Amit Shinde - अमित शिंदे retweeted
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय.
आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे !
खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.
या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.
आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉंबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच !
आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं !
राज ठाकरे ।
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
अमित राजसाहेब ठाकरेंमुळे अखेर सरकारला जाग ...
४ महिने प्रलंबित स्मारकाचे अमितजी ठाकरेंमुळे ४ दिवसात लोकार्पण…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेरूळ येथील पुतळ्याच्या अनावरणाला सरकारला मुहूर्त मिळाला ...
आम्ही श्रेयासाठी नाही,
तर महाराजांच्या सन्मानासाठी केला होता अट्टाहास ...
तमाम शिवप्रेमी, शिवभक्तांचे मनापासून आभार ...
जय जिजाऊ, जय शिवराय !!
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
🚨 Give jobs to local marathi people, or else no aircraft will be allowed to take off from the Navi Mumbai airport: MNS.
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
बोगस मतदार यादी किंवा दुबार मतदार यादी बद्दल निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला असता भारतीय जनता पार्टीला चिड का येते???
आज आशिष शेलार निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते असल्यासारखे बोलले ... त्यांनी शौचालयातील मतदार यांचे नाव नाझमिन गाझी आहे याचा विसर पडू नये ...
जात, धर्म शोधण्याचा आशिष शेलारांकडून केविलवाणा प्रयत्न ...
जात धर्म पक्ष न बघता मतदार यादी स्वच्छ करा अशी भाजपची भूमिका असती तर मनसेकडून निश्चित कौतूक केलं असतं ...
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
भाजपा आणि भाजपची बी टीम असलेल्या निवडणूक आयोगाला
आज खऱ्या मतदारांची ताकद कळली असेल ...
मूक मोर्चा काढून तर उरलेली अब्रू पण भाजपने घालवली ...
निवडणूक आयोगाच्या विरोधात काढलेला देशातला पहिला मोर्चा
मुंबईकरांनी न भूतो न भविष्यती केला…
मुंबईकरांनो तुमचे, अभिनंदन…!!!
#सत्याचामोर्चा
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
बेपारी आहात बेपार करा,आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका.महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं.तूर्तास एव्हढाच
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यानी श्री भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलं का ???
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
नोकरी उरण मद्धे आणि मुलाखती गुजरातमद्धे... मग आम्ही कानफडवलं की आम्हालाच प्रांतवादी-भाषावादी बोलायच...
#Maharashtra अजुनही वेळ गेलेली नाही... जागे व्हा ...
@jmbaxigroup @JNPort @Navimumpolice
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
काही भैय्ये व विशेषतः मराठी भैय्ये हिंदीचे समर्थन करताना मराठी ला आई ची व हिंदी ला मावशीची उपमा देतात. त्यांनी अभ्यास केल्यावर त्यांना कळेल की मराठीच्या मानाने नुकतीच तयार झालेली ही हिंदी भाषा प्रेमळ मावशी नाही तर ‘पुतना मावशी’ आहे.आपली मायमराठी टिकवायची असेल तर या मावशीला चार हात लांब ठेवलेलेच बरे !
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.
केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे.
प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.
आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.
आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेंव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत.
बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही.
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी.
प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? नाही ना ? मग ही जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे.
पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत.
माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा ! आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील.
आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो !
आपला नम्र
राज ठाकरे ।
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
राज ठाकरे ने गंगा और कुम्भ पर जो बयान दिया है,
वही बयान अभी कोई दलित, पिछड़ा नेता दिया होता,
तो सब भाजपाई और The लाल मीडिया
अब तक घाघरा उठाकर लुंगी डांस कर रहे होते,
लेकिन राज ठाकरे के बयान पर किसी की जुबान ना खुलेगी,
क्योंकि बम्बई में सबके धंधे और आना जाना है,
अगर राज ठाकरे के बारे में बोलेंगे,
तो राज ठाकरे के कार्यकर्त्ता सबके
गांव का गुड़गांव बना देंगे,
इसलिए सब चुप हैं,
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र,
कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला , गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही !
कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं ? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला ! मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे.
आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेंव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो !
अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच ! 'लाडकी बहीण'च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का ? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार ! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात ? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ....
हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदू म्हणून एकत्र येताना, प्रत्येक राज्यात तिथली भाषा, तिथली स्थानिक माणसं , तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये. हिंदूत्व आम्ही देखील पुजतो परंतू हिंदूना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लगणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे !
मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका.
मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी.
राज ठाकरे ।
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
पूर्ण व्हिडिओ का टाकला नाही?
ती महिला न्यायासाठी मनसेच्या शाखेत गेली, तेव्हा महाराष्ट्र सैनिकांनी ताबडतोब उचललेले पाऊल दाखवलं का नाही?
मराठी माणसांसाठी मनसे कशी तत्परतेने धावून येते, हे का लपवलं?
@ekikaranmarathi
@mnsadhikrut @RajThackeray
सोशल मीडियावर आलेला हा व्हिडीओ
मुंबई
मलबारहिल विधानसभा
अशा किती घटना अजून ? @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
कायदा करणार आहात की नाही?
मराठी राज्यात मराठी माणसावर दादागिरी, भाषिक अवमान करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाहीचा विधानसभेत कायदा करा.
#लोंढेथांबवा #मराठीहक्क
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
खाजवायची अक्कल नसलेला मुख्यमंत्री होऊ शकतो हे आख्ख्या महाराष्ट्राने सोसलंय!!!
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
उध्दवचे गोरगरिबांना लुटायचे उद्योग पाहून घ्या लोकहो आणि ह्याला कायमचा घरी बसवा
व्हिडिओत एक गरीब पथनाट्य करून पैसे कमावणारा विद्यार्थी आणि सहकारी लोकांना उध्दवने लोकसभेला तब्बल पाच महिने स्वतःच्या प्रचारासाठी राबवून घेतलं आणि अजून एक रूपयाही दिलेला नाही.
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
नालायक उबाठा आणि त्यांचे कार्यकर्ते...
शांतीदुतांच्या मतांसाठी इतके लाचार झालेत की हरामखोरांनी बाळासाहेबांची #हिंदुहृदयसम्राट ही उपाधीच काढून टाकलीय आता...
😡😡
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
“माझ्यावरती अन्याय झालाय हे माझ्याशी तरी कुणी बोलायचं नाही”
- राज ठाकरे
#कट्टरराजप्रेमी 💯🧡
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
सुरक्षित महाराष्ट्रासाठी आता राज ठाकरेच पाहिजे! #RajThackeray #Maharashtra
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
मराठी मुलांच्या नोकऱ्यांसाठी आता राज ठाकरेच पाहिजे!
#VoteForMNS #RajThackeray


























