Pinned Tweet
श्री. युगेंद्रदादा पवार खजिनदार विद्या प्रतिष्ठान आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.....! 🎂🎉💐 @YSPOfficialTeam #HappyBirthday
सर्वांना तुळशी विवाहाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#tulsi #TulsiVivah2026
21
शरयु फौंडेशनच्या वतीने बारामतीकरांच्या सेवेत मोफत फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण!
#SharayuFoundation #BaramatiTaluka #MedicalServices #मोफतआरोग्यसेवा #फिरतादवाखाना
3
65
बारामतीकरांच्या सेवेत शरयू फाउंडेशन चा मोफत फिरता दवाखाना .! @SharayuFdnIndia @YSP_Foundation
6
99
भावा बहिणीचा हा सण केवळ औक्षणापुरता मर्यादित नसून तो एकमेकांप्रती असणाऱ्या अथांग आदराचे प्रतीक आहे. बहिणीचे प्रेमळ आशीर्वाद आणि भावाची भक्कम साथ हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे.
भाऊबीजेच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
#BhauBeej2026 #भाऊबीज #WomenSafety #diwali2026
1
6
133
📍 बारामती
बारामती नगरपालिका कंत्राटी कामगार बांधवांना दिवाळीनिम्मित फराळ वाटप.
#DiwaliWithWorkers #BaramatiNagarpadhit #MunicipalWorkers
7
102
दिवाळीचा पाडवा अर्थात या आनंदाचा आणखी एक सोहळा. हा सोहळा आपल्या आयुष्यात आनंद,सुख, समृद्धी व निरोगी आयुष्याचे दान घेऊन यावा हीच शुभेच्छा. शुभ दीपावली 🪔🎇
5
63
कुबेराची समृद्धी आणि महालक्ष्मीची कृपा आपणा सर्वांना निरंतर लाभो. प्रत्येक घरात सुख, समाधान आणि आनंद नांदो.
सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ दीपावली! 🪔
#HappyDiwali #Diwali2026
6
104
नरक चतुर्दशीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
#NarakaChaturdashi2026 #DiwaliCelebration #ProsperityAndSuccess #HappyDiwali
धनत्रयोदशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
सर्वांना सुख-समृद्धी आणि निरामय जीवन लाभो, हीच भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना! #HappyDiwali2026
9
118
वसुबारसच्या पावन प्रसंगी सर्वांना हार्दिक व मंगलमय शुभेच्छा!
#वसुबारस #Vasubaras #दिवाळी #Diwali #शुभदिवाळी
6
97
Wishing Revati Tai a very Happy Birthday! May your year ahead be filled with happiness, good health and success.
#revatisulespeaks #HappyBirthdayRevatiTai #RevatiTai #BirthdayWishes 🎉💐🎂 @Sule_Revati
12
222
Office Of Yugendra Pawar retweeted
१७ ऑक्टोबर २०२६
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६
📍 नांदेड | प्रचार सभा
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, प्रभावी आणि प्रतिभावान कलाकार गमावला आहे.
नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
अभिनंदन पार्थदादा आणि कायनात वहिनी...💫💞
"Wishing you both a lifetime of love and happiness. Happy Engagement!" 💫💞❤️
Miss You AjitDada 💔
#congratulations🎉 #parthdada #alwaysremember #ajitdada @parthajitpawar @Parth_AjitPawar
Office Of Yugendra Pawar retweeted
'विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) योजना 2026' या अभियानाच्या अनुषंगानं आयोजित कार्यशाळेला आज उपस्थित राहून शुभारंभ करण्यात आला.
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शाश्वत रोजगार, आजीविकेच्या नव्या संधी आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या दृष्टीनं हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यात आलं. गाव समृद्ध झालं, तर राज्य समृद्ध होईल, या विश्वासानं आपण सर्वांनी मिळून हे अभियान यशस्वी करूया.
📍 विधानभवन, मुंबई
Office Of Yugendra Pawar retweeted
पुणे आणि पिंपरी - चिंचवडकरांना भेडसावणाऱ्या समस्यांची पाहणी केली आहे, येत्या काही दिवसांत त्याचे लोकाभिमुख परिणाम सुद्धा दिसतील..!
Office Of Yugendra Pawar retweeted
|| जय जय रामकृष्ण हरी ||
आज श्री विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडावा, बळीराजा सुखी-समाधानी राहावा, राज्यावरील सर्व संकटं दूर व्हावीत आणि आषाढी वारी प्रत्येक वारकऱ्यासाठी सुरक्षित, सुखकर ठरावी, अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. आषाढी वारीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसंच पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी ₹४,००० कोटींच्या आराखड्यालाही मान्यता देण्यात आली आहे.
Office Of Yugendra Pawar retweeted
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने 4 ते 6 जुलै या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्र (MMR), कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
उद्या रविवारची सुट्टी असल्यानं अनेक नागरिक आणि पर्यटक पर्यटनस्थळांकडे जाण्याचं नियोजन करत असतील. मात्र, सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं.
धबधबे, नदीपात्र, ओढे, बंधारे, पूल तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाणं टाळावं. सखल भाग आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं.
अनावश्यक धाडस टाळा. स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या.
आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं संबंधित हेल्पलाईनवर संपर्क साधा :
📞 बृहन्मुंबई महानगरपालिका – 1916
📞 पालघर जिल्हा – 02525 297474 / +91 82379 78873
📞 ठाणे महानगरपालिका – 022-25364779 / 022-25301740 / +91 93723 38827
📞 ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108 / 8657887101
📞 पनवेल महानगरपालिका – 022-27458040 / 41 / 42
सुरक्षित राहा, सतर्क राहा!
Office Of Yugendra Pawar retweeted
आज बारामतीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त आयोजित गुणवंत सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी विचारांचा वारसा जपत शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समाजहिताची मूल्यं अधिक दृढ करण्यासाठी सातत्यानं कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान गेल्या तीन दशकांहून अधिक काळ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसंच यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या युवक-युवतींचा सन्मान करत समाजाप्रतीची बांधिलकी जपत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरविण्याची ही परंपरा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचंही नमूद केलं.
बारामतीच्या सूर्यनगरी परिसरात उभारण्यात आलेलं अहिल्यादेवी वसतिगृह हे समाजसेवेचं प्रेरणादायी उदाहरण असल्याचं सांगत, आदरणीय अजितदादांनी या उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच पन्नास लाख रुपयांचा निधी देऊन अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला भक्कम आधार दिल्याची आठवण करून दिली.
यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून झालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, हा सन्मान जनतेनं आणि सहकाऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं सांगितलं. या विश्वासामुळं समाजाप्रतीची जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीवही व्यक्त केली.
यंदाचा जयंती उत्सव एका वेगळ्याच भावनेत साजरा होत असल्याचं सांगताना, आदरणीय अजितदादा दरवर्षी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत असत आणि या उपक्रमाशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं, अशी आठवण जागवली. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेली प्रेरणा, रुजवलेले संस्कार आणि विकासाचा विचार कायम पुढील वाटचालीला दिशा देत राहील, असा विश्वास व्यक्त केला.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, लोककल्याण, पारदर्शकता आणि जनसेवेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत महिलांचं सक्षमीकरण, शिक्षणाचा प्रसार आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमानं काम करत राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी सत्कारमूर्तींचं अभिनंदन करत, हा सन्मान अंतिम टप्पा नसून नव्या जबाबदारीची सुरुवात असल्याचं सांगितलं. आपल्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा आणि यशाचा उपयोग समाजहितासाठी करत इतरांसाठी प्रेरणास्थान बनावं, असं आवाहन केलं.
अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वासराव (नाना) देवकाते-पाटील, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या उपक्रमाशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले. तसंच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे लोककल्याणाचे विचार आणि आदरणीय अजितदादांनी जपलेली सेवा, संवेदना व विकासाची परंपरा अधिक ताकदीनं पुढे नेण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं.



























