
Officials Trends Page Of JANANETHA @SharadPawar_NCP Saheb 🚩Follow Our Backup - @TeamPawar_Speak || FAN ACCOUNT || ⏰||
Navi Mumbai,India
Joined December 2023
- Tweets73
- Following278
- Followers327
- Likes292
Pinned Tweet
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!🎂..!❤️💐🔥🎂 @SPawarOfficeBMT @PawarSpeks_1 @TeamPawar_Speak @SharadPawarFC @YSPawarSpeaks @SharadpawarArmy @NCP_Party1 @MPSupriya_Sule @SharadPawar_NCP @TeamSupriyaSule #HappyBirthdayWishes2023
Sharad Pawar Trends ™️ retweeted
आज पुण्यातील 'आर. के. लक्ष्मण म्युझिअम'ला भेट दिली. आर. के. लक्ष्मण हे भारतातील सुप्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यंगचित्रकार होते. ज्यांची व्यंगचित्र देशातल्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर मार्मिक भाष्य करायची. त्यांच्या व्यंगचित्रांनी अनेकदा आम्हा राजकीय क्षेत्रातील लोकांनाही अंतर्मुख व्हायला भाग पाडलं. टाइम्स ऑफ इंडियातील 'यू सेड इट' या त्यांच्या दैनिक व्यंगचित्रातून त्यांनी उभा केलेला 'कॉमन मॅन' जनमानसाचं प्रतिनिधित्व करायचा. त्यांच्या कलाविष्काराच्या प्रेरणेतून आज देशात अनेक व्यंगचित्रकार उभे राहिले आहेत. अशा प्रतिभावंत व्यंगचित्रकाराच्या कलासामुग्रीचं, व्यंगचित्रांचं यथोचित प्रदर्शन 'आर. के. लक्ष्मण म्युझिअम'मध्ये आहे हे पाहून आनंद वाटला.
Sharad Pawar Trends ™️ retweeted
बारामती तालुका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सांगवी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. एक काळ असा होता की, सांगवीला माझं जाणं येणं नेहमी असायचं. अनेक सहकारी होते काही हयात आहेत व काही नाहीत. सांगवीचे नेतृत्व आता नव्या पिढीच्या हातात आहे. अनेक निवडणुकींना सांगवीच्या नागरिकांनी सतत आम्हा लोकांना पाठिंबा दिला, सांगवीच्या विकासामध्ये सहकार्य केलं. या ठिकाणची शेती संपन्न व्हावी यासाठी एकेकाळी नदीमध्ये बंधारे बांधण्याचे काम सांगवीपासून सुरू झाले. नंतरच्या काळामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना असो, अन्य संस्था दूध संघासारख्या असो या सगळ्यांमध्ये सांगवीचा मोठा वाटा होता. सांगवीने नेतृत्व सुद्धा केलं. या भागाच्या एकंदर शेती व्यवसायाच्या उद्योगाला हातभार लावण्यासाठी सांगवीची मदत नेहमी राहिलेली आहे. त्यामुळे सांगवीचं सबंध भागामध्ये नावलौकिक आहे.
मोठ्या मतांनी जवळपास ४० - ४५ हजारांच्या फरकाने सुप्रियाला तुम्ही विजयी केलं. मी तुम्हाला एवढीच खात्री देतो की, देशाच्या लोकसभेमध्ये तुम्हा लोकांच्या मतदारसंघाचे नाव तुमचे नवे खासदार, तुमचे खासदार हे त्याठिकाणी गाजवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला त्याचे समाधान मिळेल.
आता बोलताना काही अडचणी या ठिकाणी सांगितल्या. रयत शिक्षण संस्थेच्या काही अडचणी आहेत. संस्थेचा अध्यक्ष मीच आहे त्यामुळे चौकशी करून त्यातून काही मार्ग काढावा लागेल तो मी काढेन. नदीच्या पाण्याचा प्रश्न, बंधारे आपण बांधले, पाणी साठवलं पण पाण्यामध्ये प्रदूषणाचा त्रास व्हायला लागला. पाणी स्वच्छ राहिले नाही आणि त्यामुळे साहजिकच तुम्ही सगळे अस्वस्थ आहात. पर्यावरण खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी मी बोलेन. शक्य झालं तर त्याच्या तज्ञांना या ठिकाणी पाठवून कायमचा मार्ग कसा काढता येईल याचा विचार आपण करू आणि तुम्हा लोकांची सुटका त्यामधून करू एवढेच मी सांगू इच्छितो.
साखर कारखानदारी आपण सर्वांनी वाढवली. साखर आपण करत होतो, नंतर इथेनॉल करायला लागलो त्याची तुम्हा लोकांना अधिकची किंमत मिळाली याची काळजी आपण घेतली. लहान वर्ग गावामध्ये मोठा आहे तसं उसाचं क्षेत्र कदाचित नसेल. ह्या लोकांसाठी आपण दुधाचा धंदा वाढवला त्यासाठी दुधाच्या सोसायट्या केल्या, दुधाचा तालुका संघ केला आणि दुधाची विल्हेवाट एकेकाळी आपण पुण्याला जे करत होतो त्याच्यात बदल करायची गरज आहे हे लक्षात आल्यावर बारामतीला दुधाची पावडर तयार केली. डायनामिक नावाची एक मोठी कंपनी अमेरिकेहून आणून आपण उभी केली आणि त्या दुधाच्या पावडर पासून चॉकलेटचे कारखाने आपण बारामतीला उभे केले आणि त्यामुळे दुधाची विल्हेवाट कशी लावायची याची आता अडचण राहिली नाही आणि त्या कारखान्यात सुद्धा काही हजारो लोकांना आता काम मिळायला लागलं. विकासाच्या दृष्टीने त्याची मदत झाली. त्यामुळे ऊस, ऊसाची साखर, साखरेपासून इथेनॉल या गोष्टी जसं दूध, दुधापासून पावडर, पावडरपासून चॉकलेट अशा प्रकारची कारखानदारी आपण आपल्या भागात उभी केली. शेतीला मदत होईल अशा प्रकारची व्यवस्था आपण या कारखानदारीतून आपल्या भागात केली त्याचा फायदा हा काही ना काही प्रमाणात लोकांना होतोय. तरी आणखी काम करावं लागेल, शिक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल आणि आपली नवीन पिढी ही वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे कशी जाईल याची काळजी घ्यावी लागेल आणि ते काम करायचं असेल तर आपल्याला एका विचाराने पुढची पाऊलं टाकावी लागतील. मी तुम्हाला खात्री देतो की कुणाचा कितीही विरोध असला तो विरोध तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला नाही.
मी बऱ्याच दिवसातून या वेळेला तालुक्यातल्या गावांमध्ये जातोय. लोक गावचे सांगतात की निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला. झालं ते विसरून जायचं, लक्षात ठेवायचं नाही. सुडाचं राजकारण आपण कधी करत नाही पण एक गोष्ट ज्यांनी बारामती तालुक्यात सिद्ध केली नेते गावातले होते त्यांचं दुकान काही चाललं नाही. सामान्य माणसं जी आहेत, साधी माणसं आहेत, लहान शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत त्यांचं दुकान जोरात चाललं. त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन पिढी, तरुणांची पिढी ही पुढे आली. या तरुणांच्या पिढीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल? प्रश्न कसे सुटतील? याच्यावर लक्ष देणं आम्हा लोकांची जबाबदारी राहील ती काळजी केली जाईल. या सगळ्या तरुण पिढीला ज्यांनी निवडणुकीत पुढाकार घेतला त्यांना ताकद देणं, त्यांच्या पाठीशी उभे राहणं या कामात आम्हा लोकांचे लक्ष राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो.
तुम्ही लोकांनी स्वागत केलं त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष होतं. आज माझ्याबरोबर एक रशियावरून मुलगा आलाय त्याचं नाव पीटर. मी त्यांना विचारलं कशासाठी येताय? ते म्हटले गावामध्ये तुमच्या निवडणुकी झाल्या त्याची काय पद्धत असते? रशियात सुद्धा चर्चा झाली बारामतीच्या निवडणुकीची आणि म्हणून तो स्वतः इथे आला आहे रशियावरून. काही हरकत नाही जी चर्चा सगळीकडे झाली, तो एक इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला. त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो.
Sharad Pawar Trends ™️ retweeted
#ReportersProject | NDA is pulling out all the stops to ensure victory for Sunetra Pawar
News18's @vinivdvc exclusive report
#Maharashtra #Shivsena #Congress #BJP #NCP
Sharad Pawar Trends ™️ retweeted
#WATCH | On firing outside actor Salman Khan's residence in Bandra, NCP-SCP leader Supriya Sule says, "It's .. #SalmankhanHouseFiring #SupriyaSule @MPSupriya_Sule
#WATCH | On firing outside actor Salman Khan's residence in Bandra, NCP-SCP leader Supriya Sule says, "It's extraordinarily unfortunate as the area where Salman Khan lives is a popular area and his family is clearly under pressure... It's a complete failure of the Home Ministry. We live in Pune and look what is happening here, it's a very educated place where people live in peace and harmony, but here also, the crime has gone up. It's not me making the allegations but the data given by the govt of India for Maharashtra."
Sharad Pawar Trends ™️ retweeted
Baramati Breaking News:- बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठे लीड 50,000 मतांनी आघाडीवर #BaramatiLokSabha2024Election @SupriyaSule_FC @supriya_sule @YSPawarSpeaks @Team_RevatiSule #Baramati @SPawarOfficeBMT
Sharad Pawar Trends ™️ retweeted
Baramati Breaking News:- बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठे लीड 99,999 मतांनी आघाडीवर #BaramatiLokSabha2024Election @MPSupriya_Sule @supriya_sule
Sharad Pawar Trends ™️ retweeted
Baramati Breaking News:- बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठे लीड 80,009 मतांनी आघाडीवर #BaramatiLokSabha2024Election #Baramati
Sharad Pawar Trends ™️ retweeted
Baramati News- युगेंद्र पवारांनी बारामतीत जनता दरबार भरवला अन् शरद पवारांची एन्ट्री झाली..
@SPawarOfficeBMT @YSPawarSpeaks @YSP_Foundation @SharadPawar_NCP #Baramati
युगेंद्र पवारांनी बारामतीत जनता दरबार भरवला अन् शरद पवारांची एन्ट्री झाली..
#SharadPawar #YugendraPawar #Baramati #MTShorts
Sharad Pawar Trends ™️ retweeted
आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब ..👏
यांची नविन वर्षाची सुरवात शेतकऱ्यांच्या बांधावरून...! Indapur,Baramati @ISupportedPawar @SPawarOfficeBMT @Sharmila_Pawar1 @TeamSupriyaSule
Sharad Pawar Trends ™️ retweeted
२५ वर्ष अभिमानाची, स्वाभिमानाची आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची. चला, २६ व्या वर्धापनदिनाचा उत्सव आनंदाने साजरा करूयात. 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा!
Sharad Pawar Trends ™️ retweeted
बुधवार दिनांक १९ जून २०२४ चा खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांचा बारामती दौरा.
(आदरणीय @SharadPawar_NCP साहेब यांच्या सोबत @YSPawarSpeaks #Baramati @supriya_sule
Sharad Pawar Trends ™️ retweeted
बारामतीच्या बारामतीच्या पिंपळी लिमटेक गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला..!
मला आठवतंय की एकदा पिंपळी आणि आजूबाजूची लोकं मला भेटायला आली. त्या भेटीमध्ये द्राक्षाला काही किंमत मिळत नाही, असा प्रश्न माझ्याकडे मांडला. त्यावेळी मी विचार केला की द्राक्षावर प्रक्रिया करण्यासाठी काही करता येईल का? जगामध्ये चौकशी केली. जगामध्ये वायनरी केली जाते आणि म्हणून इथे वायनरी करायचा आम्ही निकाल घेतला. तुमच्यातल्या कदाचित जुन्या लोकांना माहित असेल इटली वरून त्याचे तज्ञ इथे आले. त्या सगळ्यांनी पहिल्यांदा इथे वायनरी टाकली. त्याच्यात 50 टक्के इथले शेतकरी भागीदार आणि 50 टक्के इटलीचे भागीदार. काही दिवस चाललं पुढे ते यशस्वी झालं. या क्षेत्रातले एक मोठे गृहस्थ होते त्यांचे नाव मोरया. त्यांना या ठिकाणी बोलावलं आणि त्यांना सांगितलं की पिंपळीचा कारखाना तुम्ही घ्या, वाढवा. मला दोनच गोष्टी पाहिजे एक द्राक्षाला मार्केट आणि दोन हाताला काम. ते हाताला काम करत असताना दोन प्रकारचे लोक त्या ठिकाणी होते. एक महिला होती आणि पुरुषही होते या दोन्ही गोष्टी त्यांनी माझ्या मान्य केल्या. द्राक्षाला मार्केट आलं. उसाच्या गाड्या जातात तश्या द्राक्षाच्या गाड्या येऊन तिथे माल टाकत होते. काही अडचणी आहेत, मध्यंतरी तुमच्यापैकी काही लोक मला म्हटले इथे द्राक्ष घालायला मी लावली असती पण ते प्रश्न सोडवायला आणखी काही करायची गरज आहे एक दिवशी बसून आपण त्यातून मार्ग काढू.
इथे कंपनी आणली आणि त्याच्यामध्ये महिलांना काम द्या म्हणून सांगितलं, महिलांच्या हाताला काम मिळालं. फक्त पिंपळीच्याच नाही तर आजूबाजूच्या सुद्धा. हे झाल्यानंतर मला पिंपळीचा चेहरा बदललेला दिसतो. लोकांच्या राहणीमानात, कामामध्ये, घरदार मी बघतो आता सगळीकडे बंगलेच दिसत होते. पूर्वीची घर गेली काही राहिले असतील नाही असं नाही पण लोकांच्या राहणीमानात बदल झाले. मी हे सगळीकडे बघतोय. राजकारण हे ज्यांनी आपल्याला सत्ता हातात दिली त्यांच्यासाठी वापरायची असते ही सूत्र आम्ही हातात घेतले. शेती आणि कारखानदारी चांगली कशी होईल याची काळजी घेतली. एमआयडीसी काढली, हजारो लोकांना आज तिथे काम आहे, धंदे वाढले काही ना काही तरी लोकांना तिथे फायदा झाला. आणखी काही गोष्टी बदलायची आहे त्याच्यासाठी तुमची मदत पाहिजे. तुमच्या कष्टाची तुम्हाला चांगली किंमत मिळेल एवढेच मला हवं आहे, ते काम मला या ठिकाणी करायचे आहे व ते करायचे असेल तर आपल्याला एकत्र राहावे लागेल. तुम्ही एकजूट दाखवा बाकीची दुरुस्ती करायचं काम मी करतो.
सध्याचे मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य धोरणे घेत नाहीत ही आम्हा लोकांची तक्रार आहे आणि ती आम्ही पार्लमेंटमध्ये सांगतो. साखरेला सर्वात जास्त किंमत माझ्या काळात दिली. आताच्या सरकारने साखर परदेशात निर्यात करण्याच्या निर्णय जो आहे त्याला बंदी केली. शेवटी माल तुमचा आहे तो परदेशात गेला तर त्याला किंमत येते. इथेनॉलला परदेशात पाठवायला या सरकारने बंदी केली त्याच्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आज या राज्यकर्त्यांना पिकवणाऱ्यांची काळजी नाही. हा प्रश्न आम्ही जेव्हा दिल्लीत मांडतो तेव्हा ते आम्हाला सांगतात तुम्ही पिकवणाऱ्यांची काळजी घेता आम्ही खाणाऱ्यांची बाजू घेतो. मी त्यांना सांगत असतो पिकवणाऱ्यांनी पिकवले नाही तर खाईल काय? ज्यांना खायला पाहिजे असेल तर पिकवणाऱ्यांना किंमत द्या. पिकवणाऱ्यांना किंमत दिली तर पाहिजे तेवढी उत्पन्न या देशात वाढायची ताकद या देशातल्या शेतकऱ्यांकडे आहे. मोदी सरकारला ते मान्य नाही आणि त्यामुळे आमचा त्यांच्या धोरणांना विरोध आहे. आता महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातात जर गेली तर तुमच्या मालाची किंमत आणखी घसरेल. ती आम्हाला घसरून द्यायची नाही त्यासाठी राज्याची सत्ता सुद्धा हातात घ्यायची आहे. चार वेळेला महाराष्ट्राच्या जनतेने माझ्या हातात सत्ता दिली मुख्यमंत्री म्हणून आणि त्याच्यामध्ये लोकांसाठी जे काही करणे शक्य आहे ते त्या ठिकाणी गेलं आज ते होत नाही आणि ते होईल असं जर बघायचं असेल तर उद्याची विधानसभा सुद्धा जिंकावी लागेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हा लोकांचे सहकार्य पाहिजे हे काम तुम्ही करा मी माझे काम करतो. कसे लोकांना चांगली किंमत मिळत नाही हे मी बघतो, तुमच्या पाठीशी उभा राहतो एवढेच या ठिकाणी सांगतो.

























