Civil Services Aspirant retweeted
१४,७८७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केले; नियुक्तीवेळी मात्र कायम होण्याचा अधिकार नव्हता.
आज #Rushigangurde व इतरांनी विरोध केला तर घरात घुसून मारण्याच्या धमक्या.
शासनाने स्पष्टच सांगावे, फक्त लागेबांधे असलेले #कंत्राटी #गुंड (च भरती करणार.....
#MPSC
Civil Services Aspirant retweeted
मा. @Dev_Fadnavis चौकशी कालमर्यादेत, पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे पूर्ण करून ठोस निष्कर्ष विद्यार्थ्यांसमोर मांडावेत.
विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार ?
@mpsc_office @CMOMaharashtra @Tukaram_IndIAS
#paperleak #mpsc
Civil Services Aspirant retweeted
मा. प्रशासनाला विनंती
ऋषिकेश गांगुर्डे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या दाव्याची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि आवश्यक पोलीस संरक्षण द्यावे.
#WeSupportRishiGangurde #MPSC
Civil Services Aspirant retweeted
🔴MPSC #पेपरफुटी ..!✅
1) SIT चे काम इतके हळुवार का?
2) SIT तपास कुठपर्यंत आलय याची माहिती का देत नाही?
3)आयोगातील आणि इतर फक्त 13 जण असतील एवढे सोपं आहे काय हे?
4) चौकशी आयोग केव्हा पासून काम करणार?
5) जे दोन महिने दिले होते ते किती तारखेला संपणार?
6) 2025 च्या सर्वच परीक्षा 1000% फुटलेल्या आहेत मग त्या CANCEL का करत नाही?
7) राज्यसेवा 2024 OBJECTIVE LAST ATTEMPT मध्ये 60-70% POST HOLDER मुलेच कसे काय लागले?
8) गोपाळ मराठे DIRECT 5 वर्षाने अभ्यास करून राज्यसेवा पूर्व कसा PASS झाला?
9) CM चे एवढ्या मोठ्या महाराष्ट्र नव्हे तर देश हदरावणाऱ्या MPSC च्या कारभाराकडे इतके दुर्लक्ष कसे?
10) जर 2022-23-24 हे देखील PAPER एका जरी विद्यार्थ्यांपर्यंत गेले असतील तर त्या पण परीक्षा CANCEL करणार काय?
11) DI सारख्याच RFO च्या जागा बऱ्याच दिवसांनी 144 जागा आल्या मग त्याच्यात देखील घोटाळा आहे
कारण
राज्यसेवा 2025 जागा - 139 मुख्य साठी मुल- 2750+
FOREST जागा - 144
मुख्य साठी मुल- 2350 च्या आसपास
FOREST ला जागा जास्त असून देखील RATIO मध्ये DIRECT 400 चा फरक कसा.
प्रकरण खूप गंभीर आहे.1990-2002 पर्यंतची एक पिढी MPSC मध्ये बरबाद झालेली आहे. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न खूप गंभीर आहे त्याच काय. गट क 2026 च्या वाढलेल्या जागा कुठंय?
2027 चे वेळापत्रक कुठं आहे?
सत्यानाश झाला आपल्या आयुष्याचा...
आयोग एक संस्था म्हणून नाही तर काही व्यक्तींचा समूह म्हणून बघा.. संस्था निर्जीव असते आणि व्यक्ती भ्रष्टाचारी, अप्रामाणिक असू शकतात.
4-5 लोक आयोगातील 5-10 लाख विद्यार्थी तसेच कुटुंब मिळून एक कोटी लोक आणि 15 कोटीच्या जनसमुदाय ला पुढील 30 वर्ष प्रभावित करणार आहे.
@RRPSpeaks
@Dev_Fadnavis
@Tukaram_IndIAS
@CMOMaharashtra
@MahaDGIPR
@LoksattaLive
@mpsc_office
Civil Services Aspirant retweeted
MPSC मधील गैर प्रकारासंदर्भात पूर्वीच सचिवांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार करूनही पेपर फुटतील भामट्यांना अभय...
MPSC पेपरफुटी प्रकरणात काल आयोगातील सहायक कक्ष अधिकारी रोहित कोलटक्केला अटक झाली आहे, अटक झालेला आयोगातील हा चौथा अधिकारी आहे.
आयोगामधील या भामट्यांची भनक MPSC मधील काही अधिकाऱ्यांना लागलेली होती. या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करूनही या भामट्यांवर पांघरून घालण्याचे काम त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले आहे.
मोठा मासा नेहमी छोट्या माशांना खातो परंतु या मोठ्या माशांनीच काही छोट्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न या पेपर फुटी मध्ये केलेला आहे.
अजूनही काही मासे तपासात समोर आलेले नाहीत ते देखील लवकरच समोर येतील.
या संदर्भात SIT ला माहिती देणार आहेच त्यासोबत वास्तव कट्ट्यावर लाईव्ह तर येणारच...
-किरण निंभोरे
@CMOMaharashtra @mpsc_office
Civil Services Aspirant retweeted
#MPSC घोटाळ्यांतील अटकसत्रात SO/ASO संवर्गातील नावे वारंवार समोर येत आहेत…
Drug Inspector topper खटकाळे (165/200) यांचे SO/ASO कनेक्शनही तपासले, तर #सोलापूर कनेक्शनही उघडणार...?
**Correct joint secretary as #UnderSecretary
#MPSCScam #MPSCशुद्धीकरण
सूत्रांनुसार, मंत्रालयात खटाकळे नावाचे #JointSecretary दर्जाचे अधिकारी असल्याचे सांगितले जाते. #Lendave हेही Joint Secretary दर्जाचे अधिकारी आहेत.#druginspector परीक्षेतील टॉपर आणि खटाकळे यांचा पत्ता एकच असल्याचे दिसते. या तिघांचा काही संबंध आहे का? @GajabhauX @RRPSpeaks #mpsc
Civil Services Aspirant retweeted
MPSC मधील गैर प्रकारासंदर्भात पूर्वीच सचिवांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार करूनही पेपर फुटतील भामट्यांना अभय...
MPSC पेपरफुटी प्रकरणात काल आयोगातील सहायक कक्ष अधिकारी रोहित कोलटक्केला अटक झाली आहे, अटक झालेला आयोगातील हा चौथा अधिकारी आहे.
आयोगामधील या भामट्यांची भनक MPSC मधील काही अधिकाऱ्यांना लागलेली होती. या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करूनही या भामट्यांवर पांघरून घालण्याचे काम त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले आहे.
मोठा मासा नेहमी छोट्या माशांना खातो परंतु या मोठ्या माशांनीच काही छोट्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न या पेपर फुटी मध्ये केलेला आहे.
अजूनही काही मासे तपासात समोर आलेले नाहीत ते देखील लवकरच समोर येतील.
या संदर्भात SIT ला माहिती देणार आहेच त्यासोबत वास्तव कट्ट्यावर लाईव्ह तर येणारच...
-किरण निंभोरे
@CMOMaharashtra @mpsc_office
Civil Services Aspirant retweeted
माती केली हो तुम्ही आमच्या आयुष्याची!
१५ दिवस होऊनही समितीची एकही बैठक झाली नाही, असं सकाळच्या बातमीवरून ऐकायला मिळतंय.
पेपरफुटीच्या बाबतीत महाराष्ट्राला थेट टॉपवर नेऊन ठेवलंय तुम्ही… माझा महाराष्ट्र!
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @Tukaram_IndIAS
आयोगाच्या कर्मचाऱ्यांचे १० पानी पत्र वाचून मन सुन्न झाले! MPSC मधील नियुक्त्यांचे गौडबंगाल नेमके काय? पेपरफुटीच्या चक्रव्यूहातील ‘अभिमन्यू’ कोण?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर्मचाऱ्यांनीच तब्बल १० पानी पत्र लिहून गंभीर तक्रारी केल्या असतील, तर या प्रकरणाचे गांभीर्य किती मोठे आहे, याची कल्पना येते. हे पत्र वाचल्यानंतर मन सुन्न झाले. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या आयोगात नेमके काय चालले आहे, हा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे.
१. उमरणीकर यांची नियुक्ती नेमकी कोणाच्या आदेशाने?
आयोगात सहसचिव पदावर, तेही गोपनीय शाखेसारख्या अत्यंत संवेदनशील विभागात उमरणीकर यांची थेट नियुक्ती कशी झाली? या नियुक्तीसाठी राज्यपाल आणि आयोगाच्या अध्यक्षांची परवानगी घेण्यात आली होती का? नसेल, तर मंत्रालयातून ही नियुक्ती करण्यासाठी नेमका कोणाचा दबाव होता?
या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत.
२. आयोगाच्या स्वायत्ततेशी खेळण्याचा अधिकार कुणाला?
आयोगातील कामकाजाचे वाटप कोणाला करायचे, कोणत्या अधिकाऱ्याकडे कोणती जबाबदारी द्यायची, हे ठरवण्याचा अधिकार आयोगाच्या अध्यक्षांकडे असताना उमरणीकर यांच्याकडे परीक्षा विभाग आणि गोपनीय शाखेची जबाबदारी कशी आली?
जर या नियुक्त्या नियम डावलून करण्यात आल्या असतील, तर त्यामागील सूत्रधार कोण? आयोगाच्या स्वायत्ततेला धक्का पोहोचवून नेमका कोणाचा हेतू साध्य केला जात होता?
याचबरोबर श्रीमती बांधेकर यांच्या नियुक्तीबाबतही उपस्थित झालेल्या प्रश्नांची स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे.
३. पेपरफुटीचा चक्रव्यूह आणि त्यातील ‘अभिमन्यू’ कोण?
मी वारंवार सांगत आलो आहे की, महाराष्ट्रातील पेपरफुटीचे प्रकरण हा केवळ एखाद्या परीक्षेतील गैरप्रकाराचा विषय नाही; या प्रकरणामागे मोठे जाळे असण्याची शक्यता तपासली पाहिजे.
आज प्रश्न केवळ उमरणीकर किंवा बांधेकर यांच्या नियुक्तीपुरता मर्यादित नाही. या नियुक्त्या कोणी सुचवल्या? मंत्रालयातून आयोगात पाठवण्यासाठी कोण पुढे होते? नियमांना बगल देण्याची वेळ का आली? या संपूर्ण प्रक्रियेमागे कोणत्या व्यक्तीचा किंवा यंत्रणेचा प्रभाव होता?
माझा स्पष्ट आरोप आहे की, या नियुक्त्यांमागील संभाव्य सूत्रधारांचा शोध घेतल्याशिवाय पेपरफुटीच्या प्रकरणाची पाळेमुळे उखडली जाणार नाहीत.
उमरणीकर यांच्या नियुक्तीची सखोल चौकशी झाली, तर या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचे दुवे समोर येऊ शकतात. या नियुक्त्यांमागे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भूमिका होती का, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे.
आता वेळ आली आहे उत्तरदायित्व निश्चित करण्याची!
▪️ उमरणीकर आणि बांधेकर यांच्या नियुक्त्यांची संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करावी.
▪️ नियुक्त्यांसाठी प्राप्त झालेल्या आदेशांची, मंजुरींची आणि संबंधित फाइल्सची तपासणी करावी.
▪️ आयोगाच्या अध्यक्षांची भूमिका आणि अधिकार डावलले गेले का, याची चौकशी करावी.
▪️ मंत्रालयातील संबंधित अधिकारी आणि नियुक्त्यांसाठी शिफारस करणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी.
▪️ पेपरफुटी प्रकरणातील सर्व संबंधित दुवे तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी.
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टाचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. आयोग हा कोणत्याही व्यक्तीच्या मर्जीने चालणारा विभाग नसून, पारदर्शक आणि निष्पक्ष स्पर्धा परीक्षांचा घटनात्मक आधार आहे.
पेपरफुटीच्या या चक्रव्यूहात केवळ प्याद्यांवर कारवाई करून चालणार नाही; या व्यवस्थेमागील सूत्रधार कोण आहेत, हे शोधावेच लागेल!
महाराष्ट्राला उत्तर हवे आहे — MPSC मधील या नियुक्त्यांमागील ‘अभिमन्यू’ कोण? आणि त्याला वाचवण्यासाठी नेमके कोण प्रयत्न करत आहे?
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता कामा नये!
#MPSC #पेपरफुटी #आयोगाचीस्वायत्तता #विद्यार्थ्यांनान्याय #पारदर्शकचौकशी
Civil Services Aspirant retweeted
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ या परीक्षेचा लवकरात लवकर तपास करून,परिपत्रक काढून आम्हा विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा.
@mpsc_office
@CMOMaharashtra
@RRPSpeaks
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
Civil Services Aspirant retweeted
😎😎MPSC पेपरफुटीचा आणखी एक पुरावा..! गट ब 2025 = 60 लाखात paper फुटला🔥🔥🔥🔥
💰 ६० लाखांत १ पेपर,१०० पैकी ९० गुण अन् ६१ दुय्यम निबंधक SIT च्या रडारवर.🔥🔥
मा.@Dev_Fadnavis साहेब तत्काळ MPSC चौकशी समितीला रीतसर अधिकार द्या.
💵 आर्थिक उलाढाल लक्षात घेता पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. 💯
Exam #रद्द करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.✅
@RRPSpeaks
@Tukaram_IndIAS
@andharesushama
@mpsc_office
@CMOMaharashtra
@MahaDGIPR
@LoksattaLive
lokmat.com/pune/mpsc-paper-l…
Civil Services Aspirant retweeted
माननीय आयोगास विनंती आहे की एवढी तत्परता "महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षा 2025" संबंधित पण दाखवावी.
या परीक्षेवरती आंदोलनामध्ये पुराव्यानशी आरोप केले आहेत याची सखोल चौकशी झालीच पाहिजे.
कोणीही दोषी असेल तर त्याला पाठीशी न घालता कारवाई झाली पाहिजे.
#Mpsc #गट_ब_पूर्व_परीक्षा
Civil Services Aspirant retweeted
मी समितीच्या संपर्कात आहे. (चाणक्य)
असे जर क्लासचालक म्हणत असतील तर
स्वतःच्या आर्थिक हितासाठी पाहिजे तसा अभ्यास क्रम समिती मार्फत प्रयत्न होतोय का???
#Objective
V.राधा समितीची विश्वासार्हता तळाला नेऊन ठेवणारे वक्तव्य धर्माधिकारी यांनी केले आहे. राज्य सरकारने तत्काळ SIT नेमून समिती सोबत काही lobbying करण्यात येत आहे का यातील सत्यता पडताळून पाहावी..
#mpscobjective
@Objective2027
Civil Services Aspirant retweeted
MPSC ला जुनी कागदपत्रे रद्दी काढून नष्ट करण्याची एवढी घाई का झाली आहे? एवढा ‘चक्रम’पणा का? न्यायिक चौकशी आयोगाचा आणि मा. तुकाराम मुंडे साहेबांच्या धाकाचा हा परिणाम आहे का? आयोगाचं संपूर्ण शुद्धीकरण करायचं असेल तर सर्व जुनी कागदपत्रं देखील तपासणं गरजेचं आहे, तरच सत्य बाहेर येईल. त्यामुळं आयोगाच्या सचिवांनी किंवा सरकारने तत्काळ दखल घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत रद्दी नष्ट करण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याच्या सूचना द्याव्यात...!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@Tukaram_IndIAS
#MPSC #MPSC_आयोग
Civil Services Aspirant retweeted
माझी आई (सुनंदाताई पवार) आणि होम मिनिस्टर (कुंती) या दोघीही आमच्या कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ आहेत. घराचा डोलारा त्या सक्षमपणे सांभाळतात. त्यामुळंच गेले अनेक दिवस मी घराबाहेर असतानाही त्यांची माझ्याविषयी काहीएक तक्रार नाही. घरच्या आघाड्यांवर त्यांनी मला पूर्णपणे निश्चिंत ठेवलंय. त्यांच्या याच खंबीर पाठिंब्यामुळं मला समाजकार्य आणि विद्यार्थ्यांसाठी वेळ देता येतो, हे सांगताना नक्कीच अभिमान वाटतो. या दोघींनीही काल रात्री MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या सत्याग्रहाला उपस्थित राहून आंदोलक विद्यार्थ्यांचा संघर्ष जवळून जाणून घेतला आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश येत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत ठाम रहा, अशी इच्छाही बोलून दाखवली. संघर्षासाठी अजून काय हवंय…!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCUpdates #StudentsProtest
Civil Services Aspirant retweeted
ये डर जरुरी है...
विवेक भीमनवारने अकाउंट private केल असलं तरी फडणवीस आणि त्यांची मैत्री आता जगजाहीर झाली आहे!
Civil Services Aspirant retweeted
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis पेपरफुटी झाली असेल, तर संयुक्त गट-ब परीक्षा२०२५ रद्द करून नव्याने घेणे हाच प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा मार्ग! पेपरफुटीच्या सावटाखाली गुणवत्तेचा निकाल मान्य कसा करायचा?
शासनाला विनंती — संयुक्त गट-ब परीक्षा २०२५ सरसकट रद्द झालीच पाहिजे
#Combine2025ReExam
Civil Services Aspirant retweeted
MPSC भ्रष्टाचारमुक्त होवो, भ्रष्ट भीमनवारांना राजीनामा देण्याची सद्बुद्धी मिळो आणि विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश मिळो यासाठी मुठा नदी पात्रात महाआरती !
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
Civil Services Aspirant retweeted
MPSC विद्यार्थी सत्याग्रहप्रकरणी दुसरा गुन्हा… माफ करा! सरकारकडून दुसरं मेडल..!
पहिल्या गुन्ह्यात ऋषिकेश गांगर्डेसह इतर ४-५ जण तिथे उपस्थित नसतानाही त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. काहींचे तर चक्क लिंगच बदलले! पण पोलिसांची ही लबाडी आम्ही उघडी पाडल्याने, विद्यार्थ्यांना गुन्हेगार ठरवण्याचा विडाच उचललेल्या सरकारने आता आपली अब्रू वाचवण्यासाठी नवा डाव रचला आणि आंदोलकांना दुसऱ्या गुन्ह्यात गोवलं..!
काय तर म्हणे, परवानगीशिवाय ड्रोन उडवलं..!
गृहखात्याने पोलिसांची अब्रू वाचवायची असते; खोटे गुन्हे दाखल करून स्वतःचीच अशी अब्रू घालवायची नसते, मा. फडणवीस साहेब!
एका भ्रष्ट मित्रासाठी किती हा खटाटोप..! विद्यार्थ्यांवर अजून किती अन्याय करणार?
पोलिसांनो, सरकारचं ऐकून विद्यार्थ्यांना घाबरवू नका. गुन्हे दाखल करायचेच तर माझ्यावर करा…!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSCआंदोलन
Civil Services Aspirant retweeted
गट ब २०२५ च्या ज्या काही पूर्वच्या मार्कशीट समोर येत आहेत..
त्यावरनं एकच वाटतं..
ही तर पेपरफुटी नाही तर चक्क पेपरचा लिलाव केलेला आहे..
बाजार समितीतल्या सकाळच्या फळांच्या आणि भाजीच्या लिलावाप्रमाणे..😡
त्यामुळे आजपासून मुलांनी पेपरफुटी हा शब्द न वापरता पेपरचा लिलाव हा वापरावा
































