Pinned Tweet
K. Manjusree v. State of Andhra Pradesh (2008) आणि Malik Mazhar Sultan v. U.P. Public Service Commission (2006) या दोन्ही खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एकच स्पष्ट सांगितले आहे की, एकदा खेळ सुरू झाला की तुम्ही खेळाचे नियम बदलू शकत नाही.
जसे की, MPSC २०२६ ची पूर्व परीक्षा झाली आहे, म्हणून आयोग २०२६ च्या परीक्षेतून optional subject (पर्यायी विषय) काढून टाकू शकत नाही; कारण २०२६ ची परीक्षा ज्या पॅटर्नने सुरू झाली होती, तोच पॅटर्न राहणार. पण २०२७ च्या राज्यसेवेची जाहिरात (Notification) सुद्धा आलेली नाही, म्हणून आयोग थेट optional काढून टाकू शकला आणि मुलाखतीचे गुण २७५ वरून १७५ करू शकला, कारण MPSC राज्यसेवा २०२७ अजून सुरूच झाली नाही.
म्हणून, नोटिफिकेशन येण्यापूर्वी आयोग MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२७ मध्ये optional काढून टाकू शकतो, मुलाखतीचे गुण कमी करू शकतो, तर descriptive pattern बदलून objective pattern १०० टक्के आणू शकतो आणि नक्कीच आणणार!
वरच्या दोन्ही जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एकच सांगितले आहे की, तुम्ही सुरू झालेल्या गेममध्ये (Game) बदल करू शकत नाही; पण २०२७ ची राज्यसेवा अजून सुरूच झाली नाही, म्हणून बदल १०० टक्के करू शकतो, कारण अजून खेळ सुरूच झाला नाही.
जर काही तथाकथित शिक्षकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट वाचण्यासाठी लागणारी basic analytical ability नसेल, तर ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार?
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @dhananjay_munde @NiteshNRane @VRadhaIAS @PraveenGedam
Objective 2027 च्या मागणीसाठी प्रत्येक विभागानुसार ग्रुप तयार केले आहेत. ज्या विभागात आपला जिल्हा येत असेल त्या विभागाचा ग्रुप जॉईन करा.
विभागानुसार तयार केलेल्या ग्रुप चा उद्देश आपली चळवळ प्रत्येक जिल्ह्यात/तालुक्यात/गावात पोहोचवणे असून लोकप्रतिनिधीना निवेदने देणे, चर्चा करणे, एकत्र येणे,Parallel संघटन निर्माण करणे तसेच भेटीगाठी च्या माध्यमातून Objective 2027 साठी प्रयत्न करणे हा उद्देश आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या विभानुसार आपले ग्रुप जॉईन करा.
1.अमरावती विभाग -
t.me/objectiveAmaravti
2. नागपूर विभाग -
t.me/ObjectiveNagpur
3. संभाजीनगर विभाग -
t.me/objectiveSambhajinagar
4. नाशिक विभाग
t.me/ObjectiveNashik
5. पुणे विभाग
t.me/objectivepune
6. कोकण विभाग -
t.me/ObjectiveKokan
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @NikhilPatil_MH @cbawankule @ChDadaPatil
९९ टक्के विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला प्रायव्हेट कोचिंगवाल्यांनी विरोध करणे योग्य आहे का ?
९९ टक्के विद्यार्थ्यांना 'झुंडशाही' म्हणणे योग्य आहे का? त्यांना गोळावीर' किंवा 'अराजकता पसरवणारे' म्हणणे बरोबर आहे का? कट-कारस्थान करून असे म्हणणे की या विद्यार्थ्यांच्या मागण्या खूप मोठ्या आहेत, हे योग्य आहे का?
"बाटलीत बाटली, काचेची बाटली, ऑब्जेक्टिव्ह मागताना लाजा नाही वाटली..." अशा हीन दर्जाच्या घोषणा देऊन लाखो विद्यार्थ्यांचा अपमान करताना त्यांना जराही वाईट वाटले नाही का?
कोचिंग माफिया आणि प्रामाणिक शिक्षक यांच्यात खूप मोठा फरक असतो:
प्रामाणिक शिक्षक ते असतात, जे स्वतःच्या पैशांचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या हिटाचा विचार करतात आणि त्यांचा आदर करतात.
कोचिंग माफिया ते असतात, जे फक्त स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा आणि त्यांचे पैशांचे गणित बिघडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या विरोधात आंदोलन करतात.
महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे ९९ टक्के विद्यार्थांनी केलेल्या आंदोलन विरुद्ध काही कोचिंग्वाल्यानी आंदोलन केले होते.
#objective2027
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @MahaDGIPR
Mpsc Objective retweeted
अक्षय कदम जी,
आपण काय बोलता किती वाजता बोलता हे पण बघा जरा... स्वतः बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही..आणि मग बोलायचं पूर्ण व्हिडिओ बघा...
पूर्ण व्हिडिओ मध्ये पण काहीच नाही.आता बोलला तर बोलला उगच सारवासारव नको...😅
चुकीच्या माहिती देऊन कशाला पोरांना misguide करता syllabus चे notification आणि परीक्षांच्या जाहिरातीचे noitification यात फरक कळू नाही आणि म्हणे खेळ चालू झाला की नियम बदलतात येत नाही.😅
तुम्ही नीट descriptive चे स्पेलिंग लिहित नाही तुम्ही बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही आणि लढता descriptive साठी हा विरोधाभास वाटत नाही का? पण असो,तुमच्या strategy चा भाग असेल हा cheap publicity साठी कारण एवढा हुशार माणूस ह्या चुका सतत करतोय तर काहीतरी कारण असेल परंतु बिचारी 20/25 पोरं जास्तीची अपेक्षा ठेवतात आपल्याकडून त्या trolling गँग ला पण खुश ठेवावे लागते त्यामुळे चालुद्या अजून फक्त 15 दिवस 😅
Objective 2027🔥
@Objective2027
धन्यवाद अक्षय कदम सर 🙏 २०२७ पासून descriptive राहणार नाही, हे स्वतः वर्णनात्मकच्या सरांनीच जाहीर केले आहे.
९९ टक्के विद्यार्थांची बाजू म्हणजेच सत्याची बाजू घेतल्याबद्दल तुमचे आभार.
Thank you so much for supporting us for such a noble cause. ♥️
MPSC students truly need more teachers like you.🙏
या वर्षी पासून descriptive पॅटर्न लागू होणार नाही 🔥 याच दुसरा अर्थ objective पॅटर्न येणार 💯
@Objective2027
@NikhilPatil_MH
सर्व MPSC विद्यार्थी आणि प्रतिनिधींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
९९ टक्के विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की, जुना Objective पॅटर्न लवकरात लवकर लागू व्हावा. अंधारमय आणि केवळ पैशांच्या जोरावर निवड करणाऱ्या Descriptive पॅटर्नचा नाश होऊन तो लवकरात लवकर रद्द व्हावा. प्रामाणिक मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर 'क्लास १' अधिकारी बनवणाऱ्या Objective पॅटर्नचा विजय असो!
#objective2027 🔥
बीड जिल्ह्याचे संतोष तिडके ,MPSC राज्यसेवा मुलाखत दिलेल्या एका प्रामाणिक MPSC विद्यार्थ्याची आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा Objective व Descriptive अशा दोन्ही पॅटर्नने मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याची महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना हाक आणि विनंती की, २०२७ पासून पुन्हा राज्यात MPSC च्या सर्व मुख्य परीक्षा Objectiveपॅटर्नने घेण्यात याव्यात.
#objective2027
Mpsc Objective retweeted
Replying to @NikhilPatil_MH
राज्यसेवा परीक्षेचा Objective Pattern हा केवळ परीक्षेचा पर्याय नसून विद्यार्थ्यांच्या तयारीशी आणि भविष्यातील नियोजनाशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे Objective Pattern बाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.#objectivepattern2027💯🔥
Mpsc Objective retweeted
🔥 कोचिंग माफियांचा Objective पॅटर्नविरोधातील थयथयाट नेमका कशासाठी?
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चिंता की स्वतःच्या दुकानदारीला लागणाऱ्या संभाव्य कुलूपाची भीती?
Objective पॅटर्न आला तर Descriptive च्या नावाखाली चालणारे हजारो रुपयांचे क्लास, कोर्सेस आणि व्यावसायिक गणित धोक्यात येईल, हीच खरी पोटदुखी आहे का?
विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीतील अन्याय दिसत नाही, आयोगाच्या मर्यादा दिसत नाहीत, विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण दिसत नाही; पण Objective पॅटर्न आला की मात्र गुणवत्तेचा पुळका येतो!
विद्यार्थ्यांना अधिकारी बनवायचे आहेत की आयुष्यभर कोचिंग क्लासचे ग्राहक बनवून ठेवायचे आहेत?
विद्यार्थ्यांच्या भविष्याची एवढीच काळजी असेल, तर पेपर तपासणीतील त्रुटींवर बोला! विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अन्यायकारक गुणांवर बोला! आयोगाच्या अपुऱ्या यंत्रणेवर बोला! निकालांच्या अनिश्चिततेवर बोला!
पण नाही! Objective पॅटर्न आला तर विद्यार्थ्यांना Descriptive उत्तरलेखनाचे क्लास कोण घेणार? हजारो रुपयांचे कोर्स कोण विकणार? स्वतःचे व्यावसायिक गणित कसे जुळणार? हाच खरा प्रश्न आहे का?
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची एवढीच चिंता असेल, तर स्वतःच्या क्लासच्या पलीकडे जाऊन विचार करा!
काही कोचिंग संस्थांनी स्वतःच्या व्यावसायिक हितसंबंधांना विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुलामा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. Objective पॅटर्न वाईट आहे, अधिकारी घडणार नाहीत, गुणवत्ता संपेल, अशा भीती पसरवून विद्यार्थ्यांचे Brainwashing करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
लक्षात ठेवा!
विद्यार्थी तुमचे ग्राहक नाहीत, त्यांचे भविष्य तुमची बाजारपेठ नाही आणि MPSC तुमची जाहिरात करण्याचे व्यासपीठ नाही!
तुमचा व्यवसाय टिकवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका.
कोचिंग माफियांचा अजेंडा नव्हे, विद्यार्थ्यांचा कौल महत्त्वाचा!
🔥 २०२७ पासून Objective पॅटर्न लागू झालाच पाहिजे!
✊ येणार तर Objective चं !
#Objective2027 #MPSC
Nikhil Patil 🔥
काल रात्री राज्याचे धुरंदर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना फोन करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
इतक्या दिवसांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर काल MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेची घोषणा झाली. तब्बल १६,७१७ जागांची घोषणा राज्य शासन आणि MPSC ने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. परीक्षा तीन आठवड्यांनी पुढे गेली असली, तरी आपण निवेदनातून केलेल्या मागणीनुसार ती जानेवारी महिन्यातच होत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये सध्या एक प्रश्न उपस्थित होत आहे की, कोअर MPSC अर्थात नॉन-टेक्निकल (Qualification – Any Degree) पदांच्या जागांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही.
मला या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्याला एकच सांगायचे आहे, तुम्ही आता २४ जानेवारी रोजी होणाऱ्या Group-C Prelims 2026 च्या अनुषंगाने फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विश्वास देतो की, नॉन-टेक्निकल पदांच्या जागा कशा वाढवता येतील, यासाठी माझा पाठपुरावा कालपासूनच सुरू झाला आहे. सहकार विभाग, समाजकल्याण विभाग यांसह इतर विभागांमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरती प्रक्रियेत समाविष्ट व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा विषय काल रात्रीच देवेंजींच्या निदर्शनास आणून दिला आहे.
मित्रांनो, मला तुमच्या मेहनतीची, तुमच्या संघर्षाची आणि या परीक्षेसाठी तुम्ही घेत असलेल्या कष्टांची जाणीव आहे. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे या एका संधीची वाट पाहत आहेत. कोणाचे वय वाढत चालले आहे, कोणावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, तर कोणाचे आई-वडील आपल्या मुलाच्या यशाची आशा डोळ्यांत साठवून बसले आहेत. त्यामुळे प्रत्येक जागा आणि प्रत्येक संधी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.
१६,७१७ जागांचा ऐतिहासिक टप्पा आपण गाठला आहे. आता नॉन-टेक्निकलच्या जागांमध्येही अपेक्षित वाढ व्हावी, यासाठी मी पूर्ण ताकदीने पाठपुरावा करणार आहे.
तुम्ही फक्त अभ्यास करा, बाकी तुमच्या प्रश्नांसाठी तुमचा हा सहकारी, विद्यार्थी चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन. तुमच्या स्वप्नांच्या आड येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी माझा संघर्ष सुरूच राहील!
@Dev_Fadnavis @mpsc_office @VRadhaIAS
Mpsc Objective retweeted
देवा भाऊ @Dev_Fadnavis शब्द खरा करून दाखवला...खूप खूप धन्यवाद 🔥💯
@NikhilPatil_MH सतत पाठपुरावा करून विद्यार्थीहिताला प्राधान्य देणारा माणूस ..
आता महत्त्वाचे काम जे झाल्यात जमा असलेले ते objective चे notification निखिल दादा🔥💯
NXT notification objective 2027🔥
@CMOMaharashtra
@Objective2027
@MahaDGIPR
Mpsc Objective retweeted
सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींना दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार परीक्षा जानेवारी महिन्यातच घेण्याचा निर्णय झाला असून, MPSC च्या इतिहासात कधीही झाली नाही एवढ्या तब्बल १६ हजारांहून अधिक पदांच्या भरतीची आमची मागणी मान्य केल्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार मानतो.
परीक्षा अधिक पुढे न ढकलता याच जानेवारी महिन्यात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही नाराजी मनात न ठेवता इतर सर्व गोष्टी बाजूला सारून आता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. परीक्षेची तारीख काहीशी पुढे गेली असली, तरी परीक्षा याच जानेवारी महिन्यात होणार आहे, हे लक्षात घ्यावे.
माझे सुरुवातीपासूनच स्पष्ट मत आहे की, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला संपूर्ण वेळ अभ्यासासाठी द्यावा. कोणत्याही राजकीय हेतूसाठी विद्यार्थ्यांचा वापर होऊ नये, तसेच त्यांना आंदोलन किंवा उपोषणासाठी प्रवृत्त केले जाऊ नये. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हेदेखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सुरुवातीपासूनच अत्यंत संवेदनशील राहिले आहेत.
आता मिळालेल्या या अतिरिक्त वेळेचा आणि संधीचा प्रत्येक विद्यार्थ्याने पुरेपूर उपयोग करून घ्यावा. दुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आगामी काळात भरतीमधील पदसंख्या आणखी कशी वाढवता येईल, यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, असा शब्द मी तुम्हा सर्वांना देतो.
आता इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून अभ्यासाला लागा… तुमच्या मेहनतीला यश मिळावे, हीच सदिच्छा!
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
2023 मध्ये Descriptive पॅटर्नची घोषणा होण्यापूर्वी पुण्यात आणि इतर शहरांमध्ये अभ्यासिका वाढत होत्या आणि विद्यार्थ्यांची संख्याही वाढत होती. लोक MPSC ला एक चांगला करिअरचा मार्ग म्हणून पाहत होते. पण पुण्यात Descriptive Pattern आल्यापासून अभ्यासिकांच्या वाढीचा वेग कमी झाला, आणि कशाचा वेग वाढला? Coaching Mafia च्या ऑफिस उघडण्याचा वेग वाढला. चहाच्या टपऱ्या टाकाव्यात तश्या Coaching Mafia ने आणि 'Delhi Return'(मनाली गाजवलेल्या) म्हणून मिरवणाऱ्या लोकांनी आपली दुकाने थाटली आहेत. एकाने तर असं ऑफिस काढलंय की ते कोचिंग क्लास कमी आणि एखादी छोटीशी ट्रॅव्हल एजन्सीच जास्त वाटते. एवढ्याशा जागेत दोन-चार मुलांना तोडकं-मोडकं शिकवून पुण्यात दिल्लीसारखी Coaching Mafia उभी करण्याचं हे कारस्थान आहे. यांच्या क्लासरुमचे Fire Audit सुद्धा झाले आहे की नाही याबद्दल शंकाच आहे. लवकरात लवकर Objective पॅटर्न लागू करून ही रक्त पिणारी Coaching Mafia महाराष्ट्रातून संपलीच पाहिजे.
#Objective2027 🔥
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @NikhilPatil_MH @RahulAsks @DGPMaharashtra
मी तर म्हणतो, या स्वतंत्र पत्रकारांचीही एक 'ऑब्जेक्टिव्ह' पात्रता परीक्षा ठेवली पाहिजे! कारण हे लोक फक्त मोठ्या कोचिंग क्लासेसवाल्यांची बाजू उघडपणे पहिल्या दिवसा पासून मांडताना दिसतात काल तर मुद्दाम विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे analysis पेरून दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सर्वांना नाराज केले. हे सगळं बघून समजतं की आपल्या देशातील पत्रकारिता जगात इतकी मागे का पडली आहे!
#objective2027
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Mpsc Objective retweeted
विद्यार्थ्यांची मागणी स्पष्ट आहे, भूमिका ठाम आहे! MPSC राज्यसेवा परीक्षा Objective Pattern नेच घ्यावी. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय घेताना त्यांच्या मताचा सन्मान व्हायलाच हवा.
#MPSC #ObjectivePattern @NikhilPatil_MH @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VRadhaIAS
राज्यसेवा Objective म्हणजे विश्वास,पारदर्शकता,निपक्ष गुणांकन..👍
Descreptive मध्ये पेपर तपासणारा बदलला की Marks बदल यात पूर्वग्रह,आकलन,मत,अपारदर्शकता,गुणांकनातील गोंधळ
ज्ञानापेक्षा चित्रकला,भाषा माध्यम,नशीब,तपासणारा याच गोष्टी..😔
#Objective2027
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
दिल्ली गाजवून आलेल्या आणि दर आठवड्याला मनाली ट्रिप मारून मज्जा केलेल्यांनी, 'माझ्या जीवनाला काही अर्थ नाही, म्हणून अर्थ निर्माण करण्यासाठी वासरात लंगडी गाय शहाणी' या न्यायाने मी इथे डिस्क्रिप्टिव्हचा क्लास टाकेन आणि माझ्या आयुष्याला काही अर्थ प्राप्त होईल, असा विचार करणे दूरवरून पाहता योग्य वाटू शकतो.
पण खरा मुद्दा हा आहे की, तुमच्या स्वतःच्या आयुष्याला वयाच्या चाळीशीत काही अर्थ लागावा म्हणून, MPSC ला न पेलवणारा हा Descriptive पॅटर्न असाच चालू ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे.
तुमच्या शेतकरी आई-बापाने तुम्हाला वेळ आणि पैसा दिला होता, पण तुम्ही दिल्लीला जाऊन नुसता टाईमपास केला आणि अभ्यास केला नाही; म्हणून आता लाखो विद्यार्थ्यांच्या(९९%) भवितव्याशी खेळणे आणि त्यांना वेठीस धरणे बंद करा.
#Objective2027
विश्वास जून Objective पुन्हा 🔥
Group C 2026 परीक्षेमध्ये १६,००० हून अधिक पदांचा समावेश करण्यासह उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढ देण्याच्या निर्णयाबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
V. राधा समितीने आपल्या अहवालात केलेल्या शिफारशीनुसार, Group C 2026 परीक्षेच्या माध्यमातून १६,००० हून अधिक पदांची भरती करण्यात यावी. तसेच, उर्वरित सर्व रिक्त पदांचे शुद्धीपत्रक तातडीने अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात यावे.
कोणत्याही पात्र उमेदवाराला या महत्त्वपूर्ण संधीपासून वंचित राहावे लागू नये, यासोबतच सदर परीक्षा कोणत्याही परिस्थितीत जानेवारी महिन्यातच घेण्यात यावी, अशी राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली आणि या विषयासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या भावना व अपेक्षा त्यांच्यासमोर मांडल्या.
या चर्चेदरम्यान, वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली अपारदर्शकतेची भावना आणि त्यासंदर्भातील विविध शंकाही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच, राज्यसेवा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपातील परीक्षा पद्धतीसह इतर विविध विद्यार्थीहिताच्या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.
मला विश्वास आहे की, ही चर्चा अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि भावी अधिकाऱ्यांना निश्चितच आणखी एक आनंदाची बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
@Dev_Fadnavis @mpsc_office
@CMOMaharashtra
नेत्या लोकांनी कुठेही OBJECTIVE पॅटर्नबद्दल वाच्यता केली नाही, कारण ते आमदार आहेत आणि जबाबदार व्यक्ती आहेत. तुमच्यासारखे ते विद्यार्थीविरोधी नाहीत. जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत आधीच कोणी का बोलेल? आणि मुळात हा मुद्दा विद्यार्थी आणि मायबाप सरकार यांच्यामधला आहे, कोचिंग माफियांनी यात नाक खुपसू नये. तुमचा याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही विद्यार्थी ऑब्जेक्टिव्हची मागणी सरकारदरबारी मांडत आहोत, सुमार दर्जाचे कोर्सेस विकणाऱ्या कोचिंग माफियांनी यात लुडबूड करू नये.
#objective2027 🔥
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @VikramPachpute_ @mpsc_office
Mpsc Objective retweeted
राज्यसेवा Objective म्हणजे विश्वास,पारदर्शकता,निपक्ष गुणांकन..👍
Descreptive मध्ये पेपर तपासणारा बदलला की Marks बदल यात पूर्वग्रह,आकलन,मत,अपारदर्शकता,गुणांकनातील गोंधळ
ज्ञानापेक्षा चित्रकला,भाषा माध्यम,नशीब,तपासणारा याच गोष्टी..😔
#Objective2027
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis













