District Information Office, Parbhani (@InfoParbhani) header
District Information Office, Parbhani (@InfoParbhani) profile picture

परभणी जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं. महाराष्ट्र शासन

Parbhani,
Joined November 2015
Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)
District Information Office, Parbhani retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहारी सावंगा, नागपूर येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी शेतीविषयक समस्या, सिंचन, पिकांची स्थिती आणि स्थानिक विषयांवर संवाद साधला. #DiwaliWithFarmers
3
1
134
District Information Office, Parbhani retweeted
📍अहिल्यानगर कळसपिंपरी (ता. पाथर्डी )येथे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःला एकटे समजू नये. राज्य शासन प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रशासनाने शासनाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकरी भीमसेन शंकर भवार यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ आणि कपडे देत त्यांना दिलासा दिला. पालकमंत्री डॉ. विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी भवार कुटुंबीयांसोबत जेवण करून दिवाळीचा आनंद साजरा केला. गावातील इतर कुटुंबीयांनाही दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले. आगामी आठ ते नऊ महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री विखे पाटील यांनी दिले. पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या संयुक्त पाहणीतून पशुधनाची संख्या तसेच उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे पशुधन सुरक्षित राहावे आणि चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. @Dev_Fadnavis @RVikhePatil #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
1
9
80
5,658
District Information Office, Parbhani retweeted
कठिण प्रसंगी राज्य शासनाच्या माध्यमातून ५ हजार रुपयांची दिवाळी भेट प्राप्त झाली. ही प्रक्रिया राबविणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करतो - श्रीधर हातणकर, गोठणे दोनिवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare – at Amravati, India
चालू हंगामातील सुमारे ३० गुंठे भातशेतीचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले. अशा कठिण प्रसंगी राज्य शासनाच्या माध्यमातून ५ हजार रुपयांची दिवाळी भेट प्राप्त झाली. ही प्रक्रिया राबविणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करतो - श्रीधर हातणकर, गोठणे दोनिवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
1
1
78
District Information Office, Parbhani retweeted
योगेश मते राहणार जयपूर ता. छत्रपतीसंभाजीनगर, जिल्हा संभाजीनगर यांच्या शासकीय मदत मिळाल्या बद्दल बोलक्या प्रतिक्रिया.
2
256
District Information Office, Parbhani retweeted
📍नागपूर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य तिथे विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून दिवाळी साजरी केली. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. शेतकऱ्यांसमोरील संकट आणि या संकटावर कशी मात करता येईल, या संदर्भात त्यांनी बालपांडे यांच्यासोबत संवाद साधला. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला. हवामान बदलामुळे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर पाऊसच पडला नाही आणि अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची हानी झाली आहे. या दोन्ही प्रसंगांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत दिली जात आहे. काटोल, नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणात पीक होत आहे. परंतु, बांगलादेशने निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. या संदर्भात मिहान येथे मोठा प्रकल्प सुरू होत असून या पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे .शेतकरी अडचणीत येणार नाही, त्याची खबरदारी घेण्यात येत आहे. रब्बीचे पीक वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, या संदर्भातही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. शेतीच्या संरक्षणासाठी कुंपण घालण्याची योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. शेतकऱ्यांच्या दुःखांमध्ये सहभाग घेऊन दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आमच्या घरी आलेत सोबत मुक्काम केला तसेच आमच्या घरच्या चटणी भाकरीचा आस्वाद घेतला, याचा आम्हाला अभिमान वाटला, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जो धीर दिला त्यामुळे आम्हाला संकटावर मात करण्याची हिंमत मिळाली, अशी भावना रामभाऊ बालपांडे यांनी व्यक्त केली. @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
10
1
13
2,155
District Information Office, Parbhani retweeted
योगेश मते राहणार जयपूर ता. #छत्रपतीसंभाजीनगर, जिल्हा संभाजीनगर यांच्या शासकीय मदत मिळाल्या बद्दल बोलक्या प्रतिक्रिया.#शेतकरीमदत, #दुष्काळनिवारण .
2
144
District Information Office, Parbhani retweeted
📍 नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त त्यांच्या कुटुंबियांसमवेत घरगुती भोजनाचा आनंद घेतला. सर्वांशी आपुलकीने संवाद साधला... @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
20
4
50
3,568
District Information Office, Parbhani retweeted
📍शिर्डी (जि. अहिल्यानगर) जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कोपरगाव तालुक्यातील 'कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना' कोळपेवाडी आणि 'सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना' संजीवनीनगर येथे भेट देऊन ऊसतोड कामगारांशी संवाद साधला. मंत्री राठोड यांनी प्रत्यक्ष ऊसाच्या फडावर जाऊन ऊसतोडणीच्या कामाचा अनुभव घेतला आणि कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या. दिवाळी निमित्त ऊसतोड कामगारांना शिधा किटचे वाटप करण्यात आले. ऊसतोड कामगारांची महामंडळाकडे राज्यात विशेष नोंदणी मोहीम राबविण्याबाबत शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत पुढाकार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार अत्यंत कष्टाचे काम करतात आणि ते इतर राज्यांतही कामासाठी जातात. त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे हा या भेटीचा मुख्य उद्देश असल्याचे मंत्री राठोड यांनी सांगितले. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा व वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास पात्रतेनुसार योजनेतून आर्थिक मदत दिली जाईल. ऊसतोड कामाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे आणि सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कामगारांना दिवाळीसाठी फराळाची शिधा किट वाटप करण्यात आली. यावेळी आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @SanjayDRathods #ऊसतोडकामगार #दिवाळी
5
4
2,039
District Information Office, Parbhani retweeted
📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यांचे हे सुंदर कौलारु घर... @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
2
18
2
69
10,630
District Information Office, Parbhani retweeted
📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा येथे आगमण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्सुकता आणि उत्साह आहे. ठिकठिकाणी सजावट, रांगोळ्या घातल्या जात आहेत. त्याची ही काही छायाचित्रे.... @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
10
3
7
2,373
District Information Office, Parbhani retweeted
लोकसेवा आयोगामार्फत ( #एमपीएससी ) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ५ हजार ७०७ पदांसाठी जाहीर झालेल्या या परीक्षेत आता आणखी ११ हजार १० पदांचा समावेश करण्यात आला असून, एकूण १६ हजार ७१७ पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यातील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने सादर केलेल्या अंतरिम अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगास प्राप्त झालेल्या अतिरिक्त मागणीपत्रांनुसार पदसंख्येत वाढ करण्यात आली आहे. ▶️या परीक्षेसाठी यापूर्वी २५ जून २०२६ रोजी २ हजार ६१९ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २२ जुलै २०२६ च्या शुद्धिपत्रकाद्वारे आणखी ३ हजार ८८ पदांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे पदसंख्या ५ हजार ७०७ झाली होती. आता नव्याने ११ हजार १० पदांचा समावेश झाल्याने एकूण पदसंख्या १६ हजार ७१७ झाली आहे. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी पात्र उमेदवारांनाही मिळणार आहे. ▶️वाढीव पदसंख्येच्या अनुषंगाने उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच, यापूर्वी अर्ज केलेल्या आणि शैक्षणिक अर्हतेनुसार नव्याने समाविष्ट झालेल्या एकापेक्षा अधिक संवर्गांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना विकल्प सादर करता येणार आहेत. त्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. नव्याने अर्ज तसेच विकल्प सादर करण्यासाठी १३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोगाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ▶️विद्यमान तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर १५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला अभ्यासक्रम लागू राहणार असून परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीने घेण्यात येईल. ▶️सामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या गट-क सेवेतील प्रशासकीय संवर्गांच्या मुख्य परीक्षेचे आयोजन विहित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार करण्यात येणार आहे. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार असून, संबंधित संवर्गांचा अभ्यासक्रम प्राधान्याने तयार करून आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ▶️वाढीव पदसंख्येमुळे नव्याने अर्ज स्वीकारणे आणि यापूर्वी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांकडून विकल्प घेण्यासाठी पुरेसा कालावधी देणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ३ जानेवारी २०२७ रोजी नियोजित असलेली ही परीक्षा आता २४ जानेवारी २०२७ रोजी घेण्यात येणार आहे. ▶️पदसंख्येतील वाढ आणि परीक्षा योजनेतील बदलासंदर्भातील शुद्धिपत्रके आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. उमेदवारांनी या शुद्धिपत्रकांचे अवलोकन करून त्यानुसार पुढील कार्यवाही करावी,असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. @mpsc_office #MPSC
17
19
4
74
13,612
District Information Office, Parbhani retweeted
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेच्या परीक्षा योजनेत २१ नव्या संवर्गांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाने २० मे २०२६ रोजी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेची परीक्षा योजना प्रसिद्ध केली होती. या योजनेतील परिच्छेद १.१ मध्ये सहा संवर्गांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाच्या ५ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, गट-क मधील ज्या संवर्गांसाठी आयोगाला मागणीपत्र प्राप्त झाले आहे, अशा २१ संवर्गांचा आता परीक्षा योजनेत समावेश करण्यात आला आहे. या संवर्गांची यादी परिशिष्ट क्रमांक १ मध्ये देण्यात आली आहे. ▶️समान शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या अन्य संवर्गांसाठी पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत मागणीपत्र प्राप्त झाल्यास, त्या संवर्गांचाही प्रस्तुत परीक्षा योजनेत समावेश झाल्याचे मानण्यात येणार आहे. विद्यमान तसेच नव्याने समाविष्ट होणाऱ्या संवर्गांसाठी वयोमर्यादा २० मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजनेतील परिच्छेद ३.२ नुसार राहणार असून, शासनाच्या वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या निर्णयांनुसार त्यात बदल लागू राहतील. ▶️पूर्व परीक्षेच्या निकाल प्रक्रियेतही सुधारणा करण्यात आली आहे. सामान्य शैक्षणिक अर्हता असलेल्या संवर्गांसाठी उमेदवारांनी अर्जात दिलेला विकल्प आणि भरावयाच्या अराखीव व आरक्षित पदांच्या एकूण संख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची संख्या निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार सामाईक पूर्व परीक्षेतील गुणांच्या आधारे एकत्रित निकाल जाहीर करण्यात येईल. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गांसाठी मात्र स्वतंत्र निकाल जाहीर केला जाणार आहे. ▶️मुख्य परीक्षेच्या स्वरूपातही बदल करण्यात आला आहे. सामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या गट-क सेवेतील प्रशासकीय संवर्गांसाठी विहित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार संयुक्त मुख्य परीक्षा घेण्यात येईल. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या संवर्गांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ▶️एकापेक्षा अधिक संवर्गांसाठी एकच सामाईक मुख्य परीक्षा घेण्यात येत असल्यास, उमेदवारांकडून आवश्यकतेनुसार संवर्ग अथवा सेवेचा विकल्प आणि पसंतीक्रम घेण्यात येईल. तसेच प्रतीक्षा यादीसंदर्भातील तरतुदीतही सुधारणा करण्यात आली आहे. ▶️परीक्षा योजनेतील इतर अटी व शर्तींमध्ये काही बदल झाल्यास त्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल,असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. @mpsc_office #MPSC
14
18
1
93
35,582
District Information Office, Parbhani retweeted
चालू हंगामातील सुमारे ३० गुंठे भातशेतीचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले. अशा कठिण प्रसंगी राज्य शासनाच्या माध्यमातून ५ हजार रुपयांची दिवाळी भेट प्राप्त झाली. ही प्रक्रिया राबविणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करतो - श्रीधर हातणकर, गोठणे दोनिवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
1
5
1
3
2,258
District Information Office, Parbhani retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठी प्रकाशन विश्वात विश्वासार्ह अशी व्यावसायिकता आणि प्रयोगशीलता राबवून अनेक उद्योन्मुख साहित्यिकांची जगाला ओळख करून देणाऱ्या मेहता यांच्या निधनाने साहित्य आणि प्रकाशन क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिवंगत मेहता यांनी पुस्तक विक्रेता म्हणून सुरवात केली. नवनव्या लेखक-कवींचा शोध घेत त्यांचे साहित्य प्रकाशित करून, त्यांना व्यासपीठ निर्माण करून दिले. अन्य भाषांतील साहित्य मराठीत आणि मराठीतील साहित्य अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्याच्या उपक्रमातून त्यांनी प्रयोगशीलता राबविली. त्यांनी वाचक चळवळीलाही पाठबळ दिले. यामुळे अनेक दिग्गज साहित्यिकांसह, नवोदितांनाही रसिक वाचकांशी संवाद साधता आला. व्यावसायिक धडाडी आणि प्रकाशनाविषयीची आत्मीयता यातून त्यांनी प्रकाशित केलेली वैविध्यपूर्ण ग्रंथसंपदा पुढील पिढ्यांसाठी मोठा ठेवा ठरणार आहे. या पुस्तकांच्या रूपाने मेहता यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांच्या निधनाने प्रकाशन विश्व, त्यांच्या परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे. साहित्यिक, वाचक आणि प्रकाशक यांच्या दरम्यानचा मार्गदर्शक दुवा निखळला आहे. या सर्वांच्या दुःखात सहभागी आहोत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #अनिलमेहता #प्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस
5
9
5,710
District Information Office, Parbhani retweeted
दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून ५ हजार रुपये प्राप्त झाल्याबद्दल शासनाचे धन्यवाद - नानाजी शिवा कारेकार, फुर्डी हेट्टी, जि. चंद्रपूर #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
3
7
1
6
1,418
District Information Office, Parbhani retweeted
📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसोबत #दिवाळी साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा (ता. नरखेड, जि. नागपूर) येथे आगमण होणार असल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. शेतीसह विविध प्रश्न मांडण्याची गावकऱ्यांना संधी मिळणार असून ग्रामस्थांना भेटीची उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्री आपल्या गावात येऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत थेट पोहोचतील आणि गावाच्या विकासाच्या अपेक्षांवरही चर्चा करता येईल, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः गावात येत असल्याने या भेटीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गावात आवश्यक तयारी सुरु आहे. @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
1
16
2
23
1,840
District Information Office, Parbhani retweeted
#दुष्काळ घोषित ३०४ तालुक्यांमध्ये जलाशय आणि तलावांमधील लागवडीयोग्य गाळपेरा क्षेत्र शेतकरी व पशुपालकांना अल्पकालीन चारा पिकांच्या लागवडीसाठी भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय - मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड. शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
1
81
District Information Office, Parbhani retweeted
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - परीक्षा योजना - शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. mpsc.gov.in/examination_sche…
2
8
66
19,180
District Information Office, Parbhani retweeted
राज्यात दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आता तालुकास्तरावरही स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या कक्षात स्वतंत्रपणे वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक सेवा प्रभावीपणे राबविता येणार आहेत. दुष्काळग्रस्त भागातील गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची यंत्रणा आता थेट तालुका स्तरापर्यंत नेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला. यासोबत जिल्हा व तालुकास्तरावर आरोग्यविषयक समन्वय समित्याही स्थापन होणार आहेत. हा तालुकास्तरावरील कक्ष केवळ खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ मधील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या सर्व तालुक्यांत स्थापन करण्यात येणार आहे. या तालुक्यांतील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात हा कक्ष सुरू होईल. जिल्हाधिकारी या कक्षात एका स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करतील. त्यांच्या मदतीला लिपिक व टंकलेखक असतील, तर आवश्यक सुविधा गटविकास अधिकाऱ्यांनी प्राधान्याने पुरवायच्या आहेत. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष स्थानिक आमदार, तर उपविभागीय अधिकारी (महसूल) सहअध्यक्ष असतील. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, इंडियन मेडिकल असोसिएशन व केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी सदस्य असतील. कक्ष प्रमुख सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री, सहअध्यक्ष जिल्हाधिकारी, तर जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य सचिव असतील. तर, वैद्यकीय क्षेत्रातील दोन समाजसेवक अशासकीय सदस्य म्हणून या समितीचे काम पाहणार आहेत. सविस्तर वृत्त : mahasamvad.in/220881/ #मुख्यमंत्रीसहायतानिधी #CMRF
5
8
2
6
2,939