
उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #Volleyball #Tilling
Regina Beach, Saskatchewan
Joined July 2020
- Tweets33.2K
- Following1.3K
- Followers20.3K
- Likes89.8K
Pinned Tweet
भुकेपेक्षा चव मोठी झाली की पोटाची आबाळं सुरू होतात..!❤️
#जगण्याची_रीत #म
सर्जेराव.. पण हैस कोण तू..?
आज खरंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मनात काय भावना असतील, त्यांना किती दुःख झालं असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण स्व. अजितदादा पवार आणि देवेंद्रजी यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्परांमधील नातं मी अतिशय जवळून पाहिलं आहे.
गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. किंबहुना, अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्रजी स्वतः नको म्हणत असतानाही, ‘मी शब्द दिला आहे आणि दिलेला शब्द पाळणारच,’ अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा होते. हे त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मैत्रीचं मोठेपण होतं.
अशा अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, कोणताही ठोस आधार नसताना या अपघाताला देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणं, हा केवळ राजकीय आरोप नाही, तर अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आहे. अशा संवेदनशील प्रसंगाचं राजकीय भांडवल करणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं.
रोहितजी, खरंतर एका अभ्यासू, बुद्धिमान आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्याकडे राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, तुमच्याकडे क्षमता आहे आणि भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची संधीही आहे. परंतु प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देणं, प्रत्येक गोष्टीत टीका-टिप्पणी करणं आणि जणू काही संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरणं मला तरी योग्य वाटत नाही.
शेवटी आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी आहोत. राजकारणात काम करताना प्रत्येकाच्या काही महत्त्वाकांक्षा असतात. त्या असणं अजिबात चुकीचं नाही. तुम्हाला आहेत, तशाच आम्हालाही आहेत आणि राज्यातील प्रत्येक तरुण नेत्याला असतील. मात्र, या महत्त्वाकांक्षांच्या प्रवासात आपण आपली राजकीय आणि वैयक्तिक मर्यादा ओलांडणार नाही, याचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे.
म्हणूनच, एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे, तर तुमच्या पिढीतील एक सहकारी आणि मित्र म्हणून एवढंच सांगावंसं वाटतं की, थोडं सबुरीने घ्या. प्रत्येक विषयात व्यक्त होण्यापूर्वी त्याचे गांभीर्य, परिणाम आणि वेळ यांचा विचार करा. राजकारणात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. काही संधी काळानुरूप आपोआप मिळत असतात. त्यामुळे स्वतःच्या राजकीय प्रवासात अनावश्यक घाई करण्यापेक्षा संयम, अभ्यास आणि सातत्य यांना अधिक महत्त्व द्या. हा केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या राजकीय भविष्यासाठी दिलेला एक मित्रत्वाचा सल्ला आहे.
बाकी तुम्ही सुज्ञ आहात, समजदार आहात आणि राजकारणाचा अनुभवही तुम्हाला आहे. त्यामुळे यापुढे काय बोलावं आणि काय बोलू नये, हे तुम्हाला नक्कीच समजेल.
आणि शेवटी, एका फोटोवरून जर एवढी टीका-टिप्पणी करायची असेल, तर असे अनेक फोटो अनेक राजकीय नेत्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे, आज समाजमाध्यमांवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडक फोटो समोर आणून त्यावरून राजकीय निष्कर्ष काढण्याचा किंवा कुणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. या विषयावर अधिक भाष्य न केलेलंच बरं.
डेडपूल... retweeted
अजित पवार की मौत, कई अनसुलझे सवाल, मफलर मैन देवेंद्र फडणवीस की दोस्ती और अब रोहित पवार का बड़ा खुलासा!
इसी साल 28 जनवरी को महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार की प्लेन क्रैश में हुई मौत के बाद से लगातार यह सवाल उठते रहे हैं कि अजित पवार की मौत एक हादसा है या सोची समझी साज़िश?
जिस कंपनी VSR की प्लेन से अजित पवार सफर कर रहे थे, उसे लेकर रोहित पवार ने कई सवाल पहले भी उपस्थिति किए.. कैसे ऐन मौके पर प्लेन के समय को बदला गया, पायलट को बदला गया, जिस रनवे पर लैंड करना था, वहां लैंड करने की कोशिश भी नहीं हुई, मुख्य पायलट आखिरी कुछ मिनटों में बात भी नहीं कर रहा था वगैराह वगैराह..
तब लगा था कि मामले की सही से जांच होगी और सच्चाई लोगों के सामने आ जाएगी.. हालांकि यह सोचने वाली बात है कि मौत के लगभग साढ़े नौ महीनों बाद भी महाराष्ट्र में इस हाईप्रोफाइल मौत के मामले में एक FIR भी दर्ज नहीं किया गया है..
इसी को लेकर सोमवार 16 नवंबर को रोहित पवार ने मुंबई में एक प्रेस कॉन्फ्रेंस किया और पूछा की क्या मंत्रिमंडल में कोई ऐसा नेता मौजूद है जो नहीं चाहता है कि जिस कंपनी के प्लेन के कारण यह हादसा हुआ और अजित पवार मारे गए, उनकी जांच ना हो?
तब रोहित पवार ने Fadnavis की नवंबर 2024 की यह मफलर वाली तस्वीर साझा की, जिसमें महाराष्ट्र चुनाव खत्म होने के बाद जब नतीजे आने ही वाले थे, तब देवेंद्र फडणवीस मुंबई से जयपुर जाते हैं और VSR कंपनी के मालिक VK Singh के बेटे की शादी में शरीक होते हैं.. यह वो समय था जब कोई भी बड़ा नेता नतीजों को लेकर अपनी रणनीति बनाने में व्यस्त रहते, लेकिन फडणवीस का ऐसे समय में जयपुर जाना अपने आप में यह सबूत है कि देवेंद्र फडणवीस और VK Singh के रिश्ते कितने गहरे हैं..
इतना ही नहीं.. अजित पवार की मौत के बाद अबतक एक FIR भी दर्ज नहीं हुआ है, बल्कि इतने बड़े हादसे के बावजूद, अजित पवार की मौत से लेकर अबतक साढ़े नौ महीनों में इसी VSR कंपनी को 168 करोड़ रुपए महाराष्ट्र सरकार की ओर से मिले हैं..
और तो और, जब रोहित पवार इस कंपनी पर बार बार आरोप लगा रहे थे, तब भी 4 अप्रैल को इंडिया टीवी के संपादक रजत शर्मा के परिवार में हुए शादी के बाद देवेंद्र फडणवीस इसी VK Singh से दिल्ली एयरपोर्ट पर मुलाकात करते हैं..
इस पूरे प्रेस कॉन्फ्रेंस में रोहित पवार ने बार बार दोहराया कि वो यह नहीं कह रहे हैं कि फडणवीस का अजित पवार की मौत से कोई लेना देना है, लेकिन उन्होंने यह पूछा कि क्या फडणवीस इस कंपनी को अपनी दोस्ती के वजह से बचा रहे हैं? अबतक इस पूरे मामले को कवर करने के बाद कई ऐसे सवाल हैं, जिसका कोई जवाब नहीं मिल पाया है..
1: दिन रात किसी भी मामले में FIR करने वाली महाराष्ट्र पुलिस ने अबतक अजित पवार जैसे हाई प्रोफाइल नेता के मौत के बाद FIR दर्ज कर जांच क्यों नहीं की?
2: महाराष्ट्र के गृहमंत्री खुद देवेंद्र फडणवीस हैं.. ऐसे में क्यों देवेंद्र फडणवीस खुद जांच के आदेश देकर दूध का दूध और पानी का पानी नहीं कर देते.. रोहित पवार को इस मामले में ज़ीरो FIR करने के लिए कर्नाटक जाना पड़ा.. उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस के ही साथी थे.. इसके बावजूद जांच क्यों नहीं हो पाई?
3: VSR कंपनी को अजित पवार की मौत के बावजूद अबतक क्यों पैसे दिए जा रहे हैं और उनकी सर्विस का इस्तेमाल क्यों किया जा रहा है.. मौत के बाद पिछले साढ़े नौ महीनों में क्यों ऐसी कंपनी को 168 करोड़ दिए गए?
4: देवेंद्र फडणवीस का VSR कंपनी के मालिक VK Singh से कैसे रिश्ते हैं? क्या जिनपर आरोप लग रहे हैं, उनसे ही राज्य के गृहमंत्री को मिलते रहना चाहिए? क्या ऐसी दोस्ती होने के बाद इस मामले से सही से जांच हो पाएगी?
5: अजित पवार के बेटे जय पवार भी बीच में इस मामले में प्रेस कॉन्फ्रेंस कर कई सवाल उठाने वाले थे.. उन्हें आखिर किसने रोका?
यह वो सवाल हैं जिसका जवाब मिला नहीं है.. रोहित पवार की हिम्मत की दाद देनी होगी कि वो खुलकर मुख्यमंत्री के इस कंपनी के साथ के रिश्तों को सामने ला रहे हैं, वो भी तब, जब दोनों एनसीपी क्या साथ आएंगी ऐसे सवाल रोज़ उठाए जा रहे हैं..
मीडिया की बात करें, तो दिशा सालियान की मौत को दिन रात आदित्य ठाकरे से जोड़ने वाली मीडिया और सुशांत सिंह राजपूत की मौत को हत्या बताने वाली मीडिया फडणवीस और VK Singh के कनेक्शन पर कुछ नहीं कह रही है.. जहां पर कोई सबूत नहीं है, ऐसे मामले को वो दिन रात चलाते हैं और जहां एक विधायक सबूत पर सबूत दे रहे हैं, उसे लेकर चुप्पी क्यों? किसी दूसरे देश में अबतक मुख्यमंत्री को मीडिया के सामने आकर सच्चाई बतानी पड़ती, क्या conflict of interest तो नहीं है, यह बताना पड़ता.. लेकिन हमारे यहां ऐसा कुछ भी नहीं होगा... जो भी हो, सवाल कई हैं और जायज़ भी!
डेडपूल... retweeted
यंदा राज्यात भाजप पुरस्कृत जो छटपूजा उत्सव सुरू आहे, त्याला उत्तरप्रदेश निवडणूकीची किनार आहे, हे समजणे काय रॉकेट सायन्स नाहिये. विशेष म्हणजे हा भाजपचा उपक्रम अगदी गावपातळीवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्यावर याप्रमाणे उग्र प्रतिक्रिया उमटतांना दिसते आहे.
त्यात समाज माध्यमांवर उत्तरेतून ज्याप्रमाणे पोस्ट येत आहेत, त्याने आगीत तेल टाकले आहे. आता ही प्रक्रिया योग्य की अयोग्य या भानगडीत पडण्याच्या अगोदर, यासर्व प्रकाराला आयडेंटिटी पोलिटिक्सच्या (idp) पलीकडे जाऊन बघणे गरजेचे आहे. इथे फक्त idp होत नाहिये, तर इतर इथे एक प्रकारचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे त्याला राजकीय आश्रय आहे, जो भाषिक राजकारणाच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा आहे. या सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत नाहिये, तो म्हणजे खरंच मराठी भाषिक याला नकारात्मक अंगाने घेऊन, भाजप विरोधी भूमिका घेतील का? आणि जर ते घेणार नसतील तर मग भाषिक राजकारणाचे काय?
जर मराठी मतदार प्रतिक्रिया देणार नसतील तर तो भाजप साठी दोन्ही बाजूने फायदेशीर आहे, आणि जर ही प्रतिक्रिया येणार असेल, तर मग त्यातून नेमका किती तोटा त्यांना होणार यावर त्यांचे पुढचे गणित अवलंबून आहे. अर्थात या सर्व भानगडीत राज्यातील राजकारण हे बर्याचदा मूळ मुद्या पासून भरकटतांना दिसते.
कारण राज्यात दुष्काळ सुरू असतांना, कुंभमेळ्याच्या जाहिरातीवर होणारा खर्च आणि छटपूजा आयोजनातील राजकीय पक्षाचा सहभाग यावर चर्चा घडवून आणणे राहते मागे आणि फक्त दोन भाषिक समुदाय कसे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत, हे दाखविण्यावर भर दिला जातो.
आपली म्हणजे महाराष्ट्र सरकारे यूपी बिहारी गुजराती भैय्यांना पायघड्या घालतात.. पण त्यांची सांस्कृतिक विल्हेवाट कशी लावावी हे त्यांच्या गावीही नसतं.. त्यामुळे इथली नैसर्गिक व्यवस्था त्या भैय्यांच्या(सरकारमधीलही) अडाणीपणास बळी पडते.. फडणवीस तसे असल्या सरकारांचे मेरूमनी..❤️
भय्यांची कसली तरी पूजा सुरुय.. छट का काय ते.. आपल्या मातीत असलं काही न्हवतं आधी.. आत्ताच हे आलंय.. माणसं आली म्हणजे त्यांची संस्कृती पण आली.. मग ती गलिच्छ असली तरी येणारच.. ती संख्या वाढली की ते अतिक्रमण होतं.. ते अतिक्रमण रोखायला माणसं रोखायला पाहिजेत..संस्कृती नाही.
१/२
डेडपूल... retweeted
The Sun is not travelling through empty space. As it orbits the Milky Way, it moves through the local interstellar medium, while continuously releasing a stream of charged particles called the solar wind. This magnetized wind pushes against the surrounding interstellar environment, creating an enormous bubble around the Sun and its planets: the heliosphere.
The solar wind travels outward at hundreds of kilometres per second. Far beyond Neptune, it encounters the pressure of the interstellar medium and slows abruptly at the termination shock. It then flows through a turbulent region called the heliosheath, before reaching the heliopause, where the solar wind's outward pressure is balanced by the surrounding interstellar pressure. Beyond this boundary, neutral hydrogen can accumulate in a region known as the hydrogen wall. The heliosphere may also have an extended tail, although its precise shape remains an active area of research.
Only two spacecraft have directly crossed the heliopause. Voyager 1 crossed in August 2012 at approximately 122 AU, and Voyager 2 followed in November 2018 at approximately 119 AU. By November 2026, they had travelled roughly 172 AU and 144 AU from the Sun, respectively. Their measurements provide our first direct observations of the boundary between the Sun's plasma environment and interstellar space.
The heliosphere does not stop every galactic cosmic ray, but it does reduce the number reaching the inner Solar System. It is a dynamic magnetic environment that helps shape the radiation conditions around our planetary neighbourhood.
म्हणजे बघा आपली माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंतच आपण सांपत्तिक कुबेर.. उदाहरणार्थ पैसा अडका आहे पण मनाला शांतता प्रदान करणारी माणसं वगैरे दिमतीला नसतील तर आपण अजूनही कंगालच.. आजचे लक्ष्मीपूजन सबंध जनांना हा 'कौटुंबिक स्नेहदीप' लावण्याचे बळ देवो.. याच शुभेच्छा.. शुभ दिवाळी..❤️
#म
डेडपूल... retweeted
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..
सोमवार, 9 नोव्हेंबर 2026, सकाळी 10 वा.
📍स्थळ : दसरा चौक, कोल्हापूर
मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
तसं बघायला गेलं तर सध्या भारतीय १३०-१४०₹/लिटर दराने पेट्रोल घेतायत.. हाय का नाय मास्टरस्ट्रोक.. हा नवीन भारत आहे बेट्या.. पेट्रोल दर ९९ टक्के शुद्धतेचे घेईल..पण पेट्रोल ७० टक्के शुद्धतेचे देईल.. मरा असंच..😄❤️
कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यातील पेट्रोल पंपांवर विकल्या जाणाऱ्या इथेनॉलमिश्रित पेट्रोलबाबत नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यांच्यामार्फत सँपल बेसिसवर कर्नाटक राज्यातील काही पेट्रोल पंप तपासले गेले. त्यात पुढीलप्रमाणे धक्कादायक प्रकार आढळून आल्याचं कर्नाटक सरकारने जाहीर केलं आहे:
१. सँपल टेस्टिंगमध्ये आढळून आल्यानुसार बऱ्याच ठिकाणी E20 म्हणून २०% पेक्षा अधिक प्रमाणात इथेनॉल मिश्रण असलेलं पेट्रोल विकलं जात होतं.
२. यातील सर्वाधिक इथेनॉल मिश्रणाचं प्रमाण हे इंडियन ऑईल (३१.२%) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (३०.५%) या सरकारी कंपन्यांच्या पंपांवर आढळून आलं.
वरील निरीक्षणं आणि संबंधित अहवालाबाबत कर्नाटक सरकारने अधिकृतपणे भूमिका घेत या अधिकच्या इथेनॉल मिश्रणाबाबत गंभीर प्रश्न उठवले आहेत. कर्नाटक सरकारचे ग्राहक संरक्षण मंत्री रिझवान अर्शद यांनी एकूण ६३ सँपल तपासून हा अहवाल मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना सादर केल्याची माहिती दिली आहे. हा अहवाल जनतेसमोर मांडल्याबद्दल कर्नाटक सरकारचे विशेष आभार...
याआधीही इथेनॉलमंत्री हिज हायनेस लॉर्ड नितीन गडकरी यांच्या भ्रष्ट आणि देशविघातक इथेनॉल धोरणाबाबत सातत्याने लिहिलं आहे. हे एकंदर धोरण मुळातच अनाठायी आणि अन्यायकारक आहे. त्यात आता कर्नाटक सरकारने मांडलेला हा धक्कादायक अहवाल बघता तुम्हाला इथेनॉल धोरणाच्या नांवाने आपल्या देशात कोणत्या प्रकारचा स्कॅम सुरू आहे, याचा नीट अंदाज येईल अशी अपेक्षा आहे!
एक गोष्ट इथे खास अधोरेखित केली पाहिजे ती अशी की भारतातील सध्या रस्त्यावर असलेल्या गाड्यांपैकी लक्षणीय प्रमाणातील गाड्या या मुळात २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्यासाठी डिझाईन केलेल्या नाहीत. त्यांना E10 सर्टिफिकेशन असूनही सरकार त्या गाड्यांना सक्तीने E20 पेट्रोल भरायला लावत आहे. त्यात भर म्हणजे E20 असं सांगून सरकारी कंपन्या प्रत्यक्षात जर ३०% हून अधिक इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकत असतील तर या गाड्यांना अधिकचं नुकसान होणार ही गोष्ट कोणालाही सहज लक्षात येईल...
इथेनॉल धोरण हा मोदीकाळातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे असं म्हणता येईल. लॉर्ड गडकरी यांनी स्वतःच्या खासगी स्वार्थासाठी आणि त्यांच्या मस्तवाल अहंकारी वृत्तीपायी या देशावर हे धोरण सक्तीने लादलं आहे! मोदी सरकारमधील पेट्रोलियम मंत्री असलेले (आणि एकेकाळी एपस्टीनला प्रत्यक्ष भेटून आलेले) हरदीप पुरीसुद्धा यात सामील आहेत. या मंत्र्यांनी मिळून, पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने भारतीय जनतेची अशाप्रकारे उघड फसवणूक चालवली आहे.
तुम्ही रोज गाडीत पेट्रोल भरत असाल तर तुम्ही या मुद्द्यावर बोललं पाहिजे! आणि तुमच्याकडे स्वतःची पेट्रोलवरची गाडी नसेल तरी तुम्ही या देशाचे नागरिक म्हणून इथेनॉल भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलायची गरज आहे. भारतीय नागरिकांना केंद्र सरकारकडून असं राजरोसपणे फसवलं जात असल्याचा तुम्हाला थोडा तरी सात्विक संताप येईल आणि तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या माध्यमांवर तो स्पष्टपणे व्यक्त कराल इतकी किमान अपेक्षा ठेवून ही पोस्ट लिहिली आहे. लॉर्ड गडकरींच्या राक्षसी ताकदीला, अंधभक्तांच्या टोळ्यांना आणि आयटी सेलच्या ट्रोलिंगला घाबरून देशहिताचे मुद्दे मांडायचे थांबवू नका! सत्ताधारी देशाला असं राजरोस लुबाडत असताना न घाबरता त्याविरोधात बोलावं याहून वेगळी देशभक्ती अशी फारशी नसतेच!!
- मकरंद देसाई
#इथेनॉल
डेडपूल... retweeted
इंडी जर्नल वर @indieprathmesh सोबत ‘ठसन’च्या निमित्ताने चर्चा केली गेली.
उद्या सकाळी ९ वाजता त्याचा संपूर्ण व्हिडीओ बघायला मिळेल.
नक्की बघा आणि कळवा.
ईएमआय वगैरे ही एक परिसंस्था आहे.. नो कॉस्ट ईएमआयची किंमत लय मोठी आहे.. त्या किमतीचा मागमूसही ऋणकोला लागत नाही.. ही झाली दुसरी बाजू.
उदाहरणार्थ पहिली आहे.. त्यातल्या त्यात ऐपत नसलेल्या आणि गरजेचा अंशही नसलेल्या वस्तू खरेदी.. याला आपण मानसिक दरोडा म्हणू शकतो..❤️
दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला !
एक काळ असा होता कि मुंबईतील गिरण्या / ठाण्याच्या / आणि नासिक , औरंगाबाद सह औद्योगिक कारखान्यात दिवाळीला हमखास बोनस जाहीर व्हायचा ; कमी जास्त असेल पण मिळायचा. लाखो कामगार त्याचे लाभार्थी असायचे
कामगार संघटना तगड्या होत्या , कामगार कायदे कामगार स्नेही होते. बोनस म्हणजे विलंबाने मिळालेले वेतन (डिफर्ड वेजेस) अशी राजकीय मांडणी स्वीकारली गेली होती. यातील बरेचसे कमकुवत झाले किंवा चक्क लयाला गेले
कामगार आपसतात चर्चा करायचेच , त्याशिवाय त्याचे कुटुंबीय देखील दिवाळीच्या आधी यावर्षी बोनस मिळाल्यानंतर त्या पैशाचे नक्की काय करायचे याच्या चर्चा घराघरात एक्साईट होऊन करायचे. तीन वर्षापूर्वी आम्ही गोदरेज कपाट घेतले , मागच्या वर्षी हा दागिना केला, यावर्षी अमुक ग्राहकपयोगी वस्तू घेणार असे बोनसचे कॅलेंडर तोंडपाठ असायचे.
_____________________
कारखानदारांचा देखील वर्ग म्हणून (सुटा सुटा कारखानदार या अर्थाने नाही ) राजकीय अजेंडा होता. किमान काही लाख नागरिकांची क्रयशक्ती वाढवणे ; ज्यातून कारखानदारांनी बनवलेल्या अनेक वस्तुंचा खप होईल , गोदामे किमान काही अंशी खाली होतील , आणि उत्पादन चक्राला पुढच्या दिवाळीपर्यंत चालना मिळेल हा तो अजेंडा होता.
मग सध्याच्या काळात ?
कारखानदारांना आता देखील आपल्या वस्तुमालाचा उठाव व्हावा हे वाटतेच की ? ते तर वैश्विक सत्य आहे. त्यासाठी नागरिकांच्या हातात क्रयशक्ती हवी हे देखील ओघाने आलेच. मग बोनस का बंद पडला ? त्याचे उत्तर आहे मुक्त हस्ताने दिली गेलेली रिटेल कर्जे ….
वेतन कमी होणे / महागाई , उतपदकता वाढीप्रमाणे न वाढणे किंवा कालांतराने मिळणारे बोनस रुपी वेतन बंद / कमी होणे हे रिटेल कर्ज मार्केट वेगाने वाढण्याची पूर्वअट होती. अजूनही आहे.
कन्झ्युमर लोन्स, बाय नाऊ पे लेटर, विना कारण, विना तारण, गोल्ड लोन, क्रेडिट कार्ड, मायक्रो लोन, डिजिटल इन्स्टंट लोन …. कोट्यवधी नागरिकांना लाखो कोटी रुपयांच्या रिटेल कर्जात बुडवून टाकण्यात आले आहे.
कामगारांना बोनस / डिफर्ड वेजेस ही शुद्ध औद्योगिक भांडवलशाहीचे लक्षण होते तर मुक्त / भरपूर रिटेल कर्ज हे वित्त भांडवलशाहीच्या युगाचे लक्षण आहे
______________________
औद्योगिक प्रणालीत तयार होणाऱ्या सरप्लस मध्ये भांडवल आणि मानवी श्रम यांच्यात कोणाला किती वाटा मिळणार याच्या रस्सीखेचीत भांडवलाची सरशी झाली आहे ; त्यामुळे डिफर्ड वेजेस जाऊद्या , नेहमीचे वेजेस देखील धड दिले जात नाहीयेत
कायम / पगारी कामगार हि संज्ञा मोडीत काढली गेली ; बदली कामगार , आउट सोर्सिंग , सब काँट्रॅकींग ; कंत्राटी कामगार , आता तर गिग इकॉनॉमी मध्ये प्रत्येक श्रम देणाऱ्यांशी वेगळे ऍग्रिमेंट ; कामगार कायद्यातील सुधारणा , लेबर / मुख्य कोर्टात श्रमिक विरोधी तयार केस लॉ ची तटबंदी उभी केली गेली आहे.
_________________________
आता देखील बोनस दिला जात आहे
औद्योगिक भांडवल मॅनेज करणारे व्यवस्थापक याना भरघोस परफॉर्मन्स बोनस. अजून उच्च पदस्थांना स्टॉक ऑप्शनस ; जे विकून ते वार्षिक पगारापेक्षा जास्त मिळकती करू शकतात ;
लक्षात घ्या मानवी श्रमाला कमी पगार / किंवा बोनस नाही दिला तर उत्पादन खर्च कमी , म्हणजे नफा जास्त , नफा जास्त म्हणजे परफॉर्मन्स बोनस जास्त, अर्निंग पर शेअर जास्त , म्हणजे कंपनीच्या शेअरची किंमत जास्त म्हणजे स्टॉक ऑप्शन्स विकून जास्त पैसे
त्याही पुढे जाऊन ….कमी उप्तादन खर्चातून जास्त नफा , संचित नफा वाढत राहतो , त्यातून भाग भांडवलातील गुंतवणूकदारांना म्हणजे वित्त भांडवलाला बोनस शेअर्स दिले जातात
यासगळ्यात अर्थात वित्त भांडवलाला औद्योगिक भांडवलाला साथ आहे ; ते दोघे सख्खे भाऊ आहेत. वित्त भांडवलाचे प्रतिनिधी कंपन्यांच्या बोर्डावर डायरेक्टर म्हणून बसतात ; राजकीय व्यवस्था कामगारांच्या बाजूने हस्तक्षेप करणार नाही याची काळजी त्यांच्या लॉबीज घेतात
___________________________
राजकीय अर्थव्यवस्था / पोलिटिकल इकॉनॉमीचा चष्मा (जो विकत मिळत नाही) कष्टाने चढवू शकलो तर अनेक छोट्या मोठ्या घडामोडींचे राजकीय अन्वयार्थ लावता येतात ; ते लावल्याशिवाय गेल्या काही दशकातील राजकीय कोंडी फुटणार नाही
कामगार/ कर्मचारी / कष्टकरी वर्गाला आवाहन. संघटित व्हा. संघटित रहा. आपापल्या ट्रेड युनियनना बळकट करा. फक्त वेतन, बोनस साठी नाही. त्यासाठी तर भांडाच. पण ट्रेड युनियन कमकुवत होण्यामुळे संकुचीत, अस्मितावादी राजकीय शक्ती जोम धरतात. कामगार वर्गात विविध अस्मितांच्या आधारे फूट पाडतात. जे आपण भारतात सकट अनेक देशात बघत आहोत.
सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा ; बोनस सहित !
संजीव चांदोरकर (७ नोव्हेंबर २०२६)
डेडपूल... retweeted
दुष्काळाची ग्रामीण भागातील दाहकता BBC मराठीने आपल्या सर्वांसमोर आणली आहे, चांगल्या रिपोर्टिंग बद्दल पत्रकार @BhagyashreeRau7 हिचे कौतुक… 👏






















