Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom) header
Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom) profile picture

Official Twitter Account of Commissionerate of Education, Govt. Of Maharashtra | महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाचे अधिकृत ट्विटर (X) खाते.

Joined March 2026
Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)
Commissionerate of Education, GOM, Pune retweeted
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २७ ऑक्टोबर २०२६ रोजी १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशकाची गोळी देणार #आरोग्य #शिक्षण #Health #MahaDGIPR
8
8
2,248
Commissionerate of Education, GOM, Pune retweeted
राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘चला शाळेत जाऊ या... विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून शाळांची स्वच्छता, सुशोभीकरण व देखभाल करून शैक्षणिक वातावरण अधिक पोषक करण्यात येणार आहे. शाळा परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आनंददायी ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जबाबदारी आणि शिस्तीची भावना रुजविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. समग्र शिक्षा योजनेंतर्गत शाळांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांना या मोहिमेमुळे चालना मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. ‘माझी शाळा-माझी जबाबदारी’ या भावनेतून या मोहिमेत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था तसेच उपलब्धतेनुसार सीएसआर आणि स्थानिक सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार असून मोहिमेच्या शाळास्तरीय अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहणार आहे. शासन निर्णय पहा- gr.maharashtra.gov.in/Site/U… #चलाशाळेतजाऊया
4
7
2
62
6,614
Commissionerate of Education, GOM, Pune retweeted
📍 सिंधुदुर्ग/रत्नागिरी/रायगड शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ‘चला शाळेत जाऊया’ या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन थेट शाळेपर्यंत पोहोचत असून, प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षित शालेय वातावरण आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना सुनिश्चित केल्या जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पांडुरंगशेठ पडते, पडतेवाडी तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, खारेपाटण क्रमांक १, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा, पानवल, होरंबेवाडी आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा झरेवाडी, रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आदिवासीवाडी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, झिरड येथे भेट देऊन शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली. या भेटींदरम्यान विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन व अध्ययन कौशल्यांचा आढावा घेण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाचे ‘राष्ट्र प्रथम’ हे ब्रीदवाक्य केंद्रस्थानी ठेवून पायाभूत सुविधांसोबतच गुणवत्तापूर्ण, आनंददायी आणि संस्कारक्षम शिक्षणाला प्राधान्य देण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले. @dadajibhuse #चलाशाळेतजाऊया #शालेयशिक्षण #गुणवत्ताप्रधानशिक्षण #महाराष्ट्रशासन
2
3
2,256
Commissionerate of Education, GOM, Pune retweeted
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन ८ सप्टेंबर २०२६ #आंतरराष्ट्रीयसाक्षरतादिन #साक्षरतादिन #InternationalLiteracyDay #LiteracyDay2026 #MahaDGIPR
9
5
5,420
Commissionerate of Education, GOM, Pune retweeted
‘चला शाळेत जाऊया’ अभियान’ #MaharashtraEducation #SchoolEducation
2
13
24
11,681