
Official Twitter account of Divisional Information Office,#KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra @MAHADGIPR
Kolhapur, India
Joined July 2016
- Tweets35.3K
- Following1.2K
- Followers10.7K
- Likes10.7K
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
भगवान बिरसा मुंडा जयंती
जंगल संवर्धनातील आदिवासींची भूमिका !
गौण वनोपजांचा मितव्ययी वापर, बियाणे व रोपे टिकवणे, मधमाशांचे संरक्षण, औषधी वनस्पतींचा संयमी वापर.
वनांचे रक्षण, निसर्गाचे संवर्धन - हीच खऱ्या अर्थाने आदिवासी परंपरा !
#बिरसामुंडाजयंती #BirsaMundaJayanti
@MahaDGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
#कोल्हापूर : 'महा-पल्स एआय' (MahaPulse) प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभानंतर बोलताना @CollectorKolha1 डॉ. विजय राठोड
@MahaDGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
#कोल्हापूर : जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य आणि प्रमुख महामार्गावरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी काढावीत. तसेच सर्वाधिक अपघातग्रस्त असणाऱ्या शिरोली-किणी मार्गावरील अपघाताचे ऑडिट करण्यात यावे, अशी अपेक्षा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी व्यक्त केली.
@MahaDGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
आरोग्य सेवा अधिक गतिमान,पारदर्शक करण्यासाठी 'महापल्स' या अद्ययावत प्रकल्पाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून 'पायलट प्रोजेक्ट' (प्रायोगिक तत्त्वावर) म्हणून करण्यात आली आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अमुलाग्र, गुणवत्तापूर्ण बदल घडून येईल.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
येत्या काळात संपूर्ण राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात हा प्रकल्प क्रांतिकारक आणि दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री @iprakashabitkar यांनी केले.
@MahaDGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. विद्यापीठाने गेल्या ६४ वर्षांच्या वाटचालीत दर्जेदार शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थीभिमुख शिक्षणपद्धती, ‘कमवा आणि शिका’ योजना, विद्यार्थ्यांसाठी विविध सवलती, नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी तसेच रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त एकंदरीत कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणाऱ्या विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे.
‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार १८, गुरुवार १९ व शुक्रवार २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी घेतली आहे.
@UnishivajiOff
#दिलखुलास
#शिवाजीविद्यापीठ
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
दुष्काळी संकटात राज्य शासनाची भक्कम साथ.पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीने बळीराजाला दिलासा. पिकांच्या नुकसानीपोटी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत प्राप्तझाल्याबद्दल मिरज तालुक्यातील तानंग येथील शेतकरी बाबासाहेब चौगुले यांची प्रतिक्रिया
@MahaDGIPR @collectorsangli
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
दुष्काळी संकटात राज्य शासनाची साथ; पाच हजारांच्या मदतीने बळीराजाला दिलासा. महाराष्ट्र शासनाकडून शेतपिकाच्या नुकसानी संदर्भात 5 हजार रूपये अग्रिम मदत प्राप्त झाल्याबद्दल जत तालुक्यातील शेगाव येथील शेतकरी राकेश नाईक यांची प्रतिक्रीया
@MahaDGIPR @collectorsangli
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शासनाच्या सूचनांनुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कामांचे नियोजन करण्याच्या पालकमंत्री @ChDadaPatil यांनी दिल्या सूचना. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यंत्रणांचा घेतला आढावा
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
अल निनो व दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सूचना लक्षात घेऊन यंत्रणांनी चालू आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नियोजन करावे. तसेच, विहित मुदतीत 30 नोव्हेंबरच्या आत प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही करावी – पालकमंत्री @ChDadaPatil
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
दुष्काळी संकटात राज्य शासनाची साथ; पाच हजारांच्या मदतीने बळीराजाला दिलासा. महाराष्ट्र शासनाकडून शेतपिकाच्या नुकसानी संदर्भात 5 हजार रूपये अग्रिम मदत प्राप्त झाल्याबद्दल मिरज तालुक्यातील सावळी येथील शेतकरी रोहीत पाटील यांची प्रतिक्रीया
@MahaDGIPR @collectorsangli
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
दुष्काळी संकटात राज्य शासनाची साथ; पाच हजारांच्या मदतीने बळीराजाला दिलासा. महाराष्ट्र शासनाकडून शेतपिकाच्या नुकसानी संदर्भात 5 हजार रूपये अग्रिम मदत प्राप्त झाल्याबद्दल मिरज तालुक्यातील सावळी येथील शेतकरी अमर नाईक यांची प्रतिक्रीया
@MahaDGIPR @collectorsangli
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
खडकवासला जलाशयाला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव… #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
@MahaDGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
‘मुंबई तक’ या वृत्तवाहिनीवरील ‘महा VISION’ हा विशेष कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
‘NDTV इंडिया’ या वृत्तवाहिनीवरील ‘खबर महाराष्ट्र’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
‘NDTV मराठी’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्रनामा’ विशेष कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
#कोल्हापूर: राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी
केले.
@CollectorKolha1
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांना अभिवादन करुया!
एकतानगर, गुजरात येथे दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या ‘भारत पर्व’मध्ये सहभागी होऊया!
@EktaDiwasBharat
#सरदारपटेल
#राष्ट्रीयएकतादिवस२०२६
#SardarPatel
#RashtriyaEktaDiwas2026
#NationalUnity
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
‘पुढारी न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
‘ॲडव्हान्टेज्ड भारत : ॲन इमर्जिंग ग्लोबल केमिकल हब’ या संकल्पनेवर आधारित ‘इंडिया केम २०२६’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भारताला जागतिक रासायनिक उत्पादन केंद्र बनविण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनातून नवीन भागीदारी, गुंतवणुकीच्या संधी आणि जागतिक पुरवठा साखळीतील भारताचा सहभाग वाढण्यास चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया केम २०२६’ निमित्त दिलेल्या संदेशात भारताच्या रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उद्योगाचे अर्थव्यवस्थेतील महत्व अधोरेखित केले. केंद्रीय मंत्री नड्डा यांनी हा संदेश वाचून दाखवला. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय रसायने मंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्या हस्ते झाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल उपस्थित होते.
कृषी, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग आणि वाहननिर्मितीसाठी रासायनिक उत्पादनांचे महत्त्व अधोरेखित करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी देशांतर्गत उत्पादन, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तसेच, सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा आणि विद्युत वाहनांसाठी आवश्यक प्रगत रसायनांच्या उत्पादनात गुंतवणूक वाढवून शाश्वत उत्पादन पद्धतींचा अवलंब करण्यावर प्रधानमंत्री मोदी यांनी भर दिला.
भारताची रासायनिक उद्योगातील बाजारपेठ सध्या सुमारे २२० अब्ज अमेरिकी डॉलरची असून, २०४० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत १.६ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय मंत्री नड्डा यांनी सांगितले. रासायनिक उद्यानांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या योजनांद्वारे पायाभूत सुविधा, एकात्मिक मूल्यसाखळी आणि स्पर्धात्मक उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात असल्याचे मंत्री नड्डा यांनी सांगितले.
रासायनिक उद्योगाच्या विकासासोबत औद्योगिक सुरक्षितता, घातक रसायनांची सुरक्षित हाताळणी, कार्बन उत्सर्जनात कपात आणि प्लास्टिक पुनर्चक्रणाला प्रोत्साहन देण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. विविध देशांशी मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय उद्योगांना जागतिक बाजारपेठेत नव्या संधी उपलब्ध होणार असून, सरकार, उद्योग, संशोधक आणि गुंतवणूकदार यांच्या समन्वयातून रासायनिक उद्योगाचा शाश्वत विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे.
@narendramodi
@JPNadda
@Dev_Fadnavis
#IndiaChem2026
















