developing a shipyard project along the Dharamtar Creek at Mankule, Alibaug.
Extension of the Letter of Intent issued to M/s Famous Dredging Corporation for developing a multipurpose jetty project in the creek at Panvel.
Ex-post facto approval for the permission granted to the Inland Waterways Authority of India (IWAI) to provide land for setting up Vessel Traffic Management System (VTMS) centres along National Waterways 10, 91 and 83.
Procurement of Ro-Pax boats and speedboats by the MMB to facilitate passenger transportation on the Versova–Madh and Gateway of India–Mandwa routes.
Development of fishing harbour infrastructure under the NABARD-funded Fisheries and Aquaculture Infrastructure Development Fund (FIDF) and Rural Infrastructure Development Fund (RIDF) schemes.
The meeting marked an important step towards accelerating the development of maritime transport, ports and coastal infrastructure in Maharashtra, with the vision of positioning the state as one of India's leading maritime states.
The meeting was attended by Mr Sanjay Sethi, Additional Chief Secretary, Ports Department; Mr P. Pradeep, Chief Executive Officer, Maharashtra Maritime Board; invited members; and representatives of the Maharashtra Maritime Board.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1
vikas pawar retweeted
राज्यातील बंदरे विभागाशी संबंधित सर्व स्टेकहोल्डर्ससोबत आज महाराष्ट्र सागरी मंडळाच्या (MMB) बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यातील बंदरांची कार्यक्षमता वाढवणे, पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते व रेल्वे कनेक्टिव्हिटी, बंदरांशी संबंधित नियामक बाबी, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
बंदर संचालकांनी मांडलेल्या विविध समस्या व सूचनांची नोंद घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत चर्चा केली. राज्यातील बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली.
बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., पोर्ट ऑपरेटर्स व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
A crucial meeting was held today at the Maharashtra Maritime Board (MMB) office in Ballard Estate with all stakeholders associated with the Ports Department of the State.
The meeting involved detailed discussions on enhancing the operational efficiency of ports across the state, infrastructure development, road and rail connectivity, regulatory matters concerning ports, maritime safety, cybersecurity, and the adoption of modern technologies.
Various issues and suggestions raised by the Port Directors were taken into consideration, and discussions were held on taking positive decisions to address them. It was assured that the State Government would extend all necessary support for the development of ports across Maharashtra.
The meeting was attended by Additional Chief Secretary Sanjay Sethi, Chief Executive Officer of the Maharashtra Maritime Board, Pradeep P., port operators and other concerned officials.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1
























































