Chhatrapati Sambhajinagar First formely known as Aurangabad First, an intiative of MECC, which works for sustainable Development of Chhatrapati Sambhajinagar.
धूळमुक्त छत्रपती संभाजीनगर
पुढील तीन वर्षांत ‘डस्ट फ्री सिटी' करण्यासाठी हवा ठोस कृती आराखडा
छत्रपती संभाजीनगरचे भौगोलिक स्थान उष्ण आणि तुलनेने कोरड्या हवामानाच्या पट्ट्यात असल्याने वर्षातील अनेक महिने वातावरणात कोरडेपणा जाणवतो. मागील काही वर्षातछत्रपती संभाजीनगरमध्ये विकासाची चाके वेगाने फिरत आहेत. औद्योगिक विस्तार, नवीन रस्ते, बांधकामे आणि वाढती वाहनसंख्या शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत. मात्र, याच विकासाच्या प्रवासात नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर उडणारी माती, बांधकामांमधून पसरणारे धूलिकण, अपूर्ण फुटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला असलेली उघडी जमीन यामुळे शहराच्या हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यावेळी रस्त्यांची अपुरी स्वच्छता, पक्क्या फुटपाथचा अभाव, रस्त्यांलगत हिरवाईची कमतरता आणि वारंवार होणारे खोदकाम ही धुळीची प्रमुख कारणे आहे.
महानगरपालिकेने रस्ते स्वच्छतेसाठी काही यांत्रिक सफाई यंत्रे आणली आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, यंत्राचा प्रभावी वापर आणि धुळीचे मूळ स्रोत रोखणे अधिक महत्त्वाचे आहे. मनपाकडे आजघडीला 1760 सफाई कर्मचारी आहे, परंतु
प्रमुख रस्त्यांवर नियमित यांत्रिक सफाई, धूळ साचणाऱ्या ठिकाणांची ओळख, योग्य वेळेत कचरा व धूळ संकलन आणि सफाईच्या कामाचे नियमित परीक्षण आवश्यक आहे. असलेल्या वाहनांची संख्या अपुरी असून, प्रत्येक झोनसाठी किमान 2 मशीन असणे आवश्यक आहे. कोरड्या सफाईमुळे धूळ पुन्हा हवेत उडणार नाही, याची काळजी घ्यावी.
शहरात नवीन रस्ते तयार करताना किंवा जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण करताना केवळ वाहनांसाठी जागा वाढविण्यावर भर दिला जातो. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रुंद, सलग आणि अडथळामुक्त फुटपाथ, योग्य पावसाळी निचरा, पक्के रस्ते-शोल्डर आणि नियोजनबद्ध वृक्षलागवड यांचाही एकत्रित विचार झाला पाहिजे.
रस्त्याच्या कडेला उघडी माती असेल, तर वाहनांच्या वर्दळीमुळे ती पुन्हा हवेत उडते. त्यामुळे रस्त्याच्या कडांची योग्य बांधणी, मातीचे स्थिरीकरण आणि आवश्यक ठिकाणी पक्के किंवा हिरवे आच्छादन महत्त्वाचे आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडांच्या रांगा, दुभाजकांमध्ये नियोजनबद्ध हिरवाई आणि सार्वजनिक जागांमध्ये वृक्षलागवड केली पाहिजे. स्थानिक हवामानाला अनुरूप वृक्षप्रजाती निवडून त्यांचे पुढील काही वर्षे संगोपन करणेही आवश्यक आहे. केवळ वृक्षलागवडीची संख्या न मोजता किती झाडे जगली आणि प्रत्यक्ष हिरवे आच्छादन किती वाढले, याचा हिशेब ठेवावा.
*धुळीचे मूळ स्रोत रोखणे आवश्यक*
धुळीची समस्या केवळ रस्ते झाडून सुटणार नाही. बांधकामस्थळी साहित्य उघड्यावर ठेवणे, डेब्रिजची अयोग्य वाहतूक, अपूर्ण रस्ते, मातीचे ढिगारे आणि रस्ते खोदल्यानंतर वेळेत दुरुस्ती न होणे हीदेखील महत्त्वाची कारणे आहेत.
महानगरपालिकेने बांधकाम आणि पाडकामाच्या ठिकाणी धूळ नियंत्रणाचे नियम कठोरपणे लागू करावेत. मोठ्या बांधकामस्थळी आवश्यकतेनुसार धूळ नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा वापरणे, बांधकाम साहित्य झाकून ठेवणे आणि राडारोड्याची अधिकृत ठिकाणी विल्हेवाट लावणे बंधनकारक करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. पाणीपुरवठा, वीज, मलनिस्सारण गॅस पाइपलाइन आणि दूरसंचार सेवांसाठी वारंवार रस्ते खोदले जातात. विविध विभागांमध्ये समन्वय साधून एकाच रस्त्यावर वारंवार खोदकाम टाळणे किंवा प्रमुख रस्त्यालगत डक्ट निर्माण करून त्यामध्ये या सर्व सेवा असल्या पहिजे जेणेकरून वारंवार खोदकामणकरावे लागणार नाही.
*हवामान कृती आराखड्यातील शिफारशींची अंमलबजावणी करा*
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागासाठी डब्ल्यूआरआय इंडियाने तयार केलेल्या छत्रपती संभाजीनगर हवामान कृती आराखडा २०२४ मध्ये शहराच्या हवेच्या गुणवत्तेबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे आणि उपाय सुचवले आहेत.
या अहवालानुसार, २०१९ ते २०२२ या काळात शहरातील पीएम१० या धूलिकणांच्या वार्षिक सरासरी प्रमाणात ९७.३७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली होती. *२०१९ मध्ये पीएम१०च्या निकषावर तुलनेने कमी प्रदूषण असलेल्या शहरांमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेले छत्रपती संभाजीनगर नंतरच्या काळात ४४व्या क्रमांकावर गेले होते.* यामध्ये जड वाहनांमधून आणि चारचाकी वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचा पीएम१०च्या एकूण उत्सर्जनभारातील वाटा सुमारे ५० टक्के होता.
छत्रपती संभाजीनगरला पुढील तीन वर्षांत धूळमुक्त शहर बनविण्याचे उद्दिष्ट निश्चित करता येईल. त्यासाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी आवश्यक आहे.
पहिले वर्ष — सर्वेक्षण आणि तातडीच्या उपाययोजना:
धुळीचे हॉटस्पॉट, अपूर्ण फुटपाथ, कच्चे रस्ते, बांधकामस्थळे आणि उघडी माती असलेले रस्त्यांचे कडे यांचे सर्वेक्षण करावे. प्रमुख रस्त्यांवर नियमित यांत्रिक सफाई सुरू करून बांधकामस्थळी नियमांची अंमलबजावणी करावी.
दुसरे वर्ष — पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा:
प्रमुख रस्त्यांच्या कडांची दुरुस्ती, रुंद व सलग फुटपाथ, पावसाळी निचरा, वृक्षलागवड आणि बांधकाम डेब्रिज व्यवस्थापन यांना गती द्यावी. प्रभागनिहाय हरित पट्टे विकसित करावेत.
तिसरे वर्ष — परिणामांचे मोजमाप आणि शहरव्यापी विस्तार:
सर्व प्रभागांमध्ये उपाययोजना राबवून हवेतील पीएम१० व पीएम२.५ या धूलिकणांचे प्रमाण, रस्त्यांची स्वच्छता, बांधकामस्थळी नियमपालन आणि वृक्षांचे जगण्याचे प्रमाण यांचा नियमित आढावा घ्यावा.
यासाठी महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, संबंधित रस्ते विभाग, औद्योगिक संघटना, बांधकाम व्यावसायिक आणि नागरी संस्था यांच्या सहभागातून स्वतंत्र ‘डस्ट फ्री सिटी मिशन’ राबविता येईल. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, उपलब्ध शासकीय निधी आणि उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचाही नियमानुसार उपयोग करता येईल.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Devendra_Office@mieknathshinde@rrm_0306@rajurkar42@save_atul@SanjayShirsat77@SwachhBharatGov@WRIIndia
Mr. Ritesh Mishra, President, CSN First, had the opportunity to meet Hon. Union Finance Minister Smt. Nirmala Sitharaman.
During the interaction, Mr. Mishra briefed the Hon. Finance Minister about CSN First, its vision as a citizen forum, and the various initiatives undertaken by the organisation towards citizen participation, public engagement and community development in Chhatrapati Sambhajinagar.
@nsitharaman@nsitharamanoffc@rrm_0306
CSN First & CMIA hosted a special session with Sanjeev Sanyal, Member, Economic Advisory Council to the Prime Minister, on “Process Reforms for Ease of Doing Business in India” in Chhatrapati Sambhajinagar.
The event brought together industry leaders, entrepreneurs, civic representatives and policymakers to discuss how Chhatrapati Sambhajinagar can unlock its next phase of growth.
A key takeaway from Sanjeev Sanyal was that development is not only about big projects — better governance and better processes matter just as much.
He emphasised that simply digitising an existing process is not reform. The focus must be on identifying bottlenecks, simplifying procedures, removing unnecessary steps and making administration more efficient.
He also underlined the immense tourism potential of Chhatrapati Sambhajinagar and the need to create a distinctive tourism model that encourages visitors to stay longer, bringing greater economic benefits to the city.
Ritesh Mishra, President, CSN First presented a comprehensive Development Roadmap for Chhatrapati Sambhajinagar, focusing on the city’s next phase of growth — from infrastructure and mobility to industry, education, technology and tourism.
#CSNFirst#ChhatrapatiSambhajinagar#CSN2047#FutureGrowthCity#SanjeevSanyal@rrm_0306@dushyantnpatil
Celebrating Freedom. Inspiring Progress.
This Independence Day, we celebrate the spirit of a city that carries a rich heritage while building a bold, progressive future.
From our historic legacy to rapid growth, innovation and new opportunities, Chhatrapati Sambhajinagar is moving forward with purpose.
A city rooted in history.
A city driven by innovation.
A city shaping the Viksit Bharat of tomorrow.
Happy Independence Day! 🇮🇳
#IndependenceDay#15August#ChhatrapatiSambhajinagar#CSNFirst
A Step Towards a Dignified Vaikunth Dham
The groundbreaking ceremony for the redevelopment of Kailasnagar Crematorium was held today in the presence of Hon'ble Minister Shri Atul Save, senior government officials, and the CSN First team.
In partnership with Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation, CSN First will transform the city's historic crematorium into a modern, eco-friendly, and dignified Vaikunth Dham with world-class facilities for citizens.
धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू
मराठवाड्याच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर (सुमारे २४० कि.मी.) नवीन रेल्वेमार्गासाठी डीपीआर तयार करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर राज्य शासनाशी आवश्यक चर्चा, नीती आयोग, अर्थ मंत्रालय आणि इतर संबंधित संस्थांच्या मंजुरीनंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांवर निर्णय घेतला जाईल. रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही विविध तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय टप्प्यांमधून पार पडणारी सातत्यपूर्ण प्रक्रिया असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
हा प्रस्तावित रेल्वेमार्ग केवळ तीन जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प नसून मराठवाड्याच्या भविष्यातील आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील वेगाने विकसित होणारे औद्योगिक, उत्पादन आणि लॉजिस्टिक्स केंद्र बनत असताना या रेल्वेमार्गामुळे बिडकीन औद्योगिक वसाहत रेल्वे मॅपवर येईल.
याशिवाय, भविष्यात हा मार्ग उत्तर–दक्षिण रेल्वे कॉरिडॉरचा महत्त्वपूर्ण भाग बनण्याची क्षमता आहे. छत्रपती संभाजीनगरला दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि पुढे दक्षिण भारताशी अधिक थेट रेल्वे जोडणी उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे प्रवाशांसाठी कमी अंतराचे आणि पर्यायी रेल्वे मार्ग उपलब्ध होतील, तर मालवाहतुकीसाठीही अधिक कार्यक्षम रेल्वे नेटवर्क तयार होईल.
विशेषतः ऑरिक, शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र, ऑटोमोबाईल, ईव्ही, अभियांत्रिकी आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना या मार्गाचा मोठा फायदा होऊ शकतो. कंटेनर, औद्योगिक कच्चा माल, तयार उत्पादने तसेच कृषी उत्पादनांची वाहतूक अधिक जलद, कमी खर्चात आणि कार्यक्षम पद्धतीने करता येईल. यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल.
तसेच, या रेल्वेमार्गामुळे मराठवाड्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होईल. शिक्षण, रोजगार, व्यापार आणि आरोग्य सेवांसाठी होणाऱ्या दैनंदिन प्रवासालाही मोठी मदत मिळेल. भविष्यात या मार्गाचे राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी प्रभावी एकत्रीकरण झाल्यास तो उत्तर–दक्षिण मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा पर्यायी कॉरिडॉर म्हणून विकसित होऊ शकतो.
Source : pib.gov.in/PressReleasePage.…@rrm_0306@Csnfirst@CSN_Page@CSN_Updates@The_CSN_Index@CsnInfraspot@ssastronaut@rajurkar42 @cssmartcity @Amol_Yedge@DMAurangabadMH
Chhatrapati Sambhajinagar continues to shine as one of India’s premier heritage destinations!
Over 41.56 lakh tourists visited the city’s iconic ASI monuments in 2025-26, including Ajanta Caves, Ellora Caves, Bibi Ka Maqbara, Daulatabad Fort, and Aurangabad Caves.
@rrm_0306
ALT 🏛️ Explore the Timeless Heritage of Chhatrapati Sambhaji Nagar!
From the world-renowned Ajanta and Ellora Caves to the majestic Daulatabad Fort, iconic Bibi Ka Maqbara, and historic Aurangabad Caves, Chhatrapati Sambhaji Nagar continues to captivate visitors from across India and the world.
📈 In 2025-26, more than 41.56 lakh tourists have visited these ASI-protected monuments, reaffirming the city's position as one of India's most important heritage tourism destinations.
✨ A city where history, culture, architecture, and sustainability come together.
🌿 Clean Heritage. Proud Legacy. Sustainable Future.
📍 Visit. Explore. Experience.
Chhatrapati Sambhaji Nagar – The Heritage Capital of Maharashtra and the Next Growth Hub of India.
#ChhatrapatiSambhajiNagar #CSNFirst #HeritageTourism #AjantaCaves #ElloraCaves #BibiKaMaqbara #DaulatabadFort #AurangabadCaves #IncredibleIndia #MaharashtraTourism #CleanHeritage #ProudLegacy #SustainableFuture #VisitCSN #ExploreCSN
Team CSN First had a productive meeting with Hon. Minister @Shivendraraje11 during his visit to Chh. sambhaji nagar
The discussion focused on key infrastructure developments including proposed CSN–Pune Greenfield Expressway and the much-needed Shendra–Waluj Overbridge project.
A memorable evening of ideas, leadership & commitment towards the future of Chh. Sambhajinagar.
At the @Csnfirst Family Get-Together hosted by Rishi Bagla, distinguished leaders, industrialists & administrators came together to celebrate contributions towards city & regional.