DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@InfoDivKonkan) header
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@InfoDivKonkan) profile picture

Official Twitter Account of Divisional Information Office, #KONKAN Region, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra

NAVI MUMBAI, INDIA
Joined June 2016
संविधान दिनानिमित्त किल्ले रायगडावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ विशेष सोहळा! २६ नोव्हेंबर रोजी हिरकणीवाडी येथे स्वच्छता अभियान, सामूहिक संविधान उद्देशिका वाचन, संविधान प्रतिज्ञा, पर्यावरण जनजागृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. 🕘 सकाळी ९ वाजता #संविधानदिन
68
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweeted
राज्यातील #अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दरमहा देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणा करण्यात आली आहे. अधिकाधिक सेविका व मदतनीसांना प्रोत्साहन भत्त्याचा लाभ मिळावा आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी केंद्रांसाठी निर्धारित १० निकषांपैकी किमान ७ निकष पूर्ण करणाऱ्या सेविकांना १,४०० रुपये, तर मदतनीसांना ७०० रुपये मासिक प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. सर्व १० निकष पूर्ण केल्यास सेविकांना २,००० रुपये आणि मदतनीसांना १,००० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. सुधारित निकष नोव्हेंबर २०२६ पासून लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. @iAditiTatkare #अंगणवाडीसेविका
1
3
11
3,979
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweeted
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
1
2
3
1,966
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित ‘मुंबई पुस्तक महोत्सवा’ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पुस्तक प्रदर्शनासह व्याख्याने आणि चर्चासत्रांची मेजवानी असलेल्या या महोत्सवाला पुस्तकप्रेमींनी आवर्जून भेट द्यावी. -अश्विनी भिडे, आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका
57
समान नागरी संहितेबाबत कोकण विभागात जनसुनावणी संपन्न मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांनी समितीसमोर आपली मते व सूचना मांडल्या. सर्व समाजघटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, समितीचे आवाहन #समाननागरीसंहिता #जनसुनावणी #कोकणविभाग #महाराष्ट्रशासन
1
82
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweeted
📍पंढरपूर कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा. @mieknathshinde #कार्तिकीएकादशी #कार्तिकीवारी #कार्तिकीएकादशी२०२६ #पंढरपूर
12
26
2,853
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत २४ योजनांसाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध #मत्स्यव्यवसाय #मच्छीमार #मत्स्यसंपदायोजना #महाडीबीटी #MahaDGIPR
1
1
86
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweeted
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी तसेच जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देऊन ग्रामीण भागात पाणीटंचाईवर शाश्वत उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात ‘#वॉटरकप’ स्पर्धा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नुकतीच राज्यस्तरीय कार्यकारी समितीची बैठक मंत्रालयात पार झाली. बैठकीत राज्यात वॉटर कप स्पर्धा सुरू करण्याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. स्पर्धेचे स्वरूप, अंमलबजावणीची कार्यपद्धती, विविध विभागांचा सहभाग तसेच आवश्यक प्रशिक्षण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांना आणि संबंधित घटकांना आवश्यक प्रशिक्षण देणे, त्यासाठी प्रशिक्षणाचे नियोजन करणे तसेच विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे या बाबींवर बैठकीत विशेष भर देण्यात आला. जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविणे, गावपातळीवर पाण्याचे नियोजन आणि जलसाठा निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. पाणी फाउंडेशनच्या अनुभवाचा उपयोग करून राज्यात व्यापक स्तरावर जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे नियोजन करण्यात येत आहे. बैठकीस जलसंपदा विभाग प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, जलसंपदा विभागाचे सचिव प्रकाश मिसाळ, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे पाणी फाउंडेशनचे आमिर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, एटीई चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा सहभागी झाले होते.
8
1
3
1,720
७ डिसेंबर रोजी महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अलिबाग व मुरुड तालुक्यांतील प्रलंबित महसूल अपिलांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी ७ डिसेंबर २०२६ रोजी महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे वेळ-सकाळी ११ ते सायंकाळी ५ स्थळ-उपविभागीय अधिकारी कार्यालय, अलिबाग #महसूललोकअदालत
1
73
बालपण फुलू द्या, स्वप्नांना उमलू द्या! बालविवाह रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम #बालसंरक्षण #बालकल्याण #बालविवाहनिर्मूलन #MahaDGIPR
41
येत्या २१ नोव्हेंबर रोजी #पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या #कार्तिकीएकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार #एसटी महामंडळाने सुमारे एक हजार जादा बसेस सज्ज ठेवल्या आहेत.
1
56
या माध्यमातून भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
5
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweeted
दुष्काळाच्या काळात शासन आमच्या पाठीशी उभे राहिले. दिवाळीपूर्वी माझ्या बँक खात्यात ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा झाली. या मदतीबद्दल शासनाचे आभार - प्रभाकर बुंडे (रा. आकोली, ता. सेलू, जि. वर्धा) #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #महाकर्जमुक्ती #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR #FarmerWelfare
6
3
1,773
महाराष्ट्र वेतन नियम, २०२६ लागू! कामगारांच्या वेतन संरक्षणाला बळ #कामगारकल्याण #किमानवेतन #MahaDGIPR
1
94
मानसिक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत आहात? टेलिमानसची मदत घ्या #TeleMANAS #MentalHealthSupport #मानसिकआरोग्य #MahaDGIPR
1
54
एमपीएससी परीक्षांतील कथित गैरव्यवहार प्रकरणी चौकशी निवेदने सादर करण्यास २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ #स्पर्धापरीक्षा #महाराष्ट्रलोकसेवाआयोग #MPSC #MPSCExam #MahaDGIPR
142
दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना वार्षिक उत्पन्नाची ८ लाख रुपयांची अट लागू न करता सरसकट परीक्षा शुल्कमाफी देण्यात येणार आहे
1
70
.ईबीसी, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गांतील पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
15
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याच्या ब्लू फ्लॅग मानांकनासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून यासंदर्भातील माहिती दिली. #Raigad #Shrivardhan #BlueFlag #AditiTatkare #Tourism
1
187
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweeted
राज्य शासनाने यापूर्वी #दुष्काळ घोषित केलेल्या ३०४ तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश केला आहे. #नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, #पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड, #रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तसेच #कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज हे तालुके दुष्काळी घोषित केले आहेत. त्यामुळे राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या आता ३१० झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त अहवालाच्या आधारे आणखी सहा तालुक्यांचा समावेश केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांच्या आधारे राज्य शासनाने यापूर्वी ३०४ तालुके दुष्काळी घोषित केले होते. उर्वरित तालुक्यांच्या समावेशाबाबत प्राप्त निवेदनांनंतर प्रशासनाने दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांतील पाच प्रमुख पिकांचे २० टक्के सर्वेक्षण आणि केंद्र शासनाच्या निकषांनुसार प्रत्यक्ष क्षेत्र पडताळणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला होता, त्यानुसार आणखी सहा तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यामध्ये करण्यात आल्याचे मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले. या तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठीची मदत विहित कार्यपद्धती पूर्ण केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाईल. विविध सवलतींसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभाग उपलब्ध करून देतील. शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा- gr.maharashtra.gov.in/Site/U… @makrandpatil99
4
10
3
18
15,340